शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०२०

" गर्भसंस्काराची" त्रिसूत्री...!

Family planning करण्याआधी जाणून घ्या... गर्भसंस्काराची त्रिसूत्री

फोटो आवडला, पत्रिका जुळली, लग्न झाले career झाले चांगले settle झालात. आता बाळासाठी planning करण्याची मनात इच्छा डोकावत आहे बरोबर ना...?

 पण तुम्हाला माहिती आहे का... की आज पर्यंत तुम्हाला सर्व गोष्टींचे knowledge शाळा कॉलेजमध्ये मिळाले आहे. परंतु गर्भातील बाळाचा विकास कसा होतो, ते बाळ आरोग्यसंपन्न व बुद्धिमान जन्माला येण्यासाठी कशी काळजी घ्यावी. तर हे माहितीच असायला हवे.

Friends आपण जर अजाणतेपनाने बाळासाठी planning kela तर बाळाच्या जन्मानंतरच्या येणाऱ्या अडचणींना आयुष्यभरसामोरे लागते.

जसे की अनुवंशिक आजार, बाळा मधील विकृती म्हणजेच अपंगत्व व कुपोषण इत्यादी...

 आता तुमच्या मनामध्ये नक्की प्रश्न आला असेल की   या साठी काय करावे.

Friends आपल्याला पुढील जीवन आपल्या बाळा सहित सुखी आणि आनंदी जावे असे जर मनापासून वाटत असेल तर don't worry हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे...

त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत वाचा....

 वेदांमध्ये सांगितलेल्या सोळा संस्कारांपैकी अतिशय महत्त्वाचा असणारा संस्कार म्हणजे "गर्भसंस्कार" जन्माच्या अगोदरपासूनच गर्भसंस्कारला सुरुवात होते. जन्माआधी तीन संस्कार होत असतात १) गर्भाधान संस्कार २) पुसवन संस्कार  ३) सिमंतोन्नयन संस्कार  या तिन्ही संस्काराचे कॉम्बिनेशन म्हणजे "गर्भसंस्कार"...

१. गर्भाधान संस्कार :-


गर्भसंस्कारा विषयी खरंतर समाजामध्ये एक मोठा गैरसमज आहे तो असा की गर्भसंस्कार हे गर्भधारणा झाल्यावर करायचे असतात. परंतु त्यामुळे काय होतं की आधीपासूनचे शरीरातील दोष घेऊन गर्भसंस्काराला सुरवात होते. परंतु हे असं आहे की विवाहानंतर जेव्हा माता पिता ठरवतात की आपल्याला आता मुल हवं आहे  तेव्हापासून ते गर्भधारणा होईपर्यंत दोघांच्या रिलेशन मधील प्रत्येक गोष्ट वेदात सांगितल्या प्रमाणे लक्षपूर्वक केली जाते. हा खरा गर्भधान संस्कार आपल्या ऋषिमुनींनी सांगितलेला आहे. शारीरिक अडचणी, मानसिक ताण तणाव, आर्थिक अडचणी असे असताना शक्यतो गर्भधारणेचा plan करू नये. आई- वडील जेव्हा मुलं होऊ देण्यासाठी या सर्व गोष्टीने तयार असतील तेव्हाच मुलंं आरोग्यसंपन्न निपजेल. त्यासाठी गर्भधारणा होण्याआधीपासून किमान तीन महिने पती-पत्नीने आरोग्याची संपूर्ण काळजी घेतली पाहिजे. त्या काळात  घरातील वातावरण मंगलमय ठेवावे. सत्व, रज, तम असे गुणांचे तीन प्रकार आहेत. त्यातील आपल्या बाळा मध्ये जर सात्विक गुण जास्तीत जास्त आणायचे असेल तर सात्विक आहार घेतला पाहिजे. "जसे अन्न तसे मन" असं म्हटल जात तसेच सात्विक विचार निर्माण करण्यासाठी ध्यानधारणा... प्राणायाम सुद्धा केले पाहिजे.या सवयी आधीपासूनच लावून घ्याव्यात. 

" शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी"असंही म्हटलं जातं त्यामुळे जवळच्या आयुर्वेदिक केंद्रात जाऊन बीज शुद्धी करून घ्यावी.मासिक पाळी नंतर आठव्या ते पंधराव्या दिवसापर्यंत गर्भधाणा चा विधी केला जातो. बाराव्या ते चौदाव्या दिवसापर्यंत जर हा विधी संपन्न झाला तर होणारे बाळ आरोग्यपूर्ण सुंदर आणि सतेज निपजते. गर्भभधानाच्या दिवशी पती-पत्नींना सात्विक आहार दिला जातो. देवी-देवतांचे स्मरण करून स्वच्छ सुंदर पवित्र शयनकक्षात गर्भधानाचा चा विधि केला जातो. गर्भधानासाठी हिवाळ्याचा काळ उत्तम मानला जातो. रात्रीचे बारा वाजण्या आधीची वेळ उत्तम मानली जाते. या सर्व गोष्टींचा पाठपुरावा केल्यानंतरच मातापिता चांगल्या व सुसंस्कृत बाळाला जन्म देऊ शकतात. म्हणून त्याची तयारी शक्यतो गर्भधारणा होण्यापूर्वी तीन महिने आधीपासूनच करावी.  

२.  पुसवन संस्कार :- 

गर्भधारणा झाल्यापासून ते delivery च्या वेळेपर्यंत च्या  कालावधीमध्ये काय काय करायचे आणि काय काय नाही करायचे याला पुसंवन संस्कार म्हणतात. पुसंवन संस्कार ही नऊ महिने चालणारी प्रोसेस आहे. प्रेग्नेंसी मध्ये प्रत्येक दिवस हा पुसंवन संस्कारासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून पाळी चुकल्यानंतर दहा दिवसांनी लगेच डॉक्टरांकडे जायला पाहिजे. कारण साधारणतः दीड महिन्यात बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकू यायला लागतात. सहा आठवड्यांनी तुम्ही जे काही घरात वागता बोलता आचरण करता ते सगळं बाळाला समजतं. बाळाच्या मेंदूची वाढ तीन महिन्यापर्यंत पूर्ण होते. आपल्याला आपला बाळ बुद्धिमान व हुशार बनवायचा असेल तर हा संस्कार लगेच सुरु करायला हवा. टेस्ट रिपोर्ट positive आला की लगेच डॉक्टरांकडे जाऊन ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. म्हणजे बाळाची स्थिती कशी आहे ते समजते. त्याच बरोबर आहार कसा घ्यावा, कोणता घ्यावा, कोणता घेऊ नये ,योगासने कोणती करावी. प्राणायाम कोणते करावे.  सकारात्मक कसे रहावे. शांत आणि आनंदी कसे रहावे. गर्भ संवाद, प्रार्थना, मंत्रोपचार, संगीत या सर्व गोष्टींसाठी गर्भसंस्कार हा कोर्स जॉईन करावा. त्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टींसाठी मदत मिळेेेते.

३. सीमंतोन्नयन संस्कार :-

 ६वा संपून ७ वा महिना लागला की मातांच्या मनावर तणाव निर्माण होतो. तो असा की माझी delivery कशी होईल...? फार त्रास तर होणार तर नाही ना...? मी सहन करू शकेल का...? असे कितीतरी प्रश्न मातांच्या मनात येऊ लागतात. ती भीती नाहीसी व्हावी, माता मानसिक रित्या बाळाला जन्म देण्यासाठी आनंदाने तयार होऊन बाळाचे स्वागत करण्यासाठी सज्ज व्हावी. यासाठी तिची मानसिक तयारी व्हावी म्हणून सीमंतोन्नयन या.... संस्कारांमध्ये डोहाळे हा उत्सव साजरा केला जातो. कारण सातव्या महिन्यानंतर कधीही delivery ची वेळ येऊ शकते. या उत्साहा मध्ये मातेला राणी सारखेे सजवले जाते. घरातील मंडळी, नातेवाईक, मैत्रिणी व इतर महिला एकत्र येऊन गर्भवती मातेचे पूजन करतात ओटीभरण करतात. तिला भेटवस्तू देतात. अशाप्रकारे आनंदाने.... उत्सव साजरा करुन त्या मातेची मनस्थिती आनंदी बनवून तिला खूष केले जाते. हा उत्सव त्या मातेला delivery ची मानसिक तयारी करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी बनवला आहे. मातेेला वाटलं पाहिजे की मी आता बाळाला जन्म देण्यासाठी आनंदाने तयार आहे. बघा किती छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून आपल्या ऋषी-मुनींनी एक संस्काराच  बीज समाजामध्ये पेरलं आहे. तर मग आपण या सर्व गोष्टी आपल्या जीवनात अंगीकारल्या तर आपल्या जीवन किती आनंद निर्माण होईल. आपल्या या परंपरेला आपण वैज्ञानिक दृष्ट्या पाहिलं पाहिजे. आपल्या जीवनात या गोष्टींचा आपण उपयोग केला पाहिजे. जुन्यापुराण्या गोष्टी व पुराने विचार म्हणून आपण अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे आपल्या जीवनात पुढे आपल्याला अडचणींना सामोरे जाावे लाागते.

विवाहानंतर मूल होऊ देण्यासाठी जेव्हा मातापित्यांची मानसिक तयारी होते तेव्हापासूनच गर्भसंस्काराची सुरुवात होते. हे गर्भाधान संस्कार मध्ये सांगितलेले आहे. परंतु आपला आता पाचवा महिना चालू आहे किंवा सातवा महिना चालू आहे मग आता गर्भसंस्कार केले तर याचा फायदा होईल का...? असं तुम्हाला वाटत असेल तर don't worry यापुढील जेवढा वेळ बाकी आहे तेवढ्या वेळासाठी गर्भसंस्कार समजून घेतला आणि राहिलेल्या वेळामध्ये मनापासून follow केला तरी चालेतो. यासाठी चिंता करण्याची गरज नाही. आपल्या ऋषी-मुनींनी अधुरे knowledge दिलेले नाही. त्यासाठी प्रत्येक गोष्टीचे solution दिलेले आहे. म्हणजे याचा अर्थ असा की गर्भ- संस्कारा मध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्या त्या गोष्टी वेळ वाया न घालवता मनापासून सुरू केल्या तर अगदी पहिल्या महिन्यापासून मिळालेला फायदा बाकीच्याही महिन्यांमध्ये बाकीच्या वेळेत मिळतो यात शंका नाही.

हा ब्लॉग पूर्ण वाचल्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे.

चला तर मग आपल्या बाळाचे भविष्य उज्वल बनविण्यासाठी व येणाऱ्या पाहुण्याचे आनंदाने स्वागत करण्यासाठी तयार व्हा.

 सकारात्मक विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी व समविचारी लोकांच्या  community मध्ये सामील होण्यासाठी क्षणाचाही विलंब न करता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. आणि community जॉईन करा. 

तुम्हाला काही प्रश्न आसतील तर तुम्ही मला नक्की विच्यारु शकता WhatsApp (9922969278) केले तरी चालेल.

२१ व्या शतकातील गर्भसंस्कार

         ब्लॉग वाचून अभिप्राय नक्की द्या...

         गर्भसंस्कार मार्गदर्शक

         अलका शिंदे

          धन्यवाद !




शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०२०

"गर्भसंस्कार"?का करावे...!

   "गर्भसंस्कार? का करावे"        महत्वाची दोण कारणे...

  १) आजच्या तरुण पिढीचे वर्तन...

आजकाल टिव्ही, वर्तमानपत्र, व सोशलमिडीयावरील बातम्यांमध्ये सतत चोऱ्या,दरोडे,बलात्कार आत्महत्या, आणि व्यसनाधीन झालेल्या मुलांबद्दल आपल्या पाहायला मिळते...
 हे कुठल्या शाळेत शिकवल जातय ? तर  नाही... 
मग याला जबाबदार कोण...
 याचा आपण कधी विच्यार केलाय ?
आता तुम्ही म्हणाल गर्भसंस्काराशी याचा काय संमध ?
असा प्रश्न तुमच्या मनात येत आसेल तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे..
त्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा...

नमस्कार मंडळी 🙏

मी अलका शिंदे...

गर्भसंस्कार मार्गदर्शक...

२१ व्या शतकातील गर्भसंस्कार या प्लॅटफॉर्मची संस्थापिका...!

मला येत्या पाच वर्षात महाराष्ट्रातील एक लाख गर्भवती मातांपर्यंत  पोहचायचे आहे आणि त्यांच्या गर्भातील बाळांवर सुसंस्कार करून त्यांना सुदृढ, बुद्धिमान सर्वगुणसंपन्न आणि सक्षम असे देशाचे नागरिक मला घडवायचा आहे आणि हा माझा ध्यास आहे...!

२) आई-वडिलांच्या मुलांबद्दल च्या अपेक्षा....

 प्रत्येक आई-वडिलांना वाटत असतं की आपला बाळ स्वामी विवेकानंद भावा बिल गेट्स त्याहीपेक्षा मोठे स्वप्न आई-वडील पाहात असतात ते म्हणजे आपल्या होणाऱ्या बाळाने अगदी शिवाजी महाराज म्हणजे त्यांच्यासारखा महान व्हावा

मग बघुया कसे घडले" छत्रपती शिवाजी महाराज " ...!


 छत्रपती कोणत्या विद्यापीठात गेले नाहीत की छत्रपती कोणत्या शाळेत गेले नाही.तेआसही कुठे शिकले की सध्याच्या मुलांना जे शिक्षण मिळत आहे. असं काहीच त्यावेळी झालेले नाही "गर्भात उमलली संस्काराची रीत"हे छत्रपतींच्या चरित्रातील वाक्य आहे. यावरून असं लक्षात येत की छत्रपतींवर गर्भामध्ये संस्कार झाले आहेत. जिजाऊ आऊसाहेब छत्रपती पोटात असताना स्वतः घोड्यावरती बसायच्या. प्रवास करायच्या संगमनेर जवळील पेमगिरी ते जुन्नर जवळील शिवनेरी हा दर्‍या खोर्‍यांचा प्रवास करून जिजाऊंनी एका दिवसात शिवनेरी किल्ला गाठला हा प्रवास त्यांनी शिवरायांच्या जन्माच्या आदल्या दिवशी घोड्यावरुन केला. त्या स्वतः तलवार चालवायच्या दांडपट्टा चालवायच्या स्वतः भालाफेक खेळायच्या दादोजी कोंडदेव हे छत्रपतींचे गुरू त्यांच्या जन्मानंतर झाले. परंतु छत्रपतींचे मूळ गुरु ह्या माता जिजाऊच आहेत आणि याला इतिहास साक्षी आहे. यावरून असं लक्षात येतं की बाळ गर्भात असताना संस्कार करण्याची जबाबदारी ही आईचीच आसते. आई ज्या ज्या गोष्टी करते त्या त्या गोष्टी बाळ आत्मसात करीत असते. त्यासाठी आपल्याला आपला बाळ शिवाजी महाराज व्हावा असं जर वाटत असेल तर आपल्याला प्रथम जिजाऊ व्हावे लागेल. अशीच स्री शिवाजी महाराजांना जन्म देऊ शकेल आणि मग तिला जे मूल होईल ते मात्र छत्रपतीं सारखे सिंहच बनेल.


 आता का करायचे गर्भसंस्कार हे जा.   घेऊया ..

जन्माला येण्यापूर्वीच शिकण्याचे अद्भूत सामर्थ्य गर्भाला असते. त्याच्यावर विशिष्ट पद्धतीने चांगले संस्कार घडवता येतात. परंतु त्याच बरोबर... मुलाचा जन्म कसा होतो... मन म्हणजे काय... त्याला इच्छा कशी होते... मन व शरीर याचा संयोग कसा होतो.. इत्यादी तात्विक प्रश्नांची चर्चा गर्भसंस्कारामध्ये केली जाते. असे अनेक वैशिष्ट्ये या वर्गात असतात. तसेच गर्भात असताना त्या जीवाला मानसिक अस्तित्व असते. म्हणून या अवस्थेत चांगले विचार त्याला ऐकवले तर ते मुल ते ग्रहण करते हे संशोधकांनी सिद्ध केले आहे. म्हणूनच असे संस्कार करण्यासाठी....

"२१व्या शतकातील गर्भसंस्कार" हा कार्यक्रम मी हाती घेतला आहे. 


तात्पर्य: काही वर्षातच जन्मपूर्व संस्कार झालेली पिढी समाजात चांगला ठसा उमटवेल आणि अधिक परिणाम कारक ठरेल याची मला खात्री आहे....

तर मंडळी हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला असल्यास मला.... कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अधिक माहितीसाठी माझा फेसबूक ग्रुप खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन करा....

२१ व्या शतकातील गर्भसंस्कार

धन्यवाद 🙏

मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०२०

गर्भसंस्कार म्हणजे काय ? परिपूर्ण माहिती...


र्भधारणा झाल्यापासून 
तुमच्या मनामध्ये हे सगळे प्रश्न येताहेत का?
सध्याच्या परिस्थितीमध्ये covid-19 मुळे सर्वत्र वातावरण निगेटिव्ह झालेले आहे. अशा परिस्थितीत गरोदरपण म्हणजे एक समस्या आणि भीती मातांच्या मनामध्ये घर करून आहे. माझं बाळ कोरोना पॉझिटिव तर  होणार नाही ना? माझ्या बाळाला काही होणार तर नाही ना ? मिस कॅरेज तर  होणार नाही ना? असे अनेक प्रश्न  मातांच्या मनात येतात. अशा परिस्थितीत माता द्विधा अवस्थेमध्ये आहेत. कारण सगळीकडे म्हटलं जातं की या भयान परिस्थितीमध्ये पॉझिटिव राहणं गरजेच आहे...
'आता गुडन्यूज तर आली...!




मी नक्की आनंदी आहे की दु:खी आहे हे कळत नाहीये...!!
ह्या  सगळ्या समस्या दूर होवून तुमचा नऊ महिन्याचा प्रवास आनंदी, प्रसन्न आणि सुखकर व्हावा आस जर तुम्हाला मनापासून वाटत आसेल तर   don't worry हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत वाचा.
नमस्कार शिंदे गर्भसंस्कार मार्गदर्शक सेल्फ कोच"२१व्या शतकातील गर्भसंस्कार" या समूहाची संस्थापिका. मला येत्या पाचवर्षात १लाख गर्भवतींच्या जीवणामध्ये सकारात्मक बदल घडवून त्यांच्या गर्भातील बाळांवर सुसंस्कार करायचे आहे. त्यांना सुदृढ सर्वगुणसंपन्न आणि सक्षम असे देशाचे नागरिक मला घडवायचे आहेत आणि हा माझा ध्यास आहे..!बाळाला जन्म देणे ही सर्वांंत महत्त्वाची आणि आनंददायी घटना आहे. हे कार्य आपल्या हातून होत आहे...त्याबद्दल तुमचं मनापासून आणि हार्दिक अभिनंदन
  •  

 तुमच्या आणि तुमच्या कुटुंबीयांच्या दृष्टीने ही घटना अत्यंत अमुल्य अशीच आहे. तुम्ही सर्व माता पिता उद्याच्या भावी पिढीविषयी अत्यंत जागरूक आहात तुम्हाला सर्वांना मनापासून वाटते आहे की आपले होणारे बालक बुद्धिमान आणि आरोग्य संपन्न आणि सक्षम व्हावे त्यासाठी एकच उपाय आहे तो म्हणजे गर्भसंस्कार..

सर्वप्रथम आपण"संस्कार" म्हणजे काय हे जानुन घेऊया

कोणताही कार्य सातत्याने करने व त्यामुळे होणारा  गुणात्मक बदल.. म्हणजेच एखाद्या व्यक्ती मधले चांगले गुण वाढविणे आणि त्यासाठी त्या व्यक्तीला प्रोत्साहन देणे व त्याच बरोबर त्या व्यक्ती मधले असलेले दोष कमी करणे म्हणजे "संस्कार"...संस्काराचा आणखी एक अर्थ आहे तो म्हणजे "शुद्ध" करणे जसे की सोने तापून शुद्ध करतात तसेच " संस्कार"हे कष्टसाध्य आहेत..... 

हे"संस्कार" सतत आणि निरंतर करत राहिल्यास त्याचा तसाच परिणाम आपल्याला बघायला मिळतो...कबीर म्हणतात..."करत करत अभ्यास की जडमती हो सुजाण"!... "रसरी आवत जात के शिलपर पडतं निसान"!! म्हणजे सतत पडणाऱ्या दोराच्या घर्षणाने कठीण दगडावर देखील निशान पडते त्याच प्रमाणे सातत्याच्या अभ्यासाने मूर्ख सुद्धा अगदी ज्ञानी बनतो . 
हाच "संस्कार" नवूू महिन्याच्या प्रवासात गर्भावर केला जाऊन त्याचा जो सकारात्मक परिणाम पहायला मिळतो..
 
गर्भसंस्कार? म्हणजे काय..?


गर्भावस्थेच्या दरम्यान आईने चांगले व सकारात्मक विचार करणे व नैतिक मूल्य तसेच बाळामध्ये जन्मतः चांगले गुण रुजविणे म्हणजेच गर्भसंस्कार होय!
बाळाचां शारीरिक, मानसिक, भावनिक व अध्यात्मिक विकास हा गर्भात असल्यापासूनच सुरु होतो. आणि याच काळात त्याचा व्यक्तिमत्व personality विकास होतो. रिसर्च अनुसार विचार केला तर बाळाच्या मेंदूचा ८०% विकास हा गर्भामध्येच होतो. हे विज्ञानाने देखील सिद्ध केले आहे.भारतीय संस्कृती नुसार गर्भात असल्यापासूनच बाळाला चांगले शिक्षण देणे गरजेचे आहे.

 आयुर्वेदशास्त्रामध्ये एकूण सोळा संस्कार सांगितलेले आहेत ते माणसाच्या जन्मापासून मरेपर्यंत होत असतात. त्यापैकी गर्भसंस्कार हा अतिशय महत्त्वाचा संस्कार आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. बाळ प्लॅनिंग करण्याअगोदर तीन महिन्यापासून डिलेवारी होईपर्यंत नऊ महिने हा संस्कार केला जातो. बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी गर्भसंस्कार अतिशय महत्त्वाचा ठरतो.    वैद्यकीय शास्त्रानेदेखील गर्भसंस्काराचे महत्त्व मान्य केले आहे. गर्भधारणा होण्याआधी पासूनच गर्भावर संस्कार होत असतो. जसे आईवडिलांचे विचार तसाच परिणाम बाळावर होत असतो. बाळ जन्माला येणाऱ्यापूर्वीच आईने  बाळाच्या भविष्याविषयी सकारात्मक विचार केले तर जन्माला येणारे बाळ त्याप्रमाणेच प्राप्त होते. याची साक्ष पुरातन काळात घडून गेलेली अनेक उदाहरणांनी दिले आहे.

पुरातन काळातील गर्भसंस्कार आ विषयी काही उदाहरणे पाहूया.

राजमाता जिजाऊ व शिवाजी महाराज


शिवाजी महाराजांच्या जन्माआधीच मुघलांनी भारतावर अधिराज्य गाजवण्यास सुरूवात केली होती. मुघलांच्या अत्याचारामुळे प्रजा त्रस्त झाली होती. जिजाबाईंना प्रजेची ही अवस्था पाहून त्रास होत असे. त्याचवेळी त्यांच्या मनात राष्ट्रसंरक्षणासाठी एखाद्या सत्पुषाचा जन्म आपल्या पोटी व्हावा अशी ईच्छा निर्माण झाली होती. जिजामाता त्यावेळ गरोदर होत्या आणि असं म्हणतात की, जिजामाता यांना शिवाजी महाराज पोटात असताना घोड्यावर बसण्याचे, तलवार बाजीचे, दांडपट्टा चालवण्याचे डोहाळे लागले होते. जिजामाता यांच्या या दिव्य आणि क्रांतीकारक विचारांमधूनच शिवाजी महाराजांकडून स्वराज्याची निर्मिती झाली. ज्यामधून गर्भसंस्कारांचे महत्त्व नक्कीच पटू शकते.

वीर अभिमन्यू:



 महाभारतामधील अभिमन्युची गोष्ट आपल्या सर्वांना माहितीच आहे. ही गोष्ट गर्भसंस्कार बाबत सांगितली जाते. श्रीकृष्णांनी आपली बहिण सुभद्रेला अभिमन्यु पोटात असताना चक्रव्यूहभेदन कसे करावे हे सांगितले होते. गोष्ट  सांगत असताना सुभद्रेला झोप त्यामुळे पुढील गोष्ट तिने ऐकली नाही चक्रव्यूह मधून बाहेर येण्याचे ज्ञान घेणे राहून गेले.  गर्भात असताना अभिमन्यू नेते आत्मसात केले होते. महाभारतील महायुद्धात जेव्हा अर्जुन जवळ नसताना पांडवांवर चक्रव्यूह भेदन करण्याची वेळ आली तेव्हा तेवीस वर्षांच्या अभिमन्युला गर्भात असताना ऐकलेली चक्रव्यूह भेदन करण्याची गोष्ट आठवली व अभिमन्यूने चक्रव्युहात भेदन केले व त्याला बाहेर येण्याचे कळले नाही. यावरून असे सिद्ध होते की आईने केलेली प्रत्येक गोष्ट बाळा पर्यंत पोहोचते.


स्वामी विवेकानंद:

स्वामी विवेकानंद यांनी एकदा त्यांच्या आई भुवनेश्वरीला प्रश्न विचारला होता की, “मी माझ्या जन्माआधी कुठे होतो? तेव्हा त्यांच्या आईने त्यांना उत्तर दिले. की, आईने उत्तर दिले कि तू माझ्या पोटात होतास . यावर विवेकानंदांचे समाधान झाले नाही त्यांनी पुन्हा प्रश्न की, मी पोटात असण्या आधी कुठे होतो? विवेकानंदांची आई ती... तिने पटकन उत्तर दिले की बाळ तू माझ्या पोटात बसण्याआधी माझ्या विचारात होतास.” शिवाय विवेकानंदांची आई भुवनेश्वरी स्वामी विवेकानंद पोटात असताना ध्यानधारणा करत असत त्यामुळे विवेकानंद लहानपणापासून ध्यानविद्या जाणत होते. तसेच तिला कीर्तन प्रवचन व गायनाची देखील आवड होती. आणि तेच कोण त्यांच्यामध्ये उतरले. यावरून गर्भसंस्कारांचे महत्त्व प्राचीनकाळापासून चालत आले आहे असे सिद्ध होते. त्यामुळे प्रत्येक गर्भवती मातेला गर्भ संस्काराचे महत्त्व कळाव. व तिच्या गर्भावर संस्कार व्हावे.
यासाठी "२१व्या शतकातील गर्भसंस्कार" हा कार्यक्रम मी हाती घेतला आहे. तो असा की.... विशिष्ट विचारस्पंधनांनी गर्भाचे स्वागत करणे. त्याच्यावर सुसंस्कार करणे, त्याच्या माता-पित्यांना धीर देणे, आणि विशेष पद्धतीने बळ देणे ही "२१व्या शतकातील गर्भसंस्कार  " मधील सुसूत्र योजना आहे.
तात्पर्य : आयुर्वेदामध्ये ऋषिमुनींनी शास्त्राच्या आधारे वर्णन केलेली ही एक आचरण पद्धती आहे. गर्भवतीचा आहार कसा असावा तिचा विचार आचार यांचा नकारात्मक किंवा सकारात्मक प्रभाव तिच्या गर्भावर पडतो. व बाळ गर्भात असतानाच बाळाच्या मेंदूचा 80% विकास होतो. हे संशोधनाने सिद्ध झाले आहे. म्हणून गर्भवतीस्त्रीने गर्भधारणेच्या नियोजनापासून किंवा गर्भ पोटात असण्याची जाणीव झाल्यापासून ते सुख प्रसूती होऊन बाळाची तब्येत स्थिर होण्याापर्यंत ज्या ज्या वेळी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्या गोष्टी बाळाला पुरविल्या जाव्यात यासाठी मातेच्या शरिराला तयार करण्याचे काम गर्भ संस्कारामध्ये केले जाते. त्यासाठी तीने जाणीवपूर्वक गर्भसंस्कार या विषयी माहिती करून घेतली व त्याप्रमाणे आचरण केल्यास गर्भसंस्कार हे बाळाच्या उज्वल भविष्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरतील व भावी पिढी सर्वगुणसंपन्न होण्याच्या दृष्टीने हा एक सकारात्मक निर्णय असेल यात शंका नाही म्हणून  मैत्रीनींनो आपल्या लाडल्यावर सूसंस्कार  करून घेण्यासाठी क्षणाचाही विलंब न करता योग्य निर्णय घ्या...
आपल्याला हा  ब्लॉग आवडला आसल्यास कमेन्टबाँक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.सकारात्मक व आनंदी राहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून"२१ व्या शतकातील गर्भसंस्कार" हा फेसबूक ग्रुप जाँईन्ड करा.


पेज

१६ "संस्कार"

संस्कारांवर आधारित  भारतीयसंस्कृती भारत देश हा खेड्यापाड्यांचा देश, सामाजिक, राजकीय, वैज्ञानिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा अनेक विषयांमध्ये पु...