शनिवार, २० मार्च, २०२१

बाळ होण्यापूर्वी भाग-४

यशस्वी पालकत्व एक कला...!

प्रथम आपण कला म्हणजे काय हे जाणून घेऊया...

एकदम साध्या अर्थाने बघायच असेल तर कला म्हणजे आपल्यातील कुशलता. आपण अशी काही एखादी गोष्ट करून दाखवतो की, त्यामध्ये आपण अतिशय तज्ञ असतो.
कोणतीही गोष्ट आपण खूप चांगल्या प्रकारे  करून दाखवली तर त्यामध्ये आपण तज्ञ आहे... म्हणजेच आपल्या मध्ये ती कला आहे असे समजावे.
मित्रांनो आज आपण जाणून घेऊया की आपल्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे स्कील आहे. आपण कोणत्या गोष्टींमध्ये तज्ञ आहे. पुढील काळात आपल्याला कोण कोणत्या गोष्टी शिकण्याची गरज आहे. 
बरोबर ना..? 
तर मित्रांनो सगळ्यात आधी मी तुम्हाला एक प्रश्न करते की....
कला कोणकोणत्या? प्रकारच्या असतात...! आणि तुम्हाला काय? वाटतंय की कला किती? प्रकारच्या असतात...! ते तुम्ही कमेंट मध्ये टाईप करू शकता.
तुम्ही तुमच्या पद्धतीने विचार करा की... अशी कोणती कला तुम्हाला अवगत करावीशी वाटते. की जी अत्यंत महत्त्वाची आहे. मग त्यासाठी तुम्ही तुमचे "आत्मपरीक्षण करा...!" . आत्मपरीक्षण केल्यावर तुम्हाला नक्कीच कळेल की आपल्यामध्ये कुठली? कला असणे आवश्यक आहे...!  त्यामध्ये प्रगती केल्यास आपल्याला त्याचा खूप फायदा होईल. आणि ती आहे...

स्वतःचे व्यवस्थापन कौशल्य


हे कौशल्य आपल्यासाठी खूप खूप आणि खूप महत्वाचे आहे. कारण स्वत:च्या जीवनाचे व्यवस्थापन करण्याचे कौशल्य ज्याच्या मध्ये असते... तोच पालकत्व निभावण्या मध्ये यशस्वी होऊ शकतो. कारण आपण मुलांचे रोल मॉडेल असतो. कौशल्य कितीतरी प्रकारचे आहेत. त्यापैकी पालकत्व निभावणे हे सुद्धा एक कौशल्य आहे. आणि ते खूप महत्त्वाचे आहे ज्याला स्वतःचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करता येते... ते व्यवस्थापन करण्याचे कौशल्य ज्याच्या मध्ये असते...
तोच कोणतेही कौशल्य आत्मसात करू शकतो.
 पटतय ना...! 
तुम्हाला जर ही गोष्ट पटत असेल तर कमेंट मध्ये मला नक्की सांगा.

प्रत्येक पालकाचे आपल्या बाळा विषयी खूप मोठे स्वप्न असते. प्रत्येक पालक आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी सर्व काही करत असतो. प्रत्येकाला वाटत असते की आपला बाळ खूप हुशार असावा, त्याने आपलं नाव रोशन करावं, त्याचं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असावं. पण मित्रांनो तुम्हाला हे तुमचं स्वप्न सत्यात उतरवायचं असेल... तर त्याआधी तुम्हाला स्वतःचे व्यवस्थापन कौशल्य शिकावेच लागेल. 
बरोबर ना...!
तर स्वतःचे व्यवस्थापन कौशल्य आपल्या मध्ये कसे आणायचे... हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. त्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. 
ती म्हणजे..
"कितीतरी लोकांचा असा गैरसमज असतो की...उदा.माझे मित्र किंवा माझ्या मैत्रिणी खूप चांगले पालकत्व निभावतात पण मला ते येईल का. किंवा काही मित्र असे असतात की ते पालकत्व निभावण्यामध्ये सक्सेस होत नाही. मग त्यांच्या अनुभवावरून आपल्या सुद्धा मनामध्ये गोंधळ चालू असतो.आणि मग मनामध्ये द्विधा अवस्था निर्माण होते.
कित्येक लोकं असे फील करतात. की मला ते जमणार नाही...
 परंतु 'असं नाही मित्रांनो... आपण त्यांच्यापेक्षाही खूप चांगलं करू शकतो. आपल्या सर्वांमध्ये ते टॅलेण्ट असतेच'...!
त्यासाठी आपल्याला एक गोष्ट करायची आहे. ती म्हणजे आपण आपली तुलना दुसऱ्यांशी करायची नाही. कारण आपण जेव्हा दुसऱ्याशी तुलना करतो.. तेव्हा याचा अर्थ असा की आपण स्वत:ला किंमत देत नाही. तर आपण स्वतःची बेइज्जती करत आहोत मित्रांनो आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत. त्यामुळे आपण एक गोष्ट सोडायला हवी... स्वतःला सांगा की आज पासून मी कुणाच्याही सोबत माझी तुलना करणार नाही. कारण की मी इतरांपेक्षा वेगळा आहे. मी लाजवाब आहे. त्यासाठी...
आत्मपरीक्षण करा:


आपण आता आपले आत्मपरीक्षण करण्यासाठी स्वतःला वेळ द्यायचा आहे. आणि आपल्यासाठी थोडासा वेळ काढायचा आहे.एक अशी जागा निवडा की त्या ठिकाणी आपल्याला कोणीही डिस्टर्ब करणार नाही. आपण एका असणावरती मांडी घालून बसा. आपले दोन्ही हात मधोमद एकावरती एक ठेवून आकाशाच्या दिशेने सुलट ठेवा. तीन दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडताना शांत झाल्याचा अनुभव घ्या.
आपले संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करा. आज आपल्याला जाणून घ्यायचे आहे की स्वतःची तुलना कुणा बरोबरही का करायची नाही. कारण आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत. प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टॅलेंट असते. नेहमी लक्षात ठेवा की आपण फार वेगळे आहोत. आपल्यासारखे या जगामध्ये कोणीही नाही. डोळे बंद करा व आता मी देत असलेल्या सूचनांकडे पूर्णपणे लक्ष द्या. "होय मित्रांनो मी तुमच्याशी बोलतच आहे. 
तुम्ही पालक होऊ इच्छिता...! तुम्ही बाळाचा प्लॅनिंग करताय...!! त्यामुळेच तर तुम्ही हा ब्लॉग वाचत आहात ना...!!!
"तर फ्रेंड्स मी तुमच्याशीच बोलत आहे"!होय...! तुम्ही इतरांपेक्षा फार वेगळे आहात. तुमच्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत. तुम्ही जे ही करू पाहाता ते तुम्ही करू शकता. होय मी तुम्हालाच सांगते आहे. की आपण जे हाती घेतले... ते तुम्ही करू शकता. आपल्या मध्ये खूप खूप खूप शक्ती आहे. कारण आपण इतरांपेक्षा फार वेगळे आहोत. होय...! आपण फार वेगळे आहोत.. होय...! आपल्या अंतर्मनामध्ये डोकावून पहा त्याला विचारा की मी खरच? इतरांपेक्षा वेगळा आहे...! तर होय मित्रांनो...! आपल्या आतून नक्की आवाज येईल. जर आपण ऐकू शकत नसाल तर ऐकण्याचा प्रयत्न करा.... 
आपल्या "अंतर्मनातील आवाजला" ...! 
कारण आपण खरोखर इतरांपेक्षा फार वेगळे आहोत. आपल्या आत खूप मोठ्या प्रमाणात,अमर्यादशक्ती आहे. जी पाहिजे ती गोष्ट आपण करू शकतो. आपल्या अंतर्मनातील आवाज ऐकून तर बघा... आपण इकडे तिकडे भटकत आहोत.
 होय मित्रांनो आपण सतत इकडे तिकडे भटकत असतो. जरा एकदा स्वतःला प्रश्न विचारा आपलं मन काय सांगते. आपल्याला आपलं मन एकच सांगत आहे. की तुला जे ही करायच आहे ते तू करू शकतो /ते तू करू शकते. आपण नेहमी स्वतःची तक्रार करतो... की मी हे करू शकत नाही? ते करू शकत नाही..! पण जाऊद्या...!
 प्रत्येकामध्ये काही ना काही तरी कमी असते. सर्व बाजूने कोणीही परफेक्ट नसतो. व आपणही नाही. आणि आपण परफेक्ट बनण्याच्या मागे लागलात तर पूर्णपणे परफेक्ट बनू शकणारही नाही.मग का परफेक्ट बनण्याच्या चक्कर मध्ये आपला वेळ खर्च करत आहात. सोडून द्या मित्रांनो आणि आपण आपल्याला विचारा की मी हे करू शकतो का..? तर आपलं मन आपल्याला नक्की उत्तर देईल. की "होय मित्रा.. तू करू शकतो"...! तु का थांबलास ...

तर फ्रेंड्स मी तुम्हाला हे सांगत आहे.की  "होय... तुम्ही करू शकता", तुम्ही हे करू शकता...! तुम्ही तुमचे पालकत्व निभावून शकता...!!जे पाहिजे ते तुम्ही करू शकता..!!! कारण तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात...! आपल्या मनामध्ये एकच गोष्ट सुचवा की आपण खूप वेगळे आहोत. होय तुम्ही वेगळे आहात, तुम्ही वेगळे आहात, इतरांशी तुलना करू नका, तुम्ही खरोखर वेगळे आहात, युनिक आहात...! स्वतःशी बोला"आय एम युनिक पर्सनॅलिटी. या जगामध्ये माझ्यासारखी एकही व्यक्ती नाही. या दुनियेत माझ्यासारखं एकही जन्माला आलेला नाही. आणि यापुढेही कधी येणार नाही. एक दीर्घ श्वास घ्या आणि आपल्या आतील आत्मविश्वासाचा सुंदर अनुभव घ्या. आपली कोणाशी अजिबात बरोबरी नाही. तर मग का आपण आपला वेळ वाया घालवतोय. दुसऱ्यांबरोबर तुलना करून आपण इतरांसारखे बनू शकत नाही. हा...!
 हे मात्र नक्की आहे की आपण इतरांचे गुण आपल्यामध्ये घेऊ शकतो. पण इतरांसारखे बनू शकत नाही. त्यामुळे इतरांसारखे बनण्याचे प्रयत्न सुद्धा करू नका. कारण तुम्ही... युनिकआहात.

 स्वतःला सांगा आय ॲम युनिक💪...! अतिशय एनर्जीने बोला... की एस आय एम युनिक💪...! युनिक पर्सनॅलिटी💪...! एक दीर्घ श्वास घ्या आणि आपल्या आतील कॉन्फिडन्स चा अनुभव घ्या...!
आपण दुनियेमध्ये कशासाठी आलो आहोत. काहीतरी वेगळं करण्यासाठी आलो आहोत. आपल्यालाही कोणीतरी जन्म दिला आहे. तसाच आपल्याला आपल्या बाळाला जन्म द्यायचा आहे. त्याचे पालन पोषण उत्तम प्रकारे करायचे आहे. त्याला महान बनवायचा आहे. आणि ही माझी जबाबदारी आहे. हे माझं कर्तव्य आहे. असं स्वतःला सांगा. आतापर्यंत जे इतरांनी केले नाही... ते मला करून दाखवायचे आहे... की 
जे माता जिजाऊंनी केले.

त्या पण एक माणूस होत्या. त्यांनी केलं तर मी का? करू शकत नाही...! आपल्या आंतर मनामध्ये ही गोष्ट रुजवायची आहे कि मी एक आदर्श माता/बनू शकते ,एक आदर्श पिता बनू शकतो. कारण मी इतरांपेक्षा वेगळा आहे. मी इतरांपेक्षा वेगळी आहे,
 येस आय एम युनिक💪 आय ॲम  युनिक💪 होय..मी करू शकते/मी करू शकतो. येस आय ॲम युनिक पर्सनॅलि💪
आपल्या मनातल्या मनात बोला की होय मी करू शकते/होय मी करू शकतो. माझ्या इच्छेप्रमाणे सर्व काही मी करू शकते. माझ्या इच्छेप्रमाणे मी बनू शकते/ मी बनू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण खरोखर इतरांपेक्षा फार वेगळे आहात.
कारण "आपण आतापर्यंत जे करत आलो... तेच करत राहिलो, तर आपल्याला तेच मिळत राहील... जे आत्तापर्यंत मिळत आला आहे...!
आपले दोन्ही हात एकमेकांवर रफ करा.व डोळ्यावरून चेहऱ्यावरून फिरवून घ्या. संपूर्ण एनर्जी आपल्या शरीरामध्ये फ्लो करा.व आता आपले डोळे हळूवारपणे उघडा...😊
 तर मित्रांनो आपल्याला आता समजल आहे की आपण इतरांपेक्षा खरोखर वेगळे आहोत.या जगामध्ये आपल्यासारखी दुसरी कोणतीही व्यक्ती निर्माण झालेली नाही. 
प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वतःचे कौशल्य असते आपल्या मध्ये सुद्धा ते आहे.. गरज आहे फक्त शोध घेण्याची. आपल्यामध्ये जर तो न्यूनगंड असेल तर आजच त्याला आपल्या मधून बाहेर फेका. आणि स्वतःवर काम करा स्वतःची शक्ती ओळखा खंबीर पालकत्व निभवन्याची जबाबदारी घ्या, आपल्या बाळाला आपल्याला कशासाठी जन्म द्यायचा आहे, त्याला काय बनवायचा आहे हे निश्चित करा. कारण आपण जसा विचार करतो तसाच आपला बाळ निर्माण होतो हा प्रकृतीचा नियम आहे. 
उदा. शेतकरी आपल्या सुपीक जमिनी मध्ये बी कसा पेरेल त्यावर त्याचे पीक अवलंबून असते, 
बी जर चांगल्या प्रतीचे पेरले तर पीक भरघोस येईल.

अगदी त्याच प्रमाणे आपल्याला जे पाहिजे त्यासाठी आपण पहिला निश्चय केला तर त्याच प्रमाणे आपल्याला मिळणार आहे. आणि तो निश्चय तुम्ही आज नक्की करणार आहात. याची मला खात्री आहे. तर निर्णय घ्या निश्चय करा फॅमिली प्लॅनिंग साठी तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा...!
तुम्ही माझा ब्लॉग शेवटपर्यंत वाचला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे...!
तुम्हाला हा ब्लॉग कसा? वाटला...!
आवडला असेल आणि माझे म्हणणे पटले असेल तर तुमची अमूल्य प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की द्या.
बाळ प्लॅनिंग पासून ते नऊ महिन्या पर्यंत बाळावर संस्कार करण्यासाठी, बाळाला सर्वगुणसंपन्न व सक्षम बनविण्यासाठी मी "२१ व्या शतकातील गर्भ संस्कार हा कोर्स सुरू केला आहे". फ्रेंड्स या कोर्सच्या माध्यमातून मी तुम्हाला अतिशय सिस्टिमॅटिक पद्धतीने घेऊन जाणार आहे. ज्या नैसर्गिक आणि दैवी गोष्टी आहेत त्या मी या कोर्समध्ये दिल्या आहेत. खूप लोकांना या कोर्सचा सकारात्मक आणि चांगला फायदा झाला आहे. आणि तुम्हाला सुद्धा खूप चांगला फायदा होईल याची मला खात्री आहे. तुम्हाला जर या कोर्समध्ये भाग घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
आधीक माहितीसाठी संपर्क:
धन्यवाद🙏😊

बुधवार, १७ मार्च, २०२१

बाळ होण्यापूर्वी भाग-3

बाळ होण्या आधी १००% जबाबदारी घेण्याचे तंत्र शिका...!

दिवसभर नोकरी करून दमलेले आई-बाबा घरी आले. आल्याबरोबर साहिल त्याच्या मागण्या व गरजा घेऊन समोर आला. आणि चिडचिड करू लागला. त्याला पाहून साहिलचे बाबा पटकन बोलून गेले 'आम्ही तुझ्यासाठी एवढी मेहनत करतो आणि तुझ आपल रोजचच रडगाणं'



आता या वाक्याने आपल्याला आपले बालपण नक्कीच आठवले असेल. कितीतरी वेळा आपल्या कानावर असे वाक्य पडलेली आहेत "होय ना"...!

या सगळ्यातून वाद... वादातून तान- तणाव निर्माण होतात. आणि मग त्यातून काही गोष्टी टोकाला जाऊन जीवन विस्कळीत होते.


हे सर्व टाळण्यासाठी आपण आईबाबा होण्यास जबाबदार आहोत का? याचा विचार आधीच व्हायला हवा...!

असं म्हटलं जातं की आपल्या जीवनामध्ये खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात. त्या प्रत्येकाच्या जीवनात असतातच परंतु आपण यशस्वी पालक तेव्हाच होतो जेव्हा आपल्या जबाबदाऱ्या आपण पार पाडण्यासाठी सक्षम बनतो.

तर जबाबदाऱ्या कशा ?पूर्ण केल्या जातात...! आपल्या जीवनात जबाबदाऱ्या का? महत्त्वाच्या आहेत...! आणि आसे कोण कोणते? तंत्र आहे...! कि त्याच्या मदतीने आपण १००% जबाबदारी घेणारी व्यक्ती बनू शकता. हे तंत्र या ब्लॉग मध्ये तुम्हालाआज मिळणार आहे. त्यासाठी ब्लॉक शेवटपर्यंत वाचा...

जबाबदारी म्हणजे काय?


कोणत्याही प्रकारची तक्रार न करता आपण आपल्या पद्धतीने स्वतःमधील शक्तीचा वापर करून जीवन जगणे म्हणजे१००% जबाबदारी घेणे.

जेव्हा स्वतःला समजते की आपल्या जीवनामध्ये जे काही घडत आहे त्याचे कारण फक्त एकच व्यक्ती आहे आणि ती म्हणजे आपण स्वतः 

बरोबर..?😊

तर जेव्हा आपल्या मनात ही समजदारी येते तेव्हा असे समजावे की आपण आता १००% जबाबदारी घेणारी व्यक्ती आहे. 

बरोबर?...😊

जर आपण जबाबदारी घेऊ इच्छित असाल तर सगळ्यात आधी आपल्या मनामध्ये आपल्याला हे पक्के करावे लागेल की... आपल्याला कोणतीही जबाबदारी घ्यायची असेल तर ती १००%च घ्यावी लागेल.

कारण फ्रेंड्स आपण किती दिवस दुसऱ्यांच्या तक्रारी करणार आहोत. आपल्या जीवनात तर असे कितीतरी लोक येतील आणि त्यांच्यापासून आपल्याला काही ना काही तरी झळ बसणार आहे. तर आपण आशा किती गोष्टी टाळू शकणार आहे, किती लोकांपासून दूर राहू शकणार आहे, किती लोकांना आपण बदलू शकणार आहे याचा कधी विचार केलाय?... 

 नाही ना..!

तर फ्रेंड्स आज पासून आपल्याला १००% जबाबदारी घ्यायची आहे. आज तुम्ही घेतलेला हा निर्णय यशस्वी पालकत्वासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे.

परंतु काही गोष्टी अशा आहेत की त्या तुम्हाला समजणे अतिशय गरजेचे आहे. याआधी कित्येक वेळा तुम्हाला कोणीतरी सांगितले असेल किंवा तुम्हाला माहितीही असेल की जबाबदारी घेणे किती महत्त्वाचे असते पण किती? लोक ती घेऊ शकतात...!

तुम्ही म्हणाल की आम्ही जबाबदारी घेतो किंवा घेतली आहे. पण फ्रेंड्स आपण कितीतरी वेळा कोणातरी विषयी नेहमी तक्रारी करत असतो. कुणाला ना कुणाला काही तरी सतत बोलत असतो... बरोबर ना...!

तर फ्रेंड्स आपल्या जीवनामध्ये कुठला ना कुठला तरी प्रॉब्लेम आहे. त्यासाठी आपण जर दुसऱ्याला जबाबदार ठरवत असेल तर याचा अर्थ आपण १००% जबाबदारी घेतलेली नाही. बरोबर ना?

चला तर मग पुढे जाऊया...

जबाबदरीचा एक शब्द आहे. तो असा कोणता? शब्द आहे की ज्यामुळे आपण सिद्ध करू की आपण जबाबदारी घेऊ शकत नाही. ती गोष्ट जर आपल्या मध्ये असेल तर याचा अर्थ असा की आपण जबाबदारी घेत नाही.

होय फ्रेंड्स...! आणि ही शब्दरूपी गोष्ट... खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ती म्हणजे...

१.दोष देणे:

जेव्हा आपण दुसऱ्यांना नेहमी दोष देतो... म्हणजे: जेव्हा आपल्याला एखादा काहीतरी बोलतो तेव्हा आपण त्याला प्रत्युत्तर देतो, त्याच्यावर रागवतो व दुसऱ्या लोकांकडे त्याची तक्रार करतो. तर अशा प्रकारचा आपला स्वभाव असेल तर आपल्याला तो स्वभाव सोडावा लागेल. आपल्या मध्ये कोणत्याही गोष्टी संबंधी दोष देणारा स्वभाव असेल तर पालकत्वच काय तर आपण कोणत्याही गोष्टी मध्ये  आपल्या जीवनात पुढे जाऊ शकणार नाही.

फ्रेंड्स माझं मिशन असं आहे की बाळ होण्यापूर्वीच आपल्यामध्ये अगोदर बदल घडवून आणून... येत्या पाच वर्षात मला एक लाख गर्भवती मातांपर्यंत पोहचायचे आहे. त्यांच्या गर्भातील बाळावर संस्कार करायचे आहे आणि त्यांना देशाचे सर्वगुणसंपन्न व सक्षम असे देशाचे नागरिक घडवायचे आहे आणि हा माझा ध्यास आहे.

आज स्वतःला आपण विचारायचे आहे... की आपण कोण कोणत्या गोष्टीला, आपल्या शरीरातील कोणत्या भागाला, आपल्या आजूबाजूच्या लोकांना, आपल्या कुटुंबातील व्यक्तींना, नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना, दोष देतो का? किंवा यापैकी कोण कोणत्या गोष्टींना जास्तीत जास्त दोष देतो...

हा स्वभाव प्रत्येकाचा असतो मी सुद्धा काही दिवसांपूर्वी स्वतःला व इतरांना दोष देत होते. मी सारखी आजारी पडते, माझे शरीर मला साथ देत नाही, मला टेक्निकल गोष्टी येत नाही. दुसरे मला समजून घेत नाही इत्यादी... परंतु मी माझ्या जीवनामध्ये बदल करून घेतला... तर तुम्ही तुमच्या जीवणामध्ये किती व कोणत्या गोष्टींना दोष देता हे कमेंट मध्ये लिहू शकता. जसे मी तुम्हाला इथे माझी कबुली दिली आहे. ओके...!

स्वतःबद्दल खरे सांगणे हे खूप चांगले असते. नाही तर तो व्यक्ती स्वतःची फसवणूक करतो. आपल्याला यातून बाहेर पडायचे असेल तर आपण आपली कबुली देणे अतिशय गरजेचे आहे. कारण आज मी तुम्हाला त्यावर एक सुंदर मार्ग सांगत आहे.

१) आपण जर दुसऱ्यांना व कोणत्याही गोष्टीला नेहमी दोष देत राहिलात, तक्रारी करत राहिलात तर ती गोष्ट आपल्याला यशस्वी होण्याला आडवी येते. पालकत्व निभावणे यामध्ये या गोष्टीचा खूप मोठा वाटा आहे.

उदा. आपल्याला एखाद्या रोड वरून जायचे आहे आणि त्या रोड वरती काटे किंवा मोठे दगड गोटे आहेत त्यामुळे आपला रस्ता आडला आहे तर आपण पुढे जाऊ शकणार का?... नाही..

बरोबर ना...?

जर आपल्यामध्ये सतत दुसऱ्यांना दोष देण्याची प्रवृत्ती असेल तर आजपासून ती आपल्याला सोडून द्यावी लागेल. प्रॉमिस करा की आज पासून मी स्वतःमध्ये बदल करून घेण्यास तयार आहे...!

"त्यासाठी आपल्याला घ्यावा लागेल खंबीर निर्णय"


फ्रेंड्स... 'आपण असे निर्णय कितीतरी वेळा घेतले आहेत आणि सोडून दिले आहेत'. पण आजचा निर्णय हा साधा निर्णय नसून अतिशय गंभीर निर्णय आहे. पूर्ण तयारीनिशी तुम्हाला हा निर्णय घ्यायचा आहे. जसा मी निर्णय घेतला आहे की मला येत्या पाच वर्षात १लाख महिलांच्या जीवनात बदल घडवून त्यांच्या गर्भातील बाळांवर सुसंस्कार करायचा आहे. त्यांना सुदृढ सर्वगुणसंपन्न आणि सक्षम असे देशाचे नागरिक घडवायचे आहे. हा मी ध्यास घेतला आहे. त्यासाठी मी सातत्याने काम करत आहे. कारण मला तुमच्या मध्ये झालेला बदल आणि माझ्या हाताने घडलेले मुलं पाहण्यात खूप आनंद आहे . आणि तुम्हाला ही तुमच्या सुखी जीवनासाठी तुमच्या बाळाच्या भवितव्यासाठी स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याचा निर्णय बाळा होण्यापूर्वीच घ्यायचा आहे.

त्यासाठी आज आपली डायरी आणि पेन घेऊन आपल्या डायरीमध्ये आपले जीवन बदलण्यासाठी आपल्याला खूप चांगले चांगले निर्णय घ्यायचले आहे. ते तुम्ही लिहा. किंवा चार्ट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही लिहू शकता. 'पण याची मजा केव्हा येणार आहे जेव्हा ते तुम्ही पूर्ण कराल'😊. बोलण्यात आणि करण्यात खूप फरक आहे. मी जास्त विश्वास ठेवते कृती करण्यावर. तर आपल्यालाही आता प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याच्या सवयी लावून घ्या. त्या सवयी कोणकोणत्या आहेत...

उदा. १)कष्ट करा: छोट्या कामाने हुरळून जाऊ नका..

माझे गुरु नेहमी म्हणतात. "अभी तो नापी है मोठी भर जमी अभी तो सारा आसमा बाकी है"सतत कष्ट करण्याची शायरी ठेवा.

२) स्वतःला किंमत द्या... आपण जर स्वतःला किंमत दिली तरच दुसरे आपल्याला किंमत देतात. या जगात जी व्यक्ती स्वतःला व्हॅल्यू देते तीच व्यक्ती खूप पुढे जाते आणि यशस्वी होते.

३) स्वीकार करा... तुम्ही जसे आहे तसा स्वतःचा स्वीकार करा. तसेच आपल्या कुटुंबामध्ये, मित्र-मैत्रिणींमध्ये, समाजामध्ये जी लोक तुम्हाला भेटतात त्यांचाही स्वीकार करा.

४) जिद्दी बना... कोणतेही काम पूर्ण चेे करण्याची जिद्द बाळगण्याची सवय लावा आपल्यामध्ये जिद्द असणे खूप महत्वाच्या आहे.

५) योग्य शिक्षण... तुम्हाला बाळ प्लॅनिंग करायचा आहे त्या अगोदर त्याबद्दल माहिती करून घेणे खूप गरजेचे असते. तुमचे उत्तम शिक्षण झालेले आहे असा विचार करून तुमचे पालक तुमच्याशी या विषयावर बोलत नाहीत कदाचित मुलींशी या विषयावर बोललं केले तिला समजावले जाते पण मुलांच्या बाबतीत तर हे प्रमाण अगदीच नगण्य आहे. हो की नाही?त्याला जरी गर्भधारणा होत नसली तरी गर्भधारणेत त्याचाही तितकाच वाटा असतो हा विचार केला जात नाही म्हणून बाळ होण्यापूर्वी आपण त्याचा अभ्यास केलाच पाहिजे. त्यासाठी मातापित्यांनी डॉक्टरांकडे जाऊन समुपदेशन करून घ्यायलाा हवे .

सर्वात महत्त्वाचं म्हणजे शारीरिक, अडचणी मानसिक ताणतणाव, आर्थिक अडचणी असताना शक्यतो बाळ प्लान करू नये आईवडील जेव्हा शरीर मनाने मुल होऊ देण्यासाठी तयार असतील तेव्हाच मुल होऊ देण्याचा विचार करावा. मूल हवं आहे... म्हणून मूल होऊ देणे हे अत्यंत चुकीचं आहे. तर त्या मुलाचं पालकत्व स्वीकारायला, त्याला एक उत्तम माणूस बनायला आपण तयार आहोत किंवा नाही हा विचार करणे अतिशय गरजेचे आहे त्यासाठी गर्भधारणा होण्याआधी किमान तीन महिने आधीपासून पती-पत्नीने सर्वांगीण विचार करावा.

मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा? वाटला माझे म्हणणे तुम्हाला पटले असेल... तर कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही आजच "२१शतकातील गर्भसंस्कार" हा कोर्स जॉईन करा. कारण बाळ प्लॅन करण्याआधी तीन महिने हा कोर्स जॉईन करणे अतिशय महत्त्वाचे असते. अगदी सिस्टिमॅटिक पद्धतीने मी या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे .ज्या नैसर्गिक आणि दैवी गोष्टी आहेत... त्या मी या कोर्समध्ये सांगितल्या आहेत. त्यामुळे खुप लोकांना या कोर्सचा सकारात्मक आणि चांगला फायदा झाला आहे.

हा कोर्स तुम्हाला फक्त प्रेग्नेंसी साठीच नाही तर आपल्या संपूर्ण आयुष्यात त्याचा तुम्हाला खूप उपयोग होणार आहे

सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे त्यामुळे आपले आरोग्यही चांगले राहणार आहे आणि आपल्याला मनासारखा बाळही मिळणार आहे. आणि मी प्रॉमिस करते की या कोर्समध्ये तुम्ही तुमचे पालकत्व निभावण्यासाठी सक्षम बनणार आहात.

सकारात्मक व आनंदी राहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून '२१ व्या शतकातील गर्भ संस्कार' हा फेसबुक ग्रुप जॉईन करा.

"२१ व्या शतकातील गर्भ संस्कार"

तुम्हाला जर या कोर्समध्ये सहभागी व्हायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आजच संपर्क साधा.

संपर्क:

https://wa.link/92aazl


तुम्ही माझा ब्लॉग शेवटपर्यंत वाचला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे..

धन्यवाद...🙏🙂

सोमवार, ८ मार्च, २०२१

बाळ होण्यापूर्वी भाग :२

स्वतःला बदला जग आपोआप बदलेल...!


लग्न होऊन नवीन घरी आली आहे. तिथल्या नातेसंबंधांशी, तिथल्या रूढी- परंपरांशी जुळवून घेताना मनावर तान येत आहे. कित्येकदा सुनेबरोबर असणाऱ्या मतभेदांमुळे तिच्या गरोदरपणातही तिचं वागणं चुकीचं वाटू लागत उदा. ती खूपच आराम करते, ती खुपच बाहेर फिरते किंवा अति खाते व खाण्याची आबाळ करते , 'आम्ही असे नखरे केले असते तर आमचं कुणी खपवून घेतलं नसतं'...! किंवा 'दिवस काय हिला एकटीलाच राहिले आहेत का'...!, इतपर्यंत टीका होत असते. या सगळ्या गोष्टींचे तिच्यावर दडपण येते,  ताण येऊ शकतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. 

दिवस गेल्यानंतर तीन महिने अति सजग राहणे आवश्यक असते. या काळामध्ये जर मानसिक ताण तणाव असेल तर त्याचा गंभीर परिणाम गर्भावर होतो. अंगणवाडी क्षेत्रामध्ये काम करत असताना कित्येक मुलींच्या बाबतीत हे घडताना मी पाहिले आहे.

या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत त्याआधी बाळ होण्यापूर्वीच आपण असं काय केलं पाहिजे की आपल्याला अशा गोष्टींना सामोरं जावं लागणार नाही. आणि ते म्हणजे स्वतःमध्ये बदल घडवून आणणे.

नमस्कार ...मी अलका शिंदे.. गर्भसंस्कार मार्गदर्शक आणि सेल्फ कोच... मला येत्या ५ वर्षात एक लाख मुलींच्या जीवनामध्ये बदल घडवून आणायचा आहे. एक लाख गर्भवती मातांपर्यंत पोहोचून त्यांच्या गर्भातील बाळावर सूसंस्कार करायचे आहे हा माझा ध्यास आहे...!

आपला आजचा जो विषय आहे त्याने  माझे संपूर्ण जीवन बदलल आहे. ते कसे झाले आणि असे काय आहे तेच गुपित तुम्हाला मी सांगणार आहे.

ते गुपित जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वापरले तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये यश मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. हेच गुपित यशस्वी पालक होण्यासाठी सुद्धा लागू पडते. जगातील ५% लोक हे गुपित आपल्या  जीवनामध्ये वापरतात. कारण या गोष्टी करायला हिम्मत लागते. आपल्या प्रत्येकामध्ये ती असते फक्त आपण तिचा वापर केला पाहिजे...

पर्याय: 


आपल्यापुढे खूप सारे पर्याय असतात. त्यापैकी आपल्याला एक चांगला पर्याय गोंधळ न होऊ देता निवडायचा आहे. यशस्वी पालक होण्यासाठी एक लक्ष निश्चित करा. आपल्या बाळाबद्दल आपला हेतू काय आहे, आपले स्वप्न काय आहे, त्यानुसार  ध्येय ठरवा. आणि त्यानंतर त्या मार्गाने प्रवास करा. त्यानंतरही तुमच्यापुढे दोन पर्याय असतील... मैत्रिणींनो माझ्याही बाबतीत हेच झाले होते. पण मी यशस्वी होण्याचा पर्याय निवडला. त्यासाठी मी माझ्या सवयी बदलल्या. आणि हेच आज मी तुम्हाला या लेखामध्ये सांगणार आहे. मात्र त्यासाठी लेख शेवटपर्यंत वाचा.

आज पर्यंत ज्या सर्व यशस्वी पालकांना हे गुपित माहिती होते.  ते पालक... पालकत्व निभावण्या मध्ये यशस्वी झाले. आहेत. आता तुम्हाला हे गुपित  जाणून घ्यायची आतुरता नक्कीच लागली असेल.

या जगात दोन प्रकारचे लोक आढळतात.

१. सक्रिय:-


सकारात्मकवृत्तीचे 

२. आळशी:


नकारात्मक वृत्तीचे

एक तर सकाळी लवकर उठा किंवा झोपा

मी असं का म्हटले... तर उठल्यावर सुद्धा आपल्यापुढे दोन पर्याय असतात.

१. पुढे जाण्याचे

२. मागे येण्याचे

आता सक्रिय लोक कुठला पर्याय निवडतात... व आळशी लोक कुठला पर्याय निवडतात. हे आपण बघू या...

सक्रिय:


सक्रिय लोक हे पुढे जाण्याचा पर्याय निवडतात. कारण ते सकारात्मक विचारांचे असतात. ते फार गंभीरअसतात. ते आपल्या जीवनात चांगल्या गोष्टीची अंमलबजावणी करून स्वतःला सुधारन्यासाठी... चांगल्या गोष्टींचा शोध घेतात. सक्रिय लोक... आपल्या निर्णयावर ठाम असतात.

आळशी:

असे लोक मागे येण्याचा पर्याय... निवडतात.  ते नेहमी गोंधळलेले असतात. कारण ते नकारात्मक असतात. ते आपल्या मूड नुसार वागतात. एखाद्या कामांमध्ये पुढे जाण्याऐवजी ते मागे येतात. व स्वतःचे नुकसान करून घेतात. कोणतेही काम यांच्याकडून पूर्ण होत नाही.

आपण आजपर्यंत जे करत आलो... तेच करत राहिलो.. तर आपल्याला तेच मिळेल... जे आतापर्यंत मिळाले आहे. 

हा विचार करून सक्रिय लोक फार गंभीरपणे वागतात. ते पटकन निर्णय घेऊन कामाला लागतात. ते फार तीक्ष्ण बुद्धीचे असतात. स्वतःला सुधारण्यासाठी काय चांगलं मिळेल त्याचा शोध घेतात व त्याची आपल्या जीवनात अंमलबजावणी करतात.

माझा सांगण्याचा उद्देश एकच आहे की आपण  यशस्वी पालकत्व... निभावण्यासाठी सक्रिय बनणे अतिशय गरजेचे आहे. आपल्या बाळाच्या भवितव्यासाठी आपल्याला आतापासूनच सक्रिय बनायचे आहे. असं म्हटलं जातं

 "शिवाजी इज द मॅनेजमेंटगुरु"


प्रत्येक ...

व्यवसायामध्ये महाराजांच्या जीवणाच्या व्यवस्थापनातील गोष्टी वापरल्या जातात.ही खूप सुंदर व्यवस्था आहे. हे कोणामुळे झाले तर त्यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंमुळे... त्याच महाराजांच्या गुरू होत्या सर्व व्यवस्थापन त्यांचे होते म्हणून असं म्हटलं जातं की...

"मदर इज मॅनेजमेंट गुरु"


माता जिजाऊंनी महाराज जन्माला येण्याआधीच मनात  एक हेतू ठेवला होता. आणि तो म्हणजे "हिंदवी स्वराज्याची स्थापना". राजे पोटात असताना त्यांनी राजांना घडविण्यासाठी खूप कष्ट घेतले. म्हणून महाराज तसे घडले. हे काही नव्याने सांगायला नको...! आणि आपल्यालाही तेच बनायच आहे. हो की नाही ?आपण सुद्धा काहीतरी वेगळं करून दाखवणार आहोत. हो की नाही...?आपल्यालासुद्धा यशस्वी पालक बनवायच आहे. त्यासाठी आपल्याला एक वचन घेऊन ते पूर्ण करून दाखवायचे आहे. आपण जर आळशी असाल तर... आपल्याला आज पासून आपल्या मध्ये बदल करून घेऊन एक वचन घ्यायच आहे.

आपल्याला असं काही करून दाखवायचं आहे की... जे माता जिजाऊ सोडून आत्तापर्यंत कोणीही केलेले नाही... मला एक इतिहास घडवायचा आहे..  

मी वेगळीआहे...! मी वेगळी आहे...!!

 होय.. ! 

माझं व्यक्तिमत्त्व इतरांपेक्षा वेगळं आहे...!!! 

मला यशस्वी पालक बनायच आहे. मला माझ्या मनाप्रमाणे माझ्या स्वप्नातील बाळाला जन्म द्यायचा आहे,माझ्या स्वप्नाप्रमाणे त्याला घडवायचं आहे. त्यामध्ये मी यशस्वी झाली आहे.

मुलींनो मला १लाख मातांच्या जीवनामध्ये बदल घडवून आणायचा आहे, त्यांच एक वेगळ व्यक्तिमत्व बनवायच आहे. त्यांना सक्रिय बनवायच आहे. आदर्श बनवायच आहे. यशस्वी बनवायच आहे. त्यांच्या हातून घराघरात शिवाजीराजे घडवायचे आहेत. आणि त्यासाठी तुम्ही सर्वात आधी आदर्श पुरस्कार घेणार आहात. आणि हा माझा ध्यास आहे. मुलींनो तुमच्या मनामध्ये तुमच्या बाळा विषयी जर हेतुपूर्वक मोठं स्वप्न बाळगल आणि त्या दिशेने तुम्ही जायचं ठरवलं तर तुम्ही आजूबाजूंच्या लोकांकडे व इतरांच्या बोलण्याकडे, वागण्याकडे आपोआप दुर्लक्ष कराल आणि म्हणूनच...

आज आपण प्रतिज्ञा करूया की... 

मी माझ्या स्वप्नाप्रमाणे बाळाला जन्म देऊन...मला हवा तसा...माझ्या मनाप्रमाणे त्याला घडविणे... हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे... आणि तो मी मिळवणारच...!

   


माझ्या स्वप्नाप्रमाणे बाळाला 

घडविण्यासाठी मी माझे लक्ष              निश्चित करून 

त्या मार्गाने मला पुढे जायचे आहे.

मुलींनो आपल्याला हा प्रवास खूप पुढे घेऊन जायचा आहे. तुमची सर्वांची मला साथ मिळेलच... अशी आशा करते.  मी माझ्या धेयापर्यंत लवकरच पोहोचून यशस्वी होईल याची मला खात्री आहे.

माझा लेख शेवटपर्यंत वाचल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे.. 

तुम्हाला मला काही विचारायचं असेल तर कमेंट मध्ये विचारू शकता.

सकारात्मक,आनंदी व चांगल्या वातावरणात राहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून "२१व्या शतकातील गर्भसंस्कार" हा ग्रुप जॉईन करा.

धन्यवाद...!

https://t.me/joinchat/OtpkXgQWVzc0MTg9

https://www.facebook.com/groups/562863397763173/?ref=share

संपर्क:

https://wa.link/92aazl


रविवार, ७ मार्च, २०२१

बाळ होण्यापूर्वी- भाग:१

"महत्त्वाच्या ४ गोष्टी पाळा; आणि मगच जन्म द्या गोंडस बाळा"...!




लग्न होऊन एक, दोन, तीन वर्ष झाली आहेत, करियर झाले आहे, चांगले सेटल झाले आहात.


आता आपण प्रचंड उत्साहात, आकांक्षा आणि अपेक्षेने बाळाची चाहूल लागण्या कडे नजर लागून आहे.


काही दिवसातच गुड न्यूज येते, खूप आनंद होतो... आनंद साजरा ही होतो काही दिवस आपण असाच उत्साह अनुभवतो.

नऊ महिन्यानंतर बाळ होते तो तर वेगळाच आनंद ... आनंद गगनात मावत नाही. सगळीकडे पेढे मिठाई वाटली जाते बारा दिवसानंतर धुमधडाक्यात बारसे होते. बाळ जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत त्या काळजाच्या तुकड्याला सर्वांचे भरभरून, ओथंबुन प्रेम मिळते. पण जसा मोठा होऊ लागतो तसे प्रेम ओसरू लागते काही दिवसातच त्याच्याबद्दल तक्रारी सुरू होतात आणि मग आनंदाचे रूपांतर चिडचिड आणि टेन्शनमध्ये होते. असे का होते याचा कधी विचार केलाय...?


याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे 
आपण आत्मपरीक्षण 
करायलाच विसरतो..!




तुम्ही जे करताय तेच करत आलात... तर तुम्हाला तेच मिळेल... जे आतापर्यंत मिळाल आहे. तुम्हाला असं काहीतरी हव असेल... जे आजपर्यंत मिळाले नाही... तर असं काहीतरी करावं लागेल ते आतापर्यंत केलेलं नाही.


या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आशा चार गोष्टी सांगणार आहे की जर तुम्ही आत्ता आणि लगेच बाळ होऊ द्यायचा विचार केलात की आपल्यावर काही बंधनं घालून घेतली पाहिजे आणि जर सुरुवातीलाच या गोष्टीचा अवलंब केला तर कदाचित तुमच्या ध्येयाचा रथ तुम्ही योग्य मार्गाने घेऊन जाऊ शकाल.
नमस्कार! मी अलका शिंदे
गर्भसंस्कार मार्गदर्शक
मला येत्या पाच वर्षात एक लाख गर्भवतींच्या जीवनामध्ये बदल घडवून त्यांच्या गर्भातील बाळावर सुसंस्कार करून त्यांना सर्वगुणसंपन्न व सक्षम असे देशाचे नागरिक घडवायचे आहे आणि हा माझा ध्यास आहे.

आई-वडिल जेव्हा शरीर- मनाने मूल होऊ देण्यासाठी तयार असतील, तेव्हाच मुल आरोग्यसंपन्न निपजेल.


आपल्याला मूल हवं आहे म्हणून मूल  होऊ देन चुकीच आहे; तर त्या मुलाचं पालकत्व स्वीकारायला, एक उत्तम माणूस बनायला आपण तयार आहोत का? हा विचार करणे अधिक गरजेचे आहे. गर्भधारणा होण्याआधी किमान तीन महिने आधीपासून पती-पत्नीने आरोग्याची संपूर्ण काळजी घेतली पाहिजे.
बाळ होण्यापूर्वी कोण कोणत्या गोष्टी आवर्जून पाळायला हव्यात त्यासाठी.

चला तर मग सुरुवात करूया...

१. गर्भधारणेपूर्वी चा आहार



बाळााचा प्लॅन करतेवेळी पती-पत्नी दोघांनीही खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये जाणीवपूर्वक बदल करूून घ्यायला हवा. आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जाऊन पंचकर्मम करून बीज शुद्धधी करून घ्यायला हवी.

बाहेरचे चमचमीत, मसालेदार पदार्थ, अति मांसाहार, जंक फूड, फास्ट फूड, कोल्ड्रिंक्स, चहा कॉफी या गोष्टी हळूहळू कमी करून काही दिवसात पूर्णपणे बंद कराव्या. शुद्ध चौरस आहार घेण्यावर भर द्यावा. फळभाज्या मोड आलेली कडधान्य फळे या सगळ्यांचा आहारात समावेश असावा पुढे बाळाला फॉलिक ऍसिड आयोडीन यासारख्या घटकांची कमतरता पडू नये यासाठी सुखा मेवा सोयाबीन ज्वारी यांचाही सामावेश असावा डॉक्टरांच्या सल्ल्याने किमान महिनाभर आधीपासून फॉलिक ऍसिडच्या गोळ्या ही सुरू कराव्यात. होणाऱ्या आईने महिनाभर आधी एक दुधात शतावरी टाकून घ्यावे वडिलांनी एक चमचा अश्वगंधा पावडर कपभर दुधात घालून घ्यावे. जर मातापित्यांना व्यसन असेल तर त्याचा बाळाच्या मनावर निगेटिव परिणाम होतो. बाळ गर्भात असताना सर्व काही माता-पित्यांना कडूनच शिकत असते.

२. व्यसनांना आळा घाला.


बाळाची आई बाबा बनायचे असेल तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचे व्यसन असल्यास ते पूर्णपणे बंद केले करा. म्हणजेच दोघांनीही आपल्यावर जाणिवपुर्वक बंधन घालून घेणे गरजेचे आहे. कारण गर्भात असताना बाळाच्या मेंदूचा 80% विकास होतो त्यामुळे माता पिता जे काही करतात त्या सर्व गोष्टी बाळाकडे आकर्षित होतात. त्यासाठी बाळाला एक पॉझिटिव्ह वातावरण निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे घरातील वातावरण व मुलांवर होणारे संस्कार याचा मुलांचे भवितव्य घडवून आणण्यात फार मोठा सिंहाचा वाटा असतो. हे सत्य पालकांनी नीट लक्षात घेतले पाहिजे. घरातील मंगल वातावरण व सुसंस्कार म्हणजे मुलांना लाभलेले भक्कम कवच असते. त्यामुळे दूषित वातावरण व कुसंस्कार याचा मुलांवर वाईट परिणाम होतो. बाळ जर सुदृढ हवा असेल तर पुरुषांनी देखील व्यसन सोडले पाहिजेत .






३.सदृढ शरीर.


बाळ होण्यापूर्वी किमान तीन महिने आधी पती-पत्नी दोघांनीही आपल्या शरीराला व्यायामाची व योगासनांची सवय लावून घ्यायला हवी. सकाळी किमान वीस मिनिटे योगासने करायला पाहिजे त्यामुळे शरीर सुदृढ बनते व स्नायूंना शक्ती मिळते संपूर्ण शरीरात शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो बाळ जसं सुसंस्कारीत असणं आवश्यक आहे तसं ते सुदृढ ही असलं पाहिजे त्यासाठी त्याच्या आई-बाबांनी आपल्या शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे आपल्याला आरोग्यसंपन्न आणि तेजस्वी बाळ हवे आहे या दृष्टिकोनातून आपण आपले शरीर अधिक छान आणि आरोग्य संपन्न कसे राहील या गोष्टी लक्षात घेणे गरजे

सुदृढ मन.


बाळ होण्यापूर्वी किमान तीन महिने असते करण मुला-मुलींना या गोष्टी फार बोरिंग वाटतात. त्यामुळे त्यांनी त्यांच्यामध्ये हळूहळू सवय लावून त्यामध्ये रस निर्माण करावा. रोज 15 मिनिटे ध्यानधारणा केल्याने शरीर व मन ताजेतवाने होऊन शक्ती मिळते. व शरीरास रक्तपुरवठा होऊन ऑक्सिजन सुद्धा पुरवला जातो. मनाचे शुद्धीकरण केले जाते. मनाला स्थिरता प्राप्त होते. एकाग्रता वाढते. आणि मन स्थिर व शांत होते. स्मरणशक्ती वाढवणे व सर्व काही लक्षात राहते. आणि ते आपल्या बाळासाठी अतिशय महत्वाचे आहे व म्हणूनच मेडिटेशन ची सवय लावून घेणे महत्वाचे आहे .


 प्राणायामामुळे श्वसन तंत्र सुधारते मन एकाग्र व निश्चयी होते आणि आपली निर्णय क्षमता वाढते आपण जे काम करतो ते आपण अधिक जोमाने करतो. विचारांमध्ये सुसुत्रता येते. शरीर शुद्ध होऊन एक नवचैतन्य निर्माण होते. रॉबर्ट कोच यांनी लिहिलेल एक उत्कृष्ट पुस्तक...
80-20 principle


यात रॉबर्ट कोच म्हणतात की 20 टक्के गोष्टीवर 80 टक्के परिणाम अवलंबून असतात.
मग अशा कोणत्या 20% गोष्टी आहे ज्या जर तुम्ही रोज सातत्याने करायला सुरुवात केली तर त्याचे 80 टक्के परिणाम तुमच्या तुमच्या बाळाच्या आयुष्यात मिळतील हे यावेळी ठरविणे अतिशय गरजेचे आहे.


फार जास्त गोष्टींवर फोकस न करता वरती दिलेल्या१,२,३,४ या महत्वाच्या निवडक गोष्टींवर तुमचं संपूर्ण लक्ष केंद्रित करा, कमीत कमी नव्वद दिवस त्या सवयी वर काम करा आणि एकदा त्या तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग झाला... की मग पुढच्या गोष्टीचा (बाळ होऊ देण्याचा) विचार करा.



सर्वगुणसंपन्न तेजस्वी आणि सुदृढ बाळाला जन्म देण्याचे माझे ध्येय आहे तर त्या दिशेने कमीत कमी कोणत्या गोष्टी करण्याची गरज आहे ज्या मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचवतील? आणि त्या म्हणजे वरील १,२,३,४

तीन महिने हाच प्रयत्न करा की आपण बाळ होण्यापूर्वी ह्या दिशेने जात आहोत.तर काही गोष्टी आवर्जून टाळण्याचा प्रयत्न करा. 
ज्या गोष्टीमुळे तुम्हाला चांगले परिणाम मिळतील ते जास्तीत जास्त करण्याचा निश्चय करा.
ज्या गोष्टीमुळे विपरीत परिणाम होईल त्या गोष्टी कटाक्षाने टाळण्याचा प्रयत्न करा.
तात्पर्य: सदृढ सर्वगुणसंपन्न तेजस्वी बाळाला जन्म द्यायचा असेल तर नियमित आत्मपरीक्षण करून आपल्या ध्येयाल चिकटून राहण्याची गरज आहेे. परस्पपरविरोधी गोष्टी टाळून योग्य विचार करून योग्य निर्णय घेण्याची गरज आहेे.


हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद!
मला पूर्ण विश्वास आहे की बाळ होण्यापूर्वी तुम्ही या चार गोष्टींचा अवलंब केल्यास तुम्हाला होणाऱ्या सर्वगुणसंपन्न बाळा मुळे तुमचे पुढील आयुष्य तुम्ही नक्कीच सुखी बनवाल.


तुम्हाला या विषया वरील जर काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा.
तुमच्या ध्येयपूर्तीसाठी तुम्हाला योग्य व सकारात्मक वातावरणात राहण्याची अत्यंत गरज आहे. त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून २१ व्या शतकातील गर्भ संस्कार हा ग्रुप जॉईन करा.


अधिक माहितीसाठी संपर्क

सर्वगुणसंपन्न आरोग्यसंपन्न आणि सक्षम बाळाला जन्म देणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणरच...!

१६ "संस्कार"

संस्कारांवर आधारित  भारतीयसंस्कृती भारत देश हा खेड्यापाड्यांचा देश, सामाजिक, राजकीय, वैज्ञानिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा अनेक विषयांमध्ये पु...