बुधवार, २० ऑक्टोबर, २०२१

प्रेग्नेंसी मध्ये योगा चे महत्व:

गर्भावस्थेतील योगाचे 12 महत्वाचे फायदे..!

तुमचा प्रेग्नेंसी प्रवास? आनंदी व आरोग्यदायी व्हावा, असं तुम्हाला वाटतं का..! आपली डिलिव्हरी normal? व्हावी असं तुम्हाला वाटतं का..! तुमच्या शरीरामध्ये सतत? वेदना होत आहेत, तुम्हाला दिवसभर आळस सतावतो fresh वाटत नाही weakness जाणवतो असे? तुम्हाला वाटते का..!

असे जर का असेल तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे, त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत वाचा...!

योग केल्यामुळे आपलं शरीर नेहमी आरोग्यदायी आणि चांगलं राहातं. मात्र योगा करण्या आधी काही नियमांचं पालन करणंही आवश्यक आहे. तसेच आपल्या, स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊनच योगाला सुरुवात करावी. योग आपलं शरीर तंदुरूस्त राखण्यास मदत करतो. त्यामुळे आपल्या प्रेग्नेंसीतच नाही तर संपूर्ण आयुष्यात  योगाच महत्त्व नक्की काय आहे, हे मी आज तुम्हाला सांगणार . इतकंच नाही तर कोणती आसनं तुमच्या प्रेग्नेंसी प्रवासात तुम्ही करू शकता हे देखील मी पुढील ब्लॉग मध्ये सांगणार आहे.

आज मी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या प्रेग्नेंसी मध्ये योगा करण्याचे कोण कोणते फायदे आहेत ते सांगणार आहे.

१) योग तुम्हाला आरोग्यसंपन्न बनविण्यास आणि उर्जेने भरण्यासाठी कार्य करील. 

२)) योगाचा मनावर आणि विचारांवर परिणाम होतो. 

३) आपल्या मनात दिवसभरात खूप नकारात्मक विचार येतात, जे आपल्याला तणाव, चिंता किंवा मानसिक विकृतीत आणतात.योग आपल्याला या चक्रातून बाहेर पडण्यास मदत करतो.

४) नियमितपणे योग केल्याने माणूस काळजीपासून मुक्त होतो. 

हे सर्व फायदे मिळवण्यासाठी मात्र कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे.

योगाचे अंतर्गत फायदे.....

रक्त प्रवाह (Blood circulation)


जेव्हा शरीरात रक्ताचे अधिक चांगले अभिसरण होते, तेव्हा सर्व अवयव चांगल्या प्रकारे कार्य करतात. याव्यतिरिक्त, शरीराचे तापमान देखील नियंत्रित केले जाते. रक्ताचा प्रवाह असंतुलित होताच शरीर अनेक रोगांना बळी पडू लागते, जसे की – हृदयाशी संबंधित आजार, खराब यकृत, मेंदू व्यवस्थित काम करत नाही इत्यादी परिस्थितीत योगाद्वारे रक्ताचा चांगला प्रवाह होतो. हे सर्व अवयवांना पुरेसे ऑक्सिजन आणि पोषकद्रव्ये प्रदान करते.

उत्तम श्वसन प्रणाली (Breathe control)

योगा मुळे श्वसन क्रिया सुधारते. श्वसन यंत्रणेतील कोणत्याही विकृतीमुळे आपण आजारी पडतो, तर अशा परिस्थितीत योग जीवनात श्वास घेण्याचे महत्त्व काय ते सांगतो, कारण प्रत्येक योग श्वासोच्छवासावर आधारित असतो. जेव्हा आपण योगा करता तेव्हा फुफ्फुस पूर्ण क्षमतेने कार्य करण्यास सुरवात करतात, ज्यामुळे श्वासोच्छवास करणे सोपे होते.

तेजोमय कांती (Glowing Skin)

नियमित योगा केल्याने आपल्या कांती मध्ये (skin) सुद्धा खूप फरक दिसून येतो. दिवासेंदिवस आपण अधिकाधिक ताजेतवाने(fresh) व तरुण (young) दिसू लागतो. 

अपचनापासून मुक्तता (Increase Digestive power)

योगासनेच्या फायद्यांमध्ये वायूपासून मुक्तता समाविष्ट आहे. प्रेग्नेंसी मध्ये गॅसचा त्रास होऊ शकतो. ही समस्या मुख्यत: पाचक प्रणालीच्या अयोग्य कामकाजामुळे उद्भवते. यावर उपाय म्हणून योग हा एक उत्तम मार्ग आहे. योगामुळे पाचन तंत्र सुधारते, ज्यामुळे बद्धकोष्ठता, वायू तसेच आम्लता यासारख्या समस्या मुळापासून दूर होऊ शकतात.

वेदना सहनशीलता (Patience)


प्रेग्नेंसी मध्ये वेदना शरीरात कोठेही आणि कोणत्याही वेळी येऊ शकते. विशेषत: सांध्यातील वेदना सहन करणे कठीण होते. त्याच वेळी, जेव्हा आपण योग करता तेव्हा सुरुवातीला ही वेदना सहन करण्याची शारीरिक क्षमता वाढू लागते. तसेच नियमित सरावानंतर ही वेदना कमी होण्यास सुरवात होते. तसेच बॅक पेन,व पोटऱ्यांमधील स्नायूंमध्ये पेन होने.पायांवर सुज येवून पेटके(गोळे) येने शिरा हिरव्या निळ्या होवून पाय जड होने. यासारख्या वेदना देखील प्रेग्नेंसी मध्ये होत असतात. त्यातून सुटका होण्यासाठी योग करणे प्रेग्नेंसी मध्ये अतिशय गरजेचे असते.

रोग प्रतिकारशक्ती (Strong immunity)

रोगांशी लढण्यासाठी, चांगली प्रतिकारशक्ती असणे आवश्यक आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे शरीर सहजपणे विविध आजारांना बळी पडते. तुम्ही जर विविध आजारांना बळी पडलात तर तुमचा प्रेग्नन्सी प्रवास दुःखात जाईल तसेच तुम्हाला डिलिव्हरी फेस करताना अनेक अडचणी येऊ शकतात. आपण आरोग्यदायी नसल्यास आपल्या बाळावर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम होतो आपल्या रक्तातून चांगले-वाईट हर्मोंस, रसायने, हे रक्तातून प्लेसेंटा मार्फत बाळापर्यंत पोहोचत असतात आणि त्याचा तसाच परिणाम बाळावर होतो. यासाठी आपण आरोग्यदायी असणे खूप गरजेचे आहे. आपल्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती असेल तरच आपण आरोग्यसंपन्न राहतो. योगाने रोगप्रतिकारक शक्ती सुधारते.

नवीन ऊर्जा (New energy)

या काळात आनंदी राहण्यासाठी व सकारात्मक मार्गाने कार्य करण्यासाठी शरीरात उर्जा राखणे आवश्यक आहे. यामध्ये योग तुम्हाला मदत करतो. योग केल्यास थकवा दूर होतो आणि शरीरात नवीन उर्जा भरली जाते. तसेच कोणतही काम करताना उत्साह राहतो. तुम्ही दिवसभर ऊर्जावान राहून आपल्या बाळासाठी जे काही कराल ते आनंदाने करू शकता. तुमच्या शरीरामध्ये उर्जा प्राप्त होण्यास योग तुम्हाला मदत करतो.

झोप (sleep)

माझ्या अनुभवाप्रमाणे कित्येक महिलांना प्रेग्नेंसी मध्ये रात्री नीट  झोप येत नाही. प्रेग्नेंसी मध्ये रात्रीची झोप चांगली होणे महत्वाचे आहे. रात्री चांगली झोप झाल्यास दुसर्‍या दिवशी शरीरास पुन्हा काम करण्यास व सज्ज होण्यास मदत होते. पुरेशी झोप न मिळाल्यामुळे दिवसभर अस्वस्थता, डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ होते व तणाव वाढतो. चेहऱ्यावरही हसू येत नाही. दुसरीकडे, आपण नियमितपणे योग केल्यास, मन शांत होते आणि तणावातून मुक्त होते, जे रात्री चांगले झोपण्यास मदत करते.

हे आणि असे अनेक फायदे आपल्याला योग केल्यामुळे होतात, गर्भसंस्कारामध्ये योग शिकवला जातो व गर्भवती मातेकडून नियमितपणे योगासने करून घेतले जातात. आतापर्यंत कित्येक महिलांनी योगाचा आनंद घेऊन आपला प्रेग्नन्सी प्रवास सुखाचा करून नॉर्मल डिलिव्हरी चा अनुभव घेतला आहे.

हा ब्लॉग पूर्ण वाचल्याबद्दल मी आपली आभारी आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स मध्ये नक्की विचारू शकता ब्लॉग आवडल्यास कमेंट्स ,शेअर ,लाईक नक्की करा, आणि अशाच हेल्दी टिप्स वाचण्यासाठी माझा"२१व्या शतकातील गर्भसंस्कार" फेसबुक ग्रुप खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून नक्की जॉईन करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझा youtube channel दिलेल्या लिंक वर क्लिक करून सबस्क्राईब करा. 

YouTube channel

"२१ व्या शतकातील गर्भ संस्कार"

धन्यवाद..!

गर्भावस्थेतील हेल्डी डायट

गर्भवतींना खाण्याच्या हेल्दी सवयी लावण्यासाठी महत्त्वाच्या चार स्टेप्स..!



आजच्या बदलत्या जीवनशैलीनुसार किशोर वयापासून तर लग्न होईपर्यंत चॉकलेट, बेकरी प्रॉडक्ट, कॅडबरी, आइस्क्रीम अशा गोड पदार्थ खाण्याच्या सवयी खूप लागलेल्या असतात. आणि  मुला मुली एवढे त्या पदार्थांच्या आहारी जातात की एखाद्या वेळेस जर त्यांना ते पदार्थ मिळाले नाही तर त्यांचा जीव अक्षरशः हैराण होतो. यासाठीच आधी त्या पदार्थांची सवय लावून न देणे हा एकच पर्याय असतो. एखाद्या वेळेस आधी मधी हे पदार्थ खाल्ले तरी चालेल, पण सारखे सारखे खाने म्हणजे, आपण आपल्या सवयींना खतपाणी घालत असतो,आणि नकळतपणे आपल्या आरोग्याची हेळसांड करत असतो. याची आपल्याला जाणीवच होत नाही, आणि जेव्हा जाणीव होते तेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते.
नमस्कार🙏
मी अलका शिंदे, गर्भसंस्कार मार्गदर्शक अँड सेल्फ कोच...
मला येत्या पाच वर्षात एक लाख गर्भवती मातांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणायचा आहे त्यांच्या गर्भातील बाळांवर सुसंस्कार करून त्यांना सुदृढ सर्वगुणसंपन्न आणि सक्षम असे देशाचे नागरिक मला घडवायचे आहे आणि हा माझा ध्यास आहे.

चला तर मग जाणून घेऊया....

परिपूर्ण संतुलित आहार घ्या:




आपल्यामध्ये पोषणतत्वांची कमतरता आपल्या संपूर्ण आरोग्यावर आयुष्यभर परिणाम करत असते. व त्याचा परिणाम आपल्या गर्भावर म्हणजेच गर्भात वाढणाऱ्या बाळावर होतो. आपल्या बालकाचे आपण एक चांगले आई-वडील म्हणून त्याच्यापर्यंत चांगले न्यूट्रिशन पोचवून भविष्यात त्याला मोठ्या आजारापासून आपण वाचवू शकतो. लहानपनापासून आपण टीव्हीवरच्या फास्ट फुड्सच्या जाहिराती बघुन जे दिसेल खाल्ले. कारण त्याबद्दल कुतूहल वाटत असे. ते एखाद्या वेळेस  आणून खाल्ले तरी चालेते, पण जर आपण सतत सारखे आणून खात असाल तर ती सर्वस्वी  चूक आहे. कारण फास्ट फूडस् खाऊन भविष्यात त्याचे दुष्परिणाम काय होतील याची जाणीव न ठेवल्यामुळे.  आपण आपल्या बालकाचे एक चांगले जबाबदार पालक नाही हे सिद्ध होते. आपण जर नीट समजून घेतले की ते सारखे खाल्ले तर त्याचे वाईट परिणाम होणार आहेत.तरच आपण आपल्या मनाला आवर घालू शकतो. त्यासाठी स्वतःला प्रेमाने समजवायचे. असे केल्यास आपण स्वता:ला नक्की कंट्रोल मध्ये ठेवू शकाल. गर्भावस्थेत योग्य व संतुलित आहार आपल्या जेवणामध्ये परिपूर्ण असणे,  आपल्याला संतुलित आहारची सवय लावणे हे सर्वस्वी आपल्या हातात आहे.

भूक लागेल तेव्हाच खा:



आपले मन हट्टी असते, जेव्हा ते ऐकत नाही तेव्हा जाणीवपूर्वक शांत रहा .जेव्हा भूक लागेल तेव्हा मात्र जे असेल ते तुम्ही आवडीने खाल. एकदा का सवय लागली की ते सर्व तुम्ही आवडीने स्वतःहून खाल. पण आपणच आपल्या मनाचे नको ते लाड पुरवले तर मग त्रास आपल्याला आणि भविष्यात  बाळालाही होणारच. आपण जे खातो ते बाळापर्यंत आपल्या रक्तातून पोहोचते त्यामुळे जेवताना, काही खाताना हेल्दी आणि पौष्टिक असेल तेच खावे, .पण जर आपल्यालाच बाहेरच्या हॉटेलच्या जेवणाची सवय असेल, फास्ट फूड जेवण आवडत असेल तर आपल्या बाळावर त्याचा वाईट परिणाम झाल्याशिवाय राहत नाही.

घरात भरपूर सुका मेवा आणून ठेवा:




जसजसे महिने वाढत जातील तसतशी  भूक ही वाढत असते. अशा वेळी हेल्दी पदार्थ घरामध्ये चणे, शेंगदाणे,गूळ, काजू, बदाम, मनुका, खजूर ,ड्रायफ्रुट्स अशा हेल्दी स्नॅक्स ने आपल्या घरामध्ये असणारा खाऊचा डबा भरून ठेवला, म्हणजे भूक लागल्या वर खाता येईल.आणि खाण्याच्या वाईट सवयी आपोआप निघून जातील जर आपणच बेकरी प्रोडक्ट, कॅडबरी, केक, पॅकेज फूड्स, मॅगी, पास्ता,जाम, बिस्किट्स, चिवडा, फरसाण अशा वस्तू  घरामध्ये ठेवल्या तर त्याच खाण्याच्या सवयी लागतात.

कोल्ड् ऐवजी पर्यायी हेल्दी ड्रिंक



आपल्याला अजून एक  सवय असते. कोल्ड्रिंक्स पिण्याची साखर मिश्रीत गोड पेय जसे फ्रूटी, मॅगो, ज्यूस, कोको कोला . या कोल्ड्रिंक्स मध्ये फक्त प्रिझर्वेटिव्ह आणि भरपूर साखर असते. कोल्ड्रिंक्स वर फळांचे नाव फक्त नावाला असतात, त्यामध्ये फळांचा अंश नसतो, आणि ते शरीराला खूपच हानिकारक असतात.या हानिकारक सवयी  आपण कमी करू शकतो. घरच्या घरी आपण ग्रीन संजीवनी बनवून घेऊ शकतो. लिंबू पाणी त्यामध्ये साखर मिसळून घेऊ शकतो. किंवा कोकम सरबत,आवळा सरबत घेऊ शकतो. काही गर्भवती माता तहान लागली तरच पाणी पितात त्यामुळे त्यांना डिहायड्रेशन होते, तर आपण वेळोवेळी  पाणी पिण्याची सवय लावायला हवी. चांगल्या सवयी आपण स्वतःला या काळात नक्की  लावू शकतो आणि  आपल्या बाळाला चांगले आरोग्य भविष्यात देऊ शकतो.

हा ब्लॉग पूर्ण वाचल्याबद्दल मी आपली आभारी आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स मध्ये नक्की विचारू शकता ब्लॉग आवडल्यास कमेंट्स ,शेअर ,लाईक नक्की करा, आणि अशाच हेल्दी टिप्स वाचण्यासाठी पाहण्यासाठी माझा "२१ व्या शतकातील गर्भसंस्कार" हा फेसबुक ग्रुप जॉईन करा...

धन्यवाद..!


१६ "संस्कार"

संस्कारांवर आधारित  भारतीयसंस्कृती भारत देश हा खेड्यापाड्यांचा देश, सामाजिक, राजकीय, वैज्ञानिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा अनेक विषयांमध्ये पु...