मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०२०

गर्भसंस्कार म्हणजे काय ? परिपूर्ण माहिती...


र्भधारणा झाल्यापासून 
तुमच्या मनामध्ये हे सगळे प्रश्न येताहेत का?
सध्याच्या परिस्थितीमध्ये covid-19 मुळे सर्वत्र वातावरण निगेटिव्ह झालेले आहे. अशा परिस्थितीत गरोदरपण म्हणजे एक समस्या आणि भीती मातांच्या मनामध्ये घर करून आहे. माझं बाळ कोरोना पॉझिटिव तर  होणार नाही ना? माझ्या बाळाला काही होणार तर नाही ना ? मिस कॅरेज तर  होणार नाही ना? असे अनेक प्रश्न  मातांच्या मनात येतात. अशा परिस्थितीत माता द्विधा अवस्थेमध्ये आहेत. कारण सगळीकडे म्हटलं जातं की या भयान परिस्थितीमध्ये पॉझिटिव राहणं गरजेच आहे...
'आता गुडन्यूज तर आली...!




मी नक्की आनंदी आहे की दु:खी आहे हे कळत नाहीये...!!
ह्या  सगळ्या समस्या दूर होवून तुमचा नऊ महिन्याचा प्रवास आनंदी, प्रसन्न आणि सुखकर व्हावा आस जर तुम्हाला मनापासून वाटत आसेल तर   don't worry हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत वाचा.
नमस्कार शिंदे गर्भसंस्कार मार्गदर्शक सेल्फ कोच"२१व्या शतकातील गर्भसंस्कार" या समूहाची संस्थापिका. मला येत्या पाचवर्षात १लाख गर्भवतींच्या जीवणामध्ये सकारात्मक बदल घडवून त्यांच्या गर्भातील बाळांवर सुसंस्कार करायचे आहे. त्यांना सुदृढ सर्वगुणसंपन्न आणि सक्षम असे देशाचे नागरिक मला घडवायचे आहेत आणि हा माझा ध्यास आहे..!बाळाला जन्म देणे ही सर्वांंत महत्त्वाची आणि आनंददायी घटना आहे. हे कार्य आपल्या हातून होत आहे...त्याबद्दल तुमचं मनापासून आणि हार्दिक अभिनंदन
  •  

 तुमच्या आणि तुमच्या कुटुंबीयांच्या दृष्टीने ही घटना अत्यंत अमुल्य अशीच आहे. तुम्ही सर्व माता पिता उद्याच्या भावी पिढीविषयी अत्यंत जागरूक आहात तुम्हाला सर्वांना मनापासून वाटते आहे की आपले होणारे बालक बुद्धिमान आणि आरोग्य संपन्न आणि सक्षम व्हावे त्यासाठी एकच उपाय आहे तो म्हणजे गर्भसंस्कार..

सर्वप्रथम आपण"संस्कार" म्हणजे काय हे जानुन घेऊया

कोणताही कार्य सातत्याने करने व त्यामुळे होणारा  गुणात्मक बदल.. म्हणजेच एखाद्या व्यक्ती मधले चांगले गुण वाढविणे आणि त्यासाठी त्या व्यक्तीला प्रोत्साहन देणे व त्याच बरोबर त्या व्यक्ती मधले असलेले दोष कमी करणे म्हणजे "संस्कार"...संस्काराचा आणखी एक अर्थ आहे तो म्हणजे "शुद्ध" करणे जसे की सोने तापून शुद्ध करतात तसेच " संस्कार"हे कष्टसाध्य आहेत..... 

हे"संस्कार" सतत आणि निरंतर करत राहिल्यास त्याचा तसाच परिणाम आपल्याला बघायला मिळतो...कबीर म्हणतात..."करत करत अभ्यास की जडमती हो सुजाण"!... "रसरी आवत जात के शिलपर पडतं निसान"!! म्हणजे सतत पडणाऱ्या दोराच्या घर्षणाने कठीण दगडावर देखील निशान पडते त्याच प्रमाणे सातत्याच्या अभ्यासाने मूर्ख सुद्धा अगदी ज्ञानी बनतो . 
हाच "संस्कार" नवूू महिन्याच्या प्रवासात गर्भावर केला जाऊन त्याचा जो सकारात्मक परिणाम पहायला मिळतो..
 
गर्भसंस्कार? म्हणजे काय..?


गर्भावस्थेच्या दरम्यान आईने चांगले व सकारात्मक विचार करणे व नैतिक मूल्य तसेच बाळामध्ये जन्मतः चांगले गुण रुजविणे म्हणजेच गर्भसंस्कार होय!
बाळाचां शारीरिक, मानसिक, भावनिक व अध्यात्मिक विकास हा गर्भात असल्यापासूनच सुरु होतो. आणि याच काळात त्याचा व्यक्तिमत्व personality विकास होतो. रिसर्च अनुसार विचार केला तर बाळाच्या मेंदूचा ८०% विकास हा गर्भामध्येच होतो. हे विज्ञानाने देखील सिद्ध केले आहे.भारतीय संस्कृती नुसार गर्भात असल्यापासूनच बाळाला चांगले शिक्षण देणे गरजेचे आहे.

 आयुर्वेदशास्त्रामध्ये एकूण सोळा संस्कार सांगितलेले आहेत ते माणसाच्या जन्मापासून मरेपर्यंत होत असतात. त्यापैकी गर्भसंस्कार हा अतिशय महत्त्वाचा संस्कार आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. बाळ प्लॅनिंग करण्याअगोदर तीन महिन्यापासून डिलेवारी होईपर्यंत नऊ महिने हा संस्कार केला जातो. बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी गर्भसंस्कार अतिशय महत्त्वाचा ठरतो.    वैद्यकीय शास्त्रानेदेखील गर्भसंस्काराचे महत्त्व मान्य केले आहे. गर्भधारणा होण्याआधी पासूनच गर्भावर संस्कार होत असतो. जसे आईवडिलांचे विचार तसाच परिणाम बाळावर होत असतो. बाळ जन्माला येणाऱ्यापूर्वीच आईने  बाळाच्या भविष्याविषयी सकारात्मक विचार केले तर जन्माला येणारे बाळ त्याप्रमाणेच प्राप्त होते. याची साक्ष पुरातन काळात घडून गेलेली अनेक उदाहरणांनी दिले आहे.

पुरातन काळातील गर्भसंस्कार आ विषयी काही उदाहरणे पाहूया.

राजमाता जिजाऊ व शिवाजी महाराज


शिवाजी महाराजांच्या जन्माआधीच मुघलांनी भारतावर अधिराज्य गाजवण्यास सुरूवात केली होती. मुघलांच्या अत्याचारामुळे प्रजा त्रस्त झाली होती. जिजाबाईंना प्रजेची ही अवस्था पाहून त्रास होत असे. त्याचवेळी त्यांच्या मनात राष्ट्रसंरक्षणासाठी एखाद्या सत्पुषाचा जन्म आपल्या पोटी व्हावा अशी ईच्छा निर्माण झाली होती. जिजामाता त्यावेळ गरोदर होत्या आणि असं म्हणतात की, जिजामाता यांना शिवाजी महाराज पोटात असताना घोड्यावर बसण्याचे, तलवार बाजीचे, दांडपट्टा चालवण्याचे डोहाळे लागले होते. जिजामाता यांच्या या दिव्य आणि क्रांतीकारक विचारांमधूनच शिवाजी महाराजांकडून स्वराज्याची निर्मिती झाली. ज्यामधून गर्भसंस्कारांचे महत्त्व नक्कीच पटू शकते.

वीर अभिमन्यू:



 महाभारतामधील अभिमन्युची गोष्ट आपल्या सर्वांना माहितीच आहे. ही गोष्ट गर्भसंस्कार बाबत सांगितली जाते. श्रीकृष्णांनी आपली बहिण सुभद्रेला अभिमन्यु पोटात असताना चक्रव्यूहभेदन कसे करावे हे सांगितले होते. गोष्ट  सांगत असताना सुभद्रेला झोप त्यामुळे पुढील गोष्ट तिने ऐकली नाही चक्रव्यूह मधून बाहेर येण्याचे ज्ञान घेणे राहून गेले.  गर्भात असताना अभिमन्यू नेते आत्मसात केले होते. महाभारतील महायुद्धात जेव्हा अर्जुन जवळ नसताना पांडवांवर चक्रव्यूह भेदन करण्याची वेळ आली तेव्हा तेवीस वर्षांच्या अभिमन्युला गर्भात असताना ऐकलेली चक्रव्यूह भेदन करण्याची गोष्ट आठवली व अभिमन्यूने चक्रव्युहात भेदन केले व त्याला बाहेर येण्याचे कळले नाही. यावरून असे सिद्ध होते की आईने केलेली प्रत्येक गोष्ट बाळा पर्यंत पोहोचते.


स्वामी विवेकानंद:

स्वामी विवेकानंद यांनी एकदा त्यांच्या आई भुवनेश्वरीला प्रश्न विचारला होता की, “मी माझ्या जन्माआधी कुठे होतो? तेव्हा त्यांच्या आईने त्यांना उत्तर दिले. की, आईने उत्तर दिले कि तू माझ्या पोटात होतास . यावर विवेकानंदांचे समाधान झाले नाही त्यांनी पुन्हा प्रश्न की, मी पोटात असण्या आधी कुठे होतो? विवेकानंदांची आई ती... तिने पटकन उत्तर दिले की बाळ तू माझ्या पोटात बसण्याआधी माझ्या विचारात होतास.” शिवाय विवेकानंदांची आई भुवनेश्वरी स्वामी विवेकानंद पोटात असताना ध्यानधारणा करत असत त्यामुळे विवेकानंद लहानपणापासून ध्यानविद्या जाणत होते. तसेच तिला कीर्तन प्रवचन व गायनाची देखील आवड होती. आणि तेच कोण त्यांच्यामध्ये उतरले. यावरून गर्भसंस्कारांचे महत्त्व प्राचीनकाळापासून चालत आले आहे असे सिद्ध होते. त्यामुळे प्रत्येक गर्भवती मातेला गर्भ संस्काराचे महत्त्व कळाव. व तिच्या गर्भावर संस्कार व्हावे.
यासाठी "२१व्या शतकातील गर्भसंस्कार" हा कार्यक्रम मी हाती घेतला आहे. तो असा की.... विशिष्ट विचारस्पंधनांनी गर्भाचे स्वागत करणे. त्याच्यावर सुसंस्कार करणे, त्याच्या माता-पित्यांना धीर देणे, आणि विशेष पद्धतीने बळ देणे ही "२१व्या शतकातील गर्भसंस्कार  " मधील सुसूत्र योजना आहे.
तात्पर्य : आयुर्वेदामध्ये ऋषिमुनींनी शास्त्राच्या आधारे वर्णन केलेली ही एक आचरण पद्धती आहे. गर्भवतीचा आहार कसा असावा तिचा विचार आचार यांचा नकारात्मक किंवा सकारात्मक प्रभाव तिच्या गर्भावर पडतो. व बाळ गर्भात असतानाच बाळाच्या मेंदूचा 80% विकास होतो. हे संशोधनाने सिद्ध झाले आहे. म्हणून गर्भवतीस्त्रीने गर्भधारणेच्या नियोजनापासून किंवा गर्भ पोटात असण्याची जाणीव झाल्यापासून ते सुख प्रसूती होऊन बाळाची तब्येत स्थिर होण्याापर्यंत ज्या ज्या वेळी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्या गोष्टी बाळाला पुरविल्या जाव्यात यासाठी मातेच्या शरिराला तयार करण्याचे काम गर्भ संस्कारामध्ये केले जाते. त्यासाठी तीने जाणीवपूर्वक गर्भसंस्कार या विषयी माहिती करून घेतली व त्याप्रमाणे आचरण केल्यास गर्भसंस्कार हे बाळाच्या उज्वल भविष्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरतील व भावी पिढी सर्वगुणसंपन्न होण्याच्या दृष्टीने हा एक सकारात्मक निर्णय असेल यात शंका नाही म्हणून  मैत्रीनींनो आपल्या लाडल्यावर सूसंस्कार  करून घेण्यासाठी क्षणाचाही विलंब न करता योग्य निर्णय घ्या...
आपल्याला हा  ब्लॉग आवडला आसल्यास कमेन्टबाँक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.सकारात्मक व आनंदी राहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून"२१ व्या शतकातील गर्भसंस्कार" हा फेसबूक ग्रुप जाँईन्ड करा.


पेज

२३ टिप्पण्या:

  1. मस्त माहिती दिली आहे ताई...उपयुक्त माहिती आहे... Keep it up 👍

    उत्तर द्याहटवा

१६ "संस्कार"

संस्कारांवर आधारित  भारतीयसंस्कृती भारत देश हा खेड्यापाड्यांचा देश, सामाजिक, राजकीय, वैज्ञानिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा अनेक विषयांमध्ये पु...