"गर्भसंस्कार? का करावे" महत्वाची दोण कारणे...
१) आजच्या तरुण पिढीचे वर्तन...नमस्कार मंडळी 🙏
मी अलका शिंदे...
गर्भसंस्कार मार्गदर्शक...
२१ व्या शतकातील गर्भसंस्कार या प्लॅटफॉर्मची संस्थापिका...!
मला येत्या पाच वर्षात महाराष्ट्रातील एक लाख गर्भवती मातांपर्यंत पोहचायचे आहे आणि त्यांच्या गर्भातील बाळांवर सुसंस्कार करून त्यांना सुदृढ, बुद्धिमान सर्वगुणसंपन्न आणि सक्षम असे देशाचे नागरिक मला घडवायचा आहे आणि हा माझा ध्यास आहे...!
२) आई-वडिलांच्या मुलांबद्दल च्या अपेक्षा....
प्रत्येक आई-वडिलांना वाटत असतं की आपला बाळ स्वामी विवेकानंद भावा बिल गेट्स त्याहीपेक्षा मोठे स्वप्न आई-वडील पाहात असतात ते म्हणजे आपल्या होणाऱ्या बाळाने अगदी शिवाजी महाराज म्हणजे त्यांच्यासारखा महान व्हावा
मग बघुया कसे घडले" छत्रपती शिवाजी महाराज " ...!
छत्रपती कोणत्या विद्यापीठात गेले नाहीत की छत्रपती कोणत्या शाळेत गेले नाही.तेआसही कुठे शिकले की सध्याच्या मुलांना जे शिक्षण मिळत आहे. असं काहीच त्यावेळी झालेले नाही "गर्भात उमलली संस्काराची रीत"हे छत्रपतींच्या चरित्रातील वाक्य आहे. यावरून असं लक्षात येत की छत्रपतींवर गर्भामध्ये संस्कार झाले आहेत. जिजाऊ आऊसाहेब छत्रपती पोटात असताना स्वतः घोड्यावरती बसायच्या. प्रवास करायच्या संगमनेर जवळील पेमगिरी ते जुन्नर जवळील शिवनेरी हा दर्या खोर्यांचा प्रवास करून जिजाऊंनी एका दिवसात शिवनेरी किल्ला गाठला हा प्रवास त्यांनी शिवरायांच्या जन्माच्या आदल्या दिवशी घोड्यावरुन केला. त्या स्वतः तलवार चालवायच्या दांडपट्टा चालवायच्या स्वतः भालाफेक खेळायच्या दादोजी कोंडदेव हे छत्रपतींचे गुरू त्यांच्या जन्मानंतर झाले. परंतु छत्रपतींचे मूळ गुरु ह्या माता जिजाऊच आहेत आणि याला इतिहास साक्षी आहे. यावरून असं लक्षात येतं की बाळ गर्भात असताना संस्कार करण्याची जबाबदारी ही आईचीच आसते. आई ज्या ज्या गोष्टी करते त्या त्या गोष्टी बाळ आत्मसात करीत असते. त्यासाठी आपल्याला आपला बाळ शिवाजी महाराज व्हावा असं जर वाटत असेल तर आपल्याला प्रथम जिजाऊ व्हावे लागेल. अशीच स्री शिवाजी महाराजांना जन्म देऊ शकेल आणि मग तिला जे मूल होईल ते मात्र छत्रपतीं सारखे सिंहच बनेल.
आता का करायचे गर्भसंस्कार हे जा. घेऊया ..
जन्माला येण्यापूर्वीच शिकण्याचे अद्भूत सामर्थ्य गर्भाला असते. त्याच्यावर विशिष्ट पद्धतीने चांगले संस्कार घडवता येतात. परंतु त्याच बरोबर... मुलाचा जन्म कसा होतो... मन म्हणजे काय... त्याला इच्छा कशी होते... मन व शरीर याचा संयोग कसा होतो.. इत्यादी तात्विक प्रश्नांची चर्चा गर्भसंस्कारामध्ये केली जाते. असे अनेक वैशिष्ट्ये या वर्गात असतात. तसेच गर्भात असताना त्या जीवाला मानसिक अस्तित्व असते. म्हणून या अवस्थेत चांगले विचार त्याला ऐकवले तर ते मुल ते ग्रहण करते हे संशोधकांनी सिद्ध केले आहे. म्हणूनच असे संस्कार करण्यासाठी....
"२१व्या शतकातील गर्भसंस्कार" हा कार्यक्रम मी हाती घेतला आहे.
तात्पर्य: काही वर्षातच जन्मपूर्व संस्कार झालेली पिढी समाजात चांगला ठसा उमटवेल आणि अधिक परिणाम कारक ठरेल याची मला खात्री आहे....
तर मंडळी हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला असल्यास मला.... कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अधिक माहितीसाठी माझा फेसबूक ग्रुप खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन करा....
धन्यवाद 🙏




Chhan blog Alka Tai .गर्भसंस्कार फारच गरजेचे आहेत.
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर व उपयुक्त अशी माहिती 👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाMast lihilay
उत्तर द्याहटवावा
उत्तर द्याहटवाअलका मॅडम
खूपच छान ब्लॉग
खूप छान 👍
उत्तर द्याहटवाखूप छान
उत्तर द्याहटवा