Family planning करण्याआधी जाणून घ्या... गर्भसंस्काराची त्रिसूत्री
फोटो आवडला, पत्रिका जुळली, लग्न झाले career झाले चांगले settle झालात. आता बाळासाठी planning करण्याची मनात इच्छा डोकावत आहे बरोबर ना...?
पण तुम्हाला माहिती आहे का... की आज पर्यंत तुम्हाला सर्व गोष्टींचे knowledge शाळा कॉलेजमध्ये मिळाले आहे. परंतु गर्भातील बाळाचा विकास कसा होतो, ते बाळ आरोग्यसंपन्न व बुद्धिमान जन्माला येण्यासाठी कशी काळजी घ्यावी. तर हे माहितीच असायला हवे.
Friends आपण जर अजाणतेपनाने बाळासाठी planning kela तर बाळाच्या जन्मानंतरच्या येणाऱ्या अडचणींना आयुष्यभरसामोरे लागते.
जसे की अनुवंशिक आजार, बाळा मधील विकृती म्हणजेच अपंगत्व व कुपोषण इत्यादी...
आता तुमच्या मनामध्ये नक्की प्रश्न आला असेल की या साठी काय करावे.
Friends आपल्याला पुढील जीवन आपल्या बाळा सहित सुखी आणि आनंदी जावे असे जर मनापासून वाटत असेल तर don't worry हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे...
त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत वाचा....
वेदांमध्ये सांगितलेल्या सोळा संस्कारांपैकी अतिशय महत्त्वाचा असणारा संस्कार म्हणजे "गर्भसंस्कार" जन्माच्या अगोदरपासूनच गर्भसंस्कारला सुरुवात होते. जन्माआधी तीन संस्कार होत असतात १) गर्भाधान संस्कार २) पुसवन संस्कार ३) सिमंतोन्नयन संस्कार या तिन्ही संस्काराचे कॉम्बिनेशन म्हणजे "गर्भसंस्कार"...
१. गर्भाधान संस्कार :-
गर्भसंस्कारा विषयी खरंतर समाजामध्ये एक मोठा गैरसमज आहे तो असा की गर्भसंस्कार हे गर्भधारणा झाल्यावर करायचे असतात. परंतु त्यामुळे काय होतं की आधीपासूनचे शरीरातील दोष घेऊन गर्भसंस्काराला सुरवात होते. परंतु हे असं आहे की विवाहानंतर जेव्हा माता पिता ठरवतात की आपल्याला आता मुल हवं आहे तेव्हापासून ते गर्भधारणा होईपर्यंत दोघांच्या रिलेशन मधील प्रत्येक गोष्ट वेदात सांगितल्या प्रमाणे लक्षपूर्वक केली जाते. हा खरा गर्भधान संस्कार आपल्या ऋषिमुनींनी सांगितलेला आहे. शारीरिक अडचणी, मानसिक ताण तणाव, आर्थिक अडचणी असे असताना शक्यतो गर्भधारणेचा plan करू नये. आई- वडील जेव्हा मुलं होऊ देण्यासाठी या सर्व गोष्टीने तयार असतील तेव्हाच मुलंं आरोग्यसंपन्न निपजेल. त्यासाठी गर्भधारणा होण्याआधीपासून किमान तीन महिने पती-पत्नीने आरोग्याची संपूर्ण काळजी घेतली पाहिजे. त्या काळात घरातील वातावरण मंगलमय ठेवावे. सत्व, रज, तम असे गुणांचे तीन प्रकार आहेत. त्यातील आपल्या बाळा मध्ये जर सात्विक गुण जास्तीत जास्त आणायचे असेल तर सात्विक आहार घेतला पाहिजे. "जसे अन्न तसे मन" असं म्हटल जात तसेच सात्विक विचार निर्माण करण्यासाठी ध्यानधारणा... प्राणायाम सुद्धा केले पाहिजे.या सवयी आधीपासूनच लावून घ्याव्यात.
" शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी"असंही म्हटलं जातं त्यामुळे जवळच्या आयुर्वेदिक केंद्रात जाऊन बीज शुद्धी करून घ्यावी.मासिक पाळी नंतर आठव्या ते पंधराव्या दिवसापर्यंत गर्भधाणा चा विधी केला जातो. बाराव्या ते चौदाव्या दिवसापर्यंत जर हा विधी संपन्न झाला तर होणारे बाळ आरोग्यपूर्ण सुंदर आणि सतेज निपजते. गर्भभधानाच्या दिवशी पती-पत्नींना सात्विक आहार दिला जातो. देवी-देवतांचे स्मरण करून स्वच्छ सुंदर पवित्र शयनकक्षात गर्भधानाचा चा विधि केला जातो. गर्भधानासाठी हिवाळ्याचा काळ उत्तम मानला जातो. रात्रीचे बारा वाजण्या आधीची वेळ उत्तम मानली जाते. या सर्व गोष्टींचा पाठपुरावा केल्यानंतरच मातापिता चांगल्या व सुसंस्कृत बाळाला जन्म देऊ शकतात. म्हणून त्याची तयारी शक्यतो गर्भधारणा होण्यापूर्वी तीन महिने आधीपासूनच करावी.
२. पुसवन संस्कार :-
गर्भधारणा झाल्यापासून ते delivery च्या वेळेपर्यंत च्या कालावधीमध्ये काय काय करायचे आणि काय काय नाही करायचे याला पुसंवन संस्कार म्हणतात. पुसंवन संस्कार ही नऊ महिने चालणारी प्रोसेस आहे. प्रेग्नेंसी मध्ये प्रत्येक दिवस हा पुसंवन संस्कारासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून पाळी चुकल्यानंतर दहा दिवसांनी लगेच डॉक्टरांकडे जायला पाहिजे. कारण साधारणतः दीड महिन्यात बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकू यायला लागतात. सहा आठवड्यांनी तुम्ही जे काही घरात वागता बोलता आचरण करता ते सगळं बाळाला समजतं. बाळाच्या मेंदूची वाढ तीन महिन्यापर्यंत पूर्ण होते. आपल्याला आपला बाळ बुद्धिमान व हुशार बनवायचा असेल तर हा संस्कार लगेच सुरु करायला हवा. टेस्ट रिपोर्ट positive आला की लगेच डॉक्टरांकडे जाऊन ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. म्हणजे बाळाची स्थिती कशी आहे ते समजते. त्याच बरोबर आहार कसा घ्यावा, कोणता घ्यावा, कोणता घेऊ नये ,योगासने कोणती करावी. प्राणायाम कोणते करावे. सकारात्मक कसे रहावे. शांत आणि आनंदी कसे रहावे. गर्भ संवाद, प्रार्थना, मंत्रोपचार, संगीत या सर्व गोष्टींसाठी गर्भसंस्कार हा कोर्स जॉईन करावा. त्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टींसाठी मदत मिळेेेते.
३. सीमंतोन्नयन संस्कार :-
६वा संपून ७ वा महिना लागला की मातांच्या मनावर तणाव निर्माण होतो. तो असा की माझी delivery कशी होईल...? फार त्रास तर होणार तर नाही ना...? मी सहन करू शकेल का...? असे कितीतरी प्रश्न मातांच्या मनात येऊ लागतात. ती भीती नाहीसी व्हावी, माता मानसिक रित्या बाळाला जन्म देण्यासाठी आनंदाने तयार होऊन बाळाचे स्वागत करण्यासाठी सज्ज व्हावी. यासाठी तिची मानसिक तयारी व्हावी म्हणून सीमंतोन्नयन या.... संस्कारांमध्ये डोहाळे हा उत्सव साजरा केला जातो. कारण सातव्या महिन्यानंतर कधीही delivery ची वेळ येऊ शकते. या उत्साहा मध्ये मातेला राणी सारखेे सजवले जाते. घरातील मंडळी, नातेवाईक, मैत्रिणी व इतर महिला एकत्र येऊन गर्भवती मातेचे पूजन करतात ओटीभरण करतात. तिला भेटवस्तू देतात. अशाप्रकारे आनंदाने.... उत्सव साजरा करुन त्या मातेची मनस्थिती आनंदी बनवून तिला खूष केले जाते. हा उत्सव त्या मातेला delivery ची मानसिक तयारी करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी बनवला आहे. मातेेला वाटलं पाहिजे की मी आता बाळाला जन्म देण्यासाठी आनंदाने तयार आहे. बघा किती छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून आपल्या ऋषी-मुनींनी एक संस्काराच बीज समाजामध्ये पेरलं आहे. तर मग आपण या सर्व गोष्टी आपल्या जीवनात अंगीकारल्या तर आपल्या जीवन किती आनंद निर्माण होईल. आपल्या या परंपरेला आपण वैज्ञानिक दृष्ट्या पाहिलं पाहिजे. आपल्या जीवनात या गोष्टींचा आपण उपयोग केला पाहिजे. जुन्यापुराण्या गोष्टी व पुराने विचार म्हणून आपण अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे आपल्या जीवनात पुढे आपल्याला अडचणींना सामोरे जाावे लाागते.
विवाहानंतर मूल होऊ देण्यासाठी जेव्हा मातापित्यांची मानसिक तयारी होते तेव्हापासूनच गर्भसंस्काराची सुरुवात होते. हे गर्भाधान संस्कार मध्ये सांगितलेले आहे. परंतु आपला आता पाचवा महिना चालू आहे किंवा सातवा महिना चालू आहे मग आता गर्भसंस्कार केले तर याचा फायदा होईल का...? असं तुम्हाला वाटत असेल तर don't worry यापुढील जेवढा वेळ बाकी आहे तेवढ्या वेळासाठी गर्भसंस्कार समजून घेतला आणि राहिलेल्या वेळामध्ये मनापासून follow केला तरी चालेतो. यासाठी चिंता करण्याची गरज नाही. आपल्या ऋषी-मुनींनी अधुरे knowledge दिलेले नाही. त्यासाठी प्रत्येक गोष्टीचे solution दिलेले आहे. म्हणजे याचा अर्थ असा की गर्भ- संस्कारा मध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्या त्या गोष्टी वेळ वाया न घालवता मनापासून सुरू केल्या तर अगदी पहिल्या महिन्यापासून मिळालेला फायदा बाकीच्याही महिन्यांमध्ये बाकीच्या वेळेत मिळतो यात शंका नाही.
हा ब्लॉग पूर्ण वाचल्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे.
चला तर मग आपल्या बाळाचे भविष्य उज्वल बनविण्यासाठी व येणाऱ्या पाहुण्याचे आनंदाने स्वागत करण्यासाठी तयार व्हा.
सकारात्मक विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी व समविचारी लोकांच्या community मध्ये सामील होण्यासाठी क्षणाचाही विलंब न करता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. आणि community जॉईन करा.
तुम्हाला काही प्रश्न आसतील तर तुम्ही मला नक्की विच्यारु शकता WhatsApp (9922969278) केले तरी चालेल.
ब्लॉग वाचून अभिप्राय नक्की द्या...
गर्भसंस्कार मार्गदर्शक
अलका शिंदे
धन्यवाद !




खूप छान माहिती
उत्तर द्याहटवाखूप छान माहिती.... आज खूप गरज आहे या सगळ्या गोष्टींची.... सर्वांनी याचा विचार करावा असा विषय मांडला आहे... खूप छान अलका ताई....👌👌👍
उत्तर द्याहटवाKhup sundar margdrashan ahe
उत्तर द्याहटवाKhoopch chan mahiti 💐💐
उत्तर द्याहटवाखूप खूप छान लिहिला आहे
उत्तर द्याहटवाखूपच छान अलका मॅडम
उत्तर द्याहटवाखरंच हे काळाची गरज आहे
तुम्हाला पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा
खूपच सुंदर ब्लॉग
उत्तर द्याहटवाखूप उपयुक्त माहिती
👌👌👌👍
Thanku, thanku thanku so much all of you...!
उत्तर द्याहटवाKhoopch sundar mahiti
उत्तर द्याहटवाखूप सुंदर माहिती मिळाली
उत्तर द्याहटवाGreat alka tai
उत्तर द्याहटवाप्रत्येक कुटुंबाला आवश्यक अशी अतिशय उपयुक्त माहिती.
उत्तर द्याहटवा