प्रत्येक गोष्ट दोनदा होते, अगोदर विचारात मग अस्तित्वात.
माणसाचे नशीब आधीच ठरलेले असते. आपल्या हातात काहीच नसते असे तुम्हाला नेहमी वाटते का...? जन्माच्या पाचव्या दिवशी सटवीने कपाळावर काहीतरी लिहून ठेवले आहे व त्याप्रमाणेच सर्वकाही घडते. अस तुम्हाला नेहमीच वाटतं का...?
तसं जर असेल तर या सीमारेषा ओलांडून आपण यशस्वी पालक बनू शकतो.
जाणीवपूर्वक संस्काराला विचारांची जोड देऊन आपण आपल्या होणाऱ्या बाळाचे जन्मा आधीपासूनच नशीब घडू शकतात.
वस्तुस्थितीचा स्वीकार करून व जाणीवपूर्वक संस्कार देऊन बाळाचं भविष्य उज्वल करणाऱ्या सोप्या युक्त्या समजून घेण्यासाठी हा ब्लॉक शेवटपर्यंत वाचा.
नमस्कार मी अलका शिंदे गर्भसंस्कार मार्गदर्शक& natrotherapist(निसर्गोपचार तज्ञ)
२१ व्या शतकातील गर्भ संस्कार या प्लॅटफॉर्मची संस्थापिका...
मला येत्या पाच वर्षात एक लाख गर्भवती मातांनपर्यंत पोहोचायचे आहे. त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवून त्यांच्या गर्भातील बाळावर सूसंस्कार करायचे आहे. आणि हा माझा ध्यास आहे.
चला तर मग जाणून घेऊया काय आहेत ह्या युक्त्या..
१ . विचार बदला
'जसा विचार तसा जीवनाला आकार'...!
माणसाचा पहिला जन्म विचारात होतो, दुसरा जन्म आईच्या पोटातून होतो व तिसरा जन्म त्याला मिळालेल्या संस्कारातून होतो.
आपण फार सुंदर विचार करू शकतो पण केलेला विचार आकाराला कसा आणायचा त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे विवेकानंदांची आई...
एकदा विवेकानंदांनी आई ला प्रश्न विचारला की आई मी जन्माला येण्याच्या आधी कुठे होतो. आईला तो साधारण प्रश्न वाटला. तिने उत्तर दिलं की तू माझ्या पोटात होतास. विवेकानंदांना ते उत्तर समाधानकारक वाटले नाही. त्यांनी पुन्हा प्रश्न केला की मी पोटात आसण्याआधी कुठे होतो विवेकानंदांचीच आई ती... तिने सांगितले की तू माझ्या विचारात होता तर 'बाळाचा जन्म त्याच्या माता-पित्याच्या विचारांमध्ये होतो'...!
चांगल्या विचारांपेक्षा वाईट विचार मनामध्ये पटकन घर करून बसतात. त्या विचारांचा ठसा म्हणजे आपले बाळ. कळत नकळत या गोष्टी. होऊन गेल्यानंतर भविष्यात त्याचा परिणाम भोगावा लागतो आणि मग आपण नशिबाला दोष देत बसतो.
हे जर टाळायचे असेल तर सजगतेने काही गोष्टी जाणीवपूर्वक कराव्या लागतील आणि मगच आपण आपल्या अंतर्मनाला आपण सहजपणे नकारात्मक विचारांपासून परावृत्त करू शकू.
२. फळं चांगली लागण्यासाठी मूळं बदला
प्रत्येक पालकाचे एक स्वप्न असते की आपलं बाळ सर्वगुणसपन्न, जिनियस आणि भारतरत्न व्हावं त्याने आपलं नाव रोशन करावं.
माझे गुरु नेहमी म्हणतात..
तुमच्या विचारातून शब्द,
शब्दातून कृती,
कृतीतून सवयी ,
सवयीतून व्यक्तिमत्व,
आणि व्यक्तिमत्वातून भविष्य घडते.
आपले भविष्य म्हणजे आपली मुलं आहेत. मग जर आपल्याला आपल भविष्य बदलायचं असेल तर जाणीवपूर्वक विचार बदलण्याची गरज आहे. त्यासाठी आपल्या अंतर्मनाला चांगल्या शब्दांची परत परत आठवण करून देणे व आपल्याला कसा बाळ हवा आहे त्याचा सातत्याने विचार करणे अतिशय महत्त्वाचे आहे विचार रुपी मुळ बदलली की परिणाम रुपी फळ आपोआप लागतील.
३. पीक चांगल येण्यासाठी जमीन सुपीक बनवा
मदर इस द मॅनेजमेंट गुरु...!
आ-आत्मा
ई-ईश्वर ईश्वराचा आत्मा म्हणजे आई
मातृ-निर्माण करणारी
परमेश्वर प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही म्हणून त्याने राष्ट्राचा भार एकट्याने न वाहता एक प्रतिकृती निर्माण केली.आणि ती म्हणजे आई. आपण आता खूप मोठं काम हाती घेतलआहे. 'आपण एक निर्माते आहात...!' आपण आता नऊ महिने बाळाला गर्भामध्ये वाढवण्याची जबाबदारी घेतली आहे. बाळाचं भरण, पोषण आपण करणार आहोत आपल्या मार्फत सर्व न्यूट्रिशन आपल्या बाळाला मिळणार आहे आपण दिवसाचे २४तास त्याच्यासोबत असणार आहे.
तुम्ही जे काही करता जे खाता पिता ऐकतात बोलतात ते सगळं तुमच्या मार्फत बाळापर्यंत पोहोचणार आहे म्हणून असं म्हटलं जातं..
आपल्याकडे खूप सुंदर म्हण आहे"जे पेराल ते उगवेल"पण बी चांगले पेरण्यासाठी जमीन सुद्धा सुपीक असायला हवी कारण 'माता म्हणजे जननी' असही म्हटलं जातं. तिला सुपीक बनविण्यासाठी तिचा आहार विहार तीच शरीर तिची दिनचर्या कशी आहे यावर बाळाचे आरोग्य अवलंबून असते. हा नऊ महिन्यांचा जो काळ आहे हा तुमच्या हातामध्ये आहे तो तुम्ही कसा हँडल करता त्यावर तुमच्या बाळाची ग्रोथ होणार आहे. आणि त्याचं रूपांतर परिणामरुपी सुफळा मध्ये होणार आहे. प्रत्येक आईचा 'जन्म सिद्ध अधिकार' आहे की तिने तिच्या बाळाला तिच्या इच्छेने सद्गुणांनी परिपूर्ण असं घडवावं. तेजस्वी, सर्व गुण संपन्न, अष्टपैलू व्यक्तिमत्व युक्त असं तिच्या स्वप्नातील बाळ तिने घडवावं. आणि हा अधिकार तिला मिळावा म्हणूनच हा माझा प्रयत्न आहे.
४. वातावरण बदला.
आज पासून ५वर्षानंतर तुमचा बाळ कुठे असणार आहे हे दोनच गोष्टींवर अवलंबून आहे, तुम्ही कोणती पुस्तके वाचता आणि कोणाबरोबर राहतात.
बाळाचा ८० टक्के विकास गर्भात होतो,
१० टक्के विकास ३ वर्षा पर्यंत होतो.
राहिलेल्या दहा टक्के ६ वर्षापर्यंत होतो
तुम्हाला तुमचा बाळ जसा हवा आहे तसा पाहण्यासाठी तुम्हाला मदत करणाऱ्या, तुम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या लोकांच्या सतत संपर्कात राहुन तुम्ही तुमची विचारधारा बदलू शकता.
वैचारिक वातावरण बदलून-
प्रेग्नेंसी मध्ये जे प्रॉब्लेम येतात ते एका विशिष्ट प्रकारच्या विचार सरणी मुळे निर्माण होतात. आणि बरेच वेळा ही विचारसरणी आपण कोणत्या व्यक्तीच्या आजू बाजूला राहतो त्यावर प्रामुख्याने अवलंबून असते. आपल्याला कोणत्याही प्रकारचा निर्णय घ्यायचा असेल आपण आजूबाजूच्या लोकांशी चर्चा केल्याशिवाय तो निर्णय घेत नाही.
व्यायाम, शारीरिक तक्रारी वरती सोलुशन, मानसिक आधार, मोटिवेशन, उत्सव, शेअरिंग विचारांची देवाण-घेवाण, वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी हे सगळं एका विशिष्ट वातावरणा मधून मिळते आणि त्याचे
परिणाम स्वरूप म्हणजे आपले होणारे सर्वगुणसंपन्न बाळ. आपण जर या काळात निगेटिव्ह लोकांच्या सोबत निगेटिव्ह वातावरणात राहिलो तर त्याचा परिणाम स्वरूप आपले बाळ निगेटिव विचार, निगेटिव वातावरणात राहिल्यानेच निर्माण होत व त्यामुळे मतिमंद, विकृत बाळ जन्माला येते, बाळाची ग्रोथ थांबते आणि मग आपल्याला खूप वाईट गोष्टींना समोर जावे लागते.
सकारात्मक लोकांच्या सानिध्यात त्यांच्या विचारांनी आपण प्रेरित होऊन आनंद मिळवू शकतो व आपला प्रवास सुखकर बनवू शकतो.
ऑनलाइन गर्भसंस्कार २०२१......
गेल्या २२ वर्षात कितीतरी गर्भवतीशी माझं एक वेगळं नातं आहे अंगणवाडी क्षेत्रात काम करताना त्यांना सेवा देण्याची संधी मला मिळाली आहे.या त्यांच्या सेवेतून मला त्यांच्या समस्या कळाल्या त्यांची फिजिकली मेंटली डेवलपमेंट कशाप्रकारे व्हायला हवी याचा गेल्या २२ वर्ष मी अनुभव घेतला आहे. मागील ५ वर्षांत कित्येक गर्भवती मातांची वन-टू-वन केले आहे. व वेगवेगळे कोर्सेस करून गर्भसंस्कार या विषयाचे डीप नॉलेज मिळवले आहे.
२१ व्या शतकातील या गर्भसंस्कार कोर्समुळे बाळाच्या व मातापित्यांच्या शारीरिक-मानसिक भावनिक बदलांसाठी शारीरिक अडचणी, मानसिक ताण तणाव आर्थिक अडचणी दूर होत आहे. आणि एक सकारात्मक वातावरण बाळाच्या विकासासाठी निर्माण होत आहे.
चहूबाजूला covid-19 मुळे नकारात्मकता पसरली होती. तुमच्यासारख्या कितेक मातांना या नकारात्मकतेच्या विळख्यातून बाहेर काढून सकरात्मक व आनंदी राहण्यासाठी तसेच बाळाच्या उज्वल भविष्यासाठी 'मी २१ व्या शतकातील गर्भसंस्कार' या लाईव्हवर्कशॉप ची सुरुवात केली आहे. तुम्हाला यामध्ये सहभागी व्हायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
'मदर इज द मॅनेजमेंट गुरु'
माझ्या बाळाला माझ्या इच्छेप्रमाणे व सद्गुणांनी परिपूर्ण घडविणे . हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच--!
अधिक माहितीसाठी संपर्क...







खुप छान ताई 👌👌👌
उत्तर द्याहटवाThanks beta❤️
हटवाSuperb 👍❤
उत्तर द्याहटवाThanks ❤️
हटवाKhupp chann.....👌👌👍
उत्तर द्याहटवाThanku ❤️
हटवाखूप छान 👍🏻 गर्भातली महिलांसाठी उपयुक्त,👍🏻
उत्तर द्याहटवाThanks ❤️
हटवाKhup chhan Tai
उत्तर द्याहटवाha anubhav me ghetala aahe.
best wishes ❤
Thanks ❤️
हटवाKhup Chan
उत्तर द्याहटवाThanks ❤️
हटवाVery Nice Information.
उत्तर द्याहटवाThank you so much all my dear friends🙏
उत्तर द्याहटवा