"महत्त्वाच्या ४ गोष्टी पाळा; आणि मगच जन्म द्या गोंडस बाळा"...!
लग्न होऊन एक, दोन, तीन वर्ष झाली आहेत, करियर झाले आहे, चांगले सेटल झाले आहात.
आता आपण प्रचंड उत्साहात, आकांक्षा आणि अपेक्षेने बाळाची चाहूल लागण्या कडे नजर लागून आहे.
काही दिवसातच गुड न्यूज येते, खूप आनंद होतो... आनंद साजरा ही होतो काही दिवस आपण असाच उत्साह अनुभवतो.
नऊ महिन्यानंतर बाळ होते तो तर वेगळाच आनंद ... आनंद गगनात मावत नाही. सगळीकडे पेढे मिठाई वाटली जाते बारा दिवसानंतर धुमधडाक्यात बारसे होते. बाळ जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत त्या काळजाच्या तुकड्याला सर्वांचे भरभरून, ओथंबुन प्रेम मिळते. पण जसा मोठा होऊ लागतो तसे प्रेम ओसरू लागते काही दिवसातच त्याच्याबद्दल तक्रारी सुरू होतात आणि मग आनंदाचे रूपांतर चिडचिड आणि टेन्शनमध्ये होते. असे का होते याचा कधी विचार केलाय...?
याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे
आपण आत्मपरीक्षण
करायलाच विसरतो..!
तुम्ही जे करताय तेच करत आलात... तर तुम्हाला तेच मिळेल... जे आतापर्यंत मिळाल आहे. तुम्हाला असं काहीतरी हव असेल... जे आजपर्यंत मिळाले नाही... तर असं काहीतरी करावं लागेल ते आतापर्यंत केलेलं नाही.
या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आशा चार गोष्टी सांगणार आहे की जर तुम्ही आत्ता आणि लगेच बाळ होऊ द्यायचा विचार केलात की आपल्यावर काही बंधनं घालून घेतली पाहिजे आणि जर सुरुवातीलाच या गोष्टीचा अवलंब केला तर कदाचित तुमच्या ध्येयाचा रथ तुम्ही योग्य मार्गाने घेऊन जाऊ शकाल.
नमस्कार! मी अलका शिंदे
गर्भसंस्कार मार्गदर्शक
मला येत्या पाच वर्षात एक लाख गर्भवतींच्या जीवनामध्ये बदल घडवून त्यांच्या गर्भातील बाळावर सुसंस्कार करून त्यांना सर्वगुणसंपन्न व सक्षम असे देशाचे नागरिक घडवायचे आहे आणि हा माझा ध्यास आहे.
आई-वडिल जेव्हा शरीर- मनाने मूल होऊ देण्यासाठी तयार असतील, तेव्हाच मुल आरोग्यसंपन्न निपजेल.
आपल्याला मूल हवं आहे म्हणून मूल होऊ देन चुकीच आहे; तर त्या मुलाचं पालकत्व स्वीकारायला, एक उत्तम माणूस बनायला आपण तयार आहोत का? हा विचार करणे अधिक गरजेचे आहे. गर्भधारणा होण्याआधी किमान तीन महिने आधीपासून पती-पत्नीने आरोग्याची संपूर्ण काळजी घेतली पाहिजे.
बाळ होण्यापूर्वी कोण कोणत्या गोष्टी आवर्जून पाळायला हव्यात त्यासाठी.
चला तर मग सुरुवात करूया...
१. गर्भधारणेपूर्वी चा आहार
बाळााचा प्लॅन करतेवेळी पती-पत्नी दोघांनीही खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये जाणीवपूर्वक बदल करूून घ्यायला हवा. आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जाऊन पंचकर्मम करून बीज शुद्धधी करून घ्यायला हवी.
बाहेरचे चमचमीत, मसालेदार पदार्थ, अति मांसाहार, जंक फूड, फास्ट फूड, कोल्ड्रिंक्स, चहा कॉफी या गोष्टी हळूहळू कमी करून काही दिवसात पूर्णपणे बंद कराव्या. शुद्ध चौरस आहार घेण्यावर भर द्यावा. फळभाज्या मोड आलेली कडधान्य फळे या सगळ्यांचा आहारात समावेश असावा पुढे बाळाला फॉलिक ऍसिड आयोडीन यासारख्या घटकांची कमतरता पडू नये यासाठी सुखा मेवा सोयाबीन ज्वारी यांचाही सामावेश असावा डॉक्टरांच्या सल्ल्याने किमान महिनाभर आधीपासून फॉलिक ऍसिडच्या गोळ्या ही सुरू कराव्यात. होणाऱ्या आईने महिनाभर आधी एक दुधात शतावरी टाकून घ्यावे वडिलांनी एक चमचा अश्वगंधा पावडर कपभर दुधात घालून घ्यावे. जर मातापित्यांना व्यसन असेल तर त्याचा बाळाच्या मनावर निगेटिव परिणाम होतो. बाळ गर्भात असताना सर्व काही माता-पित्यांना कडूनच शिकत असते.
२. व्यसनांना आळा घाला.
बाळाची आई बाबा बनायचे असेल तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचे व्यसन असल्यास ते पूर्णपणे बंद केले करा. म्हणजेच दोघांनीही आपल्यावर जाणिवपुर्वक बंधन घालून घेणे गरजेचे आहे. कारण गर्भात असताना बाळाच्या मेंदूचा 80% विकास होतो त्यामुळे माता पिता जे काही करतात त्या सर्व गोष्टी बाळाकडे आकर्षित होतात. त्यासाठी बाळाला एक पॉझिटिव्ह वातावरण निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे घरातील वातावरण व मुलांवर होणारे संस्कार याचा मुलांचे भवितव्य घडवून आणण्यात फार मोठा सिंहाचा वाटा असतो. हे सत्य पालकांनी नीट लक्षात घेतले पाहिजे. घरातील मंगल वातावरण व सुसंस्कार म्हणजे मुलांना लाभलेले भक्कम कवच असते. त्यामुळे दूषित वातावरण व कुसंस्कार याचा मुलांवर वाईट परिणाम होतो. बाळ जर सुदृढ हवा असेल तर पुरुषांनी देखील व्यसन सोडले पाहिजेत .
३.सदृढ शरीर.
बाळ होण्यापूर्वी किमान तीन महिने आधी पती-पत्नी दोघांनीही आपल्या शरीराला व्यायामाची व योगासनांची सवय लावून घ्यायला हवी. सकाळी किमान वीस मिनिटे योगासने करायला पाहिजे त्यामुळे शरीर सुदृढ बनते व स्नायूंना शक्ती मिळते संपूर्ण शरीरात शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो बाळ जसं सुसंस्कारीत असणं आवश्यक आहे तसं ते सुदृढ ही असलं पाहिजे त्यासाठी त्याच्या आई-बाबांनी आपल्या शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे आपल्याला आरोग्यसंपन्न आणि तेजस्वी बाळ हवे आहे या दृष्टिकोनातून आपण आपले शरीर अधिक छान आणि आरोग्य संपन्न कसे राहील या गोष्टी लक्षात घेणे गरजे
सुदृढ मन.
बाळ होण्यापूर्वी किमान तीन महिने असते करण मुला-मुलींना या गोष्टी फार बोरिंग वाटतात. त्यामुळे त्यांनी त्यांच्यामध्ये हळूहळू सवय लावून त्यामध्ये रस निर्माण करावा. रोज 15 मिनिटे ध्यानधारणा केल्याने शरीर व मन ताजेतवाने होऊन शक्ती मिळते. व शरीरास रक्तपुरवठा होऊन ऑक्सिजन सुद्धा पुरवला जातो. मनाचे शुद्धीकरण केले जाते. मनाला स्थिरता प्राप्त होते. एकाग्रता वाढते. आणि मन स्थिर व शांत होते. स्मरणशक्ती वाढवणे व सर्व काही लक्षात राहते. आणि ते आपल्या बाळासाठी अतिशय महत्वाचे आहे व म्हणूनच मेडिटेशन ची सवय लावून घेणे महत्वाचे आहे .
प्राणायामामुळे श्वसन तंत्र सुधारते मन एकाग्र व निश्चयी होते आणि आपली निर्णय क्षमता वाढते आपण जे काम करतो ते आपण अधिक जोमाने करतो. विचारांमध्ये सुसुत्रता येते. शरीर शुद्ध होऊन एक नवचैतन्य निर्माण होते. रॉबर्ट कोच यांनी लिहिलेल एक उत्कृष्ट पुस्तक...
80-20 principle
यात रॉबर्ट कोच म्हणतात की 20 टक्के गोष्टीवर 80 टक्के परिणाम अवलंबून असतात.
मग अशा कोणत्या 20% गोष्टी आहे ज्या जर तुम्ही रोज सातत्याने करायला सुरुवात केली तर त्याचे 80 टक्के परिणाम तुमच्या तुमच्या बाळाच्या आयुष्यात मिळतील हे यावेळी ठरविणे अतिशय गरजेचे आहे.
फार जास्त गोष्टींवर फोकस न करता वरती दिलेल्या१,२,३,४ या महत्वाच्या निवडक गोष्टींवर तुमचं संपूर्ण लक्ष केंद्रित करा, कमीत कमी नव्वद दिवस त्या सवयी वर काम करा आणि एकदा त्या तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग झाला... की मग पुढच्या गोष्टीचा (बाळ होऊ देण्याचा) विचार करा.
सर्वगुणसंपन्न तेजस्वी आणि सुदृढ बाळाला जन्म देण्याचे माझे ध्येय आहे तर त्या दिशेने कमीत कमी कोणत्या गोष्टी करण्याची गरज आहे ज्या मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचवतील? आणि त्या म्हणजे वरील १,२,३,४
तीन महिने हाच प्रयत्न करा की आपण बाळ होण्यापूर्वी ह्या दिशेने जात आहोत.तर काही गोष्टी आवर्जून टाळण्याचा प्रयत्न करा.
ज्या गोष्टीमुळे तुम्हाला चांगले परिणाम मिळतील ते जास्तीत जास्त करण्याचा निश्चय करा.
ज्या गोष्टीमुळे विपरीत परिणाम होईल त्या गोष्टी कटाक्षाने टाळण्याचा प्रयत्न करा.
तात्पर्य: सदृढ सर्वगुणसंपन्न तेजस्वी बाळाला जन्म द्यायचा असेल तर नियमित आत्मपरीक्षण करून आपल्या ध्येयाल चिकटून राहण्याची गरज आहेे. परस्पपरविरोधी गोष्टी टाळून योग्य विचार करून योग्य निर्णय घेण्याची गरज आहेे.
हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद!
मला पूर्ण विश्वास आहे की बाळ होण्यापूर्वी तुम्ही या चार गोष्टींचा अवलंब केल्यास तुम्हाला होणाऱ्या सर्वगुणसंपन्न बाळा मुळे तुमचे पुढील आयुष्य तुम्ही नक्कीच सुखी बनवाल.
तुम्हाला या विषया वरील जर काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा.
तुमच्या ध्येयपूर्तीसाठी तुम्हाला योग्य व सकारात्मक वातावरणात राहण्याची अत्यंत गरज आहे. त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून २१ व्या शतकातील गर्भ संस्कार हा ग्रुप जॉईन करा.
अधिक माहितीसाठी संपर्क
सर्वगुणसंपन्न आरोग्यसंपन्न आणि सक्षम बाळाला जन्म देणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणरच...!








खूप सुंदर ब्लॉग लिहिला आहे
उत्तर द्याहटवाखुप छान ब्लाॅग लिहीला आहे.
उत्तर द्याहटवाखूप।छान मार्गदर्शन
उत्तर द्याहटवाThank you
खुप छान अलकाताई
उत्तर द्याहटवाThanku ...
उत्तर द्याहटवा🙏🙏🙏
Khup chhan margadarshan ek uttam pidhi ghadavnyasathi👍👌👌👌
उत्तर द्याहटवा