प्रथम आपण कला म्हणजे काय हे जाणून घेऊया...
एकदम साध्या अर्थाने बघायच असेल तर कला म्हणजे आपल्यातील कुशलता. आपण अशी काही एखादी गोष्ट करून दाखवतो की, त्यामध्ये आपण अतिशय तज्ञ असतो.
कोणतीही गोष्ट आपण खूप चांगल्या प्रकारे करून दाखवली तर त्यामध्ये आपण तज्ञ आहे... म्हणजेच आपल्या मध्ये ती कला आहे असे समजावे.
मित्रांनो आज आपण जाणून घेऊया की आपल्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे स्कील आहे. आपण कोणत्या गोष्टींमध्ये तज्ञ आहे. पुढील काळात आपल्याला कोण कोणत्या गोष्टी शिकण्याची गरज आहे.
बरोबर ना..?
तर मित्रांनो सगळ्यात आधी मी तुम्हाला एक प्रश्न करते की....
कला कोणकोणत्या? प्रकारच्या असतात...! आणि तुम्हाला काय? वाटतंय की कला किती? प्रकारच्या असतात...! ते तुम्ही कमेंट मध्ये टाईप करू शकता.
तुम्ही तुमच्या पद्धतीने विचार करा की... अशी कोणती कला तुम्हाला अवगत करावीशी वाटते. की जी अत्यंत महत्त्वाची आहे. मग त्यासाठी तुम्ही तुमचे "आत्मपरीक्षण करा...!" . आत्मपरीक्षण केल्यावर तुम्हाला नक्कीच कळेल की आपल्यामध्ये कुठली? कला असणे आवश्यक आहे...! त्यामध्ये प्रगती केल्यास आपल्याला त्याचा खूप फायदा होईल. आणि ती आहे...
स्वतःचे व्यवस्थापन कौशल्य
पटतय ना...!
तुम्हाला जर ही गोष्ट पटत असेल तर कमेंट मध्ये मला नक्की सांगा.
प्रत्येक पालकाचे आपल्या बाळा विषयी खूप मोठे स्वप्न असते. प्रत्येक पालक आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी सर्व काही करत असतो. प्रत्येकाला वाटत असते की आपला बाळ खूप हुशार असावा, त्याने आपलं नाव रोशन करावं, त्याचं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असावं. पण मित्रांनो तुम्हाला हे तुमचं स्वप्न सत्यात उतरवायचं असेल... तर त्याआधी तुम्हाला स्वतःचे व्यवस्थापन कौशल्य शिकावेच लागेल.
बरोबर ना...!
तर स्वतःचे व्यवस्थापन कौशल्य आपल्या मध्ये कसे आणायचे... हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. त्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे.
ती म्हणजे..
"कितीतरी लोकांचा असा गैरसमज असतो की...उदा.माझे मित्र किंवा माझ्या मैत्रिणी खूप चांगले पालकत्व निभावतात पण मला ते येईल का. किंवा काही मित्र असे असतात की ते पालकत्व निभावण्यामध्ये सक्सेस होत नाही. मग त्यांच्या अनुभवावरून आपल्या सुद्धा मनामध्ये गोंधळ चालू असतो.आणि मग मनामध्ये द्विधा अवस्था निर्माण होते.
कित्येक लोकं असे फील करतात. की मला ते जमणार नाही...
परंतु 'असं नाही मित्रांनो... आपण त्यांच्यापेक्षाही खूप चांगलं करू शकतो. आपल्या सर्वांमध्ये ते टॅलेण्ट असतेच'...!
त्यासाठी आपल्याला एक गोष्ट करायची आहे. ती म्हणजे आपण आपली तुलना दुसऱ्यांशी करायची नाही. कारण आपण जेव्हा दुसऱ्याशी तुलना करतो.. तेव्हा याचा अर्थ असा की आपण स्वत:ला किंमत देत नाही. तर आपण स्वतःची बेइज्जती करत आहोत मित्रांनो आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत. त्यामुळे आपण एक गोष्ट सोडायला हवी... स्वतःला सांगा की आज पासून मी कुणाच्याही सोबत माझी तुलना करणार नाही. कारण की मी इतरांपेक्षा वेगळा आहे. मी लाजवाब आहे. त्यासाठी...
आत्मपरीक्षण करा:
आपण आता आपले आत्मपरीक्षण करण्यासाठी स्वतःला वेळ द्यायचा आहे. आणि आपल्यासाठी थोडासा वेळ काढायचा आहे.एक अशी जागा निवडा की त्या ठिकाणी आपल्याला कोणीही डिस्टर्ब करणार नाही. आपण एका असणावरती मांडी घालून बसा. आपले दोन्ही हात मधोमद एकावरती एक ठेवून आकाशाच्या दिशेने सुलट ठेवा. तीन दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडताना शांत झाल्याचा अनुभव घ्या.
आपले संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करा. आज आपल्याला जाणून घ्यायचे आहे की स्वतःची तुलना कुणा बरोबरही का करायची नाही. कारण आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत. प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टॅलेंट असते. नेहमी लक्षात ठेवा की आपण फार वेगळे आहोत. आपल्यासारखे या जगामध्ये कोणीही नाही. डोळे बंद करा व आता मी देत असलेल्या सूचनांकडे पूर्णपणे लक्ष द्या. "होय मित्रांनो मी तुमच्याशी बोलतच आहे.
तुम्ही पालक होऊ इच्छिता...! तुम्ही बाळाचा प्लॅनिंग करताय...!! त्यामुळेच तर तुम्ही हा ब्लॉग वाचत आहात ना...!!!
"तर फ्रेंड्स मी तुमच्याशीच बोलत आहे"!होय...! तुम्ही इतरांपेक्षा फार वेगळे आहात. तुमच्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत. तुम्ही जे ही करू पाहाता ते तुम्ही करू शकता. होय मी तुम्हालाच सांगते आहे. की आपण जे हाती घेतले... ते तुम्ही करू शकता. आपल्या मध्ये खूप खूप खूप शक्ती आहे. कारण आपण इतरांपेक्षा फार वेगळे आहोत. होय...! आपण फार वेगळे आहोत.. होय...! आपल्या अंतर्मनामध्ये डोकावून पहा त्याला विचारा की मी खरच? इतरांपेक्षा वेगळा आहे...! तर होय मित्रांनो...! आपल्या आतून नक्की आवाज येईल. जर आपण ऐकू शकत नसाल तर ऐकण्याचा प्रयत्न करा....
आपल्या "अंतर्मनातील आवाजला" ...!
कारण आपण खरोखर इतरांपेक्षा फार वेगळे आहोत. आपल्या आत खूप मोठ्या प्रमाणात,अमर्यादशक्ती आहे. जी पाहिजे ती गोष्ट आपण करू शकतो. आपल्या अंतर्मनातील आवाज ऐकून तर बघा... आपण इकडे तिकडे भटकत आहोत.
होय मित्रांनो आपण सतत इकडे तिकडे भटकत असतो. जरा एकदा स्वतःला प्रश्न विचारा आपलं मन काय सांगते. आपल्याला आपलं मन एकच सांगत आहे. की तुला जे ही करायच आहे ते तू करू शकतो /ते तू करू शकते. आपण नेहमी स्वतःची तक्रार करतो... की मी हे करू शकत नाही? ते करू शकत नाही..! पण जाऊद्या...!
प्रत्येकामध्ये काही ना काही तरी कमी असते. सर्व बाजूने कोणीही परफेक्ट नसतो. व आपणही नाही. आणि आपण परफेक्ट बनण्याच्या मागे लागलात तर पूर्णपणे परफेक्ट बनू शकणारही नाही.मग का परफेक्ट बनण्याच्या चक्कर मध्ये आपला वेळ खर्च करत आहात. सोडून द्या मित्रांनो आणि आपण आपल्याला विचारा की मी हे करू शकतो का..? तर आपलं मन आपल्याला नक्की उत्तर देईल. की "होय मित्रा.. तू करू शकतो"...! तु का थांबलास ...
तर फ्रेंड्स मी तुम्हाला हे सांगत आहे.की "होय... तुम्ही करू शकता", तुम्ही हे करू शकता...! तुम्ही तुमचे पालकत्व निभावून शकता...!!जे पाहिजे ते तुम्ही करू शकता..!!! कारण तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात...! आपल्या मनामध्ये एकच गोष्ट सुचवा की आपण खूप वेगळे आहोत. होय तुम्ही वेगळे आहात, तुम्ही वेगळे आहात, इतरांशी तुलना करू नका, तुम्ही खरोखर वेगळे आहात, युनिक आहात...! स्वतःशी बोला"आय एम युनिक पर्सनॅलिटी. या जगामध्ये माझ्यासारखी एकही व्यक्ती नाही. या दुनियेत माझ्यासारखं एकही जन्माला आलेला नाही. आणि यापुढेही कधी येणार नाही. एक दीर्घ श्वास घ्या आणि आपल्या आतील आत्मविश्वासाचा सुंदर अनुभव घ्या. आपली कोणाशी अजिबात बरोबरी नाही. तर मग का आपण आपला वेळ वाया घालवतोय. दुसऱ्यांबरोबर तुलना करून आपण इतरांसारखे बनू शकत नाही. हा...!
हे मात्र नक्की आहे की आपण इतरांचे गुण आपल्यामध्ये घेऊ शकतो. पण इतरांसारखे बनू शकत नाही. त्यामुळे इतरांसारखे बनण्याचे प्रयत्न सुद्धा करू नका. कारण तुम्ही... युनिकआहात.
स्वतःला सांगा आय ॲम युनिक💪...! अतिशय एनर्जीने बोला... की एस आय एम युनिक💪...! युनिक पर्सनॅलिटी💪...! एक दीर्घ श्वास घ्या आणि आपल्या आतील कॉन्फिडन्स चा अनुभव घ्या...!
आपण दुनियेमध्ये कशासाठी आलो आहोत. काहीतरी वेगळं करण्यासाठी आलो आहोत. आपल्यालाही कोणीतरी जन्म दिला आहे. तसाच आपल्याला आपल्या बाळाला जन्म द्यायचा आहे. त्याचे पालन पोषण उत्तम प्रकारे करायचे आहे. त्याला महान बनवायचा आहे. आणि ही माझी जबाबदारी आहे. हे माझं कर्तव्य आहे. असं स्वतःला सांगा. आतापर्यंत जे इतरांनी केले नाही... ते मला करून दाखवायचे आहे... की
जे माता जिजाऊंनी केले.
त्या पण एक माणूस होत्या. त्यांनी केलं तर मी का? करू शकत नाही...! आपल्या आंतर मनामध्ये ही गोष्ट रुजवायची आहे कि मी एक आदर्श माता/बनू शकते ,एक आदर्श पिता बनू शकतो. कारण मी इतरांपेक्षा वेगळा आहे. मी इतरांपेक्षा वेगळी आहे,
येस आय एम युनिक💪 आय ॲम युनिक💪 होय..मी करू शकते/मी करू शकतो. येस आय ॲम युनिक पर्सनॅलि💪
आपल्या मनातल्या मनात बोला की होय मी करू शकते/होय मी करू शकतो. माझ्या इच्छेप्रमाणे सर्व काही मी करू शकते. माझ्या इच्छेप्रमाणे मी बनू शकते/ मी बनू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण खरोखर इतरांपेक्षा फार वेगळे आहात.
कारण "आपण आतापर्यंत जे करत आलो... तेच करत राहिलो, तर आपल्याला तेच मिळत राहील... जे आत्तापर्यंत मिळत आला आहे...!
आपले दोन्ही हात एकमेकांवर रफ करा.व डोळ्यावरून चेहऱ्यावरून फिरवून घ्या. संपूर्ण एनर्जी आपल्या शरीरामध्ये फ्लो करा.व आता आपले डोळे हळूवारपणे उघडा...😊
तर मित्रांनो आपल्याला आता समजल आहे की आपण इतरांपेक्षा खरोखर वेगळे आहोत.या जगामध्ये आपल्यासारखी दुसरी कोणतीही व्यक्ती निर्माण झालेली नाही.
प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वतःचे कौशल्य असते आपल्या मध्ये सुद्धा ते आहे.. गरज आहे फक्त शोध घेण्याची. आपल्यामध्ये जर तो न्यूनगंड असेल तर आजच त्याला आपल्या मधून बाहेर फेका. आणि स्वतःवर काम करा स्वतःची शक्ती ओळखा खंबीर पालकत्व निभवन्याची जबाबदारी घ्या, आपल्या बाळाला आपल्याला कशासाठी जन्म द्यायचा आहे, त्याला काय बनवायचा आहे हे निश्चित करा. कारण आपण जसा विचार करतो तसाच आपला बाळ निर्माण होतो हा प्रकृतीचा नियम आहे.
उदा. शेतकरी आपल्या सुपीक जमिनी मध्ये बी कसा पेरेल त्यावर त्याचे पीक अवलंबून असते,
बी जर चांगल्या प्रतीचे पेरले तर पीक भरघोस येईल.
अगदी त्याच प्रमाणे आपल्याला जे पाहिजे त्यासाठी आपण पहिला निश्चय केला तर त्याच प्रमाणे आपल्याला मिळणार आहे. आणि तो निश्चय तुम्ही आज नक्की करणार आहात. याची मला खात्री आहे. तर निर्णय घ्या निश्चय करा फॅमिली प्लॅनिंग साठी तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा...!
तुम्ही माझा ब्लॉग शेवटपर्यंत वाचला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे...!
तुम्हाला हा ब्लॉग कसा? वाटला...!
आवडला असेल आणि माझे म्हणणे पटले असेल तर तुमची अमूल्य प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की द्या.
बाळ प्लॅनिंग पासून ते नऊ महिन्या पर्यंत बाळावर संस्कार करण्यासाठी, बाळाला सर्वगुणसंपन्न व सक्षम बनविण्यासाठी मी "२१ व्या शतकातील गर्भ संस्कार हा कोर्स सुरू केला आहे". फ्रेंड्स या कोर्सच्या माध्यमातून मी तुम्हाला अतिशय सिस्टिमॅटिक पद्धतीने घेऊन जाणार आहे. ज्या नैसर्गिक आणि दैवी गोष्टी आहेत त्या मी या कोर्समध्ये दिल्या आहेत. खूप लोकांना या कोर्सचा सकारात्मक आणि चांगला फायदा झाला आहे. आणि तुम्हाला सुद्धा खूप चांगला फायदा होईल याची मला खात्री आहे. तुम्हाला जर या कोर्समध्ये भाग घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
आधीक माहितीसाठी संपर्क:
धन्यवाद🙏😊






Khup sunder ahe information tai
उत्तर द्याहटवाThanku swati 🙂
उत्तर द्याहटवा