स्वतःला बदला जग आपोआप बदलेल...!
दिवस गेल्यानंतर तीन महिने अति सजग राहणे आवश्यक असते. या काळामध्ये जर मानसिक ताण तणाव असेल तर त्याचा गंभीर परिणाम गर्भावर होतो. अंगणवाडी क्षेत्रामध्ये काम करत असताना कित्येक मुलींच्या बाबतीत हे घडताना मी पाहिले आहे.
या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत त्याआधी बाळ होण्यापूर्वीच आपण असं काय केलं पाहिजे की आपल्याला अशा गोष्टींना सामोरं जावं लागणार नाही. आणि ते म्हणजे स्वतःमध्ये बदल घडवून आणणे.
नमस्कार ...मी अलका शिंदे.. गर्भसंस्कार मार्गदर्शक आणि सेल्फ कोच... मला येत्या ५ वर्षात एक लाख मुलींच्या जीवनामध्ये बदल घडवून आणायचा आहे. एक लाख गर्भवती मातांपर्यंत पोहोचून त्यांच्या गर्भातील बाळावर सूसंस्कार करायचे आहे हा माझा ध्यास आहे...!
आपला आजचा जो विषय आहे त्याने माझे संपूर्ण जीवन बदलल आहे. ते कसे झाले आणि असे काय आहे तेच गुपित तुम्हाला मी सांगणार आहे.
ते गुपित जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वापरले तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये यश मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. हेच गुपित यशस्वी पालक होण्यासाठी सुद्धा लागू पडते. जगातील ५% लोक हे गुपित आपल्या जीवनामध्ये वापरतात. कारण या गोष्टी करायला हिम्मत लागते. आपल्या प्रत्येकामध्ये ती असते फक्त आपण तिचा वापर केला पाहिजे...
पर्याय:
आपल्यापुढे खूप सारे पर्याय असतात. त्यापैकी आपल्याला एक चांगला पर्याय गोंधळ न होऊ देता निवडायचा आहे. यशस्वी पालक होण्यासाठी एक लक्ष निश्चित करा. आपल्या बाळाबद्दल आपला हेतू काय आहे, आपले स्वप्न काय आहे, त्यानुसार ध्येय ठरवा. आणि त्यानंतर त्या मार्गाने प्रवास करा. त्यानंतरही तुमच्यापुढे दोन पर्याय असतील... मैत्रिणींनो माझ्याही बाबतीत हेच झाले होते. पण मी यशस्वी होण्याचा पर्याय निवडला. त्यासाठी मी माझ्या सवयी बदलल्या. आणि हेच आज मी तुम्हाला या लेखामध्ये सांगणार आहे. मात्र त्यासाठी लेख शेवटपर्यंत वाचा.
आज पर्यंत ज्या सर्व यशस्वी पालकांना हे गुपित माहिती होते. ते पालक... पालकत्व निभावण्या मध्ये यशस्वी झाले. आहेत. आता तुम्हाला हे गुपित जाणून घ्यायची आतुरता नक्कीच लागली असेल.
या जगात दोन प्रकारचे लोक आढळतात.
१. सक्रिय:-
सकारात्मकवृत्तीचे
२. आळशी:
नकारात्मक वृत्तीचे
एक तर सकाळी लवकर उठा किंवा झोपा
मी असं का म्हटले... तर उठल्यावर सुद्धा आपल्यापुढे दोन पर्याय असतात.
१. पुढे जाण्याचे
२. मागे येण्याचे
आता सक्रिय लोक कुठला पर्याय निवडतात... व आळशी लोक कुठला पर्याय निवडतात. हे आपण बघू या...
सक्रिय:
आळशी:
असे लोक मागे येण्याचा पर्याय... निवडतात. ते नेहमी गोंधळलेले असतात. कारण ते नकारात्मक असतात. ते आपल्या मूड नुसार वागतात. एखाद्या कामांमध्ये पुढे जाण्याऐवजी ते मागे येतात. व स्वतःचे नुकसान करून घेतात. कोणतेही काम यांच्याकडून पूर्ण होत नाही.
आपण आजपर्यंत जे करत आलो... तेच करत राहिलो.. तर आपल्याला तेच मिळेल... जे आतापर्यंत मिळाले आहे.
हा विचार करून सक्रिय लोक फार गंभीरपणे वागतात. ते पटकन निर्णय घेऊन कामाला लागतात. ते फार तीक्ष्ण बुद्धीचे असतात. स्वतःला सुधारण्यासाठी काय चांगलं मिळेल त्याचा शोध घेतात व त्याची आपल्या जीवनात अंमलबजावणी करतात.
माझा सांगण्याचा उद्देश एकच आहे की आपण यशस्वी पालकत्व... निभावण्यासाठी सक्रिय बनणे अतिशय गरजेचे आहे. आपल्या बाळाच्या भवितव्यासाठी आपल्याला आतापासूनच सक्रिय बनायचे आहे. असं म्हटलं जातं
"शिवाजी इज द मॅनेजमेंटगुरु"
प्रत्येक ...
व्यवसायामध्ये महाराजांच्या जीवणाच्या व्यवस्थापनातील गोष्टी वापरल्या जातात.ही खूप सुंदर व्यवस्था आहे. हे कोणामुळे झाले तर त्यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंमुळे... त्याच महाराजांच्या गुरू होत्या सर्व व्यवस्थापन त्यांचे होते म्हणून असं म्हटलं जातं की...
"मदर इज मॅनेजमेंट गुरु"
माता जिजाऊंनी महाराज जन्माला येण्याआधीच मनात एक हेतू ठेवला होता. आणि तो म्हणजे "हिंदवी स्वराज्याची स्थापना". राजे पोटात असताना त्यांनी राजांना घडविण्यासाठी खूप कष्ट घेतले. म्हणून महाराज तसे घडले. हे काही नव्याने सांगायला नको...! आणि आपल्यालाही तेच बनायच आहे. हो की नाही ?आपण सुद्धा काहीतरी वेगळं करून दाखवणार आहोत. हो की नाही...?आपल्यालासुद्धा यशस्वी पालक बनवायच आहे. त्यासाठी आपल्याला एक वचन घेऊन ते पूर्ण करून दाखवायचे आहे. आपण जर आळशी असाल तर... आपल्याला आज पासून आपल्या मध्ये बदल करून घेऊन एक वचन घ्यायच आहे.
आपल्याला असं काही करून दाखवायचं आहे की... जे माता जिजाऊ सोडून आत्तापर्यंत कोणीही केलेले नाही... मला एक इतिहास घडवायचा आहे..
मी वेगळीआहे...! मी वेगळी आहे...!!
होय.. !
माझं व्यक्तिमत्त्व इतरांपेक्षा वेगळं आहे...!!!
मला यशस्वी पालक बनायच आहे. मला माझ्या मनाप्रमाणे माझ्या स्वप्नातील बाळाला जन्म द्यायचा आहे,माझ्या स्वप्नाप्रमाणे त्याला घडवायचं आहे. त्यामध्ये मी यशस्वी झाली आहे.
मुलींनो मला १लाख मातांच्या जीवनामध्ये बदल घडवून आणायचा आहे, त्यांच एक वेगळ व्यक्तिमत्व बनवायच आहे. त्यांना सक्रिय बनवायच आहे. आदर्श बनवायच आहे. यशस्वी बनवायच आहे. त्यांच्या हातून घराघरात शिवाजीराजे घडवायचे आहेत. आणि त्यासाठी तुम्ही सर्वात आधी आदर्श पुरस्कार घेणार आहात. आणि हा माझा ध्यास आहे. मुलींनो तुमच्या मनामध्ये तुमच्या बाळा विषयी जर हेतुपूर्वक मोठं स्वप्न बाळगल आणि त्या दिशेने तुम्ही जायचं ठरवलं तर तुम्ही आजूबाजूंच्या लोकांकडे व इतरांच्या बोलण्याकडे, वागण्याकडे आपोआप दुर्लक्ष कराल आणि म्हणूनच...
आज आपण प्रतिज्ञा करूया की...
मी माझ्या स्वप्नाप्रमाणे बाळाला जन्म देऊन...मला हवा तसा...माझ्या मनाप्रमाणे त्याला घडविणे... हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे... आणि तो मी मिळवणारच...!
माझ्या स्वप्नाप्रमाणे बाळाला
घडविण्यासाठी मी माझे लक्ष निश्चित करून
त्या मार्गाने मला पुढे जायचे आहे.
मुलींनो आपल्याला हा प्रवास खूप पुढे घेऊन जायचा आहे. तुमची सर्वांची मला साथ मिळेलच... अशी आशा करते. मी माझ्या धेयापर्यंत लवकरच पोहोचून यशस्वी होईल याची मला खात्री आहे.
माझा लेख शेवटपर्यंत वाचल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे..
तुम्हाला मला काही विचारायचं असेल तर कमेंट मध्ये विचारू शकता.
सकारात्मक,आनंदी व चांगल्या वातावरणात राहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून "२१व्या शतकातील गर्भसंस्कार" हा ग्रुप जॉईन करा.
धन्यवाद...!
https://t.me/joinchat/OtpkXgQWVzc0MTg9
https://www.facebook.com/groups/562863397763173/?ref=share
संपर्क:









वा, खूप सुंदर मार्गदर्शन
उत्तर द्याहटवाThanks UC beta 😘❤️
हटवाKhupsundar margadarshan👍
उत्तर द्याहटवाखूप छान लिहिला आहे
उत्तर द्याहटवाछान मार्गदर्शन