रविवार, ९ मे, २०२१

बाहेरचं जग आणि पोटातले बाळ यांच्यामधील एकमेव दुवा "आई"



जन्मानंतर,  मुलांना, अनुकूल किंवा प्रतिकूल वातावरणाची जाणीव असंख्य मार्गांनी असंख्य प्रकारे होत असते, परंतु पोटातल्या बाळाला वातावरणाची जाणीव त्याच्या आईच्या माध्यमातून होते. बाहेरील जग आणि गर्भाशयातलं बाळ यांच्यामधला आई हा एकमेव दुवा असतो.

याच गूढ नेमकं काय आहे हे समजून घेण्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा...

नमस्कार...🙏

मी अलका शिंदे..

गर्भसंस्कार मार्गदर्शक अँड सेल्फ कोच

"२१ व्या शतकातील गर्भसंस्कार" या प्लॅटफॉर्मची संस्थापिका...

मला येत्या पाच वर्षात एक लाख गर्भवती मातांना पर्यंत पोहोचून त्यांच्या गर्भातील बाळावर सूसंस्कार करायचे आहे त्यांना सुदृढ सर्वगुणसंपन्न आणि सक्षम असे देशाचे नागरिक मला घडवायचे आहेत आणि हा माझा ध्यास आहे...

प्लेसेंटा(वार)

याच्या माध्यमातून बाळाला असंख्य संदेश मिळत असतात. मातेला तिच्या आहार, विहार, आजूबाजूचे वातावरण यातून जे अनुभव येत असतात ते सारे या रासायनिक संदेशांद्वारा गर्भापर्यंत पोचतात. या संदेशांमुळे, जन्मापूर्वीच बाळाला बाहेरच्या जगाची ओळख होत असते. त्या वातावरणात जगण्यासाठी बाळाची जैविक आणि मानसिक दृष्ट्या तयारी होत असते. बाहेरच्या जगात आल्यानंतर, प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता, अशाप्रकारे गर्भाशयातच बाळाला प्राप्त होते. ही क्षमता जेवढी अधिक व सकारात्मक असेल तेवढे जन्मलेल्या बाळाचे व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावशाली व यशस्वी प्रवृत्ती चे असते. आणि गर्भसंस्काराचे हेच मर्म आहे. प्रौढ व्यक्तिंमध्ये आढळणाऱ्या अनेक मानसिक आजार व स्वभाव दोषांचे मूळ , त्याचे गर्भाशयातील ९ महिन्यातल्या जीवनामध्ये आढळते.

क्रोमोसोम्स (गुणसूत्रांची निवड )

गर्भाशयात विकास पावणाऱ्या अर्भकापर्यंत पर्यावरणविषयक माहिती पाठविण्याची आईची क्षमता ही गर्भावर कायमस्वरूपी प्रभाव टाकणारी गोष्ट आहे.जगात यशस्वीपणे जगण्यासाठी संततीमध्ये जीन्सच्या (गुणसूत्रांची) सर्वोत्तम कार्ययंत्रणेची निवड व्हायला हवी हे गर्भसंस्काराचे उद्दिष्ट असते. याची दुसरी बाजू अशी आहे की गर्भवती महिला, प्रतिकूल परिस्थितीमुळे किंवा तिच्याबरोबर होणाऱ्या शारीरिक / मानसिक दुर्व्यवहारांमुळे , तणावग्रस्त असेल, तर सतत तिच्या पोटातील बाळाला ताणतणाव, दुःख, असे त्रास देणारे संकेत मिळत रहातात आणि त्याच्या मेंदूच्या विकासाचे संतुलन बिघडून जाते. वाढ आणि विकास यांच्या ऐवजी,सतत स्वसंरक्षण करण्याकडे त्याचा कल राहतो. विकासाची गती कुंठित होते. आणि याचे परिणाम त्याच्या संपूर्ण जीवनात दिसून येतात. याउलट, गर्भसंस्कार आणि जाणीवपूर्वक प्रदान करण्यात आलेल्या प्रेमळ आणि सकारात्मक मातृवातावरणामुळे, बाळाला मिळणारे अस्तित्वसंबंधित सिग्नल /संदेश वाढीस व विकासास प्रोत्साहन देणारे ठरतात. 

आजूबाजूचे वातावरण, त्यातील प्रेम / भीतीचे संकेत आणि त्याला आईकडून कळत नकळत दिला जाणारा प्रतिसाद यांची गर्भाच्या विकासासंदर्भात निर्णायक भूमिका आहे. मातेच्या रक्तातील संबंधित रेणूंच्या मार्फत हे प्रेम किंवा भीतीचे संदेश गर्भाकडे पोचवले जातात.  कारण जन्मलेली संतती त्यांचे जीवन त्याच ठिकाणी किंवा मूलत: त्याच वातावरणात व्यतीत करणार असते. नवजात मुलाच्या जीन्समध्ये, त्याचे अस्तित्व यशस्वीरीत्या टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त असे विकासात्मक प्रोग्रामिंग होते. ''जगण्यास लायक असेल तोच जीवनाच्या संघर्षात टीकतो'' हा डार्विनचा सिद्धांत आता मागे पडला आहे आणि ''प्रेम, स्नेह ही जगण्याची खरी ताकद व प्रेरणा आहे'' 

तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया नक्की द्या....

सर्वगुणसंपन्न बाळासाठी आपण कोणत्या वातावरणात राहतो, काय ऐकतो, काय बोलतो कोणती पुस्तके वाचतो हे फार महत्त्वाचे आहे तुम्हाला तुमच्या प्रेग्नेंसी काळामध्ये सकारात्मक आणि आनंदी राहण्याची अतिशय गरज आहे त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा वं "२१ शतकातील गर्भसंस्कार"हा फेसबूक ग्रुप जॉईन करा आणि आपला प्रेग्नेंसी का सकारात्मक व आनंदी बनवा .

"२१व्या शतकातील गर्भसंस्कार"


अधिक माहितीसाठी संपर्क:

https://wa.link/92aazl

माझा ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्याबद्दल मनःपूर्वक आभार हा ब्लॉग तुम्हांला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा

धन्यवाद 🙏🙂


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

१६ "संस्कार"

संस्कारांवर आधारित  भारतीयसंस्कृती भारत देश हा खेड्यापाड्यांचा देश, सामाजिक, राजकीय, वैज्ञानिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा अनेक विषयांमध्ये पु...