बुधवार, १२ मे, २०२१

जन्मपूर्व स्मृती व जन्माचे मानसशास्त्र


तुम्हाला? माहिती आहे का..! की बाळाच्या मेंदूचा८०% विकास हा गर्भात असतानाच होत असतो...!! आणि त्यामुळे बाळ जन्माला येण्यापूर्वी गर्भात असताना ज्या गोष्टी घडतात ज्या ज्या घटना घडतात त्याबद्दल च्या       गर्भाशयात बाळाचा जन्म होण्याआधी व प्रत्यक्ष जन्म       होत असतानाच्या वेळच्या आठवणी किंवा घटना त्याच्या पुढील आयुष्यभर अंतर्मनामध्ये कशा राहतात हे जरतुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा ब्लॉग शेवटपर्यवाचा...

नमस्कार मी अलका शिंदे

गर्भसंस्कार मार्गदर्शक आणि सेल्फ कोच

२१ व्या शतकातील गर्भसंस्कार या प्लॅटफॉर्मची संस्थापिका, मला येत्या पाच वर्षात एक लाख गर्भवती मातांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून त्यांच्या गर्भातील बाळांवर सुसंस्कार करायचे आहे व त्यांना सुदृढ सर्वगुणसंपन्न आणि सक्षम असे देशाचे नागरिक मला घडवायचा आहे आणि हा माझा ध्यास आहे...

आधुनिक संशोधन सांगते की बाळ गर्भात असतानाच बाळाच्या मेंदूचा ८० टक्के विकास होतो आणि त्यामुळे जन्म पूर्व घडलेल्या घटना व स्मृती त्याच्या अंतर्मनामध्ये आयुष्यभर राहतात. एवढेच नव्हे तर या घटनांचा माणसाचा स्वभाव, वर्तणूक , बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्त्व तसेच काही मानसिक आजारांशी संबंध असतो असेही अभ्यासाने आढळून आले आहे. सहसा बहिर्मनामध्ये या आठवणी व घटना व्यक्त नसतात परंतु अंतर्मनात त्या रुजलेल्या असतात. जर काही उपायाने त्या अंतर्मनातून वर आणता आल्या तर त्यांच्याशी निगडीत बऱ्याच व्याधींवर इलाज करणे सोपे जाऊ शकते. याची उदाहरण आपण पुढे पाहूच.

तरीदेखील आकडेवारी असे सांगते की दर 300 माणसामागे दोन किंवा तीन लोकांना जन्म पूर्व किंवा जन्म कालीन घटनांची आठवण असते.

संमोहन


हिप्नोथेरपी किंवा मेंदू वर काम करून स्मृती जागृत करण्याचे प्रयोग आज अनेक संशोधक करीत आहेत.डॉ. ग्रॉफ हे रुग्णांना  LSD नावाचे विशिष्ट  रसायनद्रव्य (हे प्रामुख्याने मेंदूवर कार्य करते) देऊन त्यांच्या, गर्भावस्थेत असतानाच्या स्मृती जागृत करत असत.डॉ.ग्रॉफने नोंदवलेले, त्यांच्या एका रूग्णाने केलेले  गर्भाशयात असतानाच्या अनुभवाचे  वर्णन आश्चर्यचकित करणारे आहे. (डॉ ग्राफ यांच्या संशोधन पद्धती विषयी पुढे माहिती येईल). तर त्या रुग्णाला, विशिष्ट डोसमध्ये LSD दिल्यावर, गर्भाच्या देहाकाराची जाणीव झाली. त्याचे डोके प्रौढांपेक्षा, शरीराच्या मानाने मोठे होते. कोणत्या तरी द्रव पदार्थामध्ये तो बुडलेला होता आणि नाभीपासून एका दोरखंडाने (नाळ ) प्लॅसेंटाला जोडलेला होता. वेगवेगळ्या गतीने चालणाऱ्या दोन हृदयांचे  दोन भिन्न आवाज त्याला ऐकू येत होते. आणि वारंवार येणाऱ्या, आतड्यांच्या हालचालींमुळे होणाऱ्या आवाजांची (पेरिस्टॅलिटिक साउंड) त्याला जाणीव झाली. त्याला अनोळखी अशा संकेतांच्या किंवा खाणाखूणांच्या आधारे, त्याने प्रसूतीपूर्वीचा अगदी परिपक्व गर्भ म्हणून स्वत: चे निदान केले.  अचानक त्याला बाहेरून विचित्र आवाज ऐकू आले. त्याला वाटले की ते आवाज उदराच्या भिंती आणि गर्भाच्या द्रवामुळे अस्पष्ट आणि घुमल्यासारखे येत आहेत. हसण्या खिदळण्याचे अपरिचित मानवी आवाज तो ऐकत होता आणि वाद्यांचे कर्कश्श नाद त्याला कर्निव्हलच्या कर्ण्याची आठवण करुन देत होते.  त्याला त्याच्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधी त्याच्या मूळ गावी दरवर्षी भरणाऱ्या वार्षिक फुलांच्या बाजाराची आठवण झाली. 

नमूद केलेली माहिती एकत्र केल्यावर, त्याने असा निष्कर्ष काढला की त्याची आई गरोदरपणाच्या शेवटच्या अवस्थेत बाजारात गेली असेल. 

पुढे त्याच्या आईकडून स्वतंत्रपणे माहिती मिळाली की  आई आणि आजीचा विरोध असूनही कार्निवल उत्सवाच्या ऐन धामधुमीत ती बाजारात गेली होती आणि  त्यामुळे तिची प्रसूती लवकर (वेळेच्या अगोदर) (प्रिमॅच्युअर ) झाली होती.

आधुनिक इतिहासातील विवेकानंद स्मृति



स्वामी विवेकानंद जेव्हा ८/९ वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या घरी काही उत्साहाने निमित्य भजन गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता मैथिली चांगलीच रंगलेली होती त्यामध्ये एक सुप्रसिद्ध गायक एक विशिष्ट रागात होते मधेच उभे राहून स्वामीजी म्हणाले की तुम्ही हा राग चुकीचा गात आहात गायकांना त्याबद्दल थोडं आश्चर्य वाटलं त्यांनी स्वामींना हसून विचारलं की बाळा तुला यामध्ये काय चुकीचं वाटतं त्यावर स्वामीजींनी तो राग अतिशय उत्कृष्ट पद्धतीने गाऊन दाखवला सर्व प्रेक्षक गं मंत्रमुग्ध झाले व स्वतः गायक सुद्धा आश्चर्यचकित होऊन स्वामीजींना म्हणाले की बाळ हे शिक्षण तू कुठे घेतला आहे का खूप विचारणा केल्यावर आढळून आलं आलं की स्वामीजी जेव्हा गर्भात होते तेव्हा त्यांचे आई भरपूर वेळा हा राग ऐकायची आणि हेच स्वामीजींना मिळालेलं गर्भस्थ ज्ञान होतं गर्भस्थ शिक्षण होतं. संशोधनाने हे सिद्ध झालं आहे की गर्भधारणेच्या अगदी चौदाव्या दिवसापासूनच बाळाची स्मृती म्हणजे मेमरी विकसित व्हायला लागते गर्भसंस्कारांचा विचार करताना या गोष्टीचं किती महत्त्व आहे हे वेगळं सांगायची अर्थातच आवश्यकता नाही.

याविषयी पुष्कळ साहित्य आज उपलब्ध आहे त्यापैकी डॉक्टर डेव्हिड चेंबरलीन यांचं "Babies remember birth" हे पुस्तक सर्वत्र वाखाणले गेले असून  अतिशय वाचनीय आहे.) असे डॉक्टर नरेंद्र लेले यांनी म्हटले आहे...

कल्पनेतील हवहवस असलेलं बाळ प्रत्यक्षात आणण्याचा हाच तो कालावधी आहे की ९ महिन्यांमध्ये मिळालेले ज्ञान त्याच्या ९० वर्षापर्यंत त्याला कायम स्वरूपी उपयोगी येते..

आपल्याला आपला बाळ भारतरत्न, ब्रिलियंट, सर्वगुणसंपन्न व यशस्वी लोकांपैकी एक हवा असेल तर त्या लोकां प्रमाणे त्याला बनवण्यासाठी कोण कोणत्या टेक्निक्स वापरायच्या व त्याचे सिक्रेट काय आहे या सर्व गोष्टींचे ज्ञान तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने व मायबोली मराठी मध्ये "२१ शतकातील गर्भसंस्कार" या कोर्समध्ये दिले जाईल.

आपण प्रेग्नेंट असाल व आपल्याला असा बाळ हवा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा व "२१ व्या शतकातील गर्भसंस्कार हा फेसबुक ग्रुप जॉईन करा"

२१ शतकातील गर्भसंस्कार

आपण जर मनापासून आपल्या बाळाच्या भवितव्यासाठी गर्भसंस्कार करून घ्यायला इच्छुक असाल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून माझ्याशी संपर्क साधा

गर्भसंस्कार मार्गदर्शक-अलका शिंदे

तुम्हाला गर्भसंस्कारा विषयी माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून माझा यूट्यूब चैनल सबस्क्राईब करा व व्हिडीओ आवडल्यास इतरांनाही शेअर करा..!

https://youtu.be/bE_F2iPKDpI

माझा ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्याबद्दल मनःपूर्वक आभार हा ब्लॉग तुम्हांला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा

धन्यवाद 🙂

२ टिप्पण्या:

१६ "संस्कार"

संस्कारांवर आधारित  भारतीयसंस्कृती भारत देश हा खेड्यापाड्यांचा देश, सामाजिक, राजकीय, वैज्ञानिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा अनेक विषयांमध्ये पु...