बुधवार, २० ऑक्टोबर, २०२१

गर्भावस्थेतील हेल्डी डायट

गर्भवतींना खाण्याच्या हेल्दी सवयी लावण्यासाठी महत्त्वाच्या चार स्टेप्स..!



आजच्या बदलत्या जीवनशैलीनुसार किशोर वयापासून तर लग्न होईपर्यंत चॉकलेट, बेकरी प्रॉडक्ट, कॅडबरी, आइस्क्रीम अशा गोड पदार्थ खाण्याच्या सवयी खूप लागलेल्या असतात. आणि  मुला मुली एवढे त्या पदार्थांच्या आहारी जातात की एखाद्या वेळेस जर त्यांना ते पदार्थ मिळाले नाही तर त्यांचा जीव अक्षरशः हैराण होतो. यासाठीच आधी त्या पदार्थांची सवय लावून न देणे हा एकच पर्याय असतो. एखाद्या वेळेस आधी मधी हे पदार्थ खाल्ले तरी चालेल, पण सारखे सारखे खाने म्हणजे, आपण आपल्या सवयींना खतपाणी घालत असतो,आणि नकळतपणे आपल्या आरोग्याची हेळसांड करत असतो. याची आपल्याला जाणीवच होत नाही, आणि जेव्हा जाणीव होते तेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते.
नमस्कार🙏
मी अलका शिंदे, गर्भसंस्कार मार्गदर्शक अँड सेल्फ कोच...
मला येत्या पाच वर्षात एक लाख गर्भवती मातांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणायचा आहे त्यांच्या गर्भातील बाळांवर सुसंस्कार करून त्यांना सुदृढ सर्वगुणसंपन्न आणि सक्षम असे देशाचे नागरिक मला घडवायचे आहे आणि हा माझा ध्यास आहे.

चला तर मग जाणून घेऊया....

परिपूर्ण संतुलित आहार घ्या:




आपल्यामध्ये पोषणतत्वांची कमतरता आपल्या संपूर्ण आरोग्यावर आयुष्यभर परिणाम करत असते. व त्याचा परिणाम आपल्या गर्भावर म्हणजेच गर्भात वाढणाऱ्या बाळावर होतो. आपल्या बालकाचे आपण एक चांगले आई-वडील म्हणून त्याच्यापर्यंत चांगले न्यूट्रिशन पोचवून भविष्यात त्याला मोठ्या आजारापासून आपण वाचवू शकतो. लहानपनापासून आपण टीव्हीवरच्या फास्ट फुड्सच्या जाहिराती बघुन जे दिसेल खाल्ले. कारण त्याबद्दल कुतूहल वाटत असे. ते एखाद्या वेळेस  आणून खाल्ले तरी चालेते, पण जर आपण सतत सारखे आणून खात असाल तर ती सर्वस्वी  चूक आहे. कारण फास्ट फूडस् खाऊन भविष्यात त्याचे दुष्परिणाम काय होतील याची जाणीव न ठेवल्यामुळे.  आपण आपल्या बालकाचे एक चांगले जबाबदार पालक नाही हे सिद्ध होते. आपण जर नीट समजून घेतले की ते सारखे खाल्ले तर त्याचे वाईट परिणाम होणार आहेत.तरच आपण आपल्या मनाला आवर घालू शकतो. त्यासाठी स्वतःला प्रेमाने समजवायचे. असे केल्यास आपण स्वता:ला नक्की कंट्रोल मध्ये ठेवू शकाल. गर्भावस्थेत योग्य व संतुलित आहार आपल्या जेवणामध्ये परिपूर्ण असणे,  आपल्याला संतुलित आहारची सवय लावणे हे सर्वस्वी आपल्या हातात आहे.

भूक लागेल तेव्हाच खा:



आपले मन हट्टी असते, जेव्हा ते ऐकत नाही तेव्हा जाणीवपूर्वक शांत रहा .जेव्हा भूक लागेल तेव्हा मात्र जे असेल ते तुम्ही आवडीने खाल. एकदा का सवय लागली की ते सर्व तुम्ही आवडीने स्वतःहून खाल. पण आपणच आपल्या मनाचे नको ते लाड पुरवले तर मग त्रास आपल्याला आणि भविष्यात  बाळालाही होणारच. आपण जे खातो ते बाळापर्यंत आपल्या रक्तातून पोहोचते त्यामुळे जेवताना, काही खाताना हेल्दी आणि पौष्टिक असेल तेच खावे, .पण जर आपल्यालाच बाहेरच्या हॉटेलच्या जेवणाची सवय असेल, फास्ट फूड जेवण आवडत असेल तर आपल्या बाळावर त्याचा वाईट परिणाम झाल्याशिवाय राहत नाही.

घरात भरपूर सुका मेवा आणून ठेवा:




जसजसे महिने वाढत जातील तसतशी  भूक ही वाढत असते. अशा वेळी हेल्दी पदार्थ घरामध्ये चणे, शेंगदाणे,गूळ, काजू, बदाम, मनुका, खजूर ,ड्रायफ्रुट्स अशा हेल्दी स्नॅक्स ने आपल्या घरामध्ये असणारा खाऊचा डबा भरून ठेवला, म्हणजे भूक लागल्या वर खाता येईल.आणि खाण्याच्या वाईट सवयी आपोआप निघून जातील जर आपणच बेकरी प्रोडक्ट, कॅडबरी, केक, पॅकेज फूड्स, मॅगी, पास्ता,जाम, बिस्किट्स, चिवडा, फरसाण अशा वस्तू  घरामध्ये ठेवल्या तर त्याच खाण्याच्या सवयी लागतात.

कोल्ड् ऐवजी पर्यायी हेल्दी ड्रिंक



आपल्याला अजून एक  सवय असते. कोल्ड्रिंक्स पिण्याची साखर मिश्रीत गोड पेय जसे फ्रूटी, मॅगो, ज्यूस, कोको कोला . या कोल्ड्रिंक्स मध्ये फक्त प्रिझर्वेटिव्ह आणि भरपूर साखर असते. कोल्ड्रिंक्स वर फळांचे नाव फक्त नावाला असतात, त्यामध्ये फळांचा अंश नसतो, आणि ते शरीराला खूपच हानिकारक असतात.या हानिकारक सवयी  आपण कमी करू शकतो. घरच्या घरी आपण ग्रीन संजीवनी बनवून घेऊ शकतो. लिंबू पाणी त्यामध्ये साखर मिसळून घेऊ शकतो. किंवा कोकम सरबत,आवळा सरबत घेऊ शकतो. काही गर्भवती माता तहान लागली तरच पाणी पितात त्यामुळे त्यांना डिहायड्रेशन होते, तर आपण वेळोवेळी  पाणी पिण्याची सवय लावायला हवी. चांगल्या सवयी आपण स्वतःला या काळात नक्की  लावू शकतो आणि  आपल्या बाळाला चांगले आरोग्य भविष्यात देऊ शकतो.

हा ब्लॉग पूर्ण वाचल्याबद्दल मी आपली आभारी आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स मध्ये नक्की विचारू शकता ब्लॉग आवडल्यास कमेंट्स ,शेअर ,लाईक नक्की करा, आणि अशाच हेल्दी टिप्स वाचण्यासाठी पाहण्यासाठी माझा "२१ व्या शतकातील गर्भसंस्कार" हा फेसबुक ग्रुप जॉईन करा...

धन्यवाद..!


३ टिप्पण्या:

१६ "संस्कार"

संस्कारांवर आधारित  भारतीयसंस्कृती भारत देश हा खेड्यापाड्यांचा देश, सामाजिक, राजकीय, वैज्ञानिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा अनेक विषयांमध्ये पु...