गर्भावस्थेतील योगाचे 12 महत्वाचे फायदे..!
तुमचा प्रेग्नेंसी प्रवास? आनंदी व आरोग्यदायी व्हावा, असं तुम्हाला वाटतं का..! आपली डिलिव्हरी normal? व्हावी असं तुम्हाला वाटतं का..! तुमच्या शरीरामध्ये सतत? वेदना होत आहेत, तुम्हाला दिवसभर आळस सतावतो fresh वाटत नाही weakness जाणवतो असे? तुम्हाला वाटते का..!
असे जर का असेल तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे, त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत वाचा...!
योग केल्यामुळे आपलं शरीर नेहमी आरोग्यदायी आणि चांगलं राहातं. मात्र योगा करण्या आधी काही नियमांचं पालन करणंही आवश्यक आहे. तसेच आपल्या, स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊनच योगाला सुरुवात करावी. योग आपलं शरीर तंदुरूस्त राखण्यास मदत करतो. त्यामुळे आपल्या प्रेग्नेंसीतच नाही तर संपूर्ण आयुष्यात योगाच महत्त्व नक्की काय आहे, हे मी आज तुम्हाला सांगणार . इतकंच नाही तर कोणती आसनं तुमच्या प्रेग्नेंसी प्रवासात तुम्ही करू शकता हे देखील मी पुढील ब्लॉग मध्ये सांगणार आहे.
आज मी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या प्रेग्नेंसी मध्ये योगा करण्याचे कोण कोणते फायदे आहेत ते सांगणार आहे.
१) योग तुम्हाला आरोग्यसंपन्न बनविण्यास आणि उर्जेने भरण्यासाठी कार्य करील.
२)) योगाचा मनावर आणि विचारांवर परिणाम होतो.
३) आपल्या मनात दिवसभरात खूप नकारात्मक विचार येतात, जे आपल्याला तणाव, चिंता किंवा मानसिक विकृतीत आणतात.योग आपल्याला या चक्रातून बाहेर पडण्यास मदत करतो.
४) नियमितपणे योग केल्याने माणूस काळजीपासून मुक्त होतो.
हे सर्व फायदे मिळवण्यासाठी मात्र कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे.
योगाचे अंतर्गत फायदे.....
रक्त प्रवाह (Blood circulation)
जेव्हा शरीरात रक्ताचे अधिक चांगले अभिसरण होते, तेव्हा सर्व अवयव चांगल्या प्रकारे कार्य करतात. याव्यतिरिक्त, शरीराचे तापमान देखील नियंत्रित केले जाते. रक्ताचा प्रवाह असंतुलित होताच शरीर अनेक रोगांना बळी पडू लागते, जसे की – हृदयाशी संबंधित आजार, खराब यकृत, मेंदू व्यवस्थित काम करत नाही इत्यादी परिस्थितीत योगाद्वारे रक्ताचा चांगला प्रवाह होतो. हे सर्व अवयवांना पुरेसे ऑक्सिजन आणि पोषकद्रव्ये प्रदान करते.
उत्तम श्वसन प्रणाली (Breathe control)
योगा मुळे श्वसन क्रिया सुधारते. श्वसन यंत्रणेतील कोणत्याही विकृतीमुळे आपण आजारी पडतो, तर अशा परिस्थितीत योग जीवनात श्वास घेण्याचे महत्त्व काय ते सांगतो, कारण प्रत्येक योग श्वासोच्छवासावर आधारित असतो. जेव्हा आपण योगा करता तेव्हा फुफ्फुस पूर्ण क्षमतेने कार्य करण्यास सुरवात करतात, ज्यामुळे श्वासोच्छवास करणे सोपे होते.
तेजोमय कांती (Glowing Skin)
नियमित योगा केल्याने आपल्या कांती मध्ये (skin) सुद्धा खूप फरक दिसून येतो. दिवासेंदिवस आपण अधिकाधिक ताजेतवाने(fresh) व तरुण (young) दिसू लागतो.
अपचनापासून मुक्तता (Increase Digestive power)
योगासनेच्या फायद्यांमध्ये वायूपासून मुक्तता समाविष्ट आहे. प्रेग्नेंसी मध्ये गॅसचा त्रास होऊ शकतो. ही समस्या मुख्यत: पाचक प्रणालीच्या अयोग्य कामकाजामुळे उद्भवते. यावर उपाय म्हणून योग हा एक उत्तम मार्ग आहे. योगामुळे पाचन तंत्र सुधारते, ज्यामुळे बद्धकोष्ठता, वायू तसेच आम्लता यासारख्या समस्या मुळापासून दूर होऊ शकतात.
वेदना सहनशीलता (Patience)
प्रेग्नेंसी मध्ये वेदना शरीरात कोठेही आणि कोणत्याही वेळी येऊ शकते. विशेषत: सांध्यातील वेदना सहन करणे कठीण होते. त्याच वेळी, जेव्हा आपण योग करता तेव्हा सुरुवातीला ही वेदना सहन करण्याची शारीरिक क्षमता वाढू लागते. तसेच नियमित सरावानंतर ही वेदना कमी होण्यास सुरवात होते. तसेच बॅक पेन,व पोटऱ्यांमधील स्नायूंमध्ये पेन होने.पायांवर सुज येवून पेटके(गोळे) येने शिरा हिरव्या निळ्या होवून पाय जड होने. यासारख्या वेदना देखील प्रेग्नेंसी मध्ये होत असतात. त्यातून सुटका होण्यासाठी योग करणे प्रेग्नेंसी मध्ये अतिशय गरजेचे असते.
रोग प्रतिकारशक्ती (Strong immunity)
रोगांशी लढण्यासाठी, चांगली प्रतिकारशक्ती असणे आवश्यक आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे शरीर सहजपणे विविध आजारांना बळी पडते. तुम्ही जर विविध आजारांना बळी पडलात तर तुमचा प्रेग्नन्सी प्रवास दुःखात जाईल तसेच तुम्हाला डिलिव्हरी फेस करताना अनेक अडचणी येऊ शकतात. आपण आरोग्यदायी नसल्यास आपल्या बाळावर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम होतो आपल्या रक्तातून चांगले-वाईट हर्मोंस, रसायने, हे रक्तातून प्लेसेंटा मार्फत बाळापर्यंत पोहोचत असतात आणि त्याचा तसाच परिणाम बाळावर होतो. यासाठी आपण आरोग्यदायी असणे खूप गरजेचे आहे. आपल्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती असेल तरच आपण आरोग्यसंपन्न राहतो. योगाने रोगप्रतिकारक शक्ती सुधारते.
नवीन ऊर्जा (New energy)
या काळात आनंदी राहण्यासाठी व सकारात्मक मार्गाने कार्य करण्यासाठी शरीरात उर्जा राखणे आवश्यक आहे. यामध्ये योग तुम्हाला मदत करतो. योग केल्यास थकवा दूर होतो आणि शरीरात नवीन उर्जा भरली जाते. तसेच कोणतही काम करताना उत्साह राहतो. तुम्ही दिवसभर ऊर्जावान राहून आपल्या बाळासाठी जे काही कराल ते आनंदाने करू शकता. तुमच्या शरीरामध्ये उर्जा प्राप्त होण्यास योग तुम्हाला मदत करतो.
झोप (sleep)
माझ्या अनुभवाप्रमाणे कित्येक महिलांना प्रेग्नेंसी मध्ये रात्री नीट झोप येत नाही. प्रेग्नेंसी मध्ये रात्रीची झोप चांगली होणे महत्वाचे आहे. रात्री चांगली झोप झाल्यास दुसर्या दिवशी शरीरास पुन्हा काम करण्यास व सज्ज होण्यास मदत होते. पुरेशी झोप न मिळाल्यामुळे दिवसभर अस्वस्थता, डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ होते व तणाव वाढतो. चेहऱ्यावरही हसू येत नाही. दुसरीकडे, आपण नियमितपणे योग केल्यास, मन शांत होते आणि तणावातून मुक्त होते, जे रात्री चांगले झोपण्यास मदत करते.
हे आणि असे अनेक फायदे आपल्याला योग केल्यामुळे होतात, गर्भसंस्कारामध्ये योग शिकवला जातो व गर्भवती मातेकडून नियमितपणे योगासने करून घेतले जातात. आतापर्यंत कित्येक महिलांनी योगाचा आनंद घेऊन आपला प्रेग्नन्सी प्रवास सुखाचा करून नॉर्मल डिलिव्हरी चा अनुभव घेतला आहे.
हा ब्लॉग पूर्ण वाचल्याबद्दल मी आपली आभारी आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स मध्ये नक्की विचारू शकता ब्लॉग आवडल्यास कमेंट्स ,शेअर ,लाईक नक्की करा, आणि अशाच हेल्दी टिप्स वाचण्यासाठी माझा"२१व्या शतकातील गर्भसंस्कार" फेसबुक ग्रुप खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून नक्की जॉईन करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझा youtube channel दिलेल्या लिंक वर क्लिक करून सबस्क्राईब करा.
"२१ व्या शतकातील गर्भ संस्कार"
धन्यवाद..!
Khup chan tai
उत्तर द्याहटवाखूपच छान मस्तच
उत्तर द्याहटवा