बुधवार, ९ मार्च, २०२२

१६ "संस्कार"

संस्कारांवर आधारित भारतीयसंस्कृती







भारत देश हा खेड्यापाड्यांचा देश, सामाजिक, राजकीय, वैज्ञानिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा अनेक विषयांमध्ये पुढारलेला देश. सुजाण आणि सुसंस्कृत अशी पिढी तयार करण्यासाठी आपल्या ऋषी-मुनींनी त्यांच्या अथक प्रयत्नांनी संस्कारांची निर्मिती केली. संस्काराचा हेतू फक्त धार्मिक नसून वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा मनुष्यजीवनाला हितकर आहे. आणि या संस्कारांमुळेच आपला भारत देश संपूर्ण विश्वामध्ये अद्वितीय असा देश आहे.

प्राचीन काळी प्रत्येक कार्याची सुरुवात संस्काराने होत असायची. त्या काळात संस्कारांची संख्या खूप जास्त होती परंतु जसजसा काळ बदलत गेला, व्यस्तता वाढत गेली जीवनशैली बदलत गेली तसतसे संस्कार लोप पावत गेले. व संस्कारांची संख्या कमी झाली. आपल्या धर्मशास्त्रामध्ये मुख्य सोहळा संस्कारांची व्याख्या दिसून येते. त्यामध्ये सगळ्यात पहिला संस्कार गर्भाधानसंस्कार हा आहे. गर्भाधानसंस्कार हा जन्मापूर्वीचा तर अंतिमसंस्कार हा मृत्यू नंतरचा संस्कार होय.

१६ संस्कारांची नावे खालील प्रमाणे

१ गर्भाधान              ९ विद्यारंभ

२  पुंसवन                १० कर्णवेध 

३ सीमंतोन्नयन           ११ यज्ञोपवीत

४ जातकर्म                १२ वेदारंभ

५ नामकरण               १३ केशांत

६ निष्क्रमण                १४ समावर्तन

७ अन्नप्राशन                १५ विवाह

८ चूडाकर्म.                  १६ अंत्येष्टी

या संस्कारांद्वारे माणसाच्या विचारांत परिवर्तन करता येते. त्यामुळे माणसाचे शरीर, मन आणि आत्मा या तिन्हींची शुद्धी होते. जन्मपूर्व संस्कारांपासून संस्काराला सुरुवात होते, तेव्हापासूनच जर जाणीवपूर्वक संस्कार केले नाहीत , तर ती व्यक्ती अतिरेकी, भ्रष्टाचारी आणि व्यभिचारी बनण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यक्ती स्वतःचे आणि इतरांचेही जीवन दुःखी बनवायला मागेपुढे पाहत नाही. अशा या सोळा संस्कारांपैकी पहिल्या तीन संस्कारांचे एकत्रीकरण म्हणजे "गर्भसंस्कार" होय. आयुर्वेदामध्ये सोळा संस्कारांपैकी सर्वाधिक महत्त्व गर्भसंस्काराला दिले आहे. आपले ऋषी मुनी कुणी बाबा-बुवा नसून त्या काळातले सायंटिस्ट होते. त्यामुळे त्यांना माहिती होतं की जात असतानाच बाळाच्या मेंदूचा सर्वाधिक विकास होतो. याची काही पौराणिक व ऐतिहासिक दाखले देखील आहे. ते आपण पुढील ब्लॉग मध्ये बघणारच आहोत

या ब्लॉग मध्ये दिलेल्या सोळा संस्कारांच्या नावाप्रमाणे सविस्तर माहिती पुढील ब्लॉग मध्ये दिली आहे.

मला आशा आहे की आपल्याला हा ब्लॉग वाचून नक्कीच फायदा होईल. अशा अनेक विषयांची माहिती मी ब्लॉग च्या माध्यमातून घेऊन येत असते. ब्लॉग आवडला इतरांना देखील शेअर करा. म्हणजे त्यांना आहे या माहितीचा उपयोग होईल.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून २१ व्या शतकातील गर्भसंस्कार हा फेसबुक ग्रुप जॉईन करा.

२१ व्या शतकातील गर्भ संस्कार

तसेच आणखी नवनवीन माहिती मिळण्यासाठी यूट्यूब चैनल ला भेट द्या.

Alkashinde

तुम्ही माझा ब्लॉग शेवटपर्यंत वाचला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.

धन्यवाद..!

बुधवार, २० ऑक्टोबर, २०२१

प्रेग्नेंसी मध्ये योगा चे महत्व:

गर्भावस्थेतील योगाचे 12 महत्वाचे फायदे..!

तुमचा प्रेग्नेंसी प्रवास? आनंदी व आरोग्यदायी व्हावा, असं तुम्हाला वाटतं का..! आपली डिलिव्हरी normal? व्हावी असं तुम्हाला वाटतं का..! तुमच्या शरीरामध्ये सतत? वेदना होत आहेत, तुम्हाला दिवसभर आळस सतावतो fresh वाटत नाही weakness जाणवतो असे? तुम्हाला वाटते का..!

असे जर का असेल तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे, त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत वाचा...!

योग केल्यामुळे आपलं शरीर नेहमी आरोग्यदायी आणि चांगलं राहातं. मात्र योगा करण्या आधी काही नियमांचं पालन करणंही आवश्यक आहे. तसेच आपल्या, स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊनच योगाला सुरुवात करावी. योग आपलं शरीर तंदुरूस्त राखण्यास मदत करतो. त्यामुळे आपल्या प्रेग्नेंसीतच नाही तर संपूर्ण आयुष्यात  योगाच महत्त्व नक्की काय आहे, हे मी आज तुम्हाला सांगणार . इतकंच नाही तर कोणती आसनं तुमच्या प्रेग्नेंसी प्रवासात तुम्ही करू शकता हे देखील मी पुढील ब्लॉग मध्ये सांगणार आहे.

आज मी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या प्रेग्नेंसी मध्ये योगा करण्याचे कोण कोणते फायदे आहेत ते सांगणार आहे.

१) योग तुम्हाला आरोग्यसंपन्न बनविण्यास आणि उर्जेने भरण्यासाठी कार्य करील. 

२)) योगाचा मनावर आणि विचारांवर परिणाम होतो. 

३) आपल्या मनात दिवसभरात खूप नकारात्मक विचार येतात, जे आपल्याला तणाव, चिंता किंवा मानसिक विकृतीत आणतात.योग आपल्याला या चक्रातून बाहेर पडण्यास मदत करतो.

४) नियमितपणे योग केल्याने माणूस काळजीपासून मुक्त होतो. 

हे सर्व फायदे मिळवण्यासाठी मात्र कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे.

योगाचे अंतर्गत फायदे.....

रक्त प्रवाह (Blood circulation)


जेव्हा शरीरात रक्ताचे अधिक चांगले अभिसरण होते, तेव्हा सर्व अवयव चांगल्या प्रकारे कार्य करतात. याव्यतिरिक्त, शरीराचे तापमान देखील नियंत्रित केले जाते. रक्ताचा प्रवाह असंतुलित होताच शरीर अनेक रोगांना बळी पडू लागते, जसे की – हृदयाशी संबंधित आजार, खराब यकृत, मेंदू व्यवस्थित काम करत नाही इत्यादी परिस्थितीत योगाद्वारे रक्ताचा चांगला प्रवाह होतो. हे सर्व अवयवांना पुरेसे ऑक्सिजन आणि पोषकद्रव्ये प्रदान करते.

उत्तम श्वसन प्रणाली (Breathe control)

योगा मुळे श्वसन क्रिया सुधारते. श्वसन यंत्रणेतील कोणत्याही विकृतीमुळे आपण आजारी पडतो, तर अशा परिस्थितीत योग जीवनात श्वास घेण्याचे महत्त्व काय ते सांगतो, कारण प्रत्येक योग श्वासोच्छवासावर आधारित असतो. जेव्हा आपण योगा करता तेव्हा फुफ्फुस पूर्ण क्षमतेने कार्य करण्यास सुरवात करतात, ज्यामुळे श्वासोच्छवास करणे सोपे होते.

तेजोमय कांती (Glowing Skin)

नियमित योगा केल्याने आपल्या कांती मध्ये (skin) सुद्धा खूप फरक दिसून येतो. दिवासेंदिवस आपण अधिकाधिक ताजेतवाने(fresh) व तरुण (young) दिसू लागतो. 

अपचनापासून मुक्तता (Increase Digestive power)

योगासनेच्या फायद्यांमध्ये वायूपासून मुक्तता समाविष्ट आहे. प्रेग्नेंसी मध्ये गॅसचा त्रास होऊ शकतो. ही समस्या मुख्यत: पाचक प्रणालीच्या अयोग्य कामकाजामुळे उद्भवते. यावर उपाय म्हणून योग हा एक उत्तम मार्ग आहे. योगामुळे पाचन तंत्र सुधारते, ज्यामुळे बद्धकोष्ठता, वायू तसेच आम्लता यासारख्या समस्या मुळापासून दूर होऊ शकतात.

वेदना सहनशीलता (Patience)


प्रेग्नेंसी मध्ये वेदना शरीरात कोठेही आणि कोणत्याही वेळी येऊ शकते. विशेषत: सांध्यातील वेदना सहन करणे कठीण होते. त्याच वेळी, जेव्हा आपण योग करता तेव्हा सुरुवातीला ही वेदना सहन करण्याची शारीरिक क्षमता वाढू लागते. तसेच नियमित सरावानंतर ही वेदना कमी होण्यास सुरवात होते. तसेच बॅक पेन,व पोटऱ्यांमधील स्नायूंमध्ये पेन होने.पायांवर सुज येवून पेटके(गोळे) येने शिरा हिरव्या निळ्या होवून पाय जड होने. यासारख्या वेदना देखील प्रेग्नेंसी मध्ये होत असतात. त्यातून सुटका होण्यासाठी योग करणे प्रेग्नेंसी मध्ये अतिशय गरजेचे असते.

रोग प्रतिकारशक्ती (Strong immunity)

रोगांशी लढण्यासाठी, चांगली प्रतिकारशक्ती असणे आवश्यक आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे शरीर सहजपणे विविध आजारांना बळी पडते. तुम्ही जर विविध आजारांना बळी पडलात तर तुमचा प्रेग्नन्सी प्रवास दुःखात जाईल तसेच तुम्हाला डिलिव्हरी फेस करताना अनेक अडचणी येऊ शकतात. आपण आरोग्यदायी नसल्यास आपल्या बाळावर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम होतो आपल्या रक्तातून चांगले-वाईट हर्मोंस, रसायने, हे रक्तातून प्लेसेंटा मार्फत बाळापर्यंत पोहोचत असतात आणि त्याचा तसाच परिणाम बाळावर होतो. यासाठी आपण आरोग्यदायी असणे खूप गरजेचे आहे. आपल्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती असेल तरच आपण आरोग्यसंपन्न राहतो. योगाने रोगप्रतिकारक शक्ती सुधारते.

नवीन ऊर्जा (New energy)

या काळात आनंदी राहण्यासाठी व सकारात्मक मार्गाने कार्य करण्यासाठी शरीरात उर्जा राखणे आवश्यक आहे. यामध्ये योग तुम्हाला मदत करतो. योग केल्यास थकवा दूर होतो आणि शरीरात नवीन उर्जा भरली जाते. तसेच कोणतही काम करताना उत्साह राहतो. तुम्ही दिवसभर ऊर्जावान राहून आपल्या बाळासाठी जे काही कराल ते आनंदाने करू शकता. तुमच्या शरीरामध्ये उर्जा प्राप्त होण्यास योग तुम्हाला मदत करतो.

झोप (sleep)

माझ्या अनुभवाप्रमाणे कित्येक महिलांना प्रेग्नेंसी मध्ये रात्री नीट  झोप येत नाही. प्रेग्नेंसी मध्ये रात्रीची झोप चांगली होणे महत्वाचे आहे. रात्री चांगली झोप झाल्यास दुसर्‍या दिवशी शरीरास पुन्हा काम करण्यास व सज्ज होण्यास मदत होते. पुरेशी झोप न मिळाल्यामुळे दिवसभर अस्वस्थता, डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ होते व तणाव वाढतो. चेहऱ्यावरही हसू येत नाही. दुसरीकडे, आपण नियमितपणे योग केल्यास, मन शांत होते आणि तणावातून मुक्त होते, जे रात्री चांगले झोपण्यास मदत करते.

हे आणि असे अनेक फायदे आपल्याला योग केल्यामुळे होतात, गर्भसंस्कारामध्ये योग शिकवला जातो व गर्भवती मातेकडून नियमितपणे योगासने करून घेतले जातात. आतापर्यंत कित्येक महिलांनी योगाचा आनंद घेऊन आपला प्रेग्नन्सी प्रवास सुखाचा करून नॉर्मल डिलिव्हरी चा अनुभव घेतला आहे.

हा ब्लॉग पूर्ण वाचल्याबद्दल मी आपली आभारी आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स मध्ये नक्की विचारू शकता ब्लॉग आवडल्यास कमेंट्स ,शेअर ,लाईक नक्की करा, आणि अशाच हेल्दी टिप्स वाचण्यासाठी माझा"२१व्या शतकातील गर्भसंस्कार" फेसबुक ग्रुप खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून नक्की जॉईन करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझा youtube channel दिलेल्या लिंक वर क्लिक करून सबस्क्राईब करा. 

YouTube channel

"२१ व्या शतकातील गर्भ संस्कार"

धन्यवाद..!

गर्भावस्थेतील हेल्डी डायट

गर्भवतींना खाण्याच्या हेल्दी सवयी लावण्यासाठी महत्त्वाच्या चार स्टेप्स..!



आजच्या बदलत्या जीवनशैलीनुसार किशोर वयापासून तर लग्न होईपर्यंत चॉकलेट, बेकरी प्रॉडक्ट, कॅडबरी, आइस्क्रीम अशा गोड पदार्थ खाण्याच्या सवयी खूप लागलेल्या असतात. आणि  मुला मुली एवढे त्या पदार्थांच्या आहारी जातात की एखाद्या वेळेस जर त्यांना ते पदार्थ मिळाले नाही तर त्यांचा जीव अक्षरशः हैराण होतो. यासाठीच आधी त्या पदार्थांची सवय लावून न देणे हा एकच पर्याय असतो. एखाद्या वेळेस आधी मधी हे पदार्थ खाल्ले तरी चालेल, पण सारखे सारखे खाने म्हणजे, आपण आपल्या सवयींना खतपाणी घालत असतो,आणि नकळतपणे आपल्या आरोग्याची हेळसांड करत असतो. याची आपल्याला जाणीवच होत नाही, आणि जेव्हा जाणीव होते तेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते.
नमस्कार🙏
मी अलका शिंदे, गर्भसंस्कार मार्गदर्शक अँड सेल्फ कोच...
मला येत्या पाच वर्षात एक लाख गर्भवती मातांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणायचा आहे त्यांच्या गर्भातील बाळांवर सुसंस्कार करून त्यांना सुदृढ सर्वगुणसंपन्न आणि सक्षम असे देशाचे नागरिक मला घडवायचे आहे आणि हा माझा ध्यास आहे.

चला तर मग जाणून घेऊया....

परिपूर्ण संतुलित आहार घ्या:




आपल्यामध्ये पोषणतत्वांची कमतरता आपल्या संपूर्ण आरोग्यावर आयुष्यभर परिणाम करत असते. व त्याचा परिणाम आपल्या गर्भावर म्हणजेच गर्भात वाढणाऱ्या बाळावर होतो. आपल्या बालकाचे आपण एक चांगले आई-वडील म्हणून त्याच्यापर्यंत चांगले न्यूट्रिशन पोचवून भविष्यात त्याला मोठ्या आजारापासून आपण वाचवू शकतो. लहानपनापासून आपण टीव्हीवरच्या फास्ट फुड्सच्या जाहिराती बघुन जे दिसेल खाल्ले. कारण त्याबद्दल कुतूहल वाटत असे. ते एखाद्या वेळेस  आणून खाल्ले तरी चालेते, पण जर आपण सतत सारखे आणून खात असाल तर ती सर्वस्वी  चूक आहे. कारण फास्ट फूडस् खाऊन भविष्यात त्याचे दुष्परिणाम काय होतील याची जाणीव न ठेवल्यामुळे.  आपण आपल्या बालकाचे एक चांगले जबाबदार पालक नाही हे सिद्ध होते. आपण जर नीट समजून घेतले की ते सारखे खाल्ले तर त्याचे वाईट परिणाम होणार आहेत.तरच आपण आपल्या मनाला आवर घालू शकतो. त्यासाठी स्वतःला प्रेमाने समजवायचे. असे केल्यास आपण स्वता:ला नक्की कंट्रोल मध्ये ठेवू शकाल. गर्भावस्थेत योग्य व संतुलित आहार आपल्या जेवणामध्ये परिपूर्ण असणे,  आपल्याला संतुलित आहारची सवय लावणे हे सर्वस्वी आपल्या हातात आहे.

भूक लागेल तेव्हाच खा:



आपले मन हट्टी असते, जेव्हा ते ऐकत नाही तेव्हा जाणीवपूर्वक शांत रहा .जेव्हा भूक लागेल तेव्हा मात्र जे असेल ते तुम्ही आवडीने खाल. एकदा का सवय लागली की ते सर्व तुम्ही आवडीने स्वतःहून खाल. पण आपणच आपल्या मनाचे नको ते लाड पुरवले तर मग त्रास आपल्याला आणि भविष्यात  बाळालाही होणारच. आपण जे खातो ते बाळापर्यंत आपल्या रक्तातून पोहोचते त्यामुळे जेवताना, काही खाताना हेल्दी आणि पौष्टिक असेल तेच खावे, .पण जर आपल्यालाच बाहेरच्या हॉटेलच्या जेवणाची सवय असेल, फास्ट फूड जेवण आवडत असेल तर आपल्या बाळावर त्याचा वाईट परिणाम झाल्याशिवाय राहत नाही.

घरात भरपूर सुका मेवा आणून ठेवा:




जसजसे महिने वाढत जातील तसतशी  भूक ही वाढत असते. अशा वेळी हेल्दी पदार्थ घरामध्ये चणे, शेंगदाणे,गूळ, काजू, बदाम, मनुका, खजूर ,ड्रायफ्रुट्स अशा हेल्दी स्नॅक्स ने आपल्या घरामध्ये असणारा खाऊचा डबा भरून ठेवला, म्हणजे भूक लागल्या वर खाता येईल.आणि खाण्याच्या वाईट सवयी आपोआप निघून जातील जर आपणच बेकरी प्रोडक्ट, कॅडबरी, केक, पॅकेज फूड्स, मॅगी, पास्ता,जाम, बिस्किट्स, चिवडा, फरसाण अशा वस्तू  घरामध्ये ठेवल्या तर त्याच खाण्याच्या सवयी लागतात.

कोल्ड् ऐवजी पर्यायी हेल्दी ड्रिंक



आपल्याला अजून एक  सवय असते. कोल्ड्रिंक्स पिण्याची साखर मिश्रीत गोड पेय जसे फ्रूटी, मॅगो, ज्यूस, कोको कोला . या कोल्ड्रिंक्स मध्ये फक्त प्रिझर्वेटिव्ह आणि भरपूर साखर असते. कोल्ड्रिंक्स वर फळांचे नाव फक्त नावाला असतात, त्यामध्ये फळांचा अंश नसतो, आणि ते शरीराला खूपच हानिकारक असतात.या हानिकारक सवयी  आपण कमी करू शकतो. घरच्या घरी आपण ग्रीन संजीवनी बनवून घेऊ शकतो. लिंबू पाणी त्यामध्ये साखर मिसळून घेऊ शकतो. किंवा कोकम सरबत,आवळा सरबत घेऊ शकतो. काही गर्भवती माता तहान लागली तरच पाणी पितात त्यामुळे त्यांना डिहायड्रेशन होते, तर आपण वेळोवेळी  पाणी पिण्याची सवय लावायला हवी. चांगल्या सवयी आपण स्वतःला या काळात नक्की  लावू शकतो आणि  आपल्या बाळाला चांगले आरोग्य भविष्यात देऊ शकतो.

हा ब्लॉग पूर्ण वाचल्याबद्दल मी आपली आभारी आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स मध्ये नक्की विचारू शकता ब्लॉग आवडल्यास कमेंट्स ,शेअर ,लाईक नक्की करा, आणि अशाच हेल्दी टिप्स वाचण्यासाठी पाहण्यासाठी माझा "२१ व्या शतकातील गर्भसंस्कार" हा फेसबुक ग्रुप जॉईन करा...

धन्यवाद..!


बुधवार, १ सप्टेंबर, २०२१

गर्भावस्थेत? शारीरिक संबंध असावे की नाही.!.

"ऐकावे जनाचे करावे मनाचे"

तुम्ही प्रेग्नेंट आहात का? असेल तर प्रेग्नेंसी मध्ये लैंगिक संबंध? असावे की नाही असे प्रश्न तुमच्या मनामध्ये येत आहेत का..! असे जर असेल हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत वाचा..!

नमस्कार🙏
मी अलका शिंदे गर्भसंस्कार मार्गदर्शक अँड सेल्फ कोच...
मला येत्या पाच वर्षात एक लाख गर्भवती माता पर्यंत पोहोचून त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणायचा आहे.. त्यांच्या गर्भातील बाळावर संस्कार करून त्यांना सुदृढ सर्वगुणसंपन्न व भारतरत्न बनवायचे आहेत आणि हा माझा ध्यास आहे...

दुपारचा एक वाजला होता. जेवणाची सुट्टी झाली. आज रितेशला जेवणाची इच्छा होत नव्हती. त्याची अस्वस्थता वाढत होती. दुपारनंतर च्या कामाला दांडी मारून स्टँड जवळील फुल वाल्याच्या दुकानातून छान सुंदर गजरा घेऊन तो घरी आला... ते मनाशी काही ठरवूनच..!

तो आज गाणं गुणगुणत होता "प्रेमाची ग.., लाडाची ग….!

ती ऐकून न ऐकल्यासारखे करत होती…

समजून न समजल्या सारखे करत होती…

जेवणानंतर झोपण्याची तयारी झाली...

बॅग मधून गजरा काढून रितेशने तीच्या केसांमध्ये माळला..

तशी ती त्याच्यावर भडकली...

दुसऱ्या बाजूला तोंड वळवून झोप आल्याचा तिने आव आणला…

प्रयत्नांची पराकाष्टा करत तो तिला मनवत होता…

कुठ..? नेमक कुठ बिघडत आहे... हे त्याला जाणून घ्यायचं होत;

एकदाच याला स्पष्टच सांगून टाकते हा विचार मनात येताच ती उठून बसली…!

आज पासून मला स्पर्श करणे तुमच्यासाठी बंधनकारक आहे…!

नऊ महिने नऊ दिवस आपण दोघांनीही हे नियम पाळायचे आहेत…!

रितेश नाराज होऊन झोपून गेला…

हा रोजचाच नित्यक्रम सुरू झाला…

दोघांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून खटके उडू लागले…

रितेशच्या वागण्यामध्ये बदल होऊ लागला….

रात्री उशिरा घरी येणे,  आलाच तर ड्रिंक करून येने,कधीकधी घरीच न येणे अशाप्रकारे रितेशच्या वागण्यामध्ये बदल होऊ लागला…

तिला ही त्या गोष्टीचं टेन्शन येत होतं..

परंतु दिवस गेल्यापासून सासुबाई, शेजारच्या मैत्रिणी यांच्याकडून तिला सतत सजेशन मिळत होत…

प्रेग्नेंसी मध्ये शारीरिक संबंध ठेवायचे नसतात बरं का.., ठेवल्यास बाळाला त्याचा धोका पोचू शकतो, गर्भपात होण्याची शक्यता असते, बाळाच्या आईला पण  धोका पोहोचू शकतो …मला तर बाई माझ्या सासूने तुझ्या नवऱ्याला एक वर्षाचा होईपर्यंत तिच्याजवळ झोपवले होते..

सासुबाईंचे सततचे बोलणे ऐकून तिच्या मनावर ते अगदी खोलवर बिंबले होते…

त्यामुळे ती रितेशच्या वागण्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत होती…

प्रेग्नेंसी चे सहा महिने संपले व सातवा सुरू होताच सासु बाईने तिची ओटी भरण करून तिला माहेरी पाठवली…

नऊ महिने नऊ दिवस पूर्ण झाले…

तिची डिलिव्हरी सुखरूप झाली…

बाळ सव्वा महिन्याचे झाले…

सासू सासरे आईला व बाळाला आनंदाने घरी घेऊन आले…

सासु बाईने तीला आवर्जून सूचना दिल्या…

बाळ सहा महिन्यांचे होईपर्यंत तू माझ्याजवळ झोप बर…!

बाळाचे दुध कमी होऊ नये यासाठी तुला हे नियम पाळायचे आहेत…!

रितेश त्या रात्री घरी आला तो मनाशी ठरवूनच…

जेवताना त्याने तिचा हातात हात घेतला आणि म्हणाला..

"मला तुझ्याशी काही बोलायचं आहे."

तिच्या डोळ्यांत वेदना उमटली; क्षणभर तोंडातला घास तोंडातच ठेवून ती स्तब्ध झाली..

सगळे शब्द जुळवून रितेश तिला म्हणाला मला घटस्पोट हवाय…

का...?

जाणून घेण्याचा तीव्र इच्छा व्यक्त करत ती आश्चर्याने उद्गारली..!

त्याचं मन दुसऱ्या स्त्रीवर गेलय हे रितेश तिला

स्पष्टपणे सांगू शकत नव्ह्ता….

त्याचा बँक ब्यालन्स, कार, घर, सगळ त्याने तिला देऊ केलं:

रितेशने समोर केलेला घटस्पोटाच्या कागद तिने हिसकावून घेतला व माझ्या काही अटी आहेत त्या मान्य कराव्या लागतील असे सांगितले..

दुसऱ्या दिवशी घटस्पोटा विषयीच्या अटींचा कागद तिने पुढे केला..

तिला फक्त एक महिन्याची नोटीस हवी होती..

या एका महिन्यामध्ये दोघांनीही एकमेकांसोबत राहावे अशी तिची इच्छा होती...

तिच्या अटी अगदी साद्या होत्या...

बाळाला सहा महिने पूर्ण होण्यासाठी फक्त दहा दिवस बाकी होते…

त्यानंतर लग्नाच्या पहिल्या दिवसापासून गुड न्यूज आल्या पर्यंत आपण कसे वागलो…

कोण कोणत्या गोष्टी केल्या ह्या सर्व गोष्टींबद्दल एक महिनाभर चर्चा करायची आणि त्यानंतर निर्णय घ्यायचा असे ठरले…

तिची अट मान्य करायची म्हणून त्याने होकार दिला

पण फक्त महिना व्यवस्थित जावा यासाठी रितेशने तीची अट मान्य केली होती...

घटस्पोटाच्या विचारामुळे अनेक दिवस रितेश चा पत्नीसोबतचा संपर्कच झालेला नव्हता...

दोघांमधील एक हवीहवीशी जवळीक वाढत असल्याचं त्याला जाणवलं होत.

सुरुवातीचे दिवस त्याला आठवले…

तिच्या समाधानाकरिता त्याने तिला उचलले..

तिला अचानक उचलताना त्याला जाणवलं,की

तीच वजन कमी होत चांललंय.

हृदयातल्या वेदनाचां हा परिणाम होता.

त्याने आस्थेने तिच्या कपाळाला स्पर्श केला.

दिवसागणिक तिचं कमी होणारं वजन…

रितेश ची काळजी वाढवत होत.

पण तिच्या अटीच पालन करताना रितेशला आंतरिक समाधान मिळत होत,

दोघांमध्ये काय घडतंय याची कल्पना

नसतानाही त्यांचं बाळ खूप खुश दिसत होतं...

त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता कारण त्यांच्यातली जवळीकच संपली होती…


जी परत आयुष्यात येत होती…


महिन्याच्या शेवटच्या दिवसी रितेशने मनाशी निर्णय घेतला.

रितेश प्रेयसीच्या घरी गेला. आणि  पत्नीला घटस्पोट देऊ शकत नसल्याच त्याने प्रेयसीला स्पष्टपणे सांगितले.

ती चिडली, संतापली, पण आता त्याला काही ऐकायाच नव्हत.

तिचा राग संताप बघून अस वाटत होतं की हीच प्रेम माझ्यावर नसून माझ्या पैश्यांवर आहे....

तिकडचे सगळे नाते संपवून तो घरी निघाला....

कारण त्याला कळलं होत की खरं प्रेम कोणत आहे  आणि  खोटं कोणत...

महत्वाचं म्हणजे त्याला  जाणीव झाली होती की तो खरंच चुकला..

आणि आता रितेश ला…

त्याच्या प्रिय पत्नीचा हात मरे पर्यंत सोडायचा नव्हता.


तो वेगाने कार चालवत घरी आला.


त्याच्या चेहऱ्यावर हसू होत.

हातात फुलांचा गुच्छ होता.

तो बेडरूम मध्ये पोहचला,

तर…

प्रिय पत्नी बेडवर गतप्राण पडलेली त्याला दिसली...

बाळाला जवळ घेऊन तो ओक्साबोक्शी रडत सुटला.

रितेशच्या प्रेमापायी तिने प्राण सोडला होता.

तिने मला एक महिना दिला होता,मी जे करायला हव ते केल नाही.

जे प्रेम,

जी जवळीक तिला हवी होती ती मी तिला दिली नाही....

रितेश पश्चातापाने बडबडत होता जिवाचा अंकास करीत होता...

आता रितेशचे अश्रू तिला परत आणू शकत नव्हते.

पती-पत्नीच्या नात्यात कार, बंगला, प्रेयसी, पैसा काहीही महत्वाच नाही.

महत्वाच आहे ते प्रेम, जवळीक आणि विश्वास…. विचार करा…

स्वताला विचारा आपण आपल्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टीला किती महत्त्व देतो --- "

"ऐकावे जनाचे करावे मनाचे"..!

आपल वैवाहिक आयुष्य खरच सुखाचं आहे?"

पण ते सुखरूप कसं बनवायचं हे आपल्याला समजलं पाहिजे..

या कहाणीचा एकच संदेश आहे.---

"जे काही आहे-- ते प्रेमात आहे,

ज्ञान मिळवा समज-गैरसमज सोडून द्या एकमेकांना समजून घ्या..!

नात्यामध्ये आनंद निर्माण करा व ते घट्ट करा..!

"जे प्रेमाचे आहेत ते प्राणपणाने सांभाळा.

नाही तर पश्याताप...

तात्पर्य:लैंगिक सुख प्रत्येक जोडीदाराच्या आयुष्यातील नाजुक आणि अनमोल क्षण असतो. या क्षणाचा आनंद महिलेच्या गर्भावस्थेत कमी होतो असं काहींचं म्हणणं असतं. मात्र गर्भावस्थेत अभ्यासपूर्वक काही गोष्टींची काळजी घेतल्यास हा प्रश्न नक्की सुटेल यात शंका नाही त्यासाठी पुढील ब्लॉग मध्ये काही टॉपिक दिले आहे ते जरूर वाचा…

सकारात्मक व आनंदी राहण्यासाठी तसेच अधिक माहिती मिळविण्यासाठी२१ व्या शतकातील गर्भसंस्कार हा माझा फेसबूक ग्रुप खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून नक्की जॉईन करा...

माझा ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्याबद्दल मनःपूर्वक आभार हा ब्लॉग तुम्हांला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा

२१व्या शतकातील गर्भ संस्कार

संपर्क


               धन्यवाद...

            अलका शिंदे.. 🙏

सोमवार, ९ ऑगस्ट, २०२१

विवाहानंतरचे हितगुज

 वैवाहिक जीवनात पदार्पण करताना...

लग्न होऊन मुलगी सासरी आली कितीला नवीन घराची ती त्या नातेसंबंधाचे तिथल्या रुढी-परंपरांशी जुळवून घ्यायचं असतं या सर्व गोष्टींचा तिच्या मनावर ताण असतोच लग्नाआधी ती जरा बिनधास्त असते. चिमणीच्या पिल्लाला नुकतेच पंख फुटले की, त्याला वाटायला लागतं मी आता उडू शकतो. घरट्या बाहेर पडू शकतो,  आकाशात उंच भरारी घेवू शकतो. अगदी तसंच असतं या वयात. हे वय असतं  नविन आकार घेण्याचं, नविन घडणीच. बालपण आणि तारुण्य यांच्या मधला हा काळ. या वयात खूप सारे बदल होतात. वागण्या-बोलण्यात बदल होतात. विचार करण्याची पद्धत बदलते. बोलण्यात बदल होतात. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. एवढंच नाही तर त्यांना तेच बरोबर आहे असं वाटतं जे ते विचार करतात, बघतात आणि वागतात.

कुटुंब हा समाजाचा पाया आहे आणि विवाह हे कुटुंब उभारण्याची पहिली पायरी होय त्यामुळे जीवनातील हे सर्वात महत्त्वाचे पाऊल टाकताना दोन्ही साथीदार आपल्या जबाबदार्‍या ओळखण्यात इतपत समर्थ ही हवेत संसार सुरळीत करण्यासाठी त्यांची आवश्यक शारीरिक व मानसिक तयारी हवी विवाहानंतर कुटुंबातील सुसंवाद टिकविण्यासाठी पती-पत्नींमध्ये परस्परांना तसेच इतरांना समजून घेण्याची प्रवृत्ती असणे आवश्यक आहे प्रेम परस्पर विश्वास आदर समर्पणाची भावना यातून एक आदर्श विवाह जोडपे बनते व एक जबाबदार व्यक्ती पडण्यास अनुकूल वातावरण कुटुंबात तयार होते आणि अशा कुटुंबाला मुळेच समाजाची जडणघडण होते . त्यात पालकांचीही (घरातील ज्येष्ठ मंडळींची) जबाबदारी अतिशय महत्त्वाची असते. नवविवाहित मुले मुली हे वडीलधाऱ्या व्यक्तींचे अनुकरण करतात कुटुंबातील शिकवणीनुसार मुला-मुलींचे वर्तन व पुढील आयुष्यातील पालक म्हणून त्यांची भूमिका ठरत असते आणि यासाठी च

मी तुम्हांला अशा काही टिप्स सांगणार आहे, ज्या तुमच्यासाठी तर उपयोगी आहेच पण त्याचबरोबर पालकांसाठी (घरातील ज्येष्ठ मंडळी) जाणून घेणं ही गरजेच्या आहेत, मग या 15 टिप्स काय आहेत हे जाणून घेण्यासाठी माझाहा टॉपिक शेवटपर्यंत नक्की वाचा.


नाही म्हणायला शिका


सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हांला नाही म्हणता यायला हवं. या वयात मुलं मुली आपल्या मैत्रीमध्ये प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतात. मैत्री म्हणजे सर्वकाही असतं आणि ही मैत्री निभावण्याच्या नादात नाही म्हणत नाहीत आणि मग पश्चाताप करतात. ते विचार करतात आपण नाही म्हंटल तर आपल्या मित्राला ते आवडणार नाही, तो नाराज होईल, त्याला आपला अपमान झाल्यासारखं वाटेल. त्याने माझ्याशी बोलणं बंद  केलं तर? त्याला वाईट वाटलं तर? पण तुम्हीं असा विचार करू नका, कारण कोणत्याही नात्याचा पाया असतो विश्वास, एकमेकांना समजून घेणं. तुमच्या नकार देण्यानं तुमचा एखादा मित्र नाराज होत असेल, तो रागवत असेल तर अशा मित्रापासून दूर रहा. असं म्हणतात एक नासका आंबा सगळे आंबे खराब करून टाकतो, पण  चांगले दहा आंबे त्या नासक्या आंब्याला निट नाही करू शकत. त्यामुळे मैत्री खूप विचारपूर्वक करा. तुमच्या ग्रुप मध्यें असा एखादा मित्र किंवा मैत्रीणअसेल तर वेळीच सावध व्हा. आता आपल्याला या सर्व गोष्टीपासून सजग राहणे खूप महत्त्वाचे आहे. कारण या सर्व गोष्टीचा परिणाम आपल्या व वैवाहिक जीवनावर होऊन आपले जीवन विस्कळीत होऊ नये. यासाठी स्वतहाची जीवन मूल्य ठामपणे बनविणे अतिशय आवश्यक असते.


निर्णय क्षमता भक्कम बनवा

आपल्या प्रत्येकाची काही मूल्ये असतात काय करावे अथवा काय करू नये ही जीवनमूल्ये बर्‍याचशा गोष्टीवर अवलंबून असतात.

१. नरमाई

२. ठामपणा/खंबीरता

३. आक्रमकता

आपल्या दैनंदिन जीवनात आपण वरील तीनही प्रकारच्या वागणूक इ कधी न कधी अवलंबतो परिस्थितीनुसार आपली वागणूक ह्या तीनही प्रकारच्या वागणुकीने पैकी ही सर्वात योग्य अशी असली पाहिजे ती म्हणजे ठामपणा/खंबीरता. आपण दुसऱ्यांचा हक्क न डावलता स्वतःच्या हक्कासाठी उभे रहावे. स्वतःचा तसेच दुसऱ्यांचा हे आदर राखणे महत्त्वाच्या असते. सकारात्मक व नकारात्मक दोन्ही भावना प्रकशित असाव्यात. आणि आपल्या वागण्यात आत्मविश्वास असावा. लक्षात ठेवा की ठामपणे बोलणाऱ्या माणसाला मान मिळतो आणि ते स्वतःच्या मूल्यांचा हि आदर राखतात.


स्वतःला ज्ञानाने सक्षम बनवा


जर तुमचे लग्न झाले असले तरी हे जडणघडणीचं  वय असतं. चांगल्या चांगल्या पुस्तकांचे वाचन करा... 

उदा. द-सीक्रेट(The-secret by Rhonda Bryan), यू-कॅन-हील-युवर-लाईफ(you can heal your Life-Lewis h he), 

आहार व आरोग्याचे ज्ञान मिळेल अशी वेगवेगळी प्रेरणादायी पुस्तके वाचलीत तर ते ज्ञान आयुष्यभर तुमच्या सोबत राहिल, आयुष्यभर ते ज्ञान उपयोगी पडेल. तसेच सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांना आवर्जून जा.


अध्यात्म


तुम्हीं जर तुमच्या आयुष्याला  आध्यात्माची जोड देवू शकलात, तर मग सोन्याहून पिवळं. आध्यात्म तुम्हांला सकारात्मक तर बनवतेच पण त्यासोबत self councious पण बनवते. कोणतंही काम करण्यापूर्वी तुम्हीं विचार करू लागता, तुम्हीं काय करताय? का करताय? आणि ते करण्यामागे काय उद्देश आहे. प्रार्थनेचा ही आपल्या दैनंदिन जीवनात सामावेश करा.


कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायला हवं ते ठरवा.


तुम्हांला त्या गोष्टींना प्राधान्य देता यायला हवं ज्या करणं तुमच्यासाठी महत्वाचं आहे. असं व्हायला नको की तुम्हीं कुणाच्यातरी प्रभावाखाली येवून काही गोष्टी करताय, तुम्हांला ठरवता यायला हवं की, सगळ्यात अगोदर कोणत्या गोष्टी ला प्राधान्य द्यायचं. उदा. समजा जर तुम्हांला एखाद्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या फोन आला उद्या छान पार्टी आहे तू नक्की ये पण एकीकडे घरातील व्यक्ती आजारी आहे आणि तिची काळजी घेण्याची जबाबदारी आपल्यावर आहे अशा वेळेला आपण नेमके कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावे. तुम्हाला ठरवता यायला हवं की यात सगळ्यात महत्त्वाचं काय.


पैशांचं योग्य नियोजन करता यायला हवं.(Make a budget for yourself):


तुम्हांला जो पॉकेटमनी मिळतो, त्याचं योग्य नियोजन करून खर्च करता यायला हवा. याचा फायदा तुम्हांला भविष्यात होईल. तुम्हीं योग्य अर्थनियोजन करू शकाल व तुमची निर्णयक्षमता ही वाढेल.


ध्यान(Meditation):


सकाळ संध्याकाळ ध्यान करा. दैनंदिन कार्यात ध्यानाला महत्व द्या. आपल्या रोजच्या आयुष्यात काही ना काही समस्या या असतातच. नवऱ्याशी जुळवून घेतानाच टेन्शन, करियर च टेन्शन, घरातील व्यक्ती अशी जुळवून घेताना नातेसंबंध टिकविण्याच टेन्शन. त्यामुळे रोज ध्यान करा, याने तुमचं मन तणावमुक्त राहील. तुम्हीं अगदी एक मिनिट पासून ही ध्यान करायला सुरू करू शकता व नंतर हळू हळू वेळ वाढवू शकता. 

मी तुम्हांला कितीही म्हंटल गुलाबजाम खूप गोड असतात तरी ते जोपर्यंत तुम्हीं खात नाही तोपर्यंत तुम्हांला ते समजणार नाही. ध्यान ही असंच काहीसं... त्यामुळे तुम्हीं ही ध्यान करा व याची अनुभूती घ्या.


टी. व्ही. कमीतकमी बघा(Watch less Tv):


मी असं नाही म्हणणार की Tv बघूच नका, पण कमीत कमी Tv बघा. तुमचा आवडता कार्यक्रम, चित्रपट असेल तर आवर्जून बघा. पण Tv बघण्यावर तुमचं नियंत्रण असलं पाहिजे. Tv बघणं ही तुमची निवड(choice) असली पाहिजे, सवय(habit) नाही.


वाईट लोकांपासून दूर रहा(Keep distance from toxic people):


तुमच्या जवळपास तुमच्या यशावर जळणारे, तुम्हांला नावं ठेवणारे लोक असतील, तर त्यांच्यापासून दूर रहा. अशांसोबत भांडण, वाद घालणं म्हणजे वेळेचा अपव्यय करणं. चिखलात दगड मारलात तर तो तुमच्या अंगावर पण उडणार, त्यामुळे अशा लोकांपासून दूर रहा.


दैनंदिनी लिहा (Write a Diary):



सर्व नवविवाहित मुलींना मला ही महत्वाची टिप द्यायची आहे, की तुम्ही रोज डायरी लिहा. याने तुमचं लेखन कौशल्य तर सुधारेलचं पण तुम्हांला  तुमचा राग, दुःख इ. कमी करायला मदत होईल. उदा. जर तुमचं कुणाशी भांडण झालं तर तुम्हीं ते तुमच्या डायरीत लिहू शकता. कधी कधी अशा बऱ्याच गोष्टी असतात, ज्या आपण कुणाशीच बोलू शकत नाही, पण तुम्हीं ते डायरीत लिहू शकता. यामुळे तुम्हांला खूप बरं वाटेल व त्या गोष्टी पुन्हां-पुन्हां तुमच्या मनात येणार नाहीत व त्यामुळे तुमचं मन शांत राहील.


आठवड्यातून एक दिवस म्हणजे रविवार या दिवशी सोशल मीडिया पासून दूर राहा (Distance from social media one week in Sunday


आठवड्यातून एकदा मोबाईल व सोशल मीडिया हॉलिडे घ्या आणि निसर्गाच्या सानिध्यात कुटूंबियांसोबत वेळ घालवा. त्याचप्रमाणे रात्री झोपण्यापूर्वी व सकाळी उठल्यानंतर किमान दोन तास मोबाईल पासून दूर रहा. त्यामुळे तूमची सकाळ खूप productive होईल व तुम्हांला रात्री शांत झोप ही लागेल. रात्री झोपण्यापूर्वी वाचनाची सवय लावून घ्या, कारण डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम म्हणतात, "Your habits can change your future". त्यामुळे चांगल्या सवयी जोपासा.


आरोग्य हीच खरी संपत्ती (Health is wealth):


लग्नाआधी फास्ट फूड खाण्याचं प्रमाण जास्त असते. ते आता आपल्याला कमी करायचे आहे पुढे आपल्याला आई होण्याच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचे आहे. व त्याचे गंभीर परिणाम आपल्या आरोग्यावर होतात, त्यामुळे घरचा सकस आहार घ्या. हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये, दूध आणि फळं यांचा आपल्या आहारात समावेश करा. भरपूर पाणी प्या. रोज व्यायाम आणि ध्यान करा.

याने तुम्हांला खूप उत्साहवर्धक वाटेल. भविष्यात आपल्याला चांगले काम करायचे असेल तर आपले शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले असणे गरजेचे आहे. 


सहानुभूतीशील रहा(Be empathetic):


दुसऱ्यांप्रती सहानुभूती वाटणे हे एक कौशल्य आहे. स्वतःला दुसऱ्यांच्या ठिकाणी ठेवून विचार करता यायला हवा. यामुळे तुमचे सामाजिक वर्तन आणि सामाजिक कौशल्य विकसित होतात. यशस्वी होण्यासाठी दुसऱ्यांच्या भावना समजून त्या आपली कारणं आणि तर्क यांच्याशी जोडणं गरजेचं आहे. त्यामुळे होईल तेवढी सामाजिक जाणिव ठेवा, लोकांना मदत करा.


15.छंद विकसित करा(Develop a hobby):


प्रत्येकाने आपले छंद जपले पाहिजेत. मग ते वाचन असेल, गायन असेल किंव्हा मग डान्सिंग असेल वा खेळ. कदाचित पुढे जाऊन ते तुमचं profession बनू शकेल व तुम्हीं त्यात जबरदस्त कामगिरी कराल. पण बरेचदा आपण जसे मोठे होत जातो तसे आपले छंद मागे पडत जातात, पण तसं करू नका.

या टॉपिक मधूनआपण शिकलो की आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर आपला सर्वांगीण विकास होणं गरजेचं आहे या टिप्सची तुम्हीं तुमच्या आयुष्यात अंमलबजावणी केली तर मी खात्रीपूर्वक सांगते की तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतील. हे नक्कीच करून बघा. तुम्हांला तुमचा भविष्यकाळ बदलायच असेल तर तुम्हांला तुमचा आज बदलावा लागेल.

मैत्रिणींनो तुम्हाला माझे विचार आवडले असतील तर तुमच्या मैत्रिणींना देखील शेयर जरून करा, कदाचित तुमच्या एका शेअरिंग ने एखाद्याचं आयुष्य ही बदलू शकतं

विवाहपूर्व समुपदेशन

 जबाबदारी वैवाहिक जीवनाची


तुम्हाला? हे माहिती आहे का...!की आपल्या पोटी सुसंस्कारीत बालक जन्माला येण्यासाठी  गर्भात असताना पासुनच त्याच्यावर संस्कार केले जातात. त्यामुळे गर्भधारणा झाल्यानंतर या उपक्रमात भाग घेणे गरजेचे असतेच परंतु लग्नानंतर आपण आपल्यापासून एका जिवाची निर्मिती करणार आहोत व ती एक जबाबदारी आपल्याला निभवायाची आहे. याची जाणीव ठेवून चांगल्या बीजाच्या निर्मीतीसाठी मुला-मुलींनी जाणीवपूर्वक व प्रयत्नपूर्वक आधीपासूनच स्वतःची काळजी घ्यायला हवी. तुम्ही किशोरावस्था पार केली आहे. तुम्हाला आता वैवाहिक जीवनामध्ये पदार्पण करायचे आहे.. तुम्हाला जर वाटत असेल की माझं वैवाहिक जीवन सुखी व्हावे व वैवाहिक जीवनामध्ये कोणकोणत्या गोष्टींची जबाबदारी घ्यायला हवी याविषयी माहिती करून घ्यायची आहे तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत वाचा...!

नमस्कार मी अलका शिंदे...

गर्भसंस्कार मार्गदर्शक अँड सेल्फ कोच...

किशोर वयात मुलगी अतिशय भावनाप्रधान असते या वयात तिचे मन संवेदनशील असल्यामुळे अगदी छोट्या-छोट्या कारणांनीही तिच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो. त्यामुळे तिला कधीकधी खूप रडावेसे वाटते तर कधी सगळ्यांचा खूप राग येतो. घडलेल्या शूल्लक गोष्टी खूप मनाला लावून घेतल्या जातात.

मी कोण आहे, मला काय करायचं आहे माझ्या कुटुंबात, घरात ,समाजात माझे काय स्थान आहे. अशा अनेक गोष्टींविषयी मनात गोंधळ उडालेला असतो त्याच-त्याच विचारांची मनात गर्दी होवून मन एकाग्र करणं तिला कठीण जातं या वयात मुला-मुलींना स्वतःच्या कल्पनाविश्वात रमायला आवडते. काहीही काम करताना अभ्यास करताना मध्येच नवनवीन विचारांमध्ये ती रंगून जाते आपण इतरांचे लक्ष वेधून घेत आहे व आपण कोणा एकाला फार हवेहवेसे वाटतो आहे हे नेहमीचे दिवास्वप्न ती पहात असते. यातूनच विरुद्ध लिंगी व्यक्तींविषयी आकर्षण, प्रेम या भावना जन्मास येतात. आईवडिलांशी जिव्हाळ्याचे नाते हळूहळू तुटक होऊ लागते. बेजबाबदार वर्तन ,हेकेखोरपणा, चंचल स्वभाव हे  गुण थोड्याफार प्रमाणात दिसून येतात. या वयातील मुलं-मुली मनमोकळे स्पष्टवक्ते व धाडसी मनोवृत्तीचे ही असतात.अशा आचार-विचारांना योग्य मार्गदर्शनाची व पाठिंब्याची मात्र गरज असते.

या वयात समवयस्क मित्र-मैत्रिणींमध्ये भिन्नलिंगी आकर्षण निर्माण व्हायला सुरुवात होते. सोशल मीडियाचा प्रभाव जास्त असल्याने काही गोष्टी, काही प्रसंग त्यांना खरे वाटू लागतात. समवयस्क मित्र-मैत्रिणींमध्ये भिन्नलिंगी आकर्षण निर्माण व्हायला सुरुवात होते. एखादा मुलगा सतत पाहतो ही भावना सुखावत असते. देखणा रुबाबदार असल्याने त्यावर भाळून जाऊन त्याच्या अवगुण दोष याकडे दुर्लक्ष केले जाते. रंगरुप कौशल्यावर भाळून जाऊन त्या व्यक्ती करता कोणताही त्याग करावयास ती तयार होते. अगदी स्वतःचा जीव किंवा शरीर सुद्धा...!

 किशोर वयातील या भाबडेपणा मुळे आकर्षण व प्रेम यातला फरक तिला कळत नाही.

आई वडील बहिण भाऊ यांच्यामध्ये जे नातं असतं ते सुद्धा प्रेमाचच नात असतं ज्यामध्ये आपण त्या व्यक्तीला तिच्या गुणदोषांसह उघड्या डोळ्यांनी स्वीकारतो ज्यामध्ये एकमेकांबद्दल विश्वास आदर सहकार्याचं व समजूतदारपणा च नातं असतं. ज्यामध्ये एकमेकांप्रती समर्पणाची भावना देखील असते.ते प्रेम म्हणजे खरे ते प्रेम होय.


जोडीदाराची निवड



मुलगी एकदा लग्नाला आली की आईवडील, नातेवाईक,व गावातील प्रतिष्ठित मंडळी तिला मुलगा शोधायला सुरुवात करतात. मुलीच्या मनातील व पालकांच्या मनातील योग्य मुलगा यामध्ये फरक असू शकतो. मुलाची निवड कशी करावी याचा गोंधळ तिच्या मनामध्ये असल्यामुळे जे आहे त्या परिस्थितीला सांभाळून घेऊन तिला तडजोड करावी लागते.

जोडीदार कसा हवा?

यासाठी आपण प्रत्यक्ष कृती करूया…..

डायरी घ्या. डायरीमध्ये आपल्याला जोडीदार कसा हवा याबद्दल लिहा. फक्त गुणांची यादी करा.

यामुळे विचार करण्याची क्षमता निर्माण होईल.

बाहेर स्वरूपी कुणाला महत्त्व दिले आहे असे जाणवले तर त्यावर चर्चा करता येईल. उदा. सिनेमातील हीरो हीरोइन आपण बघतो ती खरोखरच प्रत्यक्षात तसे असतील का?

जर मुला-मुलींमधील स्वभाव गुणांना महत्त्व दिले उदा. प्रेमळ व मदत करणारा प्रामाणिक यावरही चर्चा करा. वैवाहिक जीवन सुखी बनवण्यासाठी दोघांनाही काही गुणांची जरुरी असते सहसंवेदना त्याग एक निष्ठा प्रेम सहकार्य आदर तडजोड विश्वास जबाबदारी हे गुण महत्त्वाचे असतात.

आयुष्यात दोन निवडी अतिशय महत्त्वाचा मानल्या जातात. पहिली निवड आपल्या कारकिर्दीची व दुसरी निवड आपल्या जोडीदाराची. कारकिर्तीची निवड आपल्या आवडीनुसार व जोडीदाराची निवड जागरूकतेने करायला हवी जोडीदार निवडण्यासाठी कोणताही फॉर्म्युला तयार करणे शक्य नाही. तो किंवा ती अनुभवानुसार बदलतही जाते कोणत्याही अवघड परिस्थितीत मी माझे वैवाहिक जीवन सुखी करणारच असे दोघांनीही जिद्द बाळगावी या व्यक्तीशी आपले जमणार नाही किंवा काही कारणास्तव हा जोडीदार पसंत नाही असे वाटल्यास निसंकोचपणे नकार कळवावा. त्याने नाकारले म्हणून नाव नाउमेद होऊ नये आपल्यात काही कमी आहे असे समजून न्यूनगंड निर्माण होऊ देऊ नये. जोडीदाराने लग्नाआधी संबंधाची मागणी केल्यास भीड न बाळगता नाही हा परवलीचा शब्द लक्षात ठेवावा.

आपल्या आवडी निवडी सर्व काही जुळून आल्यानंतर समोरची व्यक्ती स्वभावाने कशी असेल? तिच्याशी आपले जुळेल की नाही? अशा प्रकारची भीती दोघांच्याही मनात असते. यासाठी दोघांनीही कुटुंबासोबत एकत्र येऊन संवाद साधून योग्य मार्गदर्शकाकडून प्रश्नोत्तर स्वरुपात मार्गदर्शन घेतल्यास मनातील भीती कमी होऊ शकते.

मुलं-मुली दोघांच्याही घरामध्ये अनुवंशिक आजार आहेत का असे असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे. हे लक्षात घेतले पाहिजे. शक्यतो जवळच्या नात्यांमध्ये लग्न केल्यास होणाऱ्या बाळामध्ये अनुवंशिक आजार व दोषांचे प्रमाण जास्त आढळते  डॉक्टर सांगतात. उदा. थॅलॅसिमिया, हिमोफिलिया... या आजारांवर औषध उपचार उपलब्ध झाले असले तरी आपण त्याचा विचार आधीच करायला हवा कारण त्यात आपला मौल्यवान वेळ वाया जाऊ नये.

योग्य निर्णय:


मला लग्न? का करायचे आहे..! कशासाठी? करायचे आहे..! हा उद्देश लक्षात न घेताच धुमधडाक्यात लग्न लावून दिलं जातं घरातील ज्येष्ठ मंडळी प्रामुख्याने आई वडील मुलामुलींची मोकळेपणाने बोलत नाही. शाळा कॉलेजमध्ये सर्व काही शिकले असतील या भ्रमात आई वडील मुला मुली बाबत निश्चिंत असतात.

विवाहानंतर खरे स्वभाव खऱ्या अर्थाने एकमेकांना कळतात कुटुंबासोबत जुळवून घेताना हातान मनावर अधिक अधिक वाढत जातो अशातच गर्भधारणा झाल्यास बाळावर त्याचा विपरीत परिणाम होतो. डायबेटिस हृदयविकार इत्यादींसारखे रोग स्थानाशी संबंधित असतात हेही आपण लक्षात घेतले पाहिजे गरोदरपण आणि ताण यासंबंधी झालेल्या आणि एक संशोधनामध्ये असं लक्षात आलं आहे की अतिताणामुळे बालकाचा अकाली जन्म होऊन त्याचं वजन कमी भरणं बाळ चिडचिड जन्माला येणार हे धोके उद्भवू शकतात.

मला आलेला एक अविस्मरणीय अनुभव:


प्रिया च १८व वर्ष संपत आलं आणि तिच्या लग्नाबद्दल कुजबुज सुरू झाली. आमक्या ठिकाणी असा मुलगा आहे. तमक्या ठिकाणी तसा मुलगा आहे. रोज काही ना काही तरी नवीन कानावर येत असे. एक दिवस तिच्या बाबांचा मित्र घरी आला आणि त्यांनी प्रियासाठी एक स्थळ आणले सुशांत हुशार,गोरागोमटा, उंचापुरा आहे पोटापुरती शेती आहे. हे सर्व बाजूने सकारात्मक पद्धतीने बाबांच्या मित्रांनी आई-बाबांना पटवून दिले. आपल्या मित्राने एवढं सांगितल्यावर बाबांनी मित्रावर विश्वास ठेवून बिनधास्तपणे होकार दिला. तसेच ते स्थळ अगदीच नाकारण्यासारखेही नव्हते. पुढील सगळे कार्यक्रम सुरळीत झाले लग्न पार पडले मुलगी परत मूळ करून सासरी नांदायला आली. काही दिवसातच तिथल्या नातेसंबंधाशी परंपरांशी जुळवून घेताना तिच्यावर ताण येऊ लागला. घरामध्ये एकमेकांविषयी समज गैरसमज होऊ लागले छोटे छोटे वाद-विवाद होऊ लागले अशातच तिला गर्भधारणा झाली. घरामध्ये भांडणतंटे होत असताना एक दिवस कुटुंब विभक्त झाल. 

प्रिया चे आई बाबा सर्वसाधारण कुटुंबातील कमीच शिकलेले. ते त्यांच्या पद्धतीने मार्गदर्शन करीत असत. सुशांतला जेमतेम पगार असल्याने काही दिवसातच त्यांच्या संसारांमध्ये आर्थिक अडचणी भासू लागल्या मानसिक ताणतणाव अधिकच वाढू लागला. आता म्हण मध्ये मदत नसल्याने सर्व गोष्टींचा ताण दोघांवर यायला लागला आणि मग दोघांमध्ये भांडणे सुरु झाली. अशा परिस्थितीत प्रियाच्या पोटामध्ये बाळाचा गर्भ वाढत होता. तिला या प्रवासामध्ये कितीतरी शारीरिक अडचणी आल्या. नऊ महिने नऊ दिवसानंतर सिजर झाले. बाळाचे वजन कमी. प्रियाला अंगावर दूध कमी असल्यामुळे बाळाचे पोट भरत नसेल. बाळ रडतय त्याच्या रडण्याचे कारण त्या दोघांनाही कळत नसे. शेजारीपाजारी चुकीचा सल्ला देऊन समस्या अधिकच वाढत होत्या. एक वर्षानंतर पर्यंत बाळाची तब्येत अधिकच खालावली त्याचे रूपांतर कुपोषणामध्ये झाले. अंगणवाडीमध्ये माझ्याकडे फक्त बाळाचे वजन करण्यासाठी प्रिया आपल्या बाळाला घेऊन येत असे तेही माझ्या मदतनीसच्या आग्रहास्तव बाळ सहा महिन्यांचे झाल्यानंतर त्याचे दात निघायला लागले म्हणून त्याला जुलाब होत आहेत असे ती सांगायची. महिन्यातून एकदा वजन व लसीकरण या दोन गोष्टींसाठी आल्यावर तिच्याशी आमची चर्चा व्हायची. घरात कामाचा सर्व ताण तिच्यावर असल्यामुळे ती माता बैठकांना देखील येत नसायची. मला सगळं माहिती आहे या घमेंडीत केलेले मार्गदर्शन एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायची. बाळाचे रडगाणे चिडचिड ह्या सर्व गोष्टी तिला असह्य होत असे. त्याचा परिणाम तिच्या आरोग्यावर ही होत हो लागला. हळू ती ॲनिमिया ग्रस्त झाली. अशातच मासिक पाळी सुरु होण्याआधीच दुसऱ्यांदा दिवस गेले हे तिला कळले देखील नाही. उलट्या मळमळ सुरू झाल्यावर तिला शंका आली तोपर्यंत अडीच महिने होऊन गेले होते. पहिल्या बाळाचे नीट संगोपन करण्याची समज येण्याआधीच दुसरे बाळ ही तर अतिशय तणावपूर्ण बाब दोघा नवरा बायकोच्या बाबतीत होऊन बसली. तीन जिवांची जबाबदारी सुशांत वर आता आली होती. दिवसभर राब राब राबून संध्याकाळी घरी येताच प्रियाचा सुकलेला चेहरा चिडचिड व बाळाचे रडणे बघून सुशांत डोक्याला हात लावून बसू लागला. दोघांची भांडण तंटे वाढतच चालली. दिवसांमागून दिवस जात होते तसतसा प्रियाच्या पोटातील गर्भ वाढत गेला. आठव्या महिन्यात अचानक प्रियाला बी.पी.चा त्रास सुरू झाला. सुशांत तिला सरकारी हॉस्पिटल मध्ये घेऊन गेला. प्रियाच्या अंगामध्ये फक्त 4 पॉईंट रक्त भरले होते. प्रियाला रक्त भरावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितले. परंतु सुशांतची परिस्थिती नसल्याने त्याने डॉक्टरांना सांगितले की जे काही होईल ते माझे नशीब. आणि खरोखरच नशिबाने साथ दिली असेच म्हणावे लागेल. त्याच रात्री प्रिया ची डिलिव्हरी झाली. मुलगी झाली. पण तिचे वजन फक्त दीड किलो. सात दिवसानंतर घरी जाताना डॉक्टरांनी दिला काळजी घ्यायला सांगितली. कधीमधी अंगणवाडीत येऊन रडगाणं तर कधी आरोग्य सेविका ए. एन. एम. त्यांच्याकडे लसीकरणाला आल्यावर प्रियाचे रडगाणे ऐकायला मिळायचे. मग मदतनीस आणि मी प्रियाला जास्तीचा आहार द्यायचं आम्हा दोघी नाही प्रियाची खूप दया यायची. अंगणवाडीमध्ये जेवढ्या सेवा देता येईल तेवढ्या सेवा आम्ही तिला पुरवल्या. पहिलं बाळ सोहम अडीच वर्षाचा तर दुसरी मुलगी सायली दोनवर्षाची झाली पण तिचे वजन मात्र एका वर्षाच्या मुली प्रमानेच होते. ती नेहमी आजारी पडत असे. चिडचिड करत असे. सायली ची वाढ गुंतलेली होती  मी याचे कारण शोधण्याचा खूप प्रयत्न केला. एक दिवस मदतनीस व आणि मी दोघी तिच्या घरी गृहभेटी साठी गेलो मग कळले की सुशांत रोज दारू पिऊन घरी येतो व प्रियाशी भांडतो. दगड मारामारी करतात. सुशांत चे आई वडील सुशांत वर नेहमीच नाराज असायचे अशा या घरच्या वातावरणामुळे नेहमी तो ताणतणावात असायचा त्यामुळे सायली कडे त्यांचे दुर्लक्ष झाले. सोहमला मात्र सायली झाल्यावर प्रिया ची आई तिच्या कडे घेऊन गेले त्यामुळे तो तिकडे सुरक्षित होता. सायली वर मात्र दोघही प्रेम करायला विसरूनच गेले.

मी जेव्हा दुसऱ्या गृहभेटीला गेले तेव्हा सायलीच्या आई-वडिलांना म्हणजे सुशांत व प्रियाला समजावून सांगितले  तिला आम्ही अंगणवाडीमध्ये आहार देतोच. त्यामुळे आहाराचा प्रश्न नाही. पण मुलांच्या वाढीसाठी आहार जेवढा महत्त्वाचा आहे तेवढेच प्रेमाचे वातावरण सुद्धा महत्त्वाचे आहे. तुमच्या घरातील नेहमीचे भांडणे आणि तणाव याचा सायली वर दुष्परिणाम झाला आहे. जो पर्यंत तिला कुटुंबाचे प्रेम मिळत नाही तोपर्यंत तिची भूक वाढणार नाही. तेव्हापासून माता बैठकांमध्ये आई-वडिलांचे समुपदेशन सुरू केले की बाळाची कसे बोलावे आपल्या बाळांना गोष्टी सांगाव्या त्याच्याजवळ बसून त्याला जेवण बनवावे जेणेकरून बाळाचे वजन वाढण्यास मदत होईल.

      घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती...

     तिथेअसावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती..!


तात्पर्य



मुलगी वयात आली की तिला मैत्रिणी प्रमाणे विश्वासात घेऊन व तिच्या बरोबर मैत्रिणी प्रमाणे जवळीक करून प्रत्येक गोष्टीची समाज देण्याची जबाबदारी आईची असते. कुटुंबाचे महत्त्व, लिंगभेद, आहार, आरोग्य, प्रजनन आरोग्य, गुप्तरोग, आत्मनिर्भरता, खंबीरता, व्यवसाय मार्गदर्शन याबद्दल आईने प्रशिक्षण घ्यावे किंवा याविषयीची पुस्तके वाचून स्वतःचे ज्ञान वाढवावे व आपल्या मुलीला सर्वगुणसंपन्न बनवावे की जेणेकरून ती उद्याची आदर्श आई बनेल. आणि देशाची जबाबदार व्यक्तिमत्व बनेल या सर्व गोष्टींची समज आल्यावरच लग्नाचा निर्णय घ्यावा व योग्य त्या  खात्री करूनच जोडीदार निवडावा.

अंगणवाडी क्षेत्रामध्ये काम करत असताना मला अशा कितीतरी गोष्टींचा अनुभव आले आहेत. कमी वयात मुलींची लग्न होणे, मुली मुलांसोबत पळून जाणे, विभक्त कुटुंब पद्धती, अनुवंशिक आजार, अज्ञान, अंधश्रद्धा, घरातील नकारात्मक वातावरण, किशोर वयातील मुलांना आई-वडिलांचे प्रेम नाव मिळणे, मुलांमध्ये न्यूनगंड असणे, मतिमंद, अपंग, कुपोषणग्रस्त, ॲनिमिया ग्रस्त, या सर्व गोष्टींचे अज्ञान असल्यामुळे पुढे व्यक्तींच्या जीवनामध्ये सुख समाधान आणि आनंद येत नाही आणि मग ते नशिबाला दोष देत बसतात या सर्वाचे मूळ गर्भात. बाळ गर्भात असताना सुरुवातीपासूनच त्याच्यावर सूसंस्कार केले. आणि गर्भात असताना पासूनच त्याचा लगाम आईच्या हातात असेल तर एकाच मार्गाने तिला त्याला पुढे घेऊन जाता येईल आणि म्हणूनच….

समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी स्री जागृत होणे आवश्यक आहे आणि एकदा का स्त्रीची प्रगती झाली की कुटुंबाची प्रगती होते. मग गावाची प्रगती होते. आणि अशाप्रकारे आपण उद्याची आधुनिक पिढी भारतरत्न पिढी  घडवू शकतो. पंडीत जवाहर लाल नेहरूंनी म्हटले आहे..!

माझा ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्याबद्दल मनःपूर्वक आभार हा ब्लॉग तुम्हांला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा 

अशीच आणखीन नवीन नवीन माहिती मिळण्यासाठी२१ व्या शतकातील गर्भसंस्कार हा फेसबुक ग्रुप खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जाईन करा.

२१ व्या शतकातील गर्भ संस्कार

युट्युब चॅनेल

अधिक माहितीसाठी संपर्क:






गुरुवार, ५ ऑगस्ट, २०२१

जगावेगळी आई

यशस्वी (आदर्श)माता बनण्याचे रहस्य:

लग्न झालं, करिअर झालं, सर्व काही सुरळीत चालू आहे, आता तुम्ही बाळ होऊ देण्याचा विचार करत आहात, परंतु बाळाला जन्म दिल्यानंतर माझ्याच्याने? त्याच्यावर संस्कार करणे शक्य होईल का..!, संसार म्हणजे तारेवरची कसरत हे सगळं करताना? मला ते पेलवेल का..!, बाळाला घडविण्यात? मी यशस्वी होईल का..! असे अनेक प्रश्न मातांच्या मनामध्ये येतात. काय करावे? कसे करावे? यासाठी मार्गच सापडत नाही.. असे तुमच्याही बाबतीत होते का जर का तुमच्याही बाबतीत हेच होत असेल तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत वाचा...

नमस्कार 🙏 अलका शिंदे गर्भसंस्कार मार्गदर्शक अँड सेल्फ कोच ...

मैत्रिणींनो तुमच्या मते यशाची व्याख्या काय आहे. यश? म्हणजे काय..!, ते? कधी मिळतं..!, ते? मिळण्यासाठी काय करायला हवं..! असे एक ना अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांनाच अगदी लहानपणापासून पडत आले आहेत. होय ना? तुम्हाला तुमच्या बाळाच्या भवितव्यासाठी आणि तुम्ही एक आदर्श माता आहात याबद्दलचे तुमचं अस्तित्व जागांमध्ये निर्माण करण्यासाठीच.. रहस्य नेमकं? काय आहे..! हे जाणून घ्यायचं असेल तर हा ब्लॉग खरोखर शेवटपर्यंत वाचाच....

मैत्रिणींनो एक दुर्दैव अस आहे की जागातील 95 टक्क्याहून अधिक लोक या प्रश्नांचे उत्तर जाणून न घेताच मरून जातात…आणि ज्यांना उत्तर गवसतं ते मात्र जगावर राज्य करतात…!

एखादी कल्पना किंवा स्वप्न ठरवून त्याच्या पूर्ततेसाठी जेव्हा आपण आपलं तन-मन-धन झोकून देतो , आणि त्या कल्पनेवर कोणताही संशय न घेता शंभर टक्के विश्वास ठेवतो, कितीही अडचणी, अपयश आलं तरी त्याच मार्गाने पुढे जात राहतो, मग तिथे तुमचं ध्येय पूर्ण होवो अगर न होवो परंतु या प्रवासात तुम्ही तहान भूक विसरता ते खरं ''यश'

कोणताही काम करण्यासाठी जोश आणि उत्साह असणे खूप गरजेचे आहे आणि हा उत्साह व जोश आपल्याला मोटिव्हेशन मधून मिळतो. जर तुम्ही एखादं काम करण्यासाठी मोटिव्हेटेड असाल तर ते काम करताना तुम्ही 100% देता व मोटिव्हेशन नसेल. तर तुम्ही ते काम नीट करू शकणार नाही.

कुठेतरी माझ्या वाचण्यात आलं होत  की एखाद्या कामाप्रती उदासीनता व निरुत्साह हा एक रोग आहे. आणि मोटीवेशन हे त्यावरचं एकमेव औषध आहे.

जेव्हा आपण अतिशय बिकट, प्रतिकूल परिस्थितीतून जात असतो आपल्यात उत्साह नसतो, त्यावेळी आपण हे मोटिव्हेशन च औषध घेतो. यासाठी आपण प्रेरणादायी असं वाचन करतो किंवा युट्युब, फेसबुक वरती मोटिव्हेशन चे व्हिडिओ बघतो बरोबर ना..?

मला आजपर्यंत बऱ्याच गरोदर मातांनी प्रश्न विचारला आहे की सतत मोटिव्हेट कसं राहायचं. स्वतःला सतत मोटीव्हेट कस ठेवायचं.? तर मग…


जाणून घ्या स्वतःला कायम मोटिव्हेट ठेवण्यासाठी पाच टिप्स:


१. तुम्ही तुमच्या टार्गेट पासून किती दूर आहात याचा रोज आढावा द्या:

तुम्हाला जे मिळवायच आहे, तुम्हाला जे बनायचं आहे,(आदर्श माता) त्या दृष्टीने रोज एक एक पाऊल पुढे जा. म्हणजे तुमच्या देण्यासाठी रोज थोडी थोडी मेहनत घ्या. माझे गुरु नेहमी म्हणतात की ध्येयाच्या दिशेने उडा, उत्तर येत नसेल तर धावा, धावता येत नसेल तर चाला, चालता येत नसेल तर सरपटा, तेही जमत नसेल तर रेगाळा. पण रोज थोडं थोडं पुढे जा. आपल्याला दररोज एक टक्का तरी आपल्यामध्ये प्रगती करायचे आहे. आणि ती आदर्श माता आवडण्यासाठी त्यासाठी तुम्हाला अगोदर तुमच्यामध्ये सकारात्मक बदल करायला हवा होय ना..! तुमच्यामध्ये बरेचसे बदल झाल्यानंतर तुम्ही तुमचं ध्येयाच छोटसं चित्र तुमच्या पाकीट मध्ये ठेवा. तुमच्या घरात देवपूजा असेल त्या ठिकाणी लावा. तुमच्या बेडरूम मध्ये तुम्ही बेडवरून उठल्याबरोबर दिसेल अशा ठिकाणी लावा. तुमच्या मोबाईल मध्ये वॉलपेपर वर ते ठेवा जेव्हा तुम्हाला निराशा येईल तेव्हा तो फोटो बघा. याने तुम्हाला प्रेरणा मिळेल व रोज तुमच्या ध्येयाच्या दिशेने तुम्ही सहज जाऊ शकाल.

२. महान आणि प्रेरणादायी व्यक्तींची आत्मचरित्र वाचा:

आपल्या देशात, जगात अशी मोठमोठी माणसं होऊन गेलीत ज्यांचा प्रभाव आपल्यावर अजूनही आहे. अशा व्यक्तींची आत्मचरित्र वाचा किंवा त्यांच्या आयुष्यावर आधारित पुस्तक वाचा. यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळेल. त्यांचे कष्ट मेहनत समजेल, आलेल्या अडचणी केलेल्या चुका, त्यांनी दिलेली शिकवण, सगळं काही शिकता येईल. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, स्टीव्ह जॉब्स यांसारख्या महान व्यक्तींच्या प्रेरणा घ्या.

आपल्या देशात आपल्या जगात खूप मोठमोठ्या यशस्वी व्यक्ती होऊन गेल्या आहेत ज्यांचा आपल्यावर अजूनही प्रभाव आहे अशा व्यक्तींची आत्मचरित्र वाचा किंवा त्यांच्या आयुष्यावर आधारित असलेली पुस्तके वाचा. यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळेल त्यांचे कष्ट व मेहनत कळेल. आलेल्या अडचणी केलेल्या चुका त्यांनी दिलेली शिकवण हे सगळं काही शिकता येईल छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, एपीजे अब्दुल कलाम, स्टीव जोन्स यांसारख्या यशस्वी व्यक्तींकडून प्रेरणा घ्या.

३.प्रेरणादायी चित्रपट पहा किंवा प्रेरणा देईल असं संगीत ऐका:

कधीकधी चित्रपट देखील आपल्याला खूप काही शिकवून जातात. जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमच्या सोबत खूप वाईट घडत आहे, परिस्थिती चांगली नाही, एखाद्या दिवशी तुम्ही नाराज असता, मन उदास होते, अशा वेळी तुमच्या शरीरामध्ये तसे हार्मोन्स निर्माण होऊन बाळापर्यंत पोचतात आणि त्यामुळे बाळाचे नुकसान देखील होण्याची शक्यता असते म्हणून सदैव सकारात्मक राहण्यासाठी तसेच आपल्याला पुढे जाण्यासाठी सतत प्रेरणा मिळावी म्हणून असे चित्रपट जरूर बघा. 3 idiots, chak de India, bhaag Milkha bhaag, I am Kalam यांसारखे चित्रपट बघा, ज्यामुळे तुम्हाला आलेल्या प्रसंगावर परिस्थितीवर मात करायला प्रेरणा मिळेल या व्यतिरिक्त प्रेरणा देणाऱ्या संगीत आहेत का किंवा ऑडिओ बुक ऐका त्यासाठी मी तुम्हाला एक ऑडिओ बुक सजेस्ट करीत आहे त्याचं नाव आहे. Kuku FM.

४. फ्लॅशबँक मध्ये जाऊन तुमच्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या यशाबद्दल विचारा:

जेव्हा तुम्ही निराशेने, अपयशाने आस्वस्त असाल, स्वतःलाच खूप राग येत असेल तेव्हा फ्लॅशबँक मध्ये जाऊन तुम्ही आयुष्यात मिळवलेल्या यशाचा विचार करा. त्यावेळी जो आनंद तुम्ही अनुभवला होता तो पुन्हा अनुभवा, यामुळे काय होईल की तुमच्या आत नवीन ऊर्जेचा संचार होईल. तुम्ही पुन्हा एकदा एनर्जेटिक फील कराल व नवीन जोमाने कामाला लागाल. स्वतःला पुन्हा एकदा आठवण करून द्या की यश मिळवण्यासाठी तुम्ही किती मेहनत केली आहे, आशिच तर मेहनत तुम्हाला आता घ्यायची आहे. आणि ती घेतली तर तुम्ही नक्की यश मिळवू शकता.

या होत्या काही पद्धती, की ज्यांच्या मदतीने तुम्ही स्वतःला कायम मोटिव्हेट ठेवू शकता. तुम्ही एखादं काम १००% मोटिव्हेशनने केलं तर तुम्हाला १००% यश हे मिळेलच.

तुम्ही? कधी ट्राफिक मध्ये अडकलाय का..! काय? होतं असं कुठेही अडकलं तर..! खूप राग येतो, चिडचिड होते. हळूहळू का होईना आपण जेव्हा पुढे जातो तेव्हा आपण आनंदी होतो, समाधानी होतो. आपले वैयक्तिक आयुष्य असो , इतर नातेसंबंध, नोकरी असेल किंवा व्यवसाय करियर असो वा अध्यात्म. आपल्याला एकाच ठिकाणी अडकून राहायला आवडत नाही.


कोणतेही क्षेत्र असो, अगदी शालेय जीवनात सुद्धा आपल्याला कायम पुढे जायचं असतं. यशस्वी व्हायचा असतं. आणि आज तुम्ही ज्या स्टेजमध्ये आहात तर आत्ताही तुम्हाला तेच वाटत आहे. बरोबर? ना..!

पण तुम्हाला? माहिती आहे का..!की या यशस्वीतेचे तीन दुश्मन आहे. जे आपल्या यशाच्या रस्त्यावर स्पीड बेकर सारखे आडवे येतात. जर आपण यांना आपल्या रस्त्यातून, म्हणजेच आपल्या डोक्यातून, मनातून बाहेर काढून टाकलं तर मात्र आपल्याला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही…!


चला तर मग या तीन शत्रू बाबत जाणून घेऊया….


१. लोक काय म्हणतील

मैत्रिणींनो मला माहिती आहे तुम्हाला लोक काय म्हणतील.. 

नवल परी आई झाली.. आम्हाला जसे पोरं झालेच नाही... आमच्या वेळी असं नव्हतं... आम्ही जसं असेल तसं धकून घ्यायचो... आता तर काय बाई यांचे चोचले... योगा काय करताय... रस्त्यावर काय फिरताय... सारखा डॉक्टर लागतोय... आजूबाजूच्या लोकांकडून तुम्हीच काय पण मी सुद्धा हे बोलणे ऐकलेले आहेत. पण तुम्हाला सांगते "सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग"..!

जेव्हा पासून मी स्वतः लोक काय म्हणतील हा विचार सोडून दिला तेव्हाच माझ्या जीवनात प्रगती झाली बर का. आणि ही म्हण तुम्हालाही ते सांगते.

एक हिंदी गाणं आहे,'कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना..! त्यामुळे लोक काय म्हणतील हा विचार करणं बंद करा. लोक दुसऱ्यांना सल्ला देण्यात अगदी माहीर असतात. मी असं म्हणत नाही की तुम्ही कोणाच ऐकू नका, पण इतरांच ऐकताना स्वतःलाच मत मात्र विसरू नका. अपयशी माणसाकडून सल्ला घ्या आणि यशस्वी माणसाकडून अनुभव.

हा…

पण सरतेशेवटी तुम्हाला जे योग्य वाटतं तेच करा. कृती करायला घाबरू नका. कृती कराल तरच अनुभव मिळतील. इच्छा असेल तरच चांगल्या गोष्टी शिकाल, शिकलात तरच यश येईल आणि यश आलं तरच आदर्श बनाल.

२ नशीबाला दोष देऊ नका:

मला एक सांगा पाऊस पडला नाही म्हणून शेतकर्याने स्वतःच्या नशिबाला दोष देत बसत शेती न करण्याचं ठरवलं तर, नशिब बदलून पाऊस पडेल का...??

नाही ना…

मग..

आपण हे मान्य केले पाहिजे की वेळ सारखी नसते, आज..

आज पासून दररोज एक एक दिवस आपल्यामध्ये चेंज होत जाणार आहे. प्रत्येक दिवशी आपला मूड बदलेल. परिस्थिती बदलेल. काही दिवसांनी अजून चांगलं होईल. आपण नशिबाला दोष देत न बसता आपल्या बाळाला आपल्या कडून जास्तीत जास्त बेस्ट देण्याचा प्रयत्न करत राहायचां आहे, आपले विचार चांगले ठेवायचे, चांगलं काम करत राहायचं, एक ते नऊ महिने या प्रेग्नेंसी काळातील आपल्या बाळासाठी आपण केलेले श्रम ही एक इन्व्हेस्टमेंट आहे. जेव्हा ही वेळ बदलेल तेव्हा तुमची तयारी पूर्ण झालेले असेल आणि तुम्ही तुमच्या यशाची फळ खायला तयार झालेले असाल. मी कुठेतरी एक शायरी वाचली होती,

'हातो की लकीरो पे मत जा ये गालिब...

नाशिब तो उनके भी होते है...

जिनके हात नही होते' ll

३. Perfection (परिपूर्णता) च्या मागे धावणे:

तिसरी खूप महत्त्वाची गोष्ट…

तुमच्या मनातून ही गोष्ट काढून टाका, की जीवन परफेक्ट बनू शकत. प्रत्येकाला लगेचच त्याच्या मनासारखं एक आदर्श आयुष्य हव असतं, की जिथे सगळं व्यवस्थित मनासारखा असेल, पण ह्या गैरसमजुती ला मनातून काढून टाका. जीवनाला समजणे खूप अवघड आहे.

आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा थोड्याच अभी के अभी पूर्ण होतात. जीवन हे जखमांनी भरलेल आहे. पण वेळेला/काळाला मलम बनवा. मृत्यूशी हरायचच आहे एक दिवस.. पण त्यापूर्वी जीवनाशी जिंकायच देखील आहे.

यशस्वी व्हायच असेल तर in perfect action घ्यायला शिका. माझे गुरु नेहमी म्हणतात'आपल्या प्रवासात आपल्याला जे मिळतं ते यश नाही, तर आपण काय बनतो ते यश आहे. आणि या प्रेग्नेंसी काळात तुमच्या बाळाबरोबर तुम्ही सुद्धा घडणार आहात बनणार आहात. त्यामुळे काही मिळविण्यापेक्षा बनण्याकडे लक्ष द्या. गर्भसंस्कार हे फक्त नऊ महिन्यापुरतेच मर्यादित नसून ते तुम्हाला तुमच्या संपूर्ण आयुष्यात फायद्याचे ठरतील. या मार्गाने चालल्यास तुम्ही तुमच्या बाळाचा योग्य मार्गदर्शक बंनाल यात शंका नाही. लवकरच तुमचे नाव आदर्श माता यादीत झलकल्याशिवाय राहणार नाही. याची मला खात्री आहेे. परंतु या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शनाची आणि तुम्हाला जर खरोखर या मार्गाने पुढे जायची इच्छा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून २१ व्या शतकातील गर्भसंस्कार हा फेसबूक ग्रुप नक्की जॉईन करा.

२१व्या शतकातील गर्भसंस्कार


संपर्क


.माझा ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्याबद्दल मनःपूर्वक आभार हा ब्लॉग तुम्हांला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा


धन्यवाद..!

गर्भावस्थेत आत्मविश्वासाचे महत्त्व

 

आत्मविश्वास


तुम्ही बाळ होण्याचा प्लॅनिंग करत आहात किंवा तुमच्या पोटामध्ये तुमच्या बाळाचा गर्भ वाढत आहे. मी सुरक्षित नाही..! मी आनंदी नाही असे? तुम्हाला वाटते का..! तुमच्या? प्रेग्नेंसी मध्ये तुम्हाला खूप समस्या येत आहेत, असे तुम्हाला वाटते का..! या सर्व गोष्टींसाठी आत्मविश्वासाची गरज आहे आणि तो आत्मविश्वास तुमच्या मध्ये फार कमी आहे किंवा नाहीच असे तुम्हाला वाटते का? जर का तुमच्या बाबतीत हेच होत असेल तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे..

त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत वाचा..


नमस्कार 🙏

मी अलका शिंदे गर्भसंस्कार मार्गदर्शक अंड असेल कोच..!

मैत्रिणींनो माझ्या आतापर्यंतच्या अनुभवांआधारे मला तुम्हाला सांगावसं वाटतंय की, कुठलही यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास असणं खूप गरजेचं आहे. आत्मविश्वास या शब्दाची फोड केली की याचा अर्थ होतो 'स्वतःवरचा विश्वास' आत्मविश्वासाशिवाय आयुष्य म्हणजे सुगंधा शिवाय फुल. आपण असेही म्हणू शकतो आत्मविश्वासाशिवाय एखादा माणूस एका कार '' सारखा असतो, जी खूप सुंदर आहे आणि महाग पण आहे; परंतु तिच्यात पेट्रोलच नाही

एखादा माणूस कितीही हुशार असला तरीही आत्मविश्वास नसेल तर तो यशस्वी होऊ शकत नाही.

जगात यशस्वी झालेल्या प्रत्येक व्यक्ती मध्ये आत्मविश्वासाचा हा गुण होता. म्हणूनच आत्मविश्वासाला सफलतेचे बीजं असंही म्हणतात.आत्मविश्वास वाढवण्यासाठी आता मी तुम्हाला काही टिप्स देते, त्याचा अवलंब केल्यास तुम्ही तुमचे आयुष्य बदलू शकाल व यशस्वीतेकडे वाटचाल करू शकाल.


१. आपण बदलू शकत नसलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी त्या गोष्टींना स्वीकारा.


२. आपल्या अपूर्णतेचा स्वीकार करून आपल्या 

आयुष्यातील सर्वोत्तम गोष्टीची सुरूवात करा. 

असे केल्याने आपल्या मनावरील दडपण कमी होईल

३.स्वतःवर विश्वास ठेवा:

मला ही गोष्ट येत नाही,

मला हे जमेल का? 

असा नकारात्मक विचार करण्याऐवजी आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून, 

मी ही गोष्ट करू शकते...

मला हे नक्की जमेल...

मग ती तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला करण्यासाठी योग्य असेल ती कुठलीही गोष्ट असो. त्या गोष्टीसाठी सकारात्मक विचार करून प्रयत्नांची पराकाष्ठा, कठोर परिश्रम केल्यास आपला आत्मविश्वास वाढेल आणि आपण नकारात्मक विचारांवर मात करून आपण इच्छित यश प्राप्त कराल.


४.सकारात्मक विचार करा

सकारात्मक विचार केल्याने आपला स्वतः बद्दल  विचार करण्याचा दृष्टीकोन बदलेल आणि आपली निराशा, भिती कमी होऊन आपला आत्मविश्‍वास वाढेल.

५.नेहमी सकारात्मक लोकांबरोबर रहा.



व्यायाम करा


शारीरिक व्यायाम केल्याने शरीरातील रक्ताभिसरण वाढून आपणास ऊर्जा प्राप्त होईल त्यामुळे आपण दिवसभर उत्साही रहाल आणि आपण, चांगली कामे करू शकल

७.सकस आहार घ्या

आपल्या रोजच्या जीवनात सकस व पौष्टिक आहार घेतल्यास आपल्या शरीराची वाढ होईल, झिज भरून निघेल, ऊर्जा निर्मिती होईल, कार्यशक्ती वाढेल आणि यामुळे आपला आत्मविश्वास वाढेल.

आपल्या रोजच्या जीवनात सकस व पौष्टिक आहार घेतल्यास आपल्या शरीराची वाढ होईल, झिज भरून निघेल, ऊर्जा निर्मिती होईल, कार्यशक्ती वाढेल आणि यामुळे आपला आत्मविश्वास वाढेल.

८.वाचन करा

ज्ञान हा आत्मविश्वासाचा मुख्य पाया आहे. नियमितपणे प्रोत्साहन देणारी पुस्तके वाचल्याने आपले ज्ञान वाढुन आपण न भिता, मनात कोणतीही शंका न ठेवता. आपण आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल  कराल. या सर्व गोष्टींमुळे आपल्या मधील नकारात्मकता कमी होऊन आपला आत्मविश्वास वाढेल. 

वर दिलेल्या सर्व गोष्टीचां आपण आपल्या बाळाचे भवितव्य व आपले ध्येय गाठण्यासाठी नियमितपणे वापर केल्यास आपला आत्मविश्वास द्विगुणित होईल आणि आपल्याला यश प्राप्त होईल.

९. छोटी छोटी ध्येय बनवा: 

आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या कोणत्याही मोठ्या ध्येयाला  छोट्या छोट्या ध्येयांमध्ये विभागू शकता. असं केल्याने जेव्हा तुम्ही तुमचं छोटे ध्येय साध्य कराल, तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढेल व पुढे तुम्ही तुमची ही छोटी छोटी ध्येय साध्य करत जाल तेव्हा तुमचा आत्मविश्वास अजून वाढायला लागेल व तुम्ही स्वतःचं तुमचं मुख्य ध्येय साध्य करायला प्रेरित व्हाल.

आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या कोणत्याही मोठ्या ध्येयाला  छोट्या छोट्या ध्येयांमध्ये विभागू शकता. असं केल्याने जेव्हा तुम्ही तुमचं छोटे ध्येय साध्य कराल, तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढेल व पुढे तुम्ही तुमची ही छोटी छोटी ध्येय साध्य करत जाल तेव्हा तुमचा आत्मविश्वास अजून वाढायला लागेल व तुम्ही स्वतःचं तुमचं मुख्य ध्येय साध्य करायला प्रेरित व्हाल.


तुम्ही सध्या बाळ होण्याचा प्लॅनिंग करत असाल तर तुम्हाला त्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याची यादी करा. व त्या यादीनुसार तुम्ही तुमच्यामध्ये हळूहळू बदल करायला सुरुवात करा..

उदा. तुम्हाला सकाळी लवकर उठण्याची सवय नाही असे समजा. आपल्याला आता बाळ होऊ द्यायचे म्हणजे लवकर उठण्याची सवय हे लावावाच लागेल आणि  तुम्हाला सवय लावायचीच आहे. असा निश्चय केल्यावर तुम्ही जर आठ वाजता उठत असाल तर पहिल्या दिवशी दहा मिनिटं लवकर उठा, दुसऱ्या दिवशी आणखी दहा मिनिटं लवकर उठा, तिसऱ्या दिवशी आणखी दहा मिनिटं लवकर उठा प्रत्येक दिवशी दहा मिनिटात लवकर उठण्यासाठी आलाराम सेट करून ठेवा व तुम्हाला समजा पाच वाजता उठायचं असेल तर त्याआधी नियमितपणे हा सराव करावा लागेल.  असे छोटे छोटे गोल घेऊन तुम्ही तुमच्यामध्ये परिवर्तन करू शकता.

१०. भूतकाळात केलेली मोठी कामगिरी/आठवा: 

आत्मविश्वास वाढवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. तुम्ही तुमच्या भूतकाळात केलेलं चांगलं काम, तुम्ही मिळवलेले यश आठवा. तुम्हाला जेव्हा उदास वाटत असेल तेव्हा  हे सर्व आठवा, यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही तुमच्या अचीव्हमेंट एका कागदावर लिहून भिंतीवर पण चिकटवू शकता.

११. आत्मविश्वासाच्या भावना सतत जागृत करा


मित्रांनो, तुम्ही कुठेही असाल, कोणत्याही परिस्थितीत असाल पण स्वत:वरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका. आत्मविश्वासाची साथ कधीच सोडू नका.तुम्हीं  आत्मविश्‍वासाची साथ सोडलीत तर आत्मविश्वासही तुमची साथ सोडेल. तुमच्या आत असलेल्या आत्मविश्वासाला आतून अनुभवा. सतत तुमच्यातल्या आत्मविश्वासाला अनुभवत रहा. तुम्ही स्वतःला ही सवयच लावून घ्या. यामुळे तुम्ही कायम कॉन्फिडन्ट राहाल. तुमच्यासमोर एखादं मोठं संकट आलं तरी तुम्ही त्याला आत्मविश्वासाने सामोरे जाल.

१२.जोखीम पत्करायला घाबरू नका: 


यशस्वी होण्यासाठी जोखीम पत्करणे ही खूप गरजेचे आहे. जबाबदारी पत्करल्या शिवाय कोणीही यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून जोखीम जरूर पत्करा. तुमचा आत्मविश्वास वाढेल. 

काही लोक तर म्हणतात जेवढी मोठी जोखीम पत्कराल तेवढच मोठे यश मिळेल व तुमचा आत्मविश्वासही तेवढाच वाढेल.

१३. यशस्वी आणि आत्मविश्वासू

लोक जे करतात तेच करा:



तुम्हाला ती कामं करायची सवय लावून घ्यावी लागेल जी कामं यशस्वी लोक करतात. यशस्वी लोकांच्या प्रत्येक कामात आत्मविश्‍वास आढळतो. त्यामुळे असं केल्याने तुमचा आत्मविश्वासही वाढेल व तुम्हालाही यशस्वी लोकांसारखं व्हायला आवडेल. त्यांच्यासारखं बोलायला शिका, वागायला शिका राहायला शिका त्यांच्यासारखं काम करायला शिका, यशस्वी लोक काय करतात हे जाणून घेण्यासाठी अशा लोकांसोबतच रहा, यशस्वी लोकांची चरित्र वाचा, त्यांच्या मुलाखती पहा.

२१ व्या शतकातील या गर्भसंस्कार कोर्समुळे बाळाच्या व मातापित्यांच्या शारीरिक-मानसिक भावनिक बदलांसाठी शारीरिक अडचणी, मानसिक ताण तणाव आर्थिक अडचणी दूर होत आहे. आणि एक सकारात्मक वातावरण बाळाच्या विकासासाठी निर्माण होत आहे.

चहूबाजूला covid-19 मुळे नकारात्मकता पसरली आहे. तुमच्यासारख्या कितेक मातांना या नकारात्मकतेच्या विळख्यातून बाहेर काढून सकरात्मक व आनंदी राहण्यासाठी तसेच बाळाच्या उज्वल भविष्यासाठी 'मी २१ व्या शतकातील गर्भसंस्कार' या लाईव्हवर्कशॉप ची सुरुवात केली आहे. तुम्हाला यामध्ये सहभागी व्हायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा व फेसबुक ग्रुप जॉईन करा.

२१ व्या शतकातील गर्भ संस्कार

यूट्यूब चैनल

                         

माझा ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्याबद्दल मनःपूर्वक आभार हा ब्लॉग तुम्हांला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा

धन्यवाद 🙏🙂            



१६ "संस्कार"

संस्कारांवर आधारित  भारतीयसंस्कृती भारत देश हा खेड्यापाड्यांचा देश, सामाजिक, राजकीय, वैज्ञानिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा अनेक विषयांमध्ये पु...