बुधवार, २८ एप्रिल, २०२१

सर्वगुणसंपन्न बाळासाठी "गर्भसंस्कार"

' गर्भसंस्कार 'ही संकल्पना '

 गर्भसंस्कार' या नावावरु ती काहीतरी गर्भाशी संबंधित म्हणजेच  होणाऱ्या अपत्यासाठी एक चांगली अशी गोष्ट आहे हे लक्षात येते. अर्थात पुढची पिढी निर्माण होताना तिच्या संदर्भातला हा काही चांगलाच उपक्रम आहे हे उघड होते . आपली मुलं , आपली पुढची पिढी ही आरोग्यसंपन्न , अव्यंग असावी अशी अपेक्षा अगदी स्वाभाविकपणे सर्वांची असतेच . पण ती  'अधिकच प्रगत 'असावी असा काही विचार ' गर्भसंस्कार' या शब्दातून सूचित होतो . प्रगत म्हणजेच शारिरीक , बौद्धिक , मानसिक आणि अध्यात्मिक या सर्वांगिन दृष्टिने प्रगत . 

प्रगत म्हणजे ' विकसित ' ! म्हणजे याचा अर्थ असा नाही की आताची पिढी मागास आहे . परंतु प्रगती हा निसर्गाचा नियम आहे . निसर्गाची गरजही आहे . प्रगती होणे म्हणजे, आत्ता आहे त्यापेक्षा अधिक विकास पावणे ... सुधारणे , पुढारणे , प्रगत होणे . मुख्यतः बौद्धिक, त्यामुळे अर्थातच शैक्षणिकदृष्ट्या आणि परिणामतः आर्थिक व सामाजिक दृष्टयां आपला आत्ताचा जो काही स्तर असेल,  तो आपल्या पुढल्या पिढीने उंचवावा ही अपेक्षा व इच्छा असणे नैसर्गिक आहे . "गर्भसंस्कार" हे या इच्छेशी निगडीत असल्याने , हा विषय जे पालक सामाजिक, मानसिक शारीरिक,शैक्षणिक , बौद्धिक, भाषिक आणि आर्थिक दृष्टया मागास आहेत, त्यांची पुढची पिढी प्रगत व्हावी आणि जे प्रगत आहेत त्यांची अधिक प्रगत व्हावी यासाठी आणि म्हणून सर्वांनाच लागू होणारा विषय आहे .नाहीतर... 

"आपण आत्तापर्यंत जे करत आलो तेच करत राहिलो तर आपल्याला तेच मिळत राहील जे आत्तापर्यंत आपल्याला मिळत आला आहे"  हे विधान निसर्गाच्या आणि आजकालच्या वेगवान जीवनाच्या चक्रामध्ये फार काळ टिकणार नाही , हे ओळखणं फारसं अवघड नाही.

जरा निरीक्षण केलं तर सर्वसाधारणपणे समाजात असं दिसतं की डॉक्टरांच्या पुढच्या पिढया डॉक्टरच होतात... शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढ्या शेतकरीच होतात... गरिबांच्या पुढच्या पिढ्या गरीबच होतात आणि अशिक्षित लोक पिढयानपिढया अशिक्षितच राहतात. हे असं का ?  _" मी गरीब आहे , अशिक्षित आहे . आम्ही दोघं पति - पत्नी अशिक्षित आहोत पण आमच्या मुलांना आम्हाला सुशिक्षित बनवायचंय . आम्ही गरीब आहोत पण आमच्या मुलांना आम्हाला श्रीमंत बघायचं आहे. त्यांना तसं बनवणारच "का बरं लोक असा विचार करू शकत नाहीत?आर्थिक अडचण किंवा ते आपलं काम नाही  हे कारण  कुणीही लगेच पुढे करेल. पण इतिहासात जरासं डोकावलं तर लक्षात येईल, की , ज्या व्यक्ति ' महापुरुष ' म्हणून ओळखल्या जातात , त्यातल्या बहुतांश ' आर्थिक अडचण ' या गोष्टीचा सामना करूनच मोठ्या झालेल्या आहेत . त्यामुळे _'पैशाची कमतरता'_ हे कारण कुचकामी ठरतं . हुषारी , शिक्षण , अभ्यासाची आवड , व्यक्तिमत्वातले सद्गुण इत्यादी बाबतीत आणखी एक मुद्दा  हल्ली वेळ मारून नेण्यासाठी मदतीला येतो तो म्हणजे  अनुवांशिकता! पण आता आधुनिक विज्ञानाने प्रयोगांनी सिद्ध केलेलं एक सत्य आहे ...“बाळाचा बुध्यांकासाठी अनुवांशिकतेपेक्षा गर्भाशयातील वातावरणाचा परीणाम अधिक होत असतो कारण गर्भात असताना बाळाच्या मेंदूचा 80 टक्के विकास होत असतो .मग आता ? आता , "आम्ही गरीब असलो , अशिक्षित असलो , तरी आमच्या मुलांना तसं राहू देणार नाही . त्यांना सुशिक्षितं बनवणार"_ असा विचार करण्यास काय अडचण आहे ? आणि आपण तसा विचार केला नाही, तर पशू आणि मानव, म्हणजे आपण, यात काय फरक राहिला ? मग मुद्दा येतो तो प्राधान्याचा (priority) आयुष्यात आपण कशाला प्राधान्य देतो ? एक किंवा दोन मूल होणं आणि त्यात एकतरी " मुलगा ” असणं हे जीवनाचं सार्थक आहे का ?

 की होणारं मूल ( मुलगा असो वा मुलगी )

 बुद्धिमान , सुसंस्कृत , सुदृढ , आरोग्यसंपन्न , आजच्या स्पर्धेत टिकून शिकण्याची क्षमता असलेलं , पुढे आई - बापाचं नांव काढेल असं व्हावं ही जीवनाची सार्थकता आहे ? _" इतका पुढचा विचार कोण करतो ”_ असं म्हणून हात झटकणं सोपं आहे . पण जो जबाबदार पालक आहे , सुजाण नागरिक आहे आणि मुख्य म्हणजे थोडीशी सूज्ञता असलेला ' माणूस ' आहे तो हा विचार करू शकतो . फक्त पशूच हा असला काही विचार करु शकत नाहीत . ते फक्त प्रजोत्पादन करतात . आणि 'त्या'साठी 'विचार' करावा लागत नाही . ही विचार करण्याची देणगी फक्त मानव प्राण्यालाच आहे . पण ' हे सगळं ' शक्य आहे ? " हे सगळं "म्हणजे, अशा प्रकारच्या विचारांना पूर्णता लाभणं, हे शक्य आहे ? त्यासाठी काही करता येऊ शकतं का ? असा प्रश्न आहे . आणि त्याचं उत्तर... होय ! शक्य आहे !असं आहे . आता आपल्याला मूल होणार हे कळलं अर्थात pregnancy चं ( गरोदरपणाचं ) निदान झालं की लगेच मातापित्याची भूमिका या दिशेने  सुरु व्हायला हवी . आता हे गर्भाशयस्थ मूल हुशार बनलं पाहिजे... आपल्यापेक्षा हुशार बनलं पाहिजे . . . सामान्य परिस्थितीत ते जेवढं हुशार बनू शकतं त्यापेक्षा अधिक हुशार बनलं पाहिजे . त्याचं ' मन ' देखिल आत्ता , गर्भाशयात असतांना तयार होत असतं का ? तसं असेल तर ते मनाने सुद्धा निर्भिड , समंजस , स्थिरचित्त , एकाग्रचित्त बनलं पाहिजे . त्यासाठी आपण आता काय करायचं ? काय करु शकतो ? शारिरीक दृष्टया ते मूल अव्यंग , आरोग्यसंपन्न , दणकट आणि परिणामी दिर्घायुषी बनावं यासाठी आपणं काही करू शकतो का ? करु शकत असलो तर कधी करायचं ? कसं करायचं ? आपल्या मुलाची बौद्धिक , मानसिक , शारिरीक जडणघडणं श्रेष्ठ दर्जाची व्हावी , निकोप , अव्यंग , निरामय , प्रगत आणि विकसित असं मूल व्हावं अशासाठी ' आत्ता ' ,…मूल पोटात असतानाच काही केलं जाऊ शकतं का ?  माता - पित्यांची Priority(प्राधान्य ) बदलली की , हे आणि असे प्रश्न आपोआप येऊ लागतात आणि याचं सकारात्मक व होकारात्मक उत्तर आपल्याकडे आयुर्वेदशास्राने हजारो वर्षापुर्वीच देऊन ठेवलयं . आताच आधुनिक मानवाला आधुनिक विज्ञानाच्या मदतीने त्याची खात्री पटू लागलीय . आणि ते उत्तर आहे , "गर्भसंस्कार"

गर्भसंस्कार" !मग त्याच्या अंतर्गत गर्भाधान । पुंसवन / गर्भस्थापन / गभिणीपरिचर्या योग्य आहार योग्य औषधोपचार हे आयुर्वेद चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले जाते...

योग / प्राणयाम हे योगा टीचर च्या मार्गदर्शनाखाली घेतले जाते.

/मेडिटेशन/अफर्मेशन/ऑटो सजेशन/मंत्र उच्चार/प्रार्थना/त्राटक/ ब्रेन जिम एक्सरसाइज/आयबॉल एक्ससाइज इतर अनेक  टेक्निक गर्भसंस्कार कोर्समध्ये करून घेतल्या जातात . . . 

आपण जर ह्या अवस्थेत असाल तर आपल्या बाळाच्या भविष्यासाठी हे सर्व करणे अतिशय इम्पॉर्टंट आहे... आणि आपल्याला जर खरोखर आपला बाळ सर्वगुणसंपन्न व्हावा, त्याने आपले नाव रोशन करावे असे वाटत असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून "२१ व्या शतकातील गर्भ संस्कार" हा ग्रुप जॉईन करा.

धन्यवाद...!🙏

२१ व्या शतकातील "गर्भ संस्कार"


अधिक माहितीसाठी संपर्क.https://wa.link/92aazl


५ टिप्पण्या:

  1. खुपच महत्वाची माहीती प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांचे भवितव्याची का‌लजी घेणे ही कालाची गरज आहे
    गर्भसंस्कार हा त्यासाठी उत्तम उपाय कहे
    धनवाद!

    उत्तर द्याहटवा

१६ "संस्कार"

संस्कारांवर आधारित  भारतीयसंस्कृती भारत देश हा खेड्यापाड्यांचा देश, सामाजिक, राजकीय, वैज्ञानिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा अनेक विषयांमध्ये पु...