तुम्हाला? हे माहिती आहे का? की गर्भाशयातील बाळाचे आयुष्य कसे असते आणि आपण ते कसे शोधू शकू ? गर्भातील बाळाचा विकास होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे प्रत्येक आई-वडिलांना उत्सुकता असते की माझे बाळ गर्भामध्ये कसे असेल, काय करीत असेल, झोपले असेल की जागे असेल, की ऐकत असेल तुम्हाला या सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे तर शेवटपर्यंत वाचा...
नमस्कार🙏 मी अलका शिंदे गर्भसंस्कार मार्गदर्शक अँड सेल्फ कोच..!
२१ शतकातील गर्भसंस्कार या प्लॅटफॉर्मची संस्थापिका मला येत्या पाच वर्षात एक लाख गर्भवतींच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल करून त्यांच्या गर्भातील बाळांवर सुसंस्कार करायचे आहे त्यांना सुदृढ सर्वगुणसंपन्न आणि सक्षम असे देशाचे नागरिक मला घडवायचे आहे आणि हा माझा ध्यास आहे...!
चला तर मग जाणून घेऊया
१- ९ महिने गर्भातील बाळाचा विकास:
१ला महिना:
स्त्रीची मासिक पाळी चुकल्यावर तिच्या लक्षात येतं की ती गर्भवती आहे.बाळ एका पाण्याने भरलेल्या पिशवीमध्ये असते. सुरुवातीला ते पाण्याच्या बुडबुड्या सारखे असते. पहिला महिना संपून दुसरा महिना लागला की बाळ गव्हाच्या दाण्याप्रमाणे दिसू लागते. १४ व्या दिवसापासून बाळाच्या मेंदूतीच्या पेसी प्रत्येक मिनिटाला २.५लाख इतक्या झपाट्याने विकसित होतात. तिसऱ्या आठवड्यामध्ये हाडे, स्नायू व आतील भाग तयार होऊ लागतो.२२व्या दिवसापासून स्नायुमय पेशींनी बनलेल्या हृदयाची धडधड सुरू होते. पहिल्या महिन्यांमध्ये माता गर्भवती आहे की नाही हे तिला नीट समजले नसले तरी जेव्हा ती बाळ प्लानचा विचार करते तेव्हापासूनच खरी गर्भसंस्कारला सुरुवात होते.तेव्हापासूनच चांगला विचार करा, चांगली पुस्तके वाचा, सकारात्मक वातावरणात राहायला सुरुवात करा.
बाळाची लांबी 0.6 सें मी.असते. या वेळा मध्ये बाळाचे वजन व लांबी जास्त प्रमाणात वाढते.
२ रा महिना
या महिन्यात बाळाचे छोटे छोटे हात पाय बनायला सुरुवात होते. व बाकीच्या अवयवांचा ही विकास व्हायला सुरुवात होते.श्रवण (ऐकणे)ची शक्ती विकसित व्हायला सुरुवात होते. व दृष्टी इंद्रिये त्यांचा विकास होऊ लागतो परंतु डोळे बंद असतात. चेहऱ्यावरील सर्व अवयव बनायला सुरुवात होते. मेंदूसोबत पेशीचा संबंध व्हायला सुरुवात होते. नाळ बनते. हात पाय बनतात व त्यावर नखे यायला सुरुवात होते. आमाशय, यकृत, गुदद्वार या अवयवांचा विकास व्हायला लागतो. या महिन्यात बाळाची लांबी ३ आणि वजन २८ ग्राम इतकी होते.
या महिन्यात गर्भवती मातेने पुढे झुकने, जास्त वेळ उभं राहून काम करणे, पाय लटकते ठेवणे अशा गोष्टी टाळाव्यात.
ह्या महिन्यात मळमळ, उलटी, डेकर, छातीत जळजळ होणे, तोंडाला चव नसणे, मानसिक ताण तणाव, चिडचिड ,राग, आळस इत्यादी लक्षणे दिसून येतात.
या काळात पती व घरातील सर्व मंडळींनी गर्भवती मातेला सहकार्य करावे.
या महिन्यात गर्भवती मातेने प्रवास करू नये, जड सामान उचलू नये, व जादा कसरतीची काम करू नये.
खजूर, अंजीर, किसमिस, द्राक्षे, सुकामेवा, दूध व दुग्धजन्य पदार्थांचा आहारामध्ये समावेश करावा.
प्रार्थना व गर्भ संवाद यासारखी ऍक्टिव्हिटी करावी.
हलके व आरामदायी कपडे वापरावे.
३ रा महिना
या महिन्यात ज्ञानेंद्रियांचा विकास होऊ लागतो. महिन्यात बाळाचा आकार अतिशय छोटा असल्यामुळे मातेला त्याची हालचाल जाणवत नाही. हळूहळू सर्व अवयव विकसित होतात. या महिन्यांमध्ये बाळ आपले डोके उचलण्याचा प्रयत्न करते. व संवेदन तंत्र काम करू लागतात. व माता जे ऐकते, बोलते, पाहते, त्याचा बाळ अनुभव घेते.या महिन्यात गर्भातील बाळ मुलगा आहे की मुलगी हे समजते. तसेच या महिन्यांमध्ये आईने घेतलेल्या आहाराचा स्वाद व सुगंध घेण्यामध्ये बाळ शक्तिमान बनते. तसेच या वेळी बाळाचे स्वाद केंद्र विकसित होतात.त्यामुळे या महिन्यांमध्ये आईने आहारावर विशेष लक्ष द्यावे. जास्त तिखट मसालेदार चटपटीत आहार घेऊ नये. त्याऐवजी पौष्टिक व सात्विक आहार घ्यावा. या महिन्यांमध्ये कर्णेद्रियांचा विकास होतो. त्यामुळे मधुर संगीत, प्रार्थना ,भजन, सत्संग ऐकून मातेने स्वस्त होऊन सकारात्मक व आनंदी वातावरणात रहावे. या महिन्यापासूनच मेंदू ची संपूर्ण रचना सुरू होते, त्यामुळे मातेने आपल्या विचारांवर जाणीवपूर्वक लक्ष ठेवावे.जसे सकारात्मक विचार करावा राग चिंता सोडून देऊन तनाव मुक्त रहावे.
४था महिना
या महिन्यात.बाळाच्या वजन व लांबीच्या वाढीमध्ये गती येते डोक्याचा आकार वाढतो,भुवया व पापण्यांवरती केस येऊ लागतात. चेहरा स्पष्ट बनतो.बाळाची त्वचा चांगली बनते. त्वचेमध्ये स्वेद ग्रंथी तयार होऊ लागते. श्रवण यंत्र पूर्णपणे कार्यरत होते. अशा वेळी ऐकलेले आवाज बाळाच्या अंतर्मनात कायमस्वरूपी राहतात.आई जे अन्नग्रहण करते त्याचा स्वाद बाळाला समजतो. त्यामुळे बाळाला पसंत नसलेले अन्नपदार्थ पदार्थ पुढे जन्मानंतर बाळामध्ये नकारात्मक स्वरूपात ते कायमस्वरूपी राहतात. या महिन्यात दही भात लोणी व हिरव्या पालेभाज्यांचा आहारामध्ये समावेश असावा. तसेच मोसंबी संत्री द्राक्षे व सीजन नुसार फळे खावीत.बाळाच्या डोळ्यांचे तेज वाढते.बाळाच्या किडनी चे काम सुरू होते. बाळाचा आकार वाढतो ३ महिन्या पेक्षा थोडी हालचाल जास्त सुरू होते.
५ वा महिना
या महिन्यात बाळाचे स्पशेंद्रीये चांगल्याप्रकारे कार्यरत होतात. आईने पोटाला केलेल्या स्पर्शाच्या संवेदना बाळाला जाणवतात. त्यामुळे बाळ त्यानुसार प्रतिसाद देते व बाळाच्या ही हालचाली आईला चांगल्या प्रकारे समजतात. या महिन्यात बाळाचे एकृत तयार होते व आत मध्ये मल बनायला सुरुवात होते.बाळ कधी कधी शांत तर कधी चंचल असते. बाळाच्या त्वचेमधून सफेद मऊ ओलसर श्राव सुरू होतो तो बाळाच्या त्वचेचे रक्षण करतो. त्याच्या त्वचेवर सुरकुत्या पडतात व त्वचा लाल होते या महिन्यात बाळाची लांबी ३०से.मी.व वजन २००ते४५० ग्राम होते.
आपल्या पोटावर हात ठेवून बाळासोबत संवाद साधा. कारण या महिन्यात बाळ आईच्या भावना समजते व भावनांना प्रतिसाद देते. त्यामुळे आईचे प्रेमळ, इर्षा रहित, आनंदी, कोमल वह मधुर व्यक्तिमत्व असावे.
६ वा महिना
या महीन्यात बालाच्या बुद्धिचा विकास होतो.बाळाच्या डोळ्यांचा पूर्णपणे विकास झालेला असतो. पापण्या उघडू शकतात व बंद होऊ शकतात. बाळ रडू शकते. व लाथ मारू शकते. बाळाच्या हालचाली चा वेग वाढतो. उचकी येऊ शकते. त्वचा सुरकुती युक्त व लाल असते. या महीन्यात बाळ अधिक शक्तिशाली बनते. माते च्या पोटाचा आकार वाढू लागतो. त्यामुळे त्वचा ताणली जाऊन त्वचेवर स्टेचमार्क पडतात व खाज येते काळे डाग पडू लागतात. यावर खास उपाय नाही पण या काळामध्ये ओलसरपणा टिकून राहण्यासाठी एखाद्या मॉइश्चरायझर चा वापर करावा.
या महिन्यात बाळाच्या भौतिक विकासासाठी गणिती खेळ, कोडी सोडविणे, ड्रॉइंग करणे, क्राफ्ट, तसेच विविध कलेमध्ये मातेने मन एकाग्र करावे.
तसेच आहारामध्ये दूध दुग्धजन्य पदार्थ केळे संत्री मोसंब द्राक्षे चिकू इत्यादी सीजन नुसार फळे घ्यावीत.
७ वा महिना
या महिन्यात बाळाचा संपूर्ण विकास होतो. याकाळात गर्भातील बाळ ऐकणे, पाहणे ,स्पर्शज्ञान, स्वाद घेणे या सर्व इंद्रियांचा उपयोग करू लागते. या व्यतिरिक्त त्याचे मज्जा तंत्र विकसित होते. त्याद्वारे गर्भातच बाळ श्वसन कार्य व तापमा मनावर नियंत्रण ठेवू शकते. गर्भवतीच्या पोटावर कान लावल्यास बाळाची धडधड ऐकू येते व हालचाल जाणवते. बाळाची उंची ३२-४२ व वजन ११००-१३५० इतके बाळ अंगठा चोखू लागते.
या महिन्यात बाळाचे वजन चांगले वाढावे बाळ शक्तिशाली बनावे यासाठी मातेने दूध तूप व सुका मेवा यांचा आहारात समावेश करावा. कलाकुसरी मध्ये मन एकाग्र करावे, सकारात्मक रहावे, महान पुरुष यांचे आत्मचरित्र वाचावे, व बाळामध्ये उत्तम आणि महान गुणांचे सिंचन करण्यासाठी ईश्वराला प्रार्थना करावी
८ वा महिना
या महिन्यात बाळाच्या मास पेशी मजबूत बनू लागतात. व आंतरिक शक्ती वाढते. बाळाचे मजा तंत्र संपूर्ण तयार होते. बाळाच्या फुफ्फुसांची झपाट्याने वाढ होते.बाळाचे डोळे उघडलेले असतात व पापण्या उघडझाप करतात त्यामुळे झोपण्याच्या उठण्याच्या सवयी सोबत बाळ सक्रिय राहते. या महिन्यात बाळाचे वजन२००० ग्राम पर्यंत वाढते व लांबी२३०० सेंटीमीटर पर्यंत होते. या महिन्यांमध्ये बाळाच्या हालचाली चा वेग वाढतो.
या महिन्यात प्रसूती होऊ नये यासाठी मातेने विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी प्रवास करू नका, जास्त वेळ उभे राहून काम करू नका, पाय लटकते राहतील असे जास्त वेळ बैठे काम करू नका. आराम करा.
या महिन्यात बाळाचे वजन जास्त वाढल्यामुळे पाठीचा मागचा भाग व कमरेमध्ये वेदना होऊ शकतात त्यासाठी औषधांचा वापर टाळा व डॉक्टरचा सल्ला घ्या.
गाईच्या दुधाची खीर व तूप खाल्ल्याने बाळाचे शरीर चांगले बनते व प्रसूतीनंतर स्तनपान करणे सोपे जाते.
पचायला जड व अतिथंड पदार्थ खाणे टाळा. पोट साफ न होणे, पोटात गॅस होणे अशा समस्या होऊ नये म्हणून आहाराची विशेष काळजी घ्या.
बटाटा वांगे काकडी गवार कडधान्य असे वात युक्त पदार्थ खाणे टाळा.
नैसर्गिक व सोप्या पद्धतीने प्रसूती होण्यासाठी ईश्वराला प्रार्थना करा.
९ वा महिना
या महिन्यात गर्भाची संपूर्ण वाढ झालेली असते.व ते बाहेरच्या दुनियेत येण्याच्या तयारीला लागते. त्यामुळे बाळाचे डोके खाली सरकू लागते.या महिन्यात डोके खाली व पाय वरती अशा स्थितीमध्ये बाळ असते. या महिन्यात बाळ शांत राहते. बाळाचे वजन ३२००-३४०० ग्रॅम व लांबी ५०से मी. होते.
हा झाला बाळाचा एक ते नऊ महिन्या पर्यंत चा शारीरिक विकास व प्रवास...
प्रसूतीसोपी होण्यासाठी काही वेळेला काही ठिकाणी ,
९ व्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नंतर चहा किंवा दुधात एरंडी तेल उकळून मातेला प्यायला दिले जाते.
या महिन्यात बाहेरचे अन्न पूर्णपणे टाळा.
त्याऐवजी हलका आहार घ्या की जेणेकरून पोटामध्ये वात वाढणार नाही.
कुठल्याही प्रकारची तकलीफ व्हायला लागली तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.
हॉस्पिटल मध्ये जाण्याआधी प्रसुतीसाठी लागणाऱ्या सामानाची तयारी करा.
सोबत एखादी अनुभवी महिला असणे आवश्यक आहे. आपले उत्तम व महान बालक आपल्या मांडीवर आनंदाने खेळावे यासाठी भीती व चिंतामुक्त रहा.
ईश्वराची प्रार्थना करा..!
धन्यवाद!!
मानसिक विकासक
मानसिक आरोग्याच्या दृष्टीने आता गर्भसंस्कार आणि सुलभ कष्टरहीत प्राकृत प्रसूती (normal delivery) यांचे महत्त्व जगात वाढत आहे. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपल्या भारतीयांपेक्षा पाश्चात्य लोकं याबाबतीत लवकर आणि अधिक जागरूक होत असल्याचे चित्र आजतरी दिसून येते आहे
डॉ.थॉमस वेर्नी हे सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ आहेत. १९७२ पासून ते न्यूरोसिसच्या ( मज्जासंस्थेचा/ मानसिक विकार) रुग्णांवर उपचार करताना, त्या आजाराचे मूळ शोधून त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि न्यूरोसिससारख्या अनेक मानसिक आजारांचे मूळ गर्भाशयातील जन्मापूर्वीच्या आयुष्यात व जन्मकाळच्या स्मृतींमध्ये दडलेले असते या निष्कर्षाप्रत ते पोचले आहेत. त्यांच्या एका लेखात ते म्हणतात, "मी हे शिकलो आहे की गर्भाशयातील जीवन काही काव्यमय कल्पनांप्रमाणे फार रमणीय वगैरे असते असे मुळीच नाही".यापैकी बहुतेक रुग्णांचे अहवाल म्हणजे, गर्भिणीमातेच्या स्नेहयुक्त आणि तिरस्कारयुक्त भावनांना, उत्तरोत्तर अधिकाधिक संवेदनशील होत जाणाऱ्या जीवाचे, मनोव्यापार वर्णन करणारी शब्दचित्रे असतात."
भावनिक विकास नकारात्मकतेचा परिणाम
गर्भावस्था असताना, प्रेग्नंसीबद्दलच्या नकारात्मक भावनांनी ज्यांचे मन कलुषित झालले असते , अशा स्रीयांच्या मुलांचे उपचार करताना त्या मुलांना पडत असणाऱ्या स्वप्नांमध्ये डॉ.थॉमस वेर्नी यांना विलक्षण साधर्म्य आढळले. त्यांच्या पैकी कित्येकांना "आपण एका खोल गुहेत अडकून पडलो आहोत" किंवा "भीतीदायक पशूंचे आकार आपला पाठलाग करत आहेत" अशा प्रकारची व आशयाची स्वप्ने पडत होती.
काही मुलांनी, मातेची निराश मनोवृत्ती ,भीती, चिंतेची भावना यांच्या परिणामांना गर्भावस्थेत असताना तोंड दिले होते. ही मुले चिंताग्रस्तता, नैराश्य किंवा औदासिन्य या मनोविकारांसकटच जन्माला आली.
भावनिक विकास-सकारात्मकतेचा परिणाम
ज्या मुलांना गर्भावस्थेतला अनुभव सकारात्मक, व पोषक ( मुख्यतः वैचारिक व भावनिक दृष्टीने) मिळालेला असतो, ती मुले जन्माला येतानाच्या धक्क्यांना सामोरे जाण्यास आणि सुदृढ मानसिकतेसह जीवन सुरू करण्यास, नकारात्मक गर्भावस्था सोसणाऱ्या मुलांपेक्षा अधिक सक्षम असतात.
डॉ. थॉमस वेर्नी यांचे एक विधान बरेच काही स्पष्ट करणारे आहे. ते म्हणतात, "आपण एक मूल म्हणून कसे असावे आणि पर्यायाने प्रौढ व्यक्ती म्हणून कसे आहोत, हे ,बऱ्याच अंशी, ९ महिन्यांचा गर्भाशयातील जन्मपूर्व कालावधी, जन्म , (प्रसूतीची प्रक्रिया), आणि त्यानंतरचा एक तासाचा कालावधी या गोष्टींवरून निर्धारित होते."
सगळीकडे covid-19 मुळे वातावरण अतिशय निगेटीव्ह झाले आहे सर्व जण घरीच आहेत सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे टीव्ही वरती बातम्या वर्तमानपत्रांमध्ये त्याच बातम्या घरातही ती चर्चा चालू आहे परिणामी गर्भवतीसाठी हे वातावरण अतिशय प्रतिकूल असल्यामुळे तिची चिडचिड होत आहे सो माय डिअर फ्रेंड्स आपण आता नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे म्हणजेच आपला प्रेग्नेंसी काळ आणि हा काळ सकारात्मक व आनंदी असावा हे खूप महत्त्वाचे आहे. म्हणून आपण उत्साही व आनंदी, एनर्जेटिक राहण्यासाठी"२१ व्या शतकातील गर्भ संस्कार या ग्रुपमध्ये आपले स्वागत आहे. त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
तुम्ही जर आपल्या स्वप्नातील सर्वगुणसंपन्न बाळासाठी गर्भसंस्कार हा कोर्स करून घेण्यास उत्सुक असाल तर
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून
माझ्याशी संपर्क साधा...
https://wa.link/92aazl
माझा ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्याबद्दल मनःपूर्वक आभार हा ब्लॉग तुम्हांला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा
धन्यवाद 🙏🙂
खूप छान मार्गदर्शन अलका ताई
उत्तर द्याहटवाThanku uc beta 🤩
उत्तर द्याहटवामहिलांच्या दृष्टीने खूप चांगला लेख आहे अर्थपूर्ण माहिती आहे
उत्तर द्याहटवाThanku kunjur Dada🙏🙂
उत्तर द्याहटवाखूप सुंदर मार्गदर्शन अलका ताई 👌👌
उत्तर द्याहटवाअगदी सविस्तर माहिती दिली आहे तुम्ही
Chan mahiti
उत्तर द्याहटवाThank you very much
उत्तर द्याहटवाKirati & manjushatai..! ❤️
Mast Madam...
उत्तर द्याहटवाKhup chan mam
उत्तर द्याहटवा