तुम्हाला? हे माहिती आहे का..! की जरी शरीरात इतर अनेक असे अवयव आहेत ज्याशिवाय आपण जगू शकत नाही, परंतु प्लॅसेंटा हा एकमेव अवयव असा आहे जो कार्य पूर्ण झाल्यावर नैसर्गिकरित्या काढून टाकला जातो.
परंतु गर्भधारणेमध्ये प्लेसेंटा (वार) हा अवयव किती महत्त्वाचा आहे आणि त्याचे कार्य काय आहे याबद्दल जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा.
नमस्कार..🙏 मी अलका शिंदे गर्भसंस्कार मार्गदर्शक अँड सेल्फ कोच...
"२१ व्या शतकातील गर्भसंस्कार" या प्लॅटफॉर्मची संस्थापिका पाच वर्षात एक लाख गर्भवती मातांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून त्यांच्या गर्भातील बाळांवर सुसंस्कार करायचे आहे त्यांना सुदृढ सर्वगुणसंपन्न आणि सक्षम असे देशाचे नागरिक मला घडवायचे आहे आणि हा माझा ध्यास आहे..
प्रत्येक गर्भधारणेत त्या बाळाला उत्तम प्रकारे आधार देण्यासाठी नवीन प्लेसेंटा तयार होते.
गर्भावस्थेमध्ये प्लेसेंटा किंवा वार हा अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे बाराव्या आठवड्यापासून गर्भाच्या पोषणाची संपूर्ण जबाबदारी या प्लेसेंटा वर येते. प्लेसेंटा विषयी थोडक्यात माहिती पाहू.
प्लेसेंटा हा गर्भधारणेदरम्यान बनलेला एक तात्पुरता अंतःस्रावी अवयव आहे, जो निरोगी गर्भधारणेची देखभाल करतो व प्रसूतीच्या आणि स्तनपान करण्याच्या तयारीत महत्त्वपूर्ण हार्मोन्स तयार करतो.
गर्भशयातले गर्भाचे वातावरण या प्लेसेंटावर बऱ्याच अंशी अवलंबून असते.
त्यामुळे गर्भ धारणा ही चुकून झालेली किंवा नकळत झालेली असू नये तर ती नियोजन बद्ध गर्भ धारणा असावी असे गर्भसंस्कार विषयी बोलताना नेहमी सांगितले जाते. याचाच अर्थ गर्भसंस्काराची सुरुवात गर्भधारणा झाल्यानंतर न होता ती गर्भधारणा होऊ द्यायचं ठरवल्यापासूनच होते किंवा झाली पाहिजे.
प्लेसेंटामधील रक्तवाहिन्या गर्भाकडे ऑक्सिजन आणि पोषक घटक आणतात आणि गर्भाच्या शरीरातील टाकाऊ पदार्थ काढून टाकतात. हे वहन नाळेमध्ये असणाऱ्या रक्तवाहिन्यांमधून होते. गर्भासाठी आईचे ऑक्सिजनयुक्त रक्त प्लेसेंटामध्ये आणले जाते. त्यातील ऑक्सिजन व इतर पोषक द्रव्ये, हॉर्मोन्स इत्यादी प्लॅसेंटाद्वारा गाळून गर्भाच्या रक्तात पाठवली जातात. तर गर्भाकडून डीऑक्सीजेनेटेड (ज्यामधला ऑक्सिजन वापरला गेला आहे असे, ) गर्भाचे रक्त, नाळेमधल्या दुसऱ्या रक्त वाहिनीतून परत प्लेसेंटाकडे पाठवले जाते. त्यामधला कार्बन डाय ऑक्साईड आणि इतर टाकाऊ द्रव्ये गर्भापासून ते आईकडे परत जातात, यामुळे गर्भधारणेच्या संपूर्ण कालावधीत गर्भाची वाढ आणि विकास होऊ शकतो.
महत्त्वाचे म्हणजे आई व गर्भाचे रक्त एकमेकात कधीच मिसळत नाहीत. त्यामुळेच आईचा व बाळाचा रक्तगट (ब्लडगृप) वेगवेगळा असला तरी सामान्य परिस्थितीत दोघांचेही काही बिघडत नाही. (आकृती पहा)
अँन्टीबॉडीज (रोगप्रतिकारक द्रव्ये) देखील आईकडून गर्भाकडे जाऊ शकतात, ज्यामुळे काही रोगांपासून संरक्षण मिळते. हा फायदा जन्मानंतर कित्येक महिने टिकू शकतो..
प्लेसेंटामध्ये रक्तवाहिन्यांचे एक जटिल नेटवर्क असते जे आई आणि विकसनशील गर्भाच्या दरम्यान पोषक द्रव्ये आणि वायूंची ये जा करण्यास सहाय्य करते.
प्लेसेंटाचे कार्य
बाळाला ऑक्सिजन पुरवण्यासाठी बाळाच्या फुफ्फुसांसारखे कार्य , दूषित घटक काढून टाकण्यासाठी मूत्रपिंडाचे (किडनी), पोषण करणे हे पचनसंस्थेचे कार्य, आणि अँटीबॉडी पुरवून रोगप्रतिकारक यंत्रणा म्हणून कार्य, हॉर्मोन्स निर्माण करणे हे अंतःस्रावी ग्रंथींचे कार्य.. व इतरही अनेक कार्ये.गर्भधारणेदरम्यान अनेक महत्त्वपूर्ण हार्मोन्स तयार करतो. हे हार्मोन्स, प्लेसेंटा आणि गर्भाची वाढ व विकास नियंत्रित करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करतात. गरोदरपण टिकून रहाण्यासाठी हे हॉर्मोन्स अतिशय आवश्यक असतात आणि बाळाच्या जन्माची तयारी करण्यासाठी आईवर कार्य करतात.
गर्भाच्या पेशी प्लॅसेंटामधून आईच्या शरीरात पाठवल्या जातात असे नवीन संशोधनात आढळले आहे. आईच्या त्वचा, किडनी, यकृत, अस्थिमज्जा इ. ठिकाणी या बाळाच्या पेशी सापडतात.
जखमी किंवा रोगग्रस्त अवयवामध्ये जाऊन या पेशी तो अवयव दुरूस्त करून व्याधी निवारण्यास मदत करतात
गर्भधारणा होण्याआधी किंवा गर्भधारणा झाल्यानंतर देखील या सर्व माहितीची मातेला गरज आहे तुम्हाला जर याव्यतिरिक्त आणखी माहिती मिळवायचे असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा...
तुमच्या प्रेग्नन्सी काळामध्ये सकारात्मक व आनंदी राहण्यासाठी २१ व्या शतकातील गर्भसंस्कार हा ग्रुप खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून नक्की जॉईन करा
https://www.facebook.com/groups/562863397763173/?ref=share
अधिक माहितीसाठी संपर्क
माझा ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्याबद्दल मनःपूर्वक आभार हा ब्लॉग तुम्हांला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा
धन्यवाद...!




Great अत्यंत महत्वपूर्ण
उत्तर द्याहटवाGreat अत्यंत महत्वपूर्ण
उत्तर द्याहटवा