शनिवार, १५ मे, २०२१

माता पिता आणि बाळ यांच्यामधील परस्पर संवाद आणि मानसिक देवाण-घेवाण

तुम्हालाा? माहिती आहे का...? की बाळाचा व्यक्तिमत्वविकास जन्माआधीच सुरू होतो. ही आता सर्व जगाने मान्य  केलेली वस्तुस्थिती आहेे. याबद्दलचेे काही सिक्रेट्स आहेत.ते जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे. त्यासाााठी ब्लॉक शेवटपर्यंत वाचा. 

नमस्कार मी अलका शिंदे गर्भसंस्कार मार्गदर्शक अँड सेल्फ कोच..
 २१ व्या शतकातील गर्भसंस्कार या प्लॅटफॉर्मची संस्थापिका मला येत्या पाच वर्षात एक लाख गर्भवतींच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून त्यांच्या गर्भातील बाळांवर सुसंस्कार करायचे आहे त्यांना सुदृढ सर्वगुणसंपन्न आणि सक्षम असे देशाचे नागरिक मला घडवायचा आहे आणि हा माझा ध्यास आहे.

संशोधन दर्शविते की गर्भवती माता, गर्भाचा पिता, आणि गर्भ, यांच्या मध्ये होणाऱ्या परस्परसंवादामुळे आणि विचार व भावनांच्या देवाणघेवाणीमुळे, गर्भधारणेदरम्यान गर्भाच्या शरीरावर व मनावर, चांगले किंवा वाईट परिणाम होतात. बाळाच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण जन्माला येण्यापूर्वीच होऊ लागते. मग ती सकारात्मक होईल किंवा नकारात्मक.

बाळाचा व्यक्तिमत्त्व विकास जन्माआधीच सुरु होतो ही आता सर्व जगाने मान्य केलेली वस्तुस्थिती आहे..याप्रकारच्या संशोधनामुळे गर्भसंस्कार करणे अत्यंत गरजेचे आहे याबद्दल शंकेला जागाच राहिलेली नाही.आणि साऱ्या जगभर आता 'गर्भसंस्कार' नावाने किंवा 'प्रीनेटल पॅरेंटिंग' या नावाने गर्भाशयातील गर्भाच्या व्यक्तिमत्व विकासाचे वर्ग सुरू झाले आहेत.

तान तणावाचा परिणाम


डॉ. सॉन्टाग,यांना असे आढळले की आईच्या भावनिक तणावामुळे गर्भाच्या हालचालींमध्ये लक्षणीय वाढ होते; जर हा तणाव बराच काळ कायम राहिला तर गर्भाचे वजन कमी झालेले दिसून येते. त्यांनी पुढे असेही निदर्शनास आणून दिले की तीव्र भावनिक ताणतणाव असणाऱ्या मातांमध्ये जन्मलेली मुले अतिक्रियाशील (हायपर ऍक्टीव्ह) चंचल, चिडचिडी, स्क्वर्व्हिंग (सतत चुळबूळ करणारी, अस्वस्थ), रडणारी (किरकिरी) असतात. 

काही संशोधकांना असा विश्वास आहे की मुलांना लहानपणी लवकर होणाऱ्या ऑटिझमच्या सिंड्रोमचे (आत्ममग्नता) ( syndrome of early infantile autism)  मूळ गरोदरपणाच्या काळातल्या तिच्या आईला असणाऱ्या तीव्र चिंतेत होते. (ऑटिझम व लहान मुलांमध्ये होणाऱ्या त्यासारख्या इतर काही आजारांची माहिती पुढे येणार आहे)

डॉ.फेरेरा लिहितात: "... हे उघड झाले आहे की आईच्या, नकारात्मक भावना, कधीकधी, गर्भाच्या नाशासाठी  कारणीभूत होतात.(वंध्यत्व, गर्भपात, मृतजन्म, नवजात मृत्यू इत्यादीं प्रकारांनी ). पण प्रत्येक वेळी अशा भावना गर्भाच्या नाशास कारणीभूत ठरतातच असे नाही. तरीपण त्याच्या सामान्य विकासात काही ना काही व्यत्यय मात्र नक्कीच आणतात आणि जन्मजात विकृती किंवा अधिक सूक्ष्म किंवा कमी स्पष्ट स्वरुपाच्या, सहजपणे लक्षात न येणाऱ्या इतर विकृतींना जबाबदार ठरतात."

मानसिकतेचा परिणाम

गर्भधारणा आणि प्रसूती दरम्यान दोन हजार स्रियांचा अभ्यास  करून डॉ, ल्युकेश हे अशा निष्कर्षाप्रत पोचले की 'मातेचा गर्भाविषयी असणारा दृष्टिकोन' हा अन्य कोणत्याही कारणाच्या निरपेक्ष गर्भावर विलक्षण परिणाम करणारा सर्वात जास्त प्रभावी घटक आहे.

या संशोधनादरम्यान, अभ्यासासाठी निवडलेल्या सर्व गर्भिणी या एकाच आर्थिक स्तरातील होत्या, बुद्धिमत्ता आणि शिक्षणाच्या बाबतीत देखील समकक्ष होत्या. आणि सर्वांची गर्भावस्थेतील घेतली गेलेली काळजी समान दर्जाची आणि गुणवत्तेची होती. भिन्न असणारा एकमेव महत्त्वाचा घटक होता तो म्हणजे, जन्मणाऱ्या मुलाबद्दलचा त्यांचा दृष्टीकोन; आणि त्याचा त्यांच्या मुलांवर गंभीर परिणाम झालेला दिसून आला. 

सकारात्मकतेचा परिणाम

 गर्भावस्थेचा आनंदाने स्वीकार करणाऱ्या आणि गर्भाच्या स्वागतासाठी उत्सुक असणाऱ्या स्री- पुरुषांची मुले ही गर्भावस्थेला मनातून अस्वीकार करणाऱ्या किंवा मनाविरुद्ध गर्भधारणा झालेल्या स्रीयांच्या मुलांपेक्षा, प्रेग्नंसीच्या काळात, प्रसूतीदरम्यान आणि जन्मानंतरही भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या स्वस्थ व निरोगी राहिली.

असा उल्लेख डॉक्टर नरेंद्र यांनी त्यांच्या लेखात केला आहे.

वैज्ञानिक दृष्ट्या गर्भामध्ये बाळाच्या मेंदूचा विकास ८०% होतो असं सिद्ध झाला आहे थायलंड येथील डॉक्टरांनी जन्मपूर्व अवस्थेतील बालकावर प्रयोग केले व सदर च्या प्रयोगात पालकांचा गर्भातील बाळाची वेगवेगळ्या ज्ञानेंद्रिया मार्फत संवाद साधण्याचा प्रयत्न केला गेला त्या वेळी त्यांच्या असे लक्षात आले की सदरची मुले ही जन्मानंतर आईवडिलांची अधिक जवळ असतात व ते लवकर बोलतात ती लवकर हसू लागतात त्या डॉक्टरांनी यावर दोन पुस्तके प्रसिद्ध केली आहेत काही शास्त्रज्ञांनी कितीतरी गर्भसंस् कारा नंतरच्या मुलांवर प्रयोग केले असता असे आढळले आहे की मुलांच्या बुद्धिमत्तेची स्मरणशक्ती व इंद्रिय सुसंगती मध्ये लक्षणीय प्रगती आढळली या सर्व गोष्टींचा विचार करून गर्भावर संस्कार करण्यासाठी आपण जरी उत्सुक असाल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून माझ्याशी संपर्क साधा...

आपल्या प्रेग्नन्सी काळामध्ये सकारात्मक व आनंदी राहण्यासाठी.... 

२१ व्या शतकातील गर्भ संस्कार हा फेसबुक ग्रुप जॉईन करा.

"२१ व्या शतकातील गर्भसंस्कार"

अधिक माहितीसाठी संपर्क

माझा ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्याबद्दल मनःपूर्वक आभार हा ब्लॉग तुम्हांला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा धन्यवाद ..!


७ टिप्पण्या:

  1. खूपच सुंदर ब्लॉग लिहिला आहे अलकाताई खरंच गर्भवती मातांसाठी हा ब्लॉग खूप उपयोगी आहे. जबरदस्त. 👌👌👍👍🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  2. खूप छान माहिती अल्का ताई 👌👌
    खूप deep study आहे तुमचा

    उत्तर द्याहटवा
  3. खूप माहितीपूर्ण लेख लिहिला आहे अल्का ताई

    उत्तर द्याहटवा

१६ "संस्कार"

संस्कारांवर आधारित  भारतीयसंस्कृती भारत देश हा खेड्यापाड्यांचा देश, सामाजिक, राजकीय, वैज्ञानिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा अनेक विषयांमध्ये पु...