सोमवार, १७ मे, २०२१

गर्भातच बाळाच्या मेंदूचा विकास



स्वीटी च्या आईने वर्गात आणून सोडले कि ती खूप घाबरायची. तिची बसण्याची जागा एक ठराविक आसायची. डोळे छोटे व एक डोळा नाकाच्या जवळच्या खोबनित तर दुसरा डोळा कानाच्या बाजूने वळलेला रंगाने गोरीपान शरीराने सडपातळ केस विस्कटलेले  मतिमंद असल्यामुळे ती एकलकोंडी झाली होती. मुलांमध्ये मिसळत नसायची गाणे गोष्टी इतर ऍक्टिव्हिटी करायला सांगितल्या की अजिबात रिस्पॉन्स देत नसायची. भैय्या व नेहा या दोघांचीही अशीच परिस्थिती अंगणवाडी क्षेत्रामध्ये काम करत असताना २१ वर्षात मला अशा कितीतरी मुलांचे अनुभव आले आहेत कितीतरी मुलं बघायला मिळाली आहेत.हे कशामुळे होते याचा आपण कधी विचार केला? वारंवार सूचना देऊनही गर्भवती माता आपल्या बाळाबद्दल म्हणावं तशा जागरूक नाहीत गर्भसंस्कार याबद्दल अजूनही फारशी जाणीव नाही मूल जन्माला येण्यापूर्वी त्याची नीट काळजी घेतली जात नाही  बाळाच्या मेंदूवर बाळ गर्भात असतानाच प्रोग्रामिंग होत असते आणि तेही एकदाच होते. 

तुम्हाला? माहिती आहे का..!आई बाळाशी जेव्हा संवाद करते तेव्हा मेंदूच्या पेशी एकमेकांसोबत जुळतात तसेच मेंदूच्या पेशी ऍक्टिव्ह बनतात आणि त्यामुळेच बाळाच्या मेंदूचा ८०%टक्के विकास हा गर्भात असतानाच होतो हे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झाल आहे. ते कसे याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत वाचा..

नमस्कार मी अलका शिंदे गर्भसंस्कार मार्गदर्शक अँड सेल्फ कोच..
२१ व्या शतकातील गर्भसंस्कार या प्लॅटफॉर्मची संस्थापिका मला येत्या पाच वर्षात एक लाख गर्भवतींच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून त्यांच्या गर्भातील बाळांवर सुसंस्कार करायचे आहे त्यांना सुदृढ सर्वगुणसंपन्न आणि सक्षम असे देशाचे नागरिक मला घडवायचे आहे आणि हा माझा ध्यास आहे.

१९६६ मध्ये डॉ. सॅलाम आणि डॉ. अ‍ॅडम्स या शास्रज्ञांनी हे सिद्ध केले की  प्रथम न्यूरॉनचा (मज्जातंतू) पेशीसमूह हा, 'मायलीन' अस्तित्वात येण्यापूर्वी कार्य करण्यास सुरवात करतो.  खरंच, या संशोधनानुसार, गर्भधारणेच्या पाचव्या आठवड्यांपूर्वीच प्रतिक्षिप्त क्रियांची एक आश्चर्यकारक जटिल मालिका दिसू लागते. यावेळी, गर्भाच्या त्वचेला उत्तेजित केले असता डोके, धड आणि हातापायांच्या मंद, नमुनेदार हालचाली होत असल्याचे निदर्शनास येते. गर्भधारणा झाल्यापासून पहिल्या महिन्यानंतर गर्भ एका सेकंदाला मेंदूच्या आठ हजार पेशी तयार करतो. इतक्या जलद गतीने गर्भात मेंदूच्या पेशी विकसित होतात. या पेशींचे काही दिवसातच मेंदूत रूपांतर होते. त्यानंतर जसजसे दिवस पुढे जातील तस तशा अधिक जलद गतीने पेशींचा समूह जुळू लागतो. आणि मेंदूच्या या पेशी काही दिवसातच आपल्या जागेपासून थोड्या वरच्या दिशेने जातात. जर या पेशी आपल्या नवीन जागेवर वरती चढण्यास समर्थ ठरल्या नाही, म्हणजेच त्या कमकुवत राहिल्या तर बाळाला बौद्धिक आजार होण्याची शक्यता असते. असे होऊ नये यासाठी गर्भवतीने गर्भधारणा राहिल्यापासून पुढे एक महिन्यातच गर्भाला पोषक अनुकूल असे वातावरण देणे गरजेचे आहे.

आश्चर्यजनक हालचाली

नवव्या आणि बाराव्या आठवड्यादरम्यान बाळ, लाथ मारणे, पाय फिरविणे यांच्याबरोबर बोटांच्या वलयाकार हालचाली करत  असल्याचे दिसून येते. एवढा छोटा गर्भ, चेहऱ्यावर नापसंती दर्शक हावभाव दाखवतो, तोंड उघडतो, ओठांना मुडपून तोंड मिटून घेतो. पापण्यांना हलका स्पर्श केला तर बाळ आता, पूर्वीसारखे शरीराला हिसके देत नाही, तर पापण्यांच्या फटीतून ते हळूच बघू लागते. असे संशोधकांचे निरीक्षण आहे. ओठांवर टिचकी मारावी तशासारख्या हलक्या स्पर्शाला, ओठांच्या चोखल्याप्रमाणे होणाऱ्या हालचालींनी प्रतिसाद दिला जातो. आठव्या आठवड्यापासून बाळ स्वतःचा अंगठा चोखत असतेच. या सगळ्या हालचाली अतिशय आश्चर्यकारक आहेत. आणि बाळाच्या मानसिक प्रगल्भतेच्या निदर्शक आहेत.

प्राथमिक अवस्थेतील, रिकामी फुफ्फुसे, जन्मानंतर कराव्या लागणाऱ्या श्वासोच्छ्वासाचा, जणू पूर्वाभ्यास करत असल्यासारखी, विस्तारण्यास आणि संकुचित होण्यास सुरुवात करतात. 

गर्भसंस्कारला उत्तम प्रतिसाद

तिसर्‍या महिन्याच्या अखेरीस बाळाची लांबी अंदाजे ७.५ से. मी. असते.. आणि त्याचे वजन १४ ग्रॅम असते.  'तीन महिने' एवढ्या कमी वयाचे गर्भाशयस्थ मुल, वैयक्तिक स्वभाव वैशिष्ट्ये दर्शविण्यास सुरुवात करते. विशेषत: त्याच्या चेहर्‍यावरील हावभाव. ही निरक्षणे खरोखरच आश्चर्यचकित करणारी आहेत.आपण समजतो त्यापेक्षा गर्भाशयातील बाळ कित्येक पटींनी अधिक विकसित असते. शारीरिक, मानसिक, बौद्धिक.. सर्वच दृष्टीने. अर्थातच ते अतिशय संस्कारक्षम आहे. गर्भसंस्कारांना ते उत्तम प्रतिसाद देते. आणि त्यांचा होणारा परिणाम त्याच्या वर आयुष्यभरासाठी प्रभाव टाकतो.

नुकत्याच वर्णन केलेल्या सर्व हालचाली करण्यास आणि प्रतिक्रियां देण्यास सक्षम असलेल्या गर्भामध्ये काही प्रमाणात तरी मानसिक प्रक्रिया होत नसेल, किंवा स्वतःबद्दल आणि निकटच्या वातावरणाबद्दल काहीच जागरूकता नसेल, असे म्हणणे हे माझ्या मते मूर्खपणाचेच ठरेल."( डॉ.थॉमस वेर्नी.) व असा डॉक्टर नरेंद्र लेले यांनी उल्लेख केलेला आहे.

अनुभव हा मेंदूचा शिल्पकार

मेंदू हा त्याला मिळणाऱ्या अनुभवांना पूर्ण आयुष्यभर संवेदनशील असतो.पण संवेदनशीलतेच्या बाबतीत गर्भावस्थेचा काळ व जन्मानंतरचा प्रारंभिक कालावधी अधिक निर्णायक असतो. या काळातच मुख्यतः मेंदूची वाढ, जडणघडण आणि विकास होत असतो. 

गर्भावस्थेमध्ये असताना मिळणाऱ्या सांवेदनिक(सेंसिवल) जैविक (बायोलॉजिकल) हॉर्मोनल रासायनिक(केमिकल) मानसिक इ. अनुभवांमुळे मेंदूची योग्य बांधणी झाली तर जन्मानंतर,त्याला येणाऱ्या अनुभवांना योग्य वळण लावण्यास मेंदू सक्षम होतो.

गर्भस्थ बाळाच्या संपूर्ण जीवनाचे नियोजन स्वभाव स्वास्थ्य सौभाग्य व्यक्तिमत्व आजच निश्चित करा. आपल्या बाळाचे सौभाग्य स्वतःच्या हाताने लिहिण्याचा एक अनुभव सिद्ध व अद्भुत विधी म्हणजे '२१ व्या शतकातील गर्भ संस्कार' या कोर्समध्ये आपले स्वागत आहे. त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून "२१ व्या शतकातील गर्भ संस्कार" हा फेसबुक ग्रुप जॉईन करा.

"२१ व्या शतकातील गर्भ संस्कार"

अधिक माहितीसाठी संपर्क

माझा ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्याबद्दल मनःपूर्वक आभार हा ब्लॉग तुम्हांला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा धन्यवाद ..!

1 टिप्पणी:

१६ "संस्कार"

संस्कारांवर आधारित  भारतीयसंस्कृती भारत देश हा खेड्यापाड्यांचा देश, सामाजिक, राजकीय, वैज्ञानिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा अनेक विषयांमध्ये पु...