शनिवार, २२ मे, २०२१

सोशल मीडियाचा गर्भावस्थेत बाळाच्या मेंदूवर परिणाम होऊ नये म्हणून कशी काळजी कशी घ्याल

आजकाल प्रत्येकाच्या जीवनामध्ये सोशल मीडिया हा अतिशय महत्त्वाचा भाग बनला आहे. परंतु गर्भावस्थेमध्ये आपल्या व आपल्या बाळावर सोशल मीडियाचा काय परिणाम होतो हे आपण जाणून घेणे खूप गरजेचे आहे आणि हा परिणाम सकारात्मक/नकारात्मक यापैकी कोणत्या प्रकारचा आहे व या सोशल मीडियाचा आपण कशा प्रकारे वापर करायला पाहिजे की ते आपल्या येणाऱ्या बाळासाठी उपयोगी असेल तुम्ही प्रेग्नेंट असाल आणि तुमच्याही मनामध्ये हात प्रश्न नेहमी येत असेल तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत वाचा
नमस्कार..! मी अलका शिंदे...
गर्भसंस्कारकार मार्गदर्शक अँड सेल्फ कोच २१ व्या शतकातील गर्भसंस्कार या प्लॅटफॉर्मची संस्थापिका मला येत्या पाच वर्षात एक लाख गर्भवतींच्या जीवणामध्ये सकारात्मक बदल घडवून त्यांच्या गर्भातील बाळांवर सुसंस्कार करायचे आहे त्यांना सुदृढ सर्वगुणसंपन्न आणि सक्षम असे देशाचे नागरिक मला घडवायच्या आहे आणि हा माझा ध्यास आहे.

सोशल मीडिया? टाळायला पाहिजे का..!

सोशल मीडिया हे एक असे माध्यम आहे की त्यामार्फत आपण सर्व जगा सी कनेक्ट राहू शकतो. एका ठिकाणी राहून आपण सर्व जगासी जोडले जातो. जगामध्ये कुठे काय चालले आहे कुठे काय नवीन होत आहे ही सर्व सविस्तर माहिती सोशल मीडिया मार्फत आपल्यापर्यंत पोहोचते. तसेच नवीन नवीन फ्रेंड बनविण्यासाठी आपले फॅमिली मेंबर नातेवाईक यांच्याशी कनेक्ट राहण्यासाठी तसेच नवीन नवीन नॉलेज मिळविण्यासाठी सोशल मीडिया हे माध्यम अत्यंत उपयोगी आहे परंतु त्यामार्फत नकारात्मक गोष्टीही तितक्याच सविस्तरपणे आपल्या पर्यंत पोहचतात हेही तितकेच खरे आहे. सोशल मीडियाचा गैरवापर न करता त्यामधून नेमके काय घ्यावे आणि काय सोडून द्यावे हे आपल्याच हातात असते. यावरून तुमच्या लक्षात आलेच असेल की मला काय म्हणायचे आहे.

सोशल मीडियाचा प्रेग्नन्सी सी संबंध

देशाचे भवितव्य सुसंस्कृत पिढीवर अवलंबून असते. पवित्र संस्कार, सुदृढ शरीर, सर्वगुणसंपन्न बालक हीच खरी देशाची संपत्ती आहे. आणि आशा संपत्तीची भविष्यात देशाला अत्यंत गरज आहे बाळाच्या संस्काराचा पाया हा मातेच्या गर्भामध्ये घातला जातो. त्यासाठी उत्तम व सर्वगुणसंपन्न बाळ हवे असणारे इच्छुक पालक असणे फार गरजेचे आहे. तरच ते पालक आपल्या बालकाचे भवितव्य घडविण्यासाठी सदैव तत्पर राहतील व आपल्या बालकावर संस्कार होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान ग्रहण करून आपला परिवार,देश व समाज कल्याणासाठी एक महान व्यक्तिमत्व निर्माण करतील. त्यासाठी पालकांना ज्ञानार्जनासाठी सोशल मीडिया हे माध्यम अतिशय फायद्याचे व उपयोगी ठरणारे आहे. पण त्याबरोबरच त्याचा प्रतिकूल परिणाम होईल असा गैरवापर केल्यास त्याचे दुष्परिणाम नक्कीच पाहायला मिळेल हेही तितकेच खरे आहे.

सोशल मिडीया चा दुष्परिणाम

फोन,इंटरनेट, टीव्ही लॅपटॉप, या साधनांच्या अतिवापराने व्यक्तीच्या शरीरावर व मनावर कळत नकळत परिणाम होतो. कारण त्यामध्ये काही रेडिएशन्स, लाईट इफेक्ट असतात. गर्भवती मातेने या साधनांचा अति वापर केल्यास त्याचा परिणाम तिच्या ब्रेनवर व विकासावर देखील होतो. अर्थातच तिच्या बाळावरही त्याचा परिणाम होतोच. कारण त्यामुळे झोप होत नाही. मूड खराब होतो. चिडचिड होते राग येतो छोट्या छोट्या गोष्टी मुळे नाराजी येणे म्हणजेच सहन शक्ती कमी होते.  फोन स्क्रीन मधून ब्ल्यू लाईट निघते ती आपल्या डोळ्यात मार्फत मेंदूवर परिणाम करते त्यासाठी मोबाईलचा वापर झोपण्यापूर्वी एक ते दोन तास बंद ठेवावा. व ब्राईटनेस कमी असावा. तसेच सकाळी उठल्याबरोबर एक तास मोबाईल हातात घेऊ नये. कारण सकाळच्या वेळेत आपला ब्रेन सतर्क असतो बॉडी रिलॅक्स होते आणि अशा वेळेला आपण लाईटच्या संपर्कात आल्यास बॉडीला चांगले सिग्नल मिळत नाही.

गर्भवती मातेने या काळामध्ये चांगल्या गोष्टी पाहिल्या पाहिजे निसर्गासोबत जोडले गेले पाहिजे. मोकळ्या हवेत फिरले पाहिजे. व्यायाम प्राणायाम या क्रिया केल्या पाहिजे. अशा प्रकारच्या गोष्टी तिच्या शरीराला आतून उपचार करतात. व सकारात्मक व्हायब्रेशन्स निर्माण करतात. जे बाळावर सकारात्मक परिणाम करतात.

गर्भवतीने जर सोशल मीडिया पासून थोडेसे लांब राहिले तर तिचा वेळ वाचेल व या सर्व गोष्टी करण्यासाठी तिला वेळ मिळेल.

नॉर्मल डिलिव्हरी व्हावी असे जर खरोखर मातेला मनातून वाटत असेल तर तिने जरूर प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये भाग घ्यावा. सोशल मीडियावर तासन्तास बसल्याने शरीरामध्ये दुखणे तयार होते. वजन वाढते. हाता पायावर सूज येते. त्यामुळे सिझेरियन करण्याची वेळ येते.

नकारात्मक गोष्टींचा ब्रेनवर परिणाम

नकारात्मक गोष्टींचा ब्रेन वर होणारा परिणाम त्यापाठीमागे कारण आहे. जेव्हा आपण एखादी निगेटिव बातमी ऐकतो किंवा एखादं निगेटिव दृश्य पाहतो, एखाद्या गोष्टीवर नकारात्मक विचार करतो, एखाद्यावर पटकन रिॲक्ट होतो. किंवा एखाद्या गोष्टीचा स्वतःला त्रास करून घेतो त्या वेळेला आपल्य शरीरामध्ये त्याच प्रकारचे भितदायक हार्मोन्स निर्माण होतात.

उदाहरणार्थ. प्रेग्नेंट आहात आणि आपल्या अगदी जवळच्या नातेसंबंधातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला. तर त्यावेळेला आपली? ॲक्शन कशी असेल..!  आपण? तेव्हा आपली महत्त्वाची कामे करत रहाल की त्या परिस्थितीमध्ये सामील व्हाल..! तर तुम्ही नक्कीच त्या परिस्थितीमध्ये सामील व्हाल. अशा वेळेला काय होतं किती या परिस्थितीचा आपल्या ब्रेन वरती नकारात्मक परिणाम होतो म्हणजे त्यावेळेला आपल्या ब्रेन पर्यंत सिग्नल जातो की ही गोष्ट खराब आहे आणि मग आपला ब्रेन त्या गोष्टी कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न करतो. व महत्त्वाच्या गोष्टी करण्यापासून आपण दुर्लक्षित होतो. मनामध्ये भीती निर्माण होते.

भीतीमुळे कुणाकुणाला भूक कमी लागते. तर कुणाला जास्त भूक लागते. काहींना युरीन जास्त होते. काहींना युरीन कमी होते. अशा परिस्थितीमध्ये काहींचा बी. पी. वाढतो काहीना हार्ट अटॅक येऊ शकतो. काहीना पॅरेलेस होतो. परिणामी गर्भवती  मातेचे शरीर अन बॅलेन्स होते.

गर्भ आईच्या प्लेसेंटा मार्फत सर्व गोष्टी ग्रहण करत असतो. तिच्या शरीरामध्ये निगेटिव्ह हार्मोन्स निर्माण होतात. हे हार्मोन्स रक्तात गर्दी करतात व त्याचा थेट परिणाम बाळावर होतो.

आपल्या जीवनामध्ये थोडाफार ताण-तणाव नैसर्गिक असतो. आणि त्यापासून वाचण्यासाठी निसर्गाने आपल्या शरीरांमध्ये तशी तरतूद करून ठेवलेली आहे. त्या विरुद्ध लढण्याइतकी प्रतिकारशक्ती आपल्या शरीरामध्ये असते. बाळ व आई यांच्यामध्ये नाळ जोडलेली आहे. त्यामार्फत रक्त शुद्ध करून बाळापर्यंत पोहोचविले जाते. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.

जेव्हा अशा नैसर्गिक प्रक्रियांच्या पलीकडे जाऊन. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होऊन त्याची लेव्हल वाढली तर नैसर्गिक प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये काम करत नाही. त्यावेळी या सर्व गोष्टी बाळावर परिणाम करतात. जशा निगेटिव गोष्टींचा बाळावर परिणाम होतो. तसाच पॉझिटिव गोष्टींचाही बाळावर तितकाच परिणाम होतो.

उदाहरणार्थ. प्रेरणा तिच्या प्रेग्नेंसी मध्ये डान्स क्लास घेत असे .क्लास ची मुले निघून गेल्यानंतर ती थोडावेळ शांत झाली की तिला आत मधे बाळ खूप उड्या मारत आहे असे जाणवत असे एक दिवस ती डॉक्टरांकडे गेली व सोनोग्राफी केली तेव्हा सोनोग्राफीमध्ये बाळ अक्षरशा: डान्स करताना डॉक्टरांनी तिला दाखवले. याचा अर्थ असा की आई ज्या वेळी सकारात्मक गोष्टी पाहते त्यावेळी ती आनंदी असते. आई आनंदी असेल तर बाळ ही आतून तसाच प्रतिसाद देते. अशावेळी बाळाची ऐकण्याची व प्रतिसाद देण्याची ताकत वाढते.

तिसऱ्या महिन्यापासून पुढे प्रत्येक गर्भवतीने आपल्या बाळाशी कनेक्ट राहून त्याला सकारात्मक एनर्जी दिली पाहिजे. सोशल मीडियावर ज्या ज्या गोष्टी आपल्या बाळासाठी योग्य आहे त्या पाहून झाल्यावर त्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी करण्यासाठी ॲक्शन घेतली पाहिजे फक्त बघून काही होत नाही त्यासाठी ॲक्शन घेणे खूप महत्त्वाचे असते.

निगेटिव्ह गोष्टी टाळून चांगले ऐका चांगले बघा. मेडिटेशन करा प्राणायाम करा व्यायाम करा चांगली चांगली पुस्तके वाचा चांगले चांगले ऑडिओ बुक ऐका.

पुस्तक वाचण्याची सवय लावून घ्या पुस्तक वाचल्याने कल्पना शक्ती वाढते आणि त्यामुळे आपल्या भावना जागृत होऊन आपण आपल्या बाळाशी पटकन कनेक्ट होतो व आपल्याला त्या पुस्तकातून जेव्हा चांगला अनुभव येईल त्यावेळी चांगले हार्मोन्स बाळा पर्यंत पोहोचायला मदत होईल. आणि त्याची एक चांगली पर्सनॅलिटी बनेल.

गर्भावस्थेमध्ये आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टींची माहिती मिळण्साठी सोशल मीडियाचा जरूर वापर करा परंतु इतकाही वेळ त्यामध्ये घालवू नका की आपण महत्त्वाच्या कामात पासून दूर जाऊ. आपल्या गर्भावस्थेत ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या ऍक्टिव्हिटी करण्याची गरज आहे त्यापासून दूर जाऊ या गोष्टीचे भान ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.

अशाप्रकारे गर्भावस्थेपासून वयाच्या पाच वर्षापर्यंतचा काळ बाळाच्या मेंदूसाठी अक्षरशा सुवर्णकाळ असतो मुलांचा मेंदू एखाद्या स्पंज प्रमाणे सर्व गोष्टी टिपत असतो त्यामुळे या काळामध्ये आपण कटाक्षाने वर दिलेल्या सर्व गोष्टींची काळजी घेतली तर बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी आपली त्याला मदत होईल.

आपल्या गर्भातील बाळा च्या सुसंस्कारबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी माझा २१व्या शतकातील गर्भसंस्कार हा फेसबुक ग्रुप खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन करा.

२१ व्या शतकातील गर्भ संस्कार

अधिक माहितीसाठी संपर्क;

 गर्भसंस्कार मार्गदर्शक अलका शिंदे

तुम्ही माझा ब्लॉग शेवटपर्यंत वाचला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे आपल्याला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या अमूल्य प्रतिक्रिया नक्की द्या. तसेच नवीन लग्न झालेल्या बाळ प्लॅनिंग करत असलेल्या मुली व गर्भवती माता आणि आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत ब्लॉग शेयर करायला विसरु नका.

धन्यवाद..!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

१६ "संस्कार"

संस्कारांवर आधारित  भारतीयसंस्कृती भारत देश हा खेड्यापाड्यांचा देश, सामाजिक, राजकीय, वैज्ञानिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा अनेक विषयांमध्ये पु...