बुधवार, २६ मे, २०२१

मेंदूतील चेतापेशी (न्यूरॉन) चे कार्य

 

तुम्हाला? माहिती आहे का   गर्भाशयातील गर्भाचााचााचा मेंदू व्यवस्थित तयार व्हायला पाहिजे असेल तर मेंदूमधील पेशींची सुव्यवस्थित संरचना होणे आवश्यक आहे.

गर्भाचा मेंदू तयार होत असताना त्यामध्ये थोड्याशा चुका झाल्या किंवा काही गोंधळ झाला तर त्याचे दुष्परिणाम जन्माला येणार्‍या व्यक्तीला आयुष्यभर भोगावे लागतात. त्यासाठी चेतापेशी म्हणजेच न्यूरॉन काय आहेत व त्याचे कार्य कसे चालते हे प्रत्येकाने जाणून घेतले पाहिजे. न्यूरॉन्स कार्यपद्धती आणि मेंदूचा विकास याविषयी आपल्याला जितकी माहिती असेल तितके गर्भसंस्कार नेमके कसे करतात याची तुम्हाला स्पष्टता येईल आता तुमच्या मनात याबद्दल जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली असेल होय ना..! आणि खरंच जर कसे असेल तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत वाचा.
नमस्कार...!
मी अलका शिंदे गर्भसंस्कार मार्गदर्शक अँड सेल्फ कोच. "२१व्या शतकातील गर्भसंस्कार "या प्लॅटफॉर्मची संस्थापिका मला येत्या पाच वर्षात एक लाख गर्भवती माता न पर्यंत पोहचून त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडून आणायचा आहे. त्यांच्या गर्भातील बाळांवर सुसंस्कार करून त्यांना सुदृढ सर्वगुणसंपन्न आणि सक्षम असे देशाचे नागरिक मला घडवायचे आहे आणि हा माझा ध्यास आहे.
मेंदूच्या पेशी शरीरातील इतर पेशींपेक्षा वेगळ्या  वैशिष्ट्यपूर्ण रचनेच्या असतात. या पेशींना मेंदूपेशी, चेतापेशी किंवा न्यूरॉन असे म्हणतात.मज्जातंतू चे आवेग आयोजित करण्यासाठी असलेला एक खास सेल म्हणजे चेतापेशी (न्यूरॉन)
मेंदूमध्ये लक्षावधी पेशी असतात. बाहेरून संदेश वाहून आणण्यासाठी व आतील संदेश बाहेर वाहून नेण्यासाठी एका विशिष्ट प्रकारच्या धाग्यांचे विद्युत मार्ग असतात. तसेच मेंदूच्या निरनिराळया भागांमध्ये ज्याचे त्याचे काम ठरलेले असते. संदेश वाहून नेणाऱ्या या मार्गात किंवा विशिष्ट भागात कधीकधी बिघाड होऊ शकतो.उदा.विषबाधा झालेले अन्नपदार्थ तसेच कीटकनाशके यांचा परिणाम झाल्यामुळे संदेश वाहनाची गती कमी होऊ शकते.असे झाले तर त्या त्या कामात अडथळा येतो किंवा पूर्णपणे ते काम बंदही होऊ शकते.श्वसनासारख्या कामांमध्ये अडथळा आला तर मृत्यूदेखील येऊ शकतो.असे आदेश पाठवण्याचे काम विशिष्ट चेतातंतूंमार्फत होते. संदेश मेंदूकडे आणण्यासाठी आणि मेंदूकडून आज्ञा परत अवयवांकडे पाठवण्यासाठी वेगवेगळे चेतातंतू असतात.हे संदेशवहनाचे काम सूक्ष्म विद्युतशक्तीने केले जाते. या नसांचे जाळे रक्तवाहिन्यांप्रमाणेच शरीरभर पसरलेले असते. काही नसा केवळ मेंदूकडे संदेश,नेणा-या तंतूंच्या असतात. याउलट काही नसांमध्ये संदेश नेणा-या आणि आणणा-या अशा दोन्ही तंतूंचा समावेश असतो.


पेशींचा मुख्य भाग बॉडी मधून निघणाऱ्या एका लांब तंतू च्या टोकापासून झाडांच्या मुळा प्रमाणे त्याला अनेक तंतू निघतात. या तंतूची टोके एकमेकांच्या जवळ जवळ येतात. त्यामुळे पेशी (न्यूरॉन)ची साखळी तयार होते. व या साखळीच्या जोडण्या एकमेकांवर जोडल्या जाऊन चेता पेशींचे जाळे तयार होते. आणि ज्यावेळी तंतूंची टोके जवळ जवळ येतात तेव्हा मात्र ती एकमेकांना चिकटलेली नसतात. त्यांच्यामध्ये एक बारीक फट असते या फटीमध्ये रसायने पाझतात. आणि त्यांनाच संदेश वाहक म्हणतात. या संदेशवहक फटीमध्ये पाझरलेल्या रसायनांना मानसिक आरोग्य व मानसिक आजारांमध्ये खूप महत्त्व आहे.
मन भावना इच्छा भीती व राग या सर्व अंतर्गत क्रियांवर नियंत्रण करण्यासाठी एक स्वतंत्र चेता व्यवस्था असते या व्यवस्थेला आंतरिक चेता व्यवस्था म्हणतात आणि ही व्यवस्था सुद्धा मेंदूच्या नियंत्रणाखाली असते.उदा. अचानक आपल्या डोळ्यासमोर धोकादायक अशी परिस्थिती निर्माण होते की त्यामुळे आपल्या डोळ्याला इजा होण्याची शक्यता असते. त्यावेळी आपले डोळे पटकन झाकले जातात व त्या धोक्यापासून म्हणजे डोळ्यांना इजा होण्यापासून डोळे वाचतात. आपल्या डोळ्यासमोर काय आहे की त्यामुळे आपल्या डोळ्यांना इजा होणार आहे ते आपल्याला माहिती नसताना देखील पटकन ही क्रिया घडते आणि मग आपल्याला आश्चर्य वाटते. हा प्रसंग आपल्या सगळ्यांनाच नेहमी येतो. म्हणजेच आपले शरीर ,इंद्रिये हे मेंदूच्या कंट्रोल मध्ये आहे. ह्या क्रिया व्हायला काही सेकंद पुरे असतात.
न्यूरॉन (चेतापेशीं )चे जाळे योग्य पद्धतीने तयार होण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत हे महत्त्वाचे आहे. आणि त्यासाठी योग्य मार्गदर्शन व उपाययोजना करणे ही गर्भसंस्कार करणाऱ्या मार्गदर्शकाची जबाबदारी आहे.
(ब्रेन पॉवर) मेंदूची ताकद वाढण्यासाठी माईंड काही माईंड सिक्रेट्स आहेत. आजपर्यंत आपल्याला या विषयावर कुठेही शिकवले गेले नाही. पण हे शिकून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. गर्भसंस्कार या कोर्समध्ये मी तुमच्याशी अशा गोष्टी शेअर करणार आहे की त्या गोष्टी पूर्वीचे लोक फॉलो करत असायचे. जे आजकालचे लोक फॉलो करत नाही. या कोर्समध्ये ज्या गोष्टी शिकवल्या जातात त्यामुळे तुमची संपूर्ण विचारसरणी बदलेल. आणि ते सिक्रेट आहे सुपर ब्रेन पावर सिक्रेट.

आपल्याला आल्या बॉडीवर नाही तर आपल्या ब्रेन वर काम करायचे आहे. आणि आपण आपल्या ब्रेन वर काम केलं तर आपला ब्रेन अतिशय पावरफुल बनेल, शार्प बनेल आणि आपण स्वतः तंदुरुस्त हेल्दी व ताजेतवाने बनल्यामुळे सहाजिकच आपले बाळही त्या प्रकारचेच बनेल यात शंका नाही. तर मग त्यासाठी आपल्या ब्रेनला काय हव आहे. व त्यासाठी काय करावे लागेल की ज्यामुळे तो तंदुरुस्त हेल्दी व ताजातवाना राहील आणि त्यामुळे आपले बाळ हे अतिशय पावरफुल शार्प आणि बुद्धिमान बनेल. याचे सिक्रेट तुम्हाला "२१ व्या शतकातील गर्भ संस्कार" या कोर्समध्ये शिकायला मिळणार आहे. त्यासाठी या कोर्स मध्ये नक्की सहभागी व्हा.

चहूबाजूला covid-19 मुळे नकारात्मकता पसरली आहे. तुमच्यासारख्या कितेक मातांना या नकारात्मकतेच्या विळख्यातून बाहेर काढून सकरात्मक व आनंदी राहण्यासाठी तसेच बाळाच्या उज्वल भविष्यासाठी '२१ व्या शतकातील गर्भसंस्कार' हा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून फेसबुक ग्रुप जॉईन करा.

 २१ व्या शतकातील गर्भसंस्कार

 अधिक माहितीसाठी संपर्क:

 गर्भसंस्कार मार्गदर्शक अलका शिंदे

तुम्ही माझा ब्लॉग शेवटपर्यंत वाचला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे ब्लॉग आवडला असेल तर आपल्या ओळखीतल्या गर्भवती मातांना जरूर शेअर करा तसेच आपल्या अमूल्य प्रतिक्रिया नक्की द्या

धन्यवाद..!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

१६ "संस्कार"

संस्कारांवर आधारित  भारतीयसंस्कृती भारत देश हा खेड्यापाड्यांचा देश, सामाजिक, राजकीय, वैज्ञानिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा अनेक विषयांमध्ये पु...