बुधवार, ४ ऑगस्ट, २०२१

गरोदरपणात..? शारीरिक संबंध ठेवावे का..!

 गरोदरपणातील शारीरिक संबंध:


दुपारचा एक वाजला होता. जेवणाची सुट्टी झाली. आज रितेशला जेवणाची इच्छा होत नव्हती. त्याची अस्वस्थता वाढत होती. दुपारनंतर च्या कामाला दांडी मारून स्टँड जवळील फुल वाल्याच्या दुकानातून छान सुंदर गजरा घेऊन तो घरी आला... ते मनाशी काही ठरवूनच..!

तो आज गाणं गुणगुणत होता "प्रेमाची ग.., लाडाची ग….!

ती ऐकून न ऐकल्यासारखे करत होती…

समजून न समजल्या सारखे करत होती…

जेवणानंतर झोपण्याची तयारी झाली...

बॅग मधून गजरा काढून रितेशने तीच्या केसांमध्ये माळला..

तशी ती त्याच्यावर भडकली...

दुसऱ्या बाजूला तोंड वळवून झोप आल्याचा तिने आव आणला…

प्रयत्नांची पराकाष्टा करत तो तिला मनवत होता…

कुठे नेमके कुठे बिघडत आहे हे त्याला जाणून घ्यायचं होत;

एकदाच याला स्पष्टच सांगून टाकते हा विचार मनात येताच ती उठून बसली…!

आज पासून मला स्पर्श करणे तुमच्यासाठी बंधनकारक आहे…!

नऊ महिने नऊ दिवस आपण दोघांनीही हे नियम पाळायचे आहेत…!

रितेश नाराज होऊन झोपून गेला…

हा रोजचाच नित्यक्रम सुरू झाला…

दोघांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून खटके उडू लागले…

रितेशच्या वागण्यामध्ये बदल होऊ लागला….

रात्री उशिरा घरी येणे,  आलाच तर ड्रिंक करून येने,कधीकधी घरीच न येणे अशाप्रकारे रितेशच्या वागण्यामध्ये बदल होऊ लागला…

तिला ही त्या गोष्टीचं टेन्शन येत होतं..

परंतु दिवस गेल्यापासून सासुबाई, शेजारच्या मैत्रिणी यांच्याकडून तिला सतत सजेशन मिळत होत…

प्रेग्नेंसी मध्ये शारीरिक संबंध ठेवायचे नसतात बरं का.., ठेवल्यास बाळाला त्याचा धोका पोचू शकतो, गर्भपात होण्याची शक्यता असते, बाळाच्या आईला पण  धोका पोहोचू शकतो …मला तर बाई माझ्या सासूने तुझ्या नवऱ्याला एक वर्षाचा होईपर्यंत तिच्याजवळ झोपले होते..

सासुबाईंचे सततचे बोलणे ऐकून तिच्या मनावर ते अगदी खोलवर बिंबले होते…

त्यामुळे ती रितेशच्या वागण्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत होती…

प्रेग्नेंसी चे सहा महिने संपले व सातवा सुरू होताच सासु बाईने तिची ओटी भरण करून तिला माहेरी पाठवली…

नऊ महिने नऊ दिवस पूर्ण झाले…

तिची डिलिव्हरी सुखरूप झाली…

बाळ सव्वा महिन्याचे झाले…

सासू सासरे आईला व बाळाला आनंदाने घरी घेऊन आले…

सासु बाईने तीला आवर्जून सूचना दिल्या…

बाळ सहा महिन्यांचे होईपर्यंत तू माझ्याजवळ झोप….

बाळाचे दुध कमी होऊ नये यासाठी तुला हे नियम पाळायचे आहेत…

रितेश त्या रात्री घरी आला तो मनाशी ठरवूनच…

जेवताना त्याने तिचा हातात हात घेतला आणि म्हणाला..

"मला तुझ्याशी काही बोलायचं आहे."

तिच्या डोळ्यांत वेदना उमटली; क्षणभर तोंडातला घास तोंडातच ठेवून ती स्तब्ध झाली..

सगळे शब्द जुळवून रितेश तिला म्हणाला मला घटस्पोट हवाय…

का...?

जाणून घेण्याचा तीव्र इच्छा व्यक्त करत ती आश्चर्याने उद्गारली..!

माझं मन दुसऱ्या स्त्रीवर आलय हे रितेश तिला

स्पष्टपणे सांगू शकत नव्ह्ता….

त्याचा बँक ब्यालन्स, कार, घर, सगळ त्याने तिला देऊ केलं:

रितेशने समोर केलेल्या घटस्पोटाच्या कागद तिने हिसकावून घेतला व माझ्या काही अटी आहेत त्या मान्य कराव्या लागतील असे सांगितले..

दुसऱ्या दिवशी घटस्पोटा विषयीच्या अटींचा कागद तिने पुढे केला..

तिला फक्त एक महिन्याची नोटीस हवी होती..

या एका महिन्यामध्ये दोघांनीही एकमेकांसोबत राहावे अशी तिची इच्छा होती...

तिच्या अटी साद्या होत्या...

एक अट होती. बाळाला सहा महिने पूर्ण होण्यासाठी फक्त दहा दिवस बाकी होते…

त्यानंतर लग्नाच्या पहिल्या दिवसापासून गुड न्यूज आल्या पर्यंत आपण कसे वागलो…

कोण कोणत्या गोष्टी केल्या ह्या सर्व गोष्टींबद्दल एक महिनाभर चर्चा करायची आणि त्यानंतर निर्णय घ्यायचा असे ठरले…

तिची अट मान्य करायची म्हणून त्याने होकार दिला

पण फक्त महिना व्यवस्थित जावा यासाठी रितेशने तीची अट मान्य केली होती...

घटस्पोटाच्या विचारामुळे अनेक दिवस रितेश चा पत्नीसोबतचा संपर्कच झालेला नव्हता...

त्यांच्यातली एक हवीहवीशी जवळीक वाढत असल्याचं त्याला जाणवलं.

सुरुवातीचे दिवस त्याला आठवले…

तिच्या समाधानाकरिता त्याने तिला उचलले..

तिला अचानक उचलताना त्याला जाणवलं,की

तीच वजन कमी होत चांललंय.

हृदयातल्या वेदनाचां हा परिणाम होता.

त्याने आस्थेने तिच्या कपाळाला स्पर्श केला.

दिवसागणिक तिचं कमी होणारं वजन…

रितेश ची काळजी वाढवत होती.

पण तिच्या अटीच पालन करताना रितेशला आंतरिक समाधान मिळत होत,

दोघांमध्ये काय घडतंय याची कल्पना

नसतानाही त्यांचं बाळ खूप खुश दिसत होतं...

त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता कारण त्यांच्यातली जवळीकच संपली होती…


जी परत आयुष्यात येत होती…


महिन्याच्या शेवटच्या दिवसी रितेशने मनाशी निर्णय घेतला.

रितेश प्रेयसीच्या घरी गेला. आणि  पत्नीला घटस्पोट देऊ शकत नसल्याच त्याने प्रेयसीला स्पष्टपणे सांगितले.

ती चिडली, संतापली, पण आता त्याला काही ऐकायाच नव्हत.

तिचा राग संताप बघून अस वाटत होतं की हीच प्रेम माझ्यावर नसून माझ्या पैश्यांवर आहे....

तिकडचे सगळे नाते संपवून तो घरी निघाला....

कारण त्याला कळलं होत की खरं प्रेम कोणत आहे  आणि  खोटं कोणत...

महत्वाचं म्हणजे त्याला  जाणीव झाली होती की तो खरंच चुकला..

आणि आता रितेश ला…

त्याच्या प्रिय पत्नीचा हात मरे पर्यंत सोडायचा नव्हता.


तो वेगाने कार चालवत घरी आला.


त्याच्या चेहऱ्यावर हसू होत.

हातात फुलांचा गुच्छ होता.

तो बेडरूम मध्ये पोहचला,

तर…

प्रिय पत्नी बेडवर निष्प्राण पडलेले होती...

बाळाला जवळ घेऊन तो ओक्साबोक्शी रडत सुटला.

माझ्या प्रेमापायी तिने प्राण सोडला होता.

तिने मला एक महिना दिला होता,मी जे करायला हव ते केल नाही.

जे प्रेम,

जी जवळीक तिला हवी होती ती मी तिला दिली नाही.

आता रितेशचे अश्रू तिला परत आणू शकत नव्हते.

पती-पत्नीच्या नात्यात कार, बंगला, प्रेयसी, पैसा काहीही महत्वाच नाही.

महत्वाच आहे ते प्रेम, जवळीक आणि विश्वास…. विचार करा…

स्वताला विचारा आपण आपल्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टीला किती महत्त्व देतो --- "

"ऐकावे जनाचे करावे मनाचे"..!

आपल वैवाहिक आयुष्य खरच सुखाचं आहे?"

पण ते सुखरूप कसं बनवायचं हे आपल्याला समजलं पाहिजे..

या कहाणीचा एकच संदेश आहे.---

"जे काही आहे-- ते प्रेमात आहे,

ज्ञान मिळवा समज-गैरसमज सोडून द्या एकमेकांना समजून घ्या..!

नात्यामध्ये आनंद निर्माण करा व ते घट्ट करा..!

"जे प्रेमाचे आहेत ते प्राणपणाने सांभाळा.

नाही तर पश्याताप...

लैंगिक सुख प्रत्येक जोडीदाराच्या आयुष्यातील नाजुक आणि अनमोल क्षण असतो. या क्षणाचा आनंद महिलेच्या गर्भावस्थेत कमी होतो असं काहींचं म्हणणं असतं. मात्र गर्भावस्थेत अभ्यासपूर्वक काही गोष्टींची काळजी घेतल्यास हा प्रश्न नक्की सुटेल यात शंका नाही त्यासाठी खाली काही टॉपिक दिले आहे ते जरूर वाचा…

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

१६ "संस्कार"

संस्कारांवर आधारित  भारतीयसंस्कृती भारत देश हा खेड्यापाड्यांचा देश, सामाजिक, राजकीय, वैज्ञानिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा अनेक विषयांमध्ये पु...