जबाबदारी वैवाहिक जीवनाची
नमस्कार मी अलका शिंदे...
गर्भसंस्कार मार्गदर्शक अँड सेल्फ कोच...
किशोर वयात मुलगी अतिशय भावनाप्रधान असते या वयात तिचे मन संवेदनशील असल्यामुळे अगदी छोट्या-छोट्या कारणांनीही तिच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो. त्यामुळे तिला कधीकधी खूप रडावेसे वाटते तर कधी सगळ्यांचा खूप राग येतो. घडलेल्या शूल्लक गोष्टी खूप मनाला लावून घेतल्या जातात.
मी कोण आहे, मला काय करायचं आहे माझ्या कुटुंबात, घरात ,समाजात माझे काय स्थान आहे. अशा अनेक गोष्टींविषयी मनात गोंधळ उडालेला असतो त्याच-त्याच विचारांची मनात गर्दी होवून मन एकाग्र करणं तिला कठीण जातं या वयात मुला-मुलींना स्वतःच्या कल्पनाविश्वात रमायला आवडते. काहीही काम करताना अभ्यास करताना मध्येच नवनवीन विचारांमध्ये ती रंगून जाते आपण इतरांचे लक्ष वेधून घेत आहे व आपण कोणा एकाला फार हवेहवेसे वाटतो आहे हे नेहमीचे दिवास्वप्न ती पहात असते. यातूनच विरुद्ध लिंगी व्यक्तींविषयी आकर्षण, प्रेम या भावना जन्मास येतात. आईवडिलांशी जिव्हाळ्याचे नाते हळूहळू तुटक होऊ लागते. बेजबाबदार वर्तन ,हेकेखोरपणा, चंचल स्वभाव हे गुण थोड्याफार प्रमाणात दिसून येतात. या वयातील मुलं-मुली मनमोकळे स्पष्टवक्ते व धाडसी मनोवृत्तीचे ही असतात.अशा आचार-विचारांना योग्य मार्गदर्शनाची व पाठिंब्याची मात्र गरज असते.
या वयात समवयस्क मित्र-मैत्रिणींमध्ये भिन्नलिंगी आकर्षण निर्माण व्हायला सुरुवात होते. सोशल मीडियाचा प्रभाव जास्त असल्याने काही गोष्टी, काही प्रसंग त्यांना खरे वाटू लागतात. समवयस्क मित्र-मैत्रिणींमध्ये भिन्नलिंगी आकर्षण निर्माण व्हायला सुरुवात होते. एखादा मुलगा सतत पाहतो ही भावना सुखावत असते. देखणा रुबाबदार असल्याने त्यावर भाळून जाऊन त्याच्या अवगुण दोष याकडे दुर्लक्ष केले जाते. रंगरुप कौशल्यावर भाळून जाऊन त्या व्यक्ती करता कोणताही त्याग करावयास ती तयार होते. अगदी स्वतःचा जीव किंवा शरीर सुद्धा...!
किशोर वयातील या भाबडेपणा मुळे आकर्षण व प्रेम यातला फरक तिला कळत नाही.
आई वडील बहिण भाऊ यांच्यामध्ये जे नातं असतं ते सुद्धा प्रेमाचच नात असतं ज्यामध्ये आपण त्या व्यक्तीला तिच्या गुणदोषांसह उघड्या डोळ्यांनी स्वीकारतो ज्यामध्ये एकमेकांबद्दल विश्वास आदर सहकार्याचं व समजूतदारपणा च नातं असतं. ज्यामध्ये एकमेकांप्रती समर्पणाची भावना देखील असते.ते प्रेम म्हणजे खरे ते प्रेम होय.
जोडीदाराची निवड
मुलगी एकदा लग्नाला आली की आईवडील, नातेवाईक,व गावातील प्रतिष्ठित मंडळी तिला मुलगा शोधायला सुरुवात करतात. मुलीच्या मनातील व पालकांच्या मनातील योग्य मुलगा यामध्ये फरक असू शकतो. मुलाची निवड कशी करावी याचा गोंधळ तिच्या मनामध्ये असल्यामुळे जे आहे त्या परिस्थितीला सांभाळून घेऊन तिला तडजोड करावी लागते.
जोडीदार कसा हवा?
यासाठी आपण प्रत्यक्ष कृती करूया…..
डायरी घ्या. डायरीमध्ये आपल्याला जोडीदार कसा हवा याबद्दल लिहा. फक्त गुणांची यादी करा.
यामुळे विचार करण्याची क्षमता निर्माण होईल.
बाहेर स्वरूपी कुणाला महत्त्व दिले आहे असे जाणवले तर त्यावर चर्चा करता येईल. उदा. सिनेमातील हीरो हीरोइन आपण बघतो ती खरोखरच प्रत्यक्षात तसे असतील का?
जर मुला-मुलींमधील स्वभाव गुणांना महत्त्व दिले उदा. प्रेमळ व मदत करणारा प्रामाणिक यावरही चर्चा करा. वैवाहिक जीवन सुखी बनवण्यासाठी दोघांनाही काही गुणांची जरुरी असते सहसंवेदना त्याग एक निष्ठा प्रेम सहकार्य आदर तडजोड विश्वास जबाबदारी हे गुण महत्त्वाचे असतात.
आयुष्यात दोन निवडी अतिशय महत्त्वाचा मानल्या जातात. पहिली निवड आपल्या कारकिर्दीची व दुसरी निवड आपल्या जोडीदाराची. कारकिर्तीची निवड आपल्या आवडीनुसार व जोडीदाराची निवड जागरूकतेने करायला हवी जोडीदार निवडण्यासाठी कोणताही फॉर्म्युला तयार करणे शक्य नाही. तो किंवा ती अनुभवानुसार बदलतही जाते कोणत्याही अवघड परिस्थितीत मी माझे वैवाहिक जीवन सुखी करणारच असे दोघांनीही जिद्द बाळगावी या व्यक्तीशी आपले जमणार नाही किंवा काही कारणास्तव हा जोडीदार पसंत नाही असे वाटल्यास निसंकोचपणे नकार कळवावा. त्याने नाकारले म्हणून नाव नाउमेद होऊ नये आपल्यात काही कमी आहे असे समजून न्यूनगंड निर्माण होऊ देऊ नये. जोडीदाराने लग्नाआधी संबंधाची मागणी केल्यास भीड न बाळगता नाही हा परवलीचा शब्द लक्षात ठेवावा.
आपल्या आवडी निवडी सर्व काही जुळून आल्यानंतर समोरची व्यक्ती स्वभावाने कशी असेल? तिच्याशी आपले जुळेल की नाही? अशा प्रकारची भीती दोघांच्याही मनात असते. यासाठी दोघांनीही कुटुंबासोबत एकत्र येऊन संवाद साधून योग्य मार्गदर्शकाकडून प्रश्नोत्तर स्वरुपात मार्गदर्शन घेतल्यास मनातील भीती कमी होऊ शकते.
मुलं-मुली दोघांच्याही घरामध्ये अनुवंशिक आजार आहेत का असे असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे. हे लक्षात घेतले पाहिजे. शक्यतो जवळच्या नात्यांमध्ये लग्न केल्यास होणाऱ्या बाळामध्ये अनुवंशिक आजार व दोषांचे प्रमाण जास्त आढळते डॉक्टर सांगतात. उदा. थॅलॅसिमिया, हिमोफिलिया... या आजारांवर औषध उपचार उपलब्ध झाले असले तरी आपण त्याचा विचार आधीच करायला हवा कारण त्यात आपला मौल्यवान वेळ वाया जाऊ नये.
योग्य निर्णय:
मला लग्न? का करायचे आहे..! कशासाठी? करायचे आहे..! हा उद्देश लक्षात न घेताच धुमधडाक्यात लग्न लावून दिलं जातं घरातील ज्येष्ठ मंडळी प्रामुख्याने आई वडील मुलामुलींची मोकळेपणाने बोलत नाही. शाळा कॉलेजमध्ये सर्व काही शिकले असतील या भ्रमात आई वडील मुला मुली बाबत निश्चिंत असतात.
विवाहानंतर खरे स्वभाव खऱ्या अर्थाने एकमेकांना कळतात कुटुंबासोबत जुळवून घेताना हातान मनावर अधिक अधिक वाढत जातो अशातच गर्भधारणा झाल्यास बाळावर त्याचा विपरीत परिणाम होतो. डायबेटिस हृदयविकार इत्यादींसारखे रोग स्थानाशी संबंधित असतात हेही आपण लक्षात घेतले पाहिजे गरोदरपण आणि ताण यासंबंधी झालेल्या आणि एक संशोधनामध्ये असं लक्षात आलं आहे की अतिताणामुळे बालकाचा अकाली जन्म होऊन त्याचं वजन कमी भरणं बाळ चिडचिड जन्माला येणार हे धोके उद्भवू शकतात.
मला आलेला एक अविस्मरणीय अनुभव:
प्रिया च १८व वर्ष संपत आलं आणि तिच्या लग्नाबद्दल कुजबुज सुरू झाली. आमक्या ठिकाणी असा मुलगा आहे. तमक्या ठिकाणी तसा मुलगा आहे. रोज काही ना काही तरी नवीन कानावर येत असे. एक दिवस तिच्या बाबांचा मित्र घरी आला आणि त्यांनी प्रियासाठी एक स्थळ आणले सुशांत हुशार,गोरागोमटा, उंचापुरा आहे पोटापुरती शेती आहे. हे सर्व बाजूने सकारात्मक पद्धतीने बाबांच्या मित्रांनी आई-बाबांना पटवून दिले. आपल्या मित्राने एवढं सांगितल्यावर बाबांनी मित्रावर विश्वास ठेवून बिनधास्तपणे होकार दिला. तसेच ते स्थळ अगदीच नाकारण्यासारखेही नव्हते. पुढील सगळे कार्यक्रम सुरळीत झाले लग्न पार पडले मुलगी परत मूळ करून सासरी नांदायला आली. काही दिवसातच तिथल्या नातेसंबंधाशी परंपरांशी जुळवून घेताना तिच्यावर ताण येऊ लागला. घरामध्ये एकमेकांविषयी समज गैरसमज होऊ लागले छोटे छोटे वाद-विवाद होऊ लागले अशातच तिला गर्भधारणा झाली. घरामध्ये भांडणतंटे होत असताना एक दिवस कुटुंब विभक्त झाल.
प्रिया चे आई बाबा सर्वसाधारण कुटुंबातील कमीच शिकलेले. ते त्यांच्या पद्धतीने मार्गदर्शन करीत असत. सुशांतला जेमतेम पगार असल्याने काही दिवसातच त्यांच्या संसारांमध्ये आर्थिक अडचणी भासू लागल्या मानसिक ताणतणाव अधिकच वाढू लागला. आता म्हण मध्ये मदत नसल्याने सर्व गोष्टींचा ताण दोघांवर यायला लागला आणि मग दोघांमध्ये भांडणे सुरु झाली. अशा परिस्थितीत प्रियाच्या पोटामध्ये बाळाचा गर्भ वाढत होता. तिला या प्रवासामध्ये कितीतरी शारीरिक अडचणी आल्या. नऊ महिने नऊ दिवसानंतर सिजर झाले. बाळाचे वजन कमी. प्रियाला अंगावर दूध कमी असल्यामुळे बाळाचे पोट भरत नसेल. बाळ रडतय त्याच्या रडण्याचे कारण त्या दोघांनाही कळत नसे. शेजारीपाजारी चुकीचा सल्ला देऊन समस्या अधिकच वाढत होत्या. एक वर्षानंतर पर्यंत बाळाची तब्येत अधिकच खालावली त्याचे रूपांतर कुपोषणामध्ये झाले. अंगणवाडीमध्ये माझ्याकडे फक्त बाळाचे वजन करण्यासाठी प्रिया आपल्या बाळाला घेऊन येत असे तेही माझ्या मदतनीसच्या आग्रहास्तव बाळ सहा महिन्यांचे झाल्यानंतर त्याचे दात निघायला लागले म्हणून त्याला जुलाब होत आहेत असे ती सांगायची. महिन्यातून एकदा वजन व लसीकरण या दोन गोष्टींसाठी आल्यावर तिच्याशी आमची चर्चा व्हायची. घरात कामाचा सर्व ताण तिच्यावर असल्यामुळे ती माता बैठकांना देखील येत नसायची. मला सगळं माहिती आहे या घमेंडीत केलेले मार्गदर्शन एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायची. बाळाचे रडगाणे चिडचिड ह्या सर्व गोष्टी तिला असह्य होत असे. त्याचा परिणाम तिच्या आरोग्यावर ही होत हो लागला. हळू ती ॲनिमिया ग्रस्त झाली. अशातच मासिक पाळी सुरु होण्याआधीच दुसऱ्यांदा दिवस गेले हे तिला कळले देखील नाही. उलट्या मळमळ सुरू झाल्यावर तिला शंका आली तोपर्यंत अडीच महिने होऊन गेले होते. पहिल्या बाळाचे नीट संगोपन करण्याची समज येण्याआधीच दुसरे बाळ ही तर अतिशय तणावपूर्ण बाब दोघा नवरा बायकोच्या बाबतीत होऊन बसली. तीन जिवांची जबाबदारी सुशांत वर आता आली होती. दिवसभर राब राब राबून संध्याकाळी घरी येताच प्रियाचा सुकलेला चेहरा चिडचिड व बाळाचे रडणे बघून सुशांत डोक्याला हात लावून बसू लागला. दोघांची भांडण तंटे वाढतच चालली. दिवसांमागून दिवस जात होते तसतसा प्रियाच्या पोटातील गर्भ वाढत गेला. आठव्या महिन्यात अचानक प्रियाला बी.पी.चा त्रास सुरू झाला. सुशांत तिला सरकारी हॉस्पिटल मध्ये घेऊन गेला. प्रियाच्या अंगामध्ये फक्त 4 पॉईंट रक्त भरले होते. प्रियाला रक्त भरावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितले. परंतु सुशांतची परिस्थिती नसल्याने त्याने डॉक्टरांना सांगितले की जे काही होईल ते माझे नशीब. आणि खरोखरच नशिबाने साथ दिली असेच म्हणावे लागेल. त्याच रात्री प्रिया ची डिलिव्हरी झाली. मुलगी झाली. पण तिचे वजन फक्त दीड किलो. सात दिवसानंतर घरी जाताना डॉक्टरांनी दिला काळजी घ्यायला सांगितली. कधीमधी अंगणवाडीत येऊन रडगाणं तर कधी आरोग्य सेविका ए. एन. एम. त्यांच्याकडे लसीकरणाला आल्यावर प्रियाचे रडगाणे ऐकायला मिळायचे. मग मदतनीस आणि मी प्रियाला जास्तीचा आहार द्यायचं आम्हा दोघी नाही प्रियाची खूप दया यायची. अंगणवाडीमध्ये जेवढ्या सेवा देता येईल तेवढ्या सेवा आम्ही तिला पुरवल्या. पहिलं बाळ सोहम अडीच वर्षाचा तर दुसरी मुलगी सायली दोनवर्षाची झाली पण तिचे वजन मात्र एका वर्षाच्या मुली प्रमानेच होते. ती नेहमी आजारी पडत असे. चिडचिड करत असे. सायली ची वाढ गुंतलेली होती मी याचे कारण शोधण्याचा खूप प्रयत्न केला. एक दिवस मदतनीस व आणि मी दोघी तिच्या घरी गृहभेटी साठी गेलो मग कळले की सुशांत रोज दारू पिऊन घरी येतो व प्रियाशी भांडतो. दगड मारामारी करतात. सुशांत चे आई वडील सुशांत वर नेहमीच नाराज असायचे अशा या घरच्या वातावरणामुळे नेहमी तो ताणतणावात असायचा त्यामुळे सायली कडे त्यांचे दुर्लक्ष झाले. सोहमला मात्र सायली झाल्यावर प्रिया ची आई तिच्या कडे घेऊन गेले त्यामुळे तो तिकडे सुरक्षित होता. सायली वर मात्र दोघही प्रेम करायला विसरूनच गेले.
मी जेव्हा दुसऱ्या गृहभेटीला गेले तेव्हा सायलीच्या आई-वडिलांना म्हणजे सुशांत व प्रियाला समजावून सांगितले तिला आम्ही अंगणवाडीमध्ये आहार देतोच. त्यामुळे आहाराचा प्रश्न नाही. पण मुलांच्या वाढीसाठी आहार जेवढा महत्त्वाचा आहे तेवढेच प्रेमाचे वातावरण सुद्धा महत्त्वाचे आहे. तुमच्या घरातील नेहमीचे भांडणे आणि तणाव याचा सायली वर दुष्परिणाम झाला आहे. जो पर्यंत तिला कुटुंबाचे प्रेम मिळत नाही तोपर्यंत तिची भूक वाढणार नाही. तेव्हापासून माता बैठकांमध्ये आई-वडिलांचे समुपदेशन सुरू केले की बाळाची कसे बोलावे आपल्या बाळांना गोष्टी सांगाव्या त्याच्याजवळ बसून त्याला जेवण बनवावे जेणेकरून बाळाचे वजन वाढण्यास मदत होईल.
घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती...
तिथेअसावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती..!
तात्पर्य:
मुलगी वयात आली की तिला मैत्रिणी प्रमाणे विश्वासात घेऊन व तिच्या बरोबर मैत्रिणी प्रमाणे जवळीक करून प्रत्येक गोष्टीची समाज देण्याची जबाबदारी आईची असते. कुटुंबाचे महत्त्व, लिंगभेद, आहार, आरोग्य, प्रजनन आरोग्य, गुप्तरोग, आत्मनिर्भरता, खंबीरता, व्यवसाय मार्गदर्शन याबद्दल आईने प्रशिक्षण घ्यावे किंवा याविषयीची पुस्तके वाचून स्वतःचे ज्ञान वाढवावे व आपल्या मुलीला सर्वगुणसंपन्न बनवावे की जेणेकरून ती उद्याची आदर्श आई बनेल. आणि देशाची जबाबदार व्यक्तिमत्व बनेल या सर्व गोष्टींची समज आल्यावरच लग्नाचा निर्णय घ्यावा व योग्य त्या खात्री करूनच जोडीदार निवडावा.
अंगणवाडी क्षेत्रामध्ये काम करत असताना मला अशा कितीतरी गोष्टींचा अनुभव आले आहेत. कमी वयात मुलींची लग्न होणे, मुली मुलांसोबत पळून जाणे, विभक्त कुटुंब पद्धती, अनुवंशिक आजार, अज्ञान, अंधश्रद्धा, घरातील नकारात्मक वातावरण, किशोर वयातील मुलांना आई-वडिलांचे प्रेम नाव मिळणे, मुलांमध्ये न्यूनगंड असणे, मतिमंद, अपंग, कुपोषणग्रस्त, ॲनिमिया ग्रस्त, या सर्व गोष्टींचे अज्ञान असल्यामुळे पुढे व्यक्तींच्या जीवनामध्ये सुख समाधान आणि आनंद येत नाही आणि मग ते नशिबाला दोष देत बसतात या सर्वाचे मूळ गर्भात. बाळ गर्भात असताना सुरुवातीपासूनच त्याच्यावर सूसंस्कार केले. आणि गर्भात असताना पासूनच त्याचा लगाम आईच्या हातात असेल तर एकाच मार्गाने तिला त्याला पुढे घेऊन जाता येईल आणि म्हणूनच….
समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी स्री जागृत होणे आवश्यक आहे आणि एकदा का स्त्रीची प्रगती झाली की कुटुंबाची प्रगती होते. मग गावाची प्रगती होते. आणि अशाप्रकारे आपण उद्याची आधुनिक पिढी भारतरत्न पिढी घडवू शकतो. पंडीत जवाहर लाल नेहरूंनी म्हटले आहे..!
माझा ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्याबद्दल मनःपूर्वक आभार हा ब्लॉग तुम्हांला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा
अशीच आणखीन नवीन नवीन माहिती मिळण्यासाठी२१ व्या शतकातील गर्भसंस्कार हा फेसबुक ग्रुप खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जाईन करा.





विवाहपूर्व व विवाहोपरांत समुपदेशन खुप उपयोगी असते, त्यामुळे जुळवुन घेणे सोपे होते, घटस्फोट टळतात
उत्तर द्याहटवा