तुम्हाला? माहिती आहे का?की गर्भाच्या शरीरातील कार्य करणारया सर्व यंत्रणा विकसित झालेल्या असतात आणि तो अक्षरशः, व्यवस्थित जीवन जगणारा फक्त आकाराने लहान असणारा एक 'मनुष्य' असतो. हे एक जाणीवेतील मेंदू शास्त्र आहे. तुम्हालाही जाणून घ्यायची नक्की इच्छा झाली असेल होय ना..!
तर मग हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे . त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत वाचा.
नमस्कार 🙏अलका शिंदे..
गर्भसंस्कार मार्गदर्शक अँड सेल्फ कोच २१ व्या शतकातील गर्भसंस्कार या प्लॅटफॉर्मची संस्थापिका मला येत्या पाच वर्षात एक लाख गर्भवतींच्या जीवणामध्ये सकारात्मक बदल घडवून त्यांच्या गर्भातील बाळावर सुसंस्कार करायचे आहे त्यांना सुदृढ सर्वगुणसंपन्न आणि सक्षम असे देशाचे नागरिक मला घडवायचे आहे आणि हा माझा ध्यास आहे..!
अकाली प्रसूती होऊनही जीवंत राहू शकलेले जगातील सर्वात लहान मुल, हे आठरा आठवड्यांचे अकाली जन्मलेले मूल आहे. (म्हणजे गर्भावस्थेचे फक्त साडेचार महिने झाले असतानाच जन्माला आलेले). पाचव्या महिन्यापासून पुढे अकालीप्रसूतीने जन्माला आलेली बालके, प्रगत देशांमध्ये जगवली जाऊ शकतात. अर्थात अशा अपरिपक्व अवस्थेत झालेल्या जन्मामुळे बालकांचे होणारे शारीरिक व मानसिक नुकसान, पूर्णपणे टाळता येणे शक्य नसते.
अशा अकाली प्रसूती होण्यामागच्या,माता आणि गर्भ यांच्याशी निगडीत, मानसिक आणि शारीरिक कारणांना आधीपासूनच चार हात दूर ठेवणे आणि निर्माण झालेल्या कारणांचे संभाव्य दुष्परिणाम टाळणे हे गर्भसंस्कार उपक्रमाचे महत्त्वाचे अंग आहे
गर्भातील संवेदना
गर्भाशयातील साडेचार महिन्यांचे बाळ गर्भाशयातील पाण्यात (गर्भोदक किंवा अम्नीओटिक फ्लूइड) मिसळलेल्या गोड, आंबट किंवा तीखट चवीच्या पदार्थांना, चेहर्याचे हावभाव बदलून प्रतिसाद देते, पसंती किंवा नापसंती दर्शवते असे अनेक प्रयोगांमध्ये संशोधकांना आढळले आहे.
पाचव्या महिन्यात , गर्भिणी माता आनंदी, प्रसन्न झाली की बाळ लाथ झाडून आणि विशिष्ट पद्धतीने अंग वळवून खुशी व्यक्त करते. साधारण ५ व्या महिन्यापासून, गर्भाच्या गर्भाशयातील दिनचर्येमध्ये, • क्रियाशील असण्याचा काही काळ, • तंद्रीसारख्या, आळसावलेल्या अवस्थेतील काळ (period of drowsiness) आणि • झोपेचा काळ असे वेगवेगळे कालावधी असतात. झोपेच्या विशिष्ट सवयी आणि जाग-झोपेचे ठरावीक वेळापत्रक सुद्धा असते.
न्यूयॉर्कमधील 'अल्बर्ट आइन्स्टाईन मेडिकल कॉलेज'चे डॉ. डॉमिनिक यांच्या मते, सातव्या महिन्याच्या शेवटी मेंदूच्या सुनिश्चित अशा जीवनाची सुरूवात होते. पुढे आयुष्यभर मेंदूला साधारण त्याच विशिष्ट जीवनशैलीचे अनुसरण करणे सोयीचे आणि सोपे जाते.
झोपेत डोळ्यांच्या पापण्या बंद असताना, अनेकदा बुबुळांची हालचाल होत असते. या हालचालीवरुन झोपेचे दोन प्रकार केले आहेत. REM झोप आणि NREM झोप. यापैकी REM झोप ही, स्वप्न पडत असल्याची द्योतक आहे.
मेंदूचे शास्त्र
माणूस कोणताही अनुभव घेतो, त्या वेळी त्याच्या मेंदूतील ठरावीक न्युरॉन्स (मज्जातंतू) विद्युतधारा निर्माण करतात आणि ते एकमेकांना जोडले जातात. गर्भावस्थेच्या सहाव्या महिन्यापर्यंत,बाळाच्या 'ईईजी' (Electro-encephalogram) (मेंदूमधील विद्युतवहनाचा आलेख) च्या सहाय्याने, बाळ झोपले आहे की जागृत आहे हे ओळखता येते. एवढेच नव्हे तर आरईएम झोप (जी स्वप्नांची सूचक आहे) आणि एन.आरईएम झोप (स्वप्नरहित गाढ झोप) यामधला फरक देखील ओळखला जाऊ शकतो.
"जन्मानंतरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत, मूल बहुतेक वेळा झोपते आणि या काळात, स्वप्नयुक्त झोपेचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ८० ℅ असते. झोपेचे आणि त्याबरोबर स्वप्नांचे प्रमाण हळूहळू कमी होत जाते. प्रौढ होईपर्यंत एकूण झोपेच्या केवळ २०% झोप स्वप्नयुक्त असते.
स्वप्ने ही मेंदू,( म्हणजेच मनसुद्धा ) कार्यरत असल्याची निदर्शक आहेत. आणि कोणतेही स्वप्न ही जागृतावस्थेतील अनुभवांचीच पुनरावृत्ती असते. त्यामुळे गर्भाला पडणारी स्वप्ने, ही त्याच्या जागृतावस्थेतील अनुभवांशी संलग्नच असली पाहिजेत असे अनुमान करण्यास काहीच प्रत्यवाय नाही. गर्भसंस्कारांमार्फत गर्भाला जे सकारात्मक 'अनुभव' दिले जातात, त्यांचीच स्वप्नाद्वारे उजळणी होत असली पाहिजे. गर्भावस्थेत गर्भाला येणारे नकारात्मक आणि अनिष्ट अनुभव गर्भावर कायमस्वरूपी ठसा पाडतात यात आश्चर्य वाटायला नको. असे श्री रोग तज्ञ डॉक्टर नरेंद्र लेले यांनी स्पष्ट केले आहे.
गर्भात असताना बालकाच्या मनावर नकारात्मक विचारांचे ठसे उमटल्यामुळे त्याचा बाळाच्या आयुष्यावर विपरीत परिणाम होईल याची जाणीव प्रत्येक आई-वडिलांना असावी.
आपल्या व आपल्या बाळाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून जीवनात हव्या त्या गोष्टी, सुखी आनंदी व समाधानी जीवन कोणाला नको आहे. आपले व आपल्या बाळाचे प्रभावशाली व्यक्तिमत्त्व सर्वांनाच हवे आहे.
चहूबाजूला covid-19 मुळे नकारात्मकता पसरली आहे. तुमच्यासारख्या कितेक मातांना या नकारात्मकतेच्या विळख्यातून बाहेर काढून सकरात्मक व आनंदी राहण्यासाठी तसेच बाळाच्या उज्वल भविष्यासाठी 'मी २१ व्या शतकातील गर्भसंस्कार' या लाईव्हवर्कशॉप ची सुरुवात केली आहे तुम्हाला यामध्ये सहभागी व्हायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा व फेसबुक ग्रुप जॉईन करा.
अधिक माहितीसाठी संपर्क
गर्भसंस्कार मार्गदर्शक अलका शिंदे
माझा ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्याबद्दल मनःपूर्वक आभार हा ब्लॉग तुम्हांला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा धन्यवाद ..!



छान माहिती आहे
उत्तर द्याहटवाधन्यवाद आरतीताई 🙏
उत्तर द्याहटवाखूप छान माहिती
उत्तर द्याहटवा