तुम्हाला? माहित आहे का...! जन्मपूर्व म्हणजे गर्भाशयातील बाळ फक्त आई जे खाते, पिते आणि श्वासाद्वारे ग्रहण करते त्या प्रत्येक गोष्टीचाच केवळ नव्हे, तर गर्भावस्थेच्या काळात, ती जे अनुभवते, विचार करते आणि तिला जे जे काही जाणवते त्या सर्व गोष्टींचा गर्भाशयातील गर्भावर लक्षणीय परिणाम होत असतो.विविध संशोधने, ठिकठिकाणी केली गेलेली अभ्यासपूर्ण निरीक्षणे यात तसे दाखले मिळाले आहेत. आणि हे दाखले अशी खात्री बाळगण्यास भाग पाडतात. तिची प्रसूतीपूर्व तपासणी व देखभाल, पोषण आणि शारीरिक प्रकृती यांच्याइतकीच तिच्या वैचारिक, बौद्धिक आणि भावनिक स्वास्थ्याची देखील काळजी घेणे का आवश्यक आहे. हे जाणून घेण्यासाठी माझा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा..
नमस्कार 🙏
मी आलका शिंदे गर्भसंस्कार मार्गदर्शक अंड सेल्फ कोच
"२१ व्या शतकातील गर्भ संस्कार" या प्लॅटफॉर्मची संस्थापिका...
मला येत्या पाच वर्षात एक लाख गर्भवती मातांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून त्यांच्या गर्भातील बाळावर सूसंस्कार करायचे आहेत. त्यांना सुदृढ सर्वगुणसंपन्न आणि सक्षम आज देशाचे नागरिक मला घडवायचे आहेत आणि हा माझा ध्यास आहे
या काळात मार्गदर्शनाचे महत्त्व
तणाव निर्माण करु शकेल अशा कोणत्याही परिस्थितीस धैर्याने तोंड देण्यासाठी तिला मार्गदर्शन केले पाहिजे , पतीशी आणि स्वतःच्या आईशी असणारे नाते, स्वतःच्या जन्मावेळच्या सुप्त मनात दडलेल्या नकारात्मक स्मृती, पूर्वीच्या बाळंतपणातील स्वतःचे नकोसे वाटणारे अनुभव, कमीपणाची भावना किंवा न्यूनगंड, आत्मसन्मानाची कमतरता इत्यादिंमुळे असणारी व्यक्तीगत चिंताग्रस्त मनस्थिती. या आणि यासारख्या बाबींकडे बहुतेक वेळा दुर्लक्ष केले जाते किंवा त्या लपवून ठेवल्या जातात. हे टाळलेच पाहिजे. आपल्या या प्रवासामध्ये योग्य मार्गदर्शक (गुरु) ची निवड करून आपल्या जीवनातील अशा गोष्टींचा निकाल लावला पाहिजे यासाठी गर्भसंस्कार वर्गामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. आणि हे गर्भसंस्कार सामूहिक कार्यक्रमाच्या रुपात नाही तर प्रत्येक गर्भिणीसाठी स्वतंत्र आणि वैयक्तिक व्हायला हवे. प्रत्येकाचे प्रॉब्लेम, अडचणी, मानसिकता, घरातले वातावरण , आर्थिक सामाजिक स्थिती, आहार, विहार … वेगवेगळे असतात. त्यांना सार्वजनिक स्तरावर योग्य न्याय देता येत नाही असे डॉक्टर नरेंद्र लेले यांच्या अनुभवावरून सिद्ध झाले आहे. आणि म्हणूनच सर्वगुणसंपन्न बाळासाठी बाळाच्या भवितव्यासाठी व बाळा बरोबरआपल भविष्य सुखकर होण्यासाठी योग्य मार्गदर्शक निवडून गर्भसंस्कार करून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.
भावनांचा प्रभाव
निरोगी गर्भधारणेचा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे आईला मनापासून 'मूल' हवे असणे. मनाविरुद्ध असणाऱ्या प्रेग्नंसीचे गर्भ आणि गर्भवती महिलेवर सर्वात जास्त अनिष्ट परिणाम आढळतात. सकारात्मक भावना निर्माण करण्यात गर्भसंस्कारांची महत्त्वाची भूमिका आहे
गर्भवती महिलेस गरोदरपणाच्या तिच्या भावनांबद्दल बोलण्यास प्रोत्साहित केले पाहिजे आणि काही प्रमाणात नकारात्मक भावना असणे हे स्वाभाविक असून गर्भसंस्कारांचे नियमित अनुसरण केल्याने त्यावर मात करता येते हे तिला दाखवून दिले पाहिजे. गर्भवती होणारी प्रत्येक स्त्री प्रत्येक वेळी स्वभावतःच आनंदी आणि अति उत्साही असतेच असे काही नाही.
गर्भवती स्रीला तिच्या भावनांविषयी तिच्या पतीशी संवाद साधण्यासाठी आणि गर्भसंस्कार वर्गामध्ये स्वतः बरोबर पतीलाही सहभागी करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. तिला सतत आठवण करून दिली पाहिजे की तिचे पोटातले बाळ संवेदनशील आहे, त्याला भावना आहेत आणि आई काय करते याविषयी ते जागरूक आहे. जन्मापूर्वी त्याला त्याच्या आईकडून सकारात्मक उर्जेसह भावनिक पोषण आवश्यक आहे.
संवादाचा प्रभाव
बाळ जन्मापूर्वीच म्हणजे बाळ आईच्या गर्भात असताना आईला मुलांशी सुसंवाद साधण्यास जितकी मदत करता येईल तितका तिचा तिच्या बाळाशी प्रेमयुक्त नाते संबंध अधिक दृढ होऊन प्रसुती दरम्यान व नंतर तिला कमी गुंतागुंत होते. हे निर्विवाद सत्य आहे. या बॉण्डिंग चे गर्भाच्या आणि त्या भावी व्यक्तीच्या विकासात अतिशय महत्त्व आहे. तिने आणि तिच्या नवऱ्याने तिच्या पोटातल्या बाळाशी बोलावे, पोटाला स्पर्श करावा, पोटावर हलकेच टिचक्या मारून बाळाला खेळवावे, त्याच्यासाठी गाणी गावी, त्याला योग्य असे संगीत ऐकवावे. या गोष्टी अवघड नाहीत. काही काळापूर्वीपर्यंत, आधुनिक विज्ञान आणि आधुनिक डॉक्टर(मुख्यतः आधुनिक प्रसूतितज्ञ), या पद्धतींची थट्टा करायला लागण्यापूर्वीपर्यंत, स्त्रिया शतकानुशतके या गोष्टी करत आहेत. आयुर्वेदात हजारो वर्षांपूर्वी या गोष्टी सांगितल्या आहेत. आधुनिक विज्ञानाला आता या गोष्टींमागील 'शास्र' समजू लागले आहे. आपण आता जबाबदारीपूर्वक वैद्यक शास्राच्या नावाखाली, स्रीच्या नैसर्गिक प्रवृत्तीमध्ये हस्तक्षेप करणे थांबवले पाहिजे आणि त्यांना अधिक सकारात्मक गर्भावस्थेचा आणि प्रसूतीचा अनुभव घेण्यास मदत केली पाहिजे.
गर्भाचे मन व मेंदूचा विकास
विकसनशील बाळासाठी आईचा आहार महत्वाचा आहे,याविषयी कुणीही शंका घेण्याचे काही कारण नाही.परंतु आज डॉ होफर आणि इतर अनेक वैज्ञानिकांच्या अभ्यासावरुन, आहाराबरोबर,इतर अनेक घटकांचा गर्भावर प्रभाव पडत असल्याचे दिसून येते. आईकडून गर्भापर्यंत पोचणारे, वर्तणूक, संवेदना, मानसिक खळबळ, भावना आणि विचार या रुपातले संकेत, गर्भाशयातल्या इवल्याशा बाळाला अनुभवांच्या आदिम जगात बुडवून टाकतात आणि त्याच्या मनाच्या विकासाला सतत दिशा देत रहातात.
गर्भसंस्कारांतर्गत बाळाचे मन व मेंदूचा विकास यांच्याशी संबंधित प्रत्येक घटक लक्षात घेऊन मातेचा आहार, विहार, विचार, दिनचर्या, या सर्व गोष्टीं करून घेतल्या जातात. त्यामुळे एक सर्वगुणसंपन्न व सक्षम बालक बनण्यास मदत होते.
२१ व्या शतकातील गर्भसंस्कार कोर्समुळे बाळाच्या व मातापित्यांच्या शारीरिक-मानसिक भावनिक बदलांसाठी शारीरिक अडचणी, मानसिक ताण तणाव आर्थिक अडचणी दूर होत आहे. आणि एक सकारात्मक वातावरण बाळाच्या विकासासाठी निर्माण होत आहे.
चहूबाजूला covid-19 मुळे नकारात्मकता पसरली आहे. तुमच्यासारख्या कितेक मातांना या नकारात्मकतेच्या विळख्यातून बाहेर काढून सकरात्मक व आनंदी राहण्यासाठी तसेच बाळाच्या उज्वल भविष्यासाठी 'मी २१ व्या शतकातील गर्भसंस्कार' या लाईव्हवर्कशॉप ची सुरुवात केली आहे. तुम्हाला यामध्ये सहभागी व्हायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा व फेसबुक ग्रुप जॉईन करा. व माझ्याशी संपर्क साधा..
माझा ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्याबद्दल मनःपूर्वक आभार हा ब्लॉग तुम्हांला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा
धन्यवाद...!





Khup sunder👌👌👌
उत्तर द्याहटवाThanks
उत्तर द्याहटवाखूपच छान मार्गदर्शन अलका ताई
उत्तर द्याहटवाThanku uc बेटा...!
उत्तर द्याहटवाखुपचं छान मार्गदर्शन करता आम्हाला असणं मार्गदर्शन नेहमी इथुन पुढे करत रहा.....आणि १ml सबस्क्राइबर व्हावित अशी देवाकडे प्रार्थना करते...thnx madam
उत्तर द्याहटवाKhoop chan information 👌
उत्तर द्याहटवाThanku all my dear friend 🙏
उत्तर द्याहटवा