वैवाहिक जीवनात पदार्पण करताना...
लग्न होऊन मुलगी सासरी आली कितीला नवीन घराची ती त्या नातेसंबंधाचे तिथल्या रुढी-परंपरांशी जुळवून घ्यायचं असतं या सर्व गोष्टींचा तिच्या मनावर ताण असतोच लग्नाआधी ती जरा बिनधास्त असते. चिमणीच्या पिल्लाला नुकतेच पंख फुटले की, त्याला वाटायला लागतं मी आता उडू शकतो. घरट्या बाहेर पडू शकतो, आकाशात उंच भरारी घेवू शकतो. अगदी तसंच असतं या वयात. हे वय असतं नविन आकार घेण्याचं, नविन घडणीच. बालपण आणि तारुण्य यांच्या मधला हा काळ. या वयात खूप सारे बदल होतात. वागण्या-बोलण्यात बदल होतात. विचार करण्याची पद्धत बदलते. बोलण्यात बदल होतात. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. एवढंच नाही तर त्यांना तेच बरोबर आहे असं वाटतं जे ते विचार करतात, बघतात आणि वागतात.
कुटुंब हा समाजाचा पाया आहे आणि विवाह हे कुटुंब उभारण्याची पहिली पायरी होय त्यामुळे जीवनातील हे सर्वात महत्त्वाचे पाऊल टाकताना दोन्ही साथीदार आपल्या जबाबदार्या ओळखण्यात इतपत समर्थ ही हवेत संसार सुरळीत करण्यासाठी त्यांची आवश्यक शारीरिक व मानसिक तयारी हवी विवाहानंतर कुटुंबातील सुसंवाद टिकविण्यासाठी पती-पत्नींमध्ये परस्परांना तसेच इतरांना समजून घेण्याची प्रवृत्ती असणे आवश्यक आहे प्रेम परस्पर विश्वास आदर समर्पणाची भावना यातून एक आदर्श विवाह जोडपे बनते व एक जबाबदार व्यक्ती पडण्यास अनुकूल वातावरण कुटुंबात तयार होते आणि अशा कुटुंबाला मुळेच समाजाची जडणघडण होते . त्यात पालकांचीही (घरातील ज्येष्ठ मंडळींची) जबाबदारी अतिशय महत्त्वाची असते. नवविवाहित मुले मुली हे वडीलधाऱ्या व्यक्तींचे अनुकरण करतात कुटुंबातील शिकवणीनुसार मुला-मुलींचे वर्तन व पुढील आयुष्यातील पालक म्हणून त्यांची भूमिका ठरत असते आणि यासाठी च
मी तुम्हांला अशा काही टिप्स सांगणार आहे, ज्या तुमच्यासाठी तर उपयोगी आहेच पण त्याचबरोबर पालकांसाठी (घरातील ज्येष्ठ मंडळी) जाणून घेणं ही गरजेच्या आहेत, मग या 15 टिप्स काय आहेत हे जाणून घेण्यासाठी माझाहा टॉपिक शेवटपर्यंत नक्की वाचा.
नाही म्हणायला शिका
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हांला नाही म्हणता यायला हवं. या वयात मुलं मुली आपल्या मैत्रीमध्ये प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतात. मैत्री म्हणजे सर्वकाही असतं आणि ही मैत्री निभावण्याच्या नादात नाही म्हणत नाहीत आणि मग पश्चाताप करतात. ते विचार करतात आपण नाही म्हंटल तर आपल्या मित्राला ते आवडणार नाही, तो नाराज होईल, त्याला आपला अपमान झाल्यासारखं वाटेल. त्याने माझ्याशी बोलणं बंद केलं तर? त्याला वाईट वाटलं तर? पण तुम्हीं असा विचार करू नका, कारण कोणत्याही नात्याचा पाया असतो विश्वास, एकमेकांना समजून घेणं. तुमच्या नकार देण्यानं तुमचा एखादा मित्र नाराज होत असेल, तो रागवत असेल तर अशा मित्रापासून दूर रहा. असं म्हणतात एक नासका आंबा सगळे आंबे खराब करून टाकतो, पण चांगले दहा आंबे त्या नासक्या आंब्याला निट नाही करू शकत. त्यामुळे मैत्री खूप विचारपूर्वक करा. तुमच्या ग्रुप मध्यें असा एखादा मित्र किंवा मैत्रीणअसेल तर वेळीच सावध व्हा. आता आपल्याला या सर्व गोष्टीपासून सजग राहणे खूप महत्त्वाचे आहे. कारण या सर्व गोष्टीचा परिणाम आपल्या व वैवाहिक जीवनावर होऊन आपले जीवन विस्कळीत होऊ नये. यासाठी स्वतहाची जीवन मूल्य ठामपणे बनविणे अतिशय आवश्यक असते.
निर्णय क्षमता भक्कम बनवा
आपल्या प्रत्येकाची काही मूल्ये असतात काय करावे अथवा काय करू नये ही जीवनमूल्ये बर्याचशा गोष्टीवर अवलंबून असतात.
१. नरमाई
२. ठामपणा/खंबीरता
३. आक्रमकता
आपल्या दैनंदिन जीवनात आपण वरील तीनही प्रकारच्या वागणूक इ कधी न कधी अवलंबतो परिस्थितीनुसार आपली वागणूक ह्या तीनही प्रकारच्या वागणुकीने पैकी ही सर्वात योग्य अशी असली पाहिजे ती म्हणजे ठामपणा/खंबीरता. आपण दुसऱ्यांचा हक्क न डावलता स्वतःच्या हक्कासाठी उभे रहावे. स्वतःचा तसेच दुसऱ्यांचा हे आदर राखणे महत्त्वाच्या असते. सकारात्मक व नकारात्मक दोन्ही भावना प्रकशित असाव्यात. आणि आपल्या वागण्यात आत्मविश्वास असावा. लक्षात ठेवा की ठामपणे बोलणाऱ्या माणसाला मान मिळतो आणि ते स्वतःच्या मूल्यांचा हि आदर राखतात.
स्वतःला ज्ञानाने सक्षम बनवा
जर तुमचे लग्न झाले असले तरी हे जडणघडणीचं वय असतं. चांगल्या चांगल्या पुस्तकांचे वाचन करा...
उदा. द-सीक्रेट(The-secret by Rhonda Bryan), यू-कॅन-हील-युवर-लाईफ(you can heal your Life-Lewis h he),
आहार व आरोग्याचे ज्ञान मिळेल अशी वेगवेगळी प्रेरणादायी पुस्तके वाचलीत तर ते ज्ञान आयुष्यभर तुमच्या सोबत राहिल, आयुष्यभर ते ज्ञान उपयोगी पडेल. तसेच सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांना आवर्जून जा.
अध्यात्म
तुम्हीं जर तुमच्या आयुष्याला आध्यात्माची जोड देवू शकलात, तर मग सोन्याहून पिवळं. आध्यात्म तुम्हांला सकारात्मक तर बनवतेच पण त्यासोबत self councious पण बनवते. कोणतंही काम करण्यापूर्वी तुम्हीं विचार करू लागता, तुम्हीं काय करताय? का करताय? आणि ते करण्यामागे काय उद्देश आहे. प्रार्थनेचा ही आपल्या दैनंदिन जीवनात सामावेश करा.
कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायला हवं ते ठरवा.
तुम्हांला त्या गोष्टींना प्राधान्य देता यायला हवं ज्या करणं तुमच्यासाठी महत्वाचं आहे. असं व्हायला नको की तुम्हीं कुणाच्यातरी प्रभावाखाली येवून काही गोष्टी करताय, तुम्हांला ठरवता यायला हवं की, सगळ्यात अगोदर कोणत्या गोष्टी ला प्राधान्य द्यायचं. उदा. समजा जर तुम्हांला एखाद्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या फोन आला उद्या छान पार्टी आहे तू नक्की ये पण एकीकडे घरातील व्यक्ती आजारी आहे आणि तिची काळजी घेण्याची जबाबदारी आपल्यावर आहे अशा वेळेला आपण नेमके कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावे. तुम्हाला ठरवता यायला हवं की यात सगळ्यात महत्त्वाचं काय.
पैशांचं योग्य नियोजन करता यायला हवं.(Make a budget for yourself):
तुम्हांला जो पॉकेटमनी मिळतो, त्याचं योग्य नियोजन करून खर्च करता यायला हवा. याचा फायदा तुम्हांला भविष्यात होईल. तुम्हीं योग्य अर्थनियोजन करू शकाल व तुमची निर्णयक्षमता ही वाढेल.
ध्यान(Meditation):
सकाळ संध्याकाळ ध्यान करा. दैनंदिन कार्यात ध्यानाला महत्व द्या. आपल्या रोजच्या आयुष्यात काही ना काही समस्या या असतातच. नवऱ्याशी जुळवून घेतानाच टेन्शन, करियर च टेन्शन, घरातील व्यक्ती अशी जुळवून घेताना नातेसंबंध टिकविण्याच टेन्शन. त्यामुळे रोज ध्यान करा, याने तुमचं मन तणावमुक्त राहील. तुम्हीं अगदी एक मिनिट पासून ही ध्यान करायला सुरू करू शकता व नंतर हळू हळू वेळ वाढवू शकता.
मी तुम्हांला कितीही म्हंटल गुलाबजाम खूप गोड असतात तरी ते जोपर्यंत तुम्हीं खात नाही तोपर्यंत तुम्हांला ते समजणार नाही. ध्यान ही असंच काहीसं... त्यामुळे तुम्हीं ही ध्यान करा व याची अनुभूती घ्या.
टी. व्ही. कमीतकमी बघा(Watch less Tv):
मी असं नाही म्हणणार की Tv बघूच नका, पण कमीत कमी Tv बघा. तुमचा आवडता कार्यक्रम, चित्रपट असेल तर आवर्जून बघा. पण Tv बघण्यावर तुमचं नियंत्रण असलं पाहिजे. Tv बघणं ही तुमची निवड(choice) असली पाहिजे, सवय(habit) नाही.
वाईट लोकांपासून दूर रहा(Keep distance from toxic people):
तुमच्या जवळपास तुमच्या यशावर जळणारे, तुम्हांला नावं ठेवणारे लोक असतील, तर त्यांच्यापासून दूर रहा. अशांसोबत भांडण, वाद घालणं म्हणजे वेळेचा अपव्यय करणं. चिखलात दगड मारलात तर तो तुमच्या अंगावर पण उडणार, त्यामुळे अशा लोकांपासून दूर रहा.
दैनंदिनी लिहा (Write a Diary):
सर्व नवविवाहित मुलींना मला ही महत्वाची टिप द्यायची आहे, की तुम्ही रोज डायरी लिहा. याने तुमचं लेखन कौशल्य तर सुधारेलचं पण तुम्हांला तुमचा राग, दुःख इ. कमी करायला मदत होईल. उदा. जर तुमचं कुणाशी भांडण झालं तर तुम्हीं ते तुमच्या डायरीत लिहू शकता. कधी कधी अशा बऱ्याच गोष्टी असतात, ज्या आपण कुणाशीच बोलू शकत नाही, पण तुम्हीं ते डायरीत लिहू शकता. यामुळे तुम्हांला खूप बरं वाटेल व त्या गोष्टी पुन्हां-पुन्हां तुमच्या मनात येणार नाहीत व त्यामुळे तुमचं मन शांत राहील.
आठवड्यातून एक दिवस म्हणजे रविवार या दिवशी सोशल मीडिया पासून दूर राहा (Distance from social media one week in Sunday
आठवड्यातून एकदा मोबाईल व सोशल मीडिया हॉलिडे घ्या आणि निसर्गाच्या सानिध्यात कुटूंबियांसोबत वेळ घालवा. त्याचप्रमाणे रात्री झोपण्यापूर्वी व सकाळी उठल्यानंतर किमान दोन तास मोबाईल पासून दूर रहा. त्यामुळे तूमची सकाळ खूप productive होईल व तुम्हांला रात्री शांत झोप ही लागेल. रात्री झोपण्यापूर्वी वाचनाची सवय लावून घ्या, कारण डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम म्हणतात, "Your habits can change your future". त्यामुळे चांगल्या सवयी जोपासा.
आरोग्य हीच खरी संपत्ती (Health is wealth):
लग्नाआधी फास्ट फूड खाण्याचं प्रमाण जास्त असते. ते आता आपल्याला कमी करायचे आहे पुढे आपल्याला आई होण्याच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचे आहे. व त्याचे गंभीर परिणाम आपल्या आरोग्यावर होतात, त्यामुळे घरचा सकस आहार घ्या. हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये, दूध आणि फळं यांचा आपल्या आहारात समावेश करा. भरपूर पाणी प्या. रोज व्यायाम आणि ध्यान करा.
याने तुम्हांला खूप उत्साहवर्धक वाटेल. भविष्यात आपल्याला चांगले काम करायचे असेल तर आपले शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले असणे गरजेचे आहे.
सहानुभूतीशील रहा(Be empathetic):
दुसऱ्यांप्रती सहानुभूती वाटणे हे एक कौशल्य आहे. स्वतःला दुसऱ्यांच्या ठिकाणी ठेवून विचार करता यायला हवा. यामुळे तुमचे सामाजिक वर्तन आणि सामाजिक कौशल्य विकसित होतात. यशस्वी होण्यासाठी दुसऱ्यांच्या भावना समजून त्या आपली कारणं आणि तर्क यांच्याशी जोडणं गरजेचं आहे. त्यामुळे होईल तेवढी सामाजिक जाणिव ठेवा, लोकांना मदत करा.
15.छंद विकसित करा(Develop a hobby):
प्रत्येकाने आपले छंद जपले पाहिजेत. मग ते वाचन असेल, गायन असेल किंव्हा मग डान्सिंग असेल वा खेळ. कदाचित पुढे जाऊन ते तुमचं profession बनू शकेल व तुम्हीं त्यात जबरदस्त कामगिरी कराल. पण बरेचदा आपण जसे मोठे होत जातो तसे आपले छंद मागे पडत जातात, पण तसं करू नका.
या टॉपिक मधूनआपण शिकलो की आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर आपला सर्वांगीण विकास होणं गरजेचं आहे या टिप्सची तुम्हीं तुमच्या आयुष्यात अंमलबजावणी केली तर मी खात्रीपूर्वक सांगते की तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतील. हे नक्कीच करून बघा. तुम्हांला तुमचा भविष्यकाळ बदलायच असेल तर तुम्हांला तुमचा आज बदलावा लागेल.
मैत्रिणींनो तुम्हाला माझे विचार आवडले असतील तर तुमच्या मैत्रिणींना देखील शेयर जरून करा, कदाचित तुमच्या एका शेअरिंग ने एखाद्याचं आयुष्य ही बदलू शकतं








