गर्भाचां प्रत्येक अवयव तयार होत असताना तो गुणयुक्त तयार व्हावा यासाठी गर्भसंस्कार अतिशय महत्त्वाचा विषय आहे. स्त्री बीज पुरुष बीज आणि आत्मा या तींहीचा संगम म्हणजे गर्भ. विभाजन किंवा ज्यामुळे बाळा मधील चेतना जाणवते तो आत्मा. हा आत्मा येतो कुठून? असा प्रश्न तुमच्या मनामध्ये होय ना...!
आपण शाळेमध्ये हा प्रयोग नेहमी करायचो आणि घरी सुद्धा करायचं तो म्हणजे एक भिंत घेऊन उन्हामध्ये त्याखाली कागद करायचं सूर्यकिरणांमुळे कागद जाळायचा. सूर्यकिरण आपल्याला दिसत नाही पण कागद मात्र नक्की जवळ असतो मग हा कागद कसा जळतो त्या ठिकाणी सूर्यकिरण एकत्र आले आणि म्हणून कागद जळाला बरोबर ना..! अशाच प्रमाणे गर्भामध्ये आत्म्याचा प्रवेश होतो. तो आपल्याला दिसत नाही परंतु जाणवतो, कळतो. आणि आत्मा जेव्हा गर्भामध्ये प्रवेश करतो तेव्हा त्या गर्भाची वाढ व्हायला सुरुवात होते. सो स्त्रीबीज व पुरुषबीज आणि आत्मा यांचं कॉम्बिनेशन म्हणजे गर्भ हे आता आपल्याला समजलं असेलच.
मुलांची अनुवंशिकता (एपी जेनेटिक्स कोड) सारखे असेल आणि एक्सप्रेशन कोड वेगळे असेल तर त्याला संस्कार म्हणतात . सारख्याच बुद्धीची मुले असली तरी त्यांच्या गुणांमध्ये बदल असतो. गुणांमध्ये बदल करून पुढच्या पिढीसाठी आपल्याला त्यांच्यामध्ये चांगले एपिजनेटीक्स द्यायचे आहे. उदा. जुळी मुलं. एकाच आईच्या गुजरात जन्म घेतलेल्या मुल दिसायला सारखे असले तरी यांचे गुणधर्म वेगवेगळे असतात. असे का..
एकाचा ग्रास्पिंग पावर वेगळा, दुसऱ्याचा वेगळा. म्हणजे प्रत्येकाचा विचार वेगळा एपीजेनेटिक्स वेगळा. जो तो त्याच्या आधीच्या अनुवंशिकतेने नुसार गुण घेऊन जन्माला येतो. तर पुढील पिढीसाठी हे एपिजनेतिक अतिशय चांगल्या पद्धतीने तयार व्हावे ते कशामुळे साध्य होईल तर गर्भ संस्कारामुळे. गर्भातील बाळाला सुदृढ सर्वगुणसंपन्न आणि सक्षम होण्यासाठी त्या पद्धतीच्या ॲक्टिविटी गर्भ संस्कार मध्ये केल्या जातात. बाळ आधीची अनुवंशिकता घेऊन आलेले असल्यास तेसुद्धा गर्भात असताना बदलता येतात. जन्म होण्याआधीच आपल्याला गर्भावर संस्कार केल्यामुळे हे करणे शक्य होते.इथे मी तुम्हाला एक उदाहरण देते.
घरी पाळलेली कुत्री (राणी) ती प्रेग्नेंट असते. तिच्याबरोबर रानात राहणारी ही त्याच काळात प्रेग्नेंट असते. दोघी नाही थोड्या दिवसात पिलं होतात. राणीची पिलं अतिशय गरीब आणि प्रेमळ असतात व रानात राहणाऱ्या कुत्रीची पिल्लू अतिशय तिखट जवळ देखील येऊ देत नाहीत हे असं का? तर रानात राहणाऱ्या कुत्रीचा अम्यागोलांडा(भावना जागृत करणारा मेंदूचा एक भाग) हा अतिशय ॲक्टिव्ह कारण तिला संरक्षण नसल्यामुळे स्वतःचं संरक्षण स्वतः करायची तिला सवय असते त्यामुळे कोणी दिसलं की त्यावर हल्ला करायचा किंवा पळून जायचे तिला एवढेच माहिती असते मग ही गर्भात असताना तेच संस्कार पडतात म्हणून फार तिखट असतात कोणी दिसलं तर त्याच्यावर हल्ला करायचा किंवा स्वतःचे संरक्षण करण्यासाठी पळून जायचं हे रानातल्या कुत्र्याच्या बाळाला शिकवावं लागत नाही. त्याउलट घरी राहणाऱ्या राणी कुत्रीचे जास्त प्रमाणात लाड होत असल्यामुळे तिला जास्त प्रेम मिळत असल्यामुळे तिची पिल्लंही तशीच बनतात. म्हणून येता जाताना माणसांना चाटणे मांडीवर बसणे लाड हे राणीच्या बाळाला शिकवावे लागत नाही. का शिकवावं लागत नाही तर ते आईच्या पोटामध्ये असताना शिकलेले असतात. रानातल्या कुत्रीचा amigolada अति जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह असल्यामुळे तिचे बाळ आहे तसेच बनले आणि घरच्या कुत्रीचा आम्ही आम्ही amigolada एकदम लेस ऍक्टिव्ह आहे. याचा अर्थ आईच्या संवेदना बाळ सूचना म्हणून पाळत व वातावरण आणि संस्काराचा परिणाम. तुमच्या लक्षात आलंच असेल की मला काय म्हणायचं आहे.
न्यूरॉन्सच्या जोडण्या होऊन, इलेक्ट्रिक वायरींगप्रमाणे किंवा कॉम्प्युटरप्रमाणे, मेंदूमध्ये आणि शरीरात, कोट्यावधी न्यूरॉन्सची असंख्य सर्किट बनलेली असतात. या सर्किटां पासूनच आपली मज्जासंस्था तयार झाली आहे.तिच्या मधून मेंदूत व शरीरात दरक्षणी हजारो संदेशांचे वहन चालू असते.आपण जे विचार करतो, कृती करतो, जे बोलतो , जे अनुभवतो, आपल्याला जे जे जाणवते, त्या प्रत्येक गोष्टीसाठी ही सर्किटस् जबाबदार असतात. 'संवेदना वाहक' सर्किट आपल्या मेंदूतील संवेदना ग्रहण करणाऱ्या तंतूंद्वारे येणारे सिग्नल मेंदूपर्यंत पोचवतात. 'आज्ञावाहक' सर्किट मार्फत आपल्या स्नायूंना आज्ञा दिली जाते. मेंदूच्या उच्च-स्तरीय क्रिया, जसे स्मृती, निर्णयक्षमता आणि आपल्या सभोवतालच्या जगाचे आकलन, यासाठी जटील आणि अत्यंत किचकट अशी सर्किट आवश्यक असतात.
जन्मापूर्वी, गर्भाशयात असतानाच, 'जीन्स' म्हणजे, 'गुणसूत्रां'च्या निर्देशानुसार साधी सर्किट्स् निर्माण होतात. गुणसूत्रे म्हणजे जीन्स. पण हे सारे 100% जीन्सवर अवलंबून असते असे मुळीच नाही. एपीजेनेटिक्स शास्त्राच्या मदतीने आता जीन्सवर मात करायला मनुष्य शिकू लागला आहे. जीन्स किंवा एपिजेनेटिक्स यांचा स्पष्ट उल्लेख केलेला आढळत नसला तरी,गुणसूत्रांच्या सदृश कार्यपद्धती असणाऱ्या 'बीज-अवयव' अशासारख्या शब्दांचे उल्लेख आयुर्वेदामध्ये सापडतात. हजारो वर्षांपूर्वी आयुर्वेदाने सांगितलेली 'गर्भिणीपरिचर्या' हा एपीजेनेटिक्सचाच युक्तीने केलेला प्रयोग आहे.
जेव्हा आपले न्यूरॉन्स आणि त्यांची कनेक्शन्स म्हणजे त्यांच्या जोडण्या, नवीन अनुभव आणि वातावरणानुसार बदलत जातात, तेव्हा ही सुरुवातीला साधी आणि गुंतागुंत नसणारी सर्किट्स बरीच क्लीष्ट व किचकट बनत जातात. हे बदल मुख्यत: गर्भावस्थेत व बालपणातच घडतात, परंतु ते संपूर्ण आयुष्यभर काही प्रमाणात सुरू राहतात.
आपल्या मेंदूतील बहुतेक न्यूरॉन्स गर्भावस्थेतच तयार होतात व जन्माच्या वेळी हजर असतात. त्यापैकी बहुतेक सर्वच आपल्या उर्वरित आयुष्यात टिकून राहतात. म्हणूनच मेंदूच्या विकासासाठी गर्भावस्थेचा आणि जन्मानंतर सुरुवातीचा (सूतिकेचा) कालावधी अत्यंत महत्त्वाचा असतो.
एखादे नवीन कौशल्य किंवा भाषा शिकण्याच्या प्रक्रियेत मेंदू, 'न्यूरॉन्सची कनेक्शनस्', मजबूत करत असतो. अगदी नवीन कनेक्शन्स निर्माण देखील करतो. प्रत्येक नवीन अनुभव व अनुभवाची पुनरावृत्ती, मेंदूमध्ये बदल घडवतो, आकार देतो.विशेषतः गर्भावस्थेत व जन्मानंतर अगदी सुरुवातीच्या काळात(मातेच्या सूतिकावस्थेत). त्यामुळेच प्रत्येक व्यक्ती ही इतर सर्वांपेक्षा 'वेगळी', आणि 'एकमेवाद्वितीय' अशी असते.
गर्भसंस्कारांचे महत्त्व स्पष्ट करणारे एक फार सुंदर वाक्य इथे नमूद करावेसे वाटते.
"जन्मापूर्वी, 'अनुभव' मेंदूला जसा आकार देतात. तसा, जन्मानंतर, मेंदू अनुभवांना वळण देण्यास समर्थ होतो."
गर्भामध्ये, मेंदूच्या विकासादरम्यान, न्यूरॉन्सची भरमसाट, अशी, आवश्यकतेपेक्षा कितीतरी जास्त वाढ होते. पण लवकरच, मेंदू त्या अतिरिक्त पेशी काढून टाकतो. मेंदूच्या कार्यकारीत्वासाठी आवश्यक असलेली आणि वारंवार वापरली जाणारी कनेक्शनस् टिकून रहातात. वापरात नसलेले न्यूरॉन्स आपोआपच नष्ट होतात. या प्रक्रियेला 'प्रुनींग' (pruning) असे म्हणतात. गर्भाच्या मेंदूमधली अधिकाधिक कनेक्शनस् टिकवणे आणि वाढवणे हे गर्भसंस्कारांच्या मार्फत साध्य केले जाऊ शकते. बाळाच्या मेंदूला आईच्या माध्यमातून बौद्धिक आणि मानसिक व्यायाम दिले जातात व मेंदूला निरोगी ठेवून त्यांचा जास्तीत जास्त विकास साधला जातो. बाळाला जन्मानंतर आयुष्यभर याचा शिदोरी म्हणून उपयोग होतो.
























